तडका - वंदन तिरंग्याला

Submitted by vishal maske on 14 August, 2015 - 21:38

वंदन तिरंग्याला

भक्ती-भावाने गात राहू
तिरंग्याचे गुण-गाण सदा
मनात राहील उंचच उंच
या तिरंग्याची शान सदा

मना-मनातुन मना-मनात
राष्ट्रप्रेमाचे स्पंदन भरू
अबाधित राखुन एकात्मता
तिरंग्याला हे वंदन करू

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users