तडका - दुष्काळी पर्यटन

Submitted by vishal maske on 11 August, 2015 - 21:30

दुष्काळी पर्यटन

वरचे आलेत फिरून जातील
खालचेही येऊन फिरून जातील
दुष्काळी भागाच्या दौर्‍यासाठीही
कुणी उदंड खर्च करुन जातील

आता नव्या-नव्या दौर्‍यांचीही
रोज-रोज नविन खबर येते
दुष्काळाच्या नावानं का होईना
पण पर्यटन मात्र जबर होते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users