स्वातंत्र्य दिन

Submitted by joshnilu on 15 August, 2015 - 05:59

आज सुचलेले काही मुक्तछंदातील विचार
काहीना पटतील
काहीना विद्रोही वाटतील
पण प्लीज आपला अभिप्राय नक्की दया
.
15 ऑगस्ट सूर्योदय झाला
69 वा स्वातंत्र्यदिन उजाडला
पण माझ्या बोलण्यात वागण्यात
नेमका काय बदल झाला ?
.
स्वातंत्र्य होतेच की आधीपासून
बोलण्याचे,विचार मांडण्याचे
समाजात चुकीचे घडते दिसुनही
त्याकडे कानाडोळा करण्याचे
.
स्वातंत्र्य आहेच की सर्वाना
खोटे वागुन व्यवहार करण्याचे
सर्व मिळून खाऊ वृत्तीला
एकसाथ जोपासण्याचे
.
स्वातंत्र्य आहेच की आपल्याला
चांगले घडत असूनही
वाईट घडलेले जास्त बघण्याचे
नकारार्थी मानसिकता जोपसण्याचे
.
स्वातंत्र्य आहे लोकप्रतिनिधिना
स्वार्थी राजकारण करण्याचे
लोकहिताचे निर्णय न घेता
282 करोड़ वाया घालवण्याचे
.
स्वातंत्र्य आहे शेतकऱ्यांना
आत्महत्या आत्मक्लेश करायचे
किंवा मग सरकार भरोसे न राहता
स्वतःच शेती संवर्धन करण्याचे
.
स्वातंत्र्य आहेच की जनतेला
नवीन पिढीची दिशा ठरवण्याचे
संस्कार करून येणाऱ्या पिढीला
स्वंयपुर्ण बलवान बनवण्याचे
.
स्वातंत्र्य तर आहेच सर्वांकडे
आज अचूक वेळ आलीये
कसा अर्थ काढायचा व कसे
वागायचे हे ठाम ठरवण्याची
.
-- निलेश जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users