१ दिवसात नागपूर मधील काय पहावे

Submitted by bvijaykumar on 8 August, 2015 - 01:11

ऑगस्ट च्या शेवटच्या हप्त्या त ' नागपूर ' ला जावे लागतंय .... १ दिवस नागपूर पहाण्यासाठी देता येईल ..
- येण्या-- जाण्याचे रेल्वे -- विमान असे रिजव्ह्रेशन झाले आहे ..
१) १ दिवसात नागपूर मधील काय पहावे
२) विमानतळ शहरापासुन कि ती लांब आहे
३) चूकवू नये असे काही ... नागपूर शहराविषयी सांगावे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेशीमबाग किंवा दीक्षाभूमी : आवडीनुसार . अन्यथा नागपुरातही काही नाही बघायला. सावजीचे मटण आहे पण त्यातही फार डुप्लिकेशन

... ध न्य वा द ! ...रॉबीनहूड ...
मला रेशीमबाग विष यी अधिक माहिती हवी आहे ... दीक्षाभूमी बघणारच आहोत
सावजीचे मटण चे विशेष हॉटेल असेल तर जरुर सांगावे ...

रमन विज्ञान केंद्र मस्त आहे..त्यात पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम हि फिल्म अवश्य पाहावी..
महाराजबाग सुद्धा छान आहे..
कोराडी पावर प्लांट च्या तिथ देवीच मस्त मंदिर आहे.. पण विमानतळ एका टोकाला आणि कोराडी एका टोकाला आहे..
टेकडी मंदिर..
फन अ‍ॅंड फुड
च्रेझी कॅसेल
फुटाळा लेक वगैरे

रॉबिनहूड Lol
खरंय नागपुरला "प्रेक्षणीय स्थळं" अशी काही नाहीत. तिथली हवाही अशी नाही की दिवसभर उन्हातान्हात भटकून तुम्ही फार काही पाहु शकाल. एवढा घाम गाळून बघायचेच ठरवले तरी तशी मेहनत करुन बघण्यासारखं खरंच काही नाही.
तुम्ही कुठे रहाणार आहात? विमानतळ शहरापासुन म्हणजे समजा सीताबर्डीपासुन १२-१५ किमी आहे. पण वेळ फार नाही लागत. फारतर अर्धा तास कारने.
रेशीमबागेत बघण्यासारखे काये? तुम्हाला संघाविषयी उत्सुकता असेल तर जाता येईल. तिथे हेडगेवाराम्च्या स्मॄतीप्रित्यर्थ "स्मृतीमंदीर" आहे. शाळा आहे.

असली सावजी सगळे पुर्व नागपुरात आहेत अशी माझी जुनी माहिती आहे. रेशीमबाग पुर्व नागपुरातच आहे. त्यामुळे तिकडे गेलात तर मग भरपूर सावजी सापडतील. Wink त्यापैकी सध्या कुठला सावजी फॅशनमध्ये आहे ते माहीत नाही. Happy

तुम्हाला आवड असेल तर सकाळी टेकडीच्या गणपती मंदिरात जाता येईल. मग तिकडुन निघून बर्डीवर मेन मार्केटमध्ये शॉपिंग+खानपान (काय ते नागपूर खादाडी धाग्यावर पहा). करता येईल. मग हवंतर दीक्षाभुमिला जाता येईल. (मला टाइमिंग माहीत नाही तिथले). संध्याकाळी फुटाळा लेकला जायचं आणि परत येताना शंकरनगर चौकातल्या नवीन हल्दीराममध्ये जायचं (नाव विसरले.) . तिथे असंख्य मिठाया आणि बाकी बरंच काही आहे. त्यामुळे ऑल्मोस्ट जेवणच होईल.

मी नागपुरला गेले की कपडे खरेदी अजिब्बात मिस करत नाही. बेस्ट क्वालिटी, रिझनेबल किमती आणि प्रचंड व्हरायटी. सगळ्या लेटेस्ट फॅशन्स. त्या पुण्यात मला वर्षभरानी आणि नंतरही वर्षानुवर्षं दिसतात. कोतबो.

ध न्य वा द ! ...नताशा ....
======================================================================
तुझ्या माहितीतुन बरेचसे नागपूर पर्यटन करता येईल .......... ध न्य वा द !

पुडाची वडी या धाग्यावर मृण्मयी नी दिलेले - बर्डी (सीताबर्डी)ला अभ्यंकर रोडवर, मुंजे पुतळ्याजवळ 'सुरुची' नावाचं दुकान आहे. आजुबाजूच्या हल्दीराम आणि इतर दुकानांच्या गर्दीत हे अगदी बकाल आणि छोटसं दुकान वाटतं. (वर्षानुवर्षं ते तसंच आहे.) तिथून पुडाच्या वड्या मागवता येतील. प्रवासात न्यायला स्पेशल पॅकिंग करतात. भरपूर तिखट, अजीबात मिर्च्या नकोत असल्या स्पेसिफिकेशन्ससगट करून देतात. वड्या आपल्यासमोर प्याक करतात.

इथेच मोठं हल्दिरामचं दुकानही आहे जवळच. हीरा स्वीट्स पण आहे. हीरा स्वीट्स मध्ये सोनरोल्स चांगले मिळतात. पर्सनली मला सोनपापडी अन सोनरोल हल्दिरामपेक्षा हीरा स्वीट्सचे जास्त आवडतात.

बाकी तुम्ही जुन्या नागपूरात वेळेअभावी नाही जाणार बहुतेक नाहीतर इतवारी, महाल या भागांत बरंच मार्केट आहे. इतवारीमध्ये अजूनही बहुतेक लाल ईमली चं एक दुकान आहे, त्यांच्याकडे चांगल्या प्रतीचे लोकरीचे कपडे मिळतील.

ध न्य वा द ! ..... योकु
============================================================
पुडाच्या वड्या घे णा र च ! ... जुन्या नागपूरात सायंकाळी जाता येईल का ? ... संध्याकाळ चे काही तास हातात आहेत ...

बर्‍यापैकी गर्दी राहील. सगळ्याच शहरांत असते तशी. मुख्यम्हणजे महाल, इतवारी एका भागांत आहे अन एअरपोर्ट बरोबर विरुद्ध दिशेला. त्यामुळे वेळ होईलच असं नाही. बर्डी भागात फिराल तरी बरंच काही आहे पाहायला.

जुनं नागपूर म्हणजे महाल, इतवारी वगैरे भाग रेशीमबागेपासून जवळ आहेत. रेशीमबागेत गेला तर जाऊ शकता. पर मेरी मानो, उधर मत जाओ. गल्ल्याबोळात हरवून जाल.

काही तास हाती असल्यास सरळ जिथे उतरताय तिथल्या यजमान/मालकांस विचारा अन तुमच्या आवडीनिवडी सांगा ! ते जास्त उत्तम सुचवतील

भर मे महिन्यात जावे. एका दिवसात बरेच काही पाहता / अनुभवता येईल
=============================================================
.
..
.
.
..

.
तुमचा टोला समजला ...

एका टूरिष्टाला खास नागपूरला जाऊन कसेही करून पहावेच असे नागपुरात काय आहे? जसे तुम्ही वरोर्‍याला आमटेंचे कार्य पहायला जाता. पवनार्ला केवळ विनोबा आश्रम पहायलाच जाता शिर्डीला साइ दर्शनालाच जाता. तसे केवळ याच गोष्टीसाठी नागपूरला जावे असे काय आहे नागपुरात? दीक्षाभूमी आणि रेशीमबाग हे तुम्हच्या श्रद्धांवर अवलंबून आहे. खाणे पिणे हे अनुषंगिक बाबी आहेत.