वाढदिवस- ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’

Submitted by निक्षिपा on 7 August, 2015 - 07:38

वाढदिवस- ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’

जिथे प्रश्न... तिथे मायबोली. या उक्तीला अनुसरून मायबोलीकरांकडून एक मदत हवी आहे.
माझ्या मुलाचा ५वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. आम्ही दोघांनी साधारण २ वर्षांपासून मुलाच्या वाढदिवसाची थीम ठरवली आहे आणि ती आहे ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’. ही थीम ठरवण्याचे खास कारण म्हणजे माझा नवरा एका नामांकित टूर कंपनीमध्ये इंटरनॅशनल टूर लीडर आहे आणि तो युरोप, अमेरिका, साऊथ इस्ट एशिया अशा अनेक टूर्स करतो आणि मी सुद्धा त्याच ट्रॅव्हल कंपनीमध्ये ऑफिस स्टाफ म्हणून कार्यरत आहे. साहजिकच कळत नकळत आमच्या ४ वर्षीय हिरोंना सगळ्या देशांची, त्यांच्या फ्लॅग्सची आणि तिथल्या मॉन्युमेंटस्‌ची उत्तम ओळख आहे. आमची सर्वांची आवड आणि मित्र परिवार हा पर्यटनक्षेत्राशी रिलेटेड आहे म्हणूनच आम्ही ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’ ही थीम निश्चित केली आहे.

गुगलबाबांची मदत घेतल्यावर डेकोरेशन, केक, इन्व्हिटेशनचे शेकडोंनी पर्याय समोर आले (अर्थात परदेशातले) पण आम्हाला नेमकं काय आणि कसं करावं हे समजलं नाहीए. भारतात मिकी माऊसपासून पायरेटस्‌पर्यंत आणि कार्सपासून ते जंगलपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’चे कुठेही काही नाही. पार्टी सप्लायर्सचे डिटेल्स शोधून झालेत पण ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’ कोणाकडेही नाही. एखाद्या इव्हेंट कंपनीची मदत घ्यायची ठरवली तर ४-५ जणांनी ही थीम जमणार नाही म्हणून हात वर केले आहेत.

‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’ या थीमशी रिलेटेड माबोकर काही उपयुक्त आयडियाज्‌ देऊ शकतील का? नेमक्या कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. (बजेटचा इश्यु नाहीए पण प्रत्येक गोष्ट उत्तम झाली पाहिजे याकडे आमचा कटाक्ष आहे)

मुलाचा वाढदिवस एप्रिल मध्ये आहे. तसा खूप वेळ आहे पण काहीच सापडले नाही तर नवरा मुंबईमध्ये असतो तेवढ्यात तयारीला लागावे हा उद्देश. डेकोरेशन किंवा इतर काही गोष्टी विकत मिळाल्या नाहीत तर हॅण्डमेड बनविण्याची सुद्धा तयारी आहे आणि हातात वेळही राहिल. मात्र योग्य मार्गदर्शन लागेल.

मी आणि नवर्याने शोधलेल्या काही आयडियाज्‌

डेकोरेशन -
बोर्डिंग पास पर्सनलाईज बर्थडे इन्व्हिटेशन
विविध देशांचे फ्लॅग्ज्‌च्या पताका
लिनिंग टॉवर ऑफ पीसा आणि अजून एक मॉन्युमेंटचा थ्री डी स्टँडी - ज्याच्या बाजूला उभं राहून लोकं फोटो काढू शकतील
फोटो बूथ विथ पार्टी सोव्हिनिअर्स

गेम्स -
गेस द कंट्री/ फूड/ अॲनिमल्स
अजून २-३ विचार करतोय

केक -
याबाबतीत आयडियाज्‌ अगदी क्लिअर आहेत.

खाणं -
पास्ता- इटली
डोसा- इंडिया
ज्यूस- जमाईका
अजून वेगळ्या कॉन्टिनेंट मधलं काय खाणं ठेवावं?
थाळी किंवा ठरलेला मेनू नको पण पोटभर हवा. मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असं

रिटर्न गिफ्ट -
अज्जिबात सूचत नाहीए

नोंद-
१) वाढदिवस एखादा ए.सी हॉल घेऊन संध्याकाळी करणार आहोत.
२) साधारण १५० लोकांना बोलावणार आहोत
३) १२ वर्षा खालील मुलांना रिटर्न गिफ्ट देणार आहोत. मुलांची संख्या ५० पर्यंत जातेय.
४) मा.बो.कर कोणी ह्या इव्हेंटची जबाबदारी घेऊ इच्छिणार असाल तर आपलं स्वागत आहे.

प्लीज कोणाला काही सुचत असेल तर इथे नक्की कळवा. काही अंग्लसने आम्ही कदाचित विचार केला नसेल किंवा एखादी गोष्ट कुठे चांगली आणि रिजनेबल रेटमध्ये मिळते त्याबाबत सांगितल्यास बरं होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,

आज तब्बल ८ महिन्यांनी हा धागा उघडतेय आणि त्यावर अपडेट्‌स देतेय. ‘‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’’ या आमच्या वाढदिवसाच्या थीम अनुसार वाढदिवस खरोखर छान झाला. मुख्य म्हणजे मुलांनी खूप एन्जॉय केलं. या वाढदिवसाची थीम ठरवताना आपण माबोकरांनी जे सहकार्य केलंत, मार्गदर्शन केलंत त्याबद्दल मनःपूर्वक आभार. ह्या थीम अनुसार बऱ्याचशा गोष्टी आम्ही विचारात घेतल्या. सजावटीपासून ते जेवणापर्यंत आणि फोटोबूथ पासून ते मुलाच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट या थीमला साजेशी होती म्हणूनच जेव्हा देशविदेशात फिरलेला ट्रॅव्हलर (बर्थडे बॉयची) ज्या गेटअप मध्ये एन्ट्री झाली ती सगळ्यांसाठीचं... हायला! सहीच! वॉव! सुपर्ब! अशा रिएक्शनची होती. मुलगा खूश, आलेली मुलं खूश आणि आम्हीही खूश...

डेकोरेशनमध्ये देशविदेशाचे झेंडे, मॉन्युमेंटस्‌, कटआऊटस्‌, फोटोबूथ, प्रॉप्स हे केलेलं तर जेवणामध्ये इटली (मुलांचा आवडता पास्ता), इंडिया (डोसा काऊंटर), चायना (चायनीज फूड), अमेरिका (कपकेक्स), जमाईका (ज्युसेस) हे काऊंटर होते जे त्या त्या देशांच्या इटरेस्टिंग फॅक्टस्‌नी सजवलेले होते. एक वेगळी गोष्ट आम्ही वाढदिवसामध्ये केली- ‘‘मेक युअर केक’’ काऊंटरची. तयार कपकेक्सवर मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करायचं आणि त्यासाठी वेगवेगळी टॉपिंग्स आणि क्रीम आम्ही मांडून ठेवलेली. या काऊंटवर मुलांनी खूप एन्जॉय केलं. या सगळ्याबरोबर मॅजिशीयन, टॅटू आर्टिस्ट, गेम्स, गिफ्टस्‌ यामुळे वाढदिवसाला एक वेगळाच रंग चढला. सगळ्या मुलांना गिफ्ट म्हणून बॅग्स दिल्या ज्या ट्रॅव्हलशी निगडीत होत्या. एकूणच हा वाढदिवस अगदी अविस्मरणीय झाला. काही फोटो शेअर करतेय त्यावरून कल्पना येईल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

निक्षीपा.
001.JPG005.JPG_DSC0195.jpg06.jpg_DSC00351_Done_opt.jpg08.JPG009.JPG010.JPG0100.JPG011.jpg0120.JPG013.jpg0140.jpg0150.jpg016.jpg

वा! मस्त आयडीया. आणी निक्षीपा हे तू खूपच कल्पक पद्धतीने जमवुन आणलस त्याबद्दल तुझे खास अभिनन्दन. तुझ्या मुलाला पण पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा. ( जरी वाढदिवस होऊन गेला असला तरी)

फोटो छान आलेत.

निक्षिपा, किती हौशीने आणि कल्पकतेने केलंत तुम्ही... डिटेलिंग बघून/ वाचून मी थक्क झाले आहे, दंडवत स्वीकारावा.
आयुषला हॅप्पी बर्थडे!

खर्च किती आला पार्टी ला पूर्ण? मस्तच केले आहे सर्व. मुलांनी मस्त एंजॉय केले आहे.

खुप सुन्दर! डीटेलिन्ग आवडले, डेकोर तुम्ही केले की बनवुन घेतले. वाढदिवसाच्या शुभेच्छा! भविष्यात त्याला खर्‍या अराऊंड द वर्ल्ड ट्रॅव्हल करायची सन्धी मिळो

राजू७६, अजय अभय अहमदनगरकर, मंजूडी, अमा, स्वस्ति, मनीष, BS, प्राजक्ता, charcha आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद Happy

@ प्राजक्ता- हे सगळे डीटेलिन्ग आम्ही ठरवले आणि सप्लायरशी कॉन्टॅक्ट करून बनवून घेतले.

निक्षिपा, किती हौशीने आणि कल्पकतेने केलंत तुम्ही... डिटेलिंग बघून/ वाचून मी थक्क झाले आहे, दंडवत स्वीकारावा.
आयुषला हॅप्पी बर्थडे! >>> मंजूडी + १
निक्षिपा, ग्रेट आहात ! Happy

निक्षिपा, किती हौशीने आणि कल्पकतेने केलंत तुम्ही... डिटेलिंग बघून/ वाचून मी थक्क झाले आहे, दंडवत स्वीकारावा.
आयुषला हॅप्पी बर्थडे >>> मंजूडी +१११

Pages