‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !

Submitted by हेमन्त् on 15 August, 2015 - 11:36

भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता.
आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो

हे पहा त्यांची मुक्ताफळे

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those...

‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा
Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात 'समकालीन साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

देशी भाषांची जननी संस्कृत नाही

'देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून ​बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,' असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

----------------------

आपले मत काय ?

बाय द वे यांना कॉन्व्हेण्ट शाळा अपेक्षित आहेत कि सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा ? यांना त्यातला फरक तरी माहित आहे ना ? सध्याच्या अनेक चांगल्या शाळा जसे कि जमनाबाई , मानेकजी , रायन , DPS , पोदार या कॉन्व्हेण्ट नाहीत.

आणि माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते. भले मराठी माध्यमातून अनेक महान लोक निघाले असतील .. पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ , इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !) , सुपर मोडेल ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users