स्ट्रोलर/ प्रॅम कम कारसीट घेण्याबद्दल सल्ला हवा आहे

Submitted by प्रज्ञा९ on 10 August, 2015 - 05:56

मला स्ट्रोलर-कम-कार सीट घ्यायची आहे. कशी घ्यावी याबद्दल टिप्स/ सल्ले हवे आहेत. कुठला ब्रँड, कम्फर्टचा विचार करून कशी असावी/ नसावी वगैरे. माझी मुलगी दीड वर्षाची आहे.

अ‍ॅमेझॉनची कूपन्स आहेत, त्यामुळे शक्यतो ऑनलाईन तिथेच घ्यायची आहे, पण नुसती चित्रं बघून काहीही कळत नाहिये. नॅनो मधे नीट ठेवता येईल अशी कारसीट हवी.

शंका- एकदा ती कारसीट म्हणून फिक्स केली की पुन्हा काढता-घालताना कितपत कटकट होते? कारण कारसीट म्हणून कमी( वीकेंड्सना बहुतेककरून), नि सध्या तरी रोज स्ट्रोलर म्हणून जास्त वापर होणार आहे. मुलगी छान धावते सगळीकडे, पण त्यामुळे तिला घेऊन बाजारात जायचं म्हणजे मला गैरसोयीचं होतं.

तर प्लीज मला सल्ले द्या. इथे न विचारलेली पण आवश्यक अशी माहिती असेल तर तीही शेअर करा.

धन्यवाद. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलगी धावते पळते आहे सगळीकडे तर कारसीटमधे, स्ट्रोलरमधे बसवल्यावर किती वेळ बसून राहील? मला कारसीटबद्दल काहीच माहीती, अनुभव नाही.

आशूडी, ती शंका मनात आहेच! Sad
पण तिला कडेवर घेऊन रोज बाजारात जायचं म्हणजे माझे हात भरून येतात. ती चालते पण थोडी चालली की कंटाळते, कारण मग पळायचं असतं. आमच्या गल्लीतसुद्धा ट्रॅफिक असतं, त्यामुळे मला टेन्शन. मेन रोड तर वाहता रस्ता आहे.
आणि कारसीट वगैरेही अनुभव नाहीच. म्हटलं तर हाही प्रयोगच.

आमच्याकडे कारसीट आणि स्ट्रोलर दोन्ही आहेत आणि दोन्ही गोष्टि प्रचंड उपयोगी आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कारसीट गरजेची आहे. ती लावायला काढायला दोन मिनिटेही लागत नाहीत. एकदम सोपे आहे.

प्रॅम मुलीला फिरवायला, बाजारहाट करायला सोबत नेताना, शॉपिंगला सोबत नेताना, इथे बर्‍याच हॉटेलांत बेबीचेअर नसतातच तेव्हा तिला टेबलाशी बसवायला, कुठल्याही समारंभाला गेलो तर तिला अधूनमधून बसवायला, विमानतळावर अशा असंख्य वेळी कामाला येते.

तुम्ही मॉम अँड मी वगैरे दुकानांत जाऊन प्रत्यक्ष त्या गोष्टी फीचर्स इ. पाहणं बरं! मग ब्रँड मॉडेल ठरले की ऑनलाईन घेता येईल. आमच्या दोन्ही गोष्टींचा ब्रँड graco!

हलक्या वजनाची कारसीट उपयोगी पडते.
खास करुन कारमध्ये एकटे मुलाबरोबर बरेचदा जात असल्यास चांगलीच. आणी घरी त्याचा पाळणा वापर करुन झोपवायला.
पण मुलं एक वर्षाची होईपर्यंतच घरी वापर होतो, नंतर ती स्वतः उठून बसतात आणि कारसीट उभी होते.६ महिने-१ वर्ष वाली मुले अखंड कडेवर घेण्यापेक्षा कारसीट मध्ये ठेवून बास्केट सारखे घेऊन जाता येते.(वयाने मोठ्या लोकांना पाहायला हे दृष्य आवडत नाही:))

तुम्ही मॉम अँड मी वगैरे दुकानांत जाऊन प्रत्यक्ष त्या गोष्टी फीचर्स इ. पाहणं बरं! मग ब्रँड मॉडेल ठरले की ऑनलाईन घेता येईल. >> सध्या असंच करायचं ठरलंय. बाळाच्या कुठल्याही खरेदीचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे प्रश्न काय पडले पाहिजेत हेही कळत नाही कधीकधी Proud

अवांतरः

बाळी झोपली म्हणून मी खाली जाऊन १ कळशी पाणी आणलं. वर येईपर्यंतच्या मोजून ४ मिनिटांत बाळी उठली, मी घरात नाही हे बघून मुख्य दाराशी आली, नि आतली स्लाइडिंगची कडी लावून टाकली चाळा म्हणून. बाकी घरातली सगळी दारं आतून बंद. लॅच की होती माझ्याकडे, पण हिने आतली मुख्य कडीच लावल्यामुळे नि पुन्हा उघडता न आल्यामुळे १५ मिनिटं हलकल्लोळ! Uhoh सुदैवाने शेजारच्या घरातून आमच्या बाल्कनीत येऊन तो दरवाजा आतून बंदच असूनही जोरात ढकलल्यावर कसातरी उघडला. नाहीतर मेजर तोडफोड करावी लागेल अशी अवस्था, आणि त्याहून जास्त म्हणजे बाळी आतमधे रडून चेरीरेड झालेली! Sad

हे असे उद्योग ती करेल हे माझ्या डोक्यातही आलं नाही. त्यामुळे कधीकधी काय विचार करून खरेदी करावी असं वाटतं.

Uhoh

कडी आतून लावणे हा उद्योग लहान मुलं एकदा तरी करतातच.आणि आपण प्रचंड अस्ताव्यस्त/बेसावध्/पैसेकिल्लीमोबाईल काही न घेता बाहेर असताना.
आमच्याकडे मी लायझॉल टाकून बाथरुम धूत असताना आमच्या पात्राने बाहेरुन कडी लावून घेतली होती आणि साबा अजय अतुल चा कर्यक्रम मोठ्या आवाजात पाहत असल्याने त्यांना आरडा ओरडा ऐकूच आला नाही बराच वेळ:)

तुम्ही quikr किवा OLX वर पण येकदा पहा . मला ६-७ वर्षापूर्वी येक अमेरिकन कार सेअत फार फार स्वस्त मिळाली होती . ती फक्त कार सेअत म्हणूनच वापरता यायची .

पण ती लेकीला काही आवडली नाही त्यामुळे फार उपयोग झाला नाही . तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ती मागे लावायची आस्ते . मला अनेकदा लेकीला घेवून एकट्याने फिरावयास लागायचे आणि तिला मागे बसने मुळीच आवडायचे नाही . ती सिट तशी पुढे हि लागायची . माझ्याकडे wagon R होती .

माझेकडे कार सिट आहे व जुळ्या मुलांसाठी घेतलेली बाबागाडी सुद्धा आहे. आता नातवंडं मोठी झाल्याने दोन्हींचा काही उपयोग नाही. कार सिट सहजपणे काढता येते व बसविता येते. मी बोरिवली येथे रहातो. हवी असल्यास सम्पर्क साधावा. व्यनि पाठवावा.