वाढदिवस- ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’

Submitted by निक्षिपा on 7 August, 2015 - 07:38

वाढदिवस- ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’

जिथे प्रश्न... तिथे मायबोली. या उक्तीला अनुसरून मायबोलीकरांकडून एक मदत हवी आहे.
माझ्या मुलाचा ५वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. आम्ही दोघांनी साधारण २ वर्षांपासून मुलाच्या वाढदिवसाची थीम ठरवली आहे आणि ती आहे ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’. ही थीम ठरवण्याचे खास कारण म्हणजे माझा नवरा एका नामांकित टूर कंपनीमध्ये इंटरनॅशनल टूर लीडर आहे आणि तो युरोप, अमेरिका, साऊथ इस्ट एशिया अशा अनेक टूर्स करतो आणि मी सुद्धा त्याच ट्रॅव्हल कंपनीमध्ये ऑफिस स्टाफ म्हणून कार्यरत आहे. साहजिकच कळत नकळत आमच्या ४ वर्षीय हिरोंना सगळ्या देशांची, त्यांच्या फ्लॅग्सची आणि तिथल्या मॉन्युमेंटस्‌ची उत्तम ओळख आहे. आमची सर्वांची आवड आणि मित्र परिवार हा पर्यटनक्षेत्राशी रिलेटेड आहे म्हणूनच आम्ही ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’ ही थीम निश्चित केली आहे.

गुगलबाबांची मदत घेतल्यावर डेकोरेशन, केक, इन्व्हिटेशनचे शेकडोंनी पर्याय समोर आले (अर्थात परदेशातले) पण आम्हाला नेमकं काय आणि कसं करावं हे समजलं नाहीए. भारतात मिकी माऊसपासून पायरेटस्‌पर्यंत आणि कार्सपासून ते जंगलपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’चे कुठेही काही नाही. पार्टी सप्लायर्सचे डिटेल्स शोधून झालेत पण ‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’ कोणाकडेही नाही. एखाद्या इव्हेंट कंपनीची मदत घ्यायची ठरवली तर ४-५ जणांनी ही थीम जमणार नाही म्हणून हात वर केले आहेत.

‘ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड’ या थीमशी रिलेटेड माबोकर काही उपयुक्त आयडियाज्‌ देऊ शकतील का? नेमक्या कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. (बजेटचा इश्यु नाहीए पण प्रत्येक गोष्ट उत्तम झाली पाहिजे याकडे आमचा कटाक्ष आहे)

मुलाचा वाढदिवस एप्रिल मध्ये आहे. तसा खूप वेळ आहे पण काहीच सापडले नाही तर नवरा मुंबईमध्ये असतो तेवढ्यात तयारीला लागावे हा उद्देश. डेकोरेशन किंवा इतर काही गोष्टी विकत मिळाल्या नाहीत तर हॅण्डमेड बनविण्याची सुद्धा तयारी आहे आणि हातात वेळही राहिल. मात्र योग्य मार्गदर्शन लागेल.

मी आणि नवर्याने शोधलेल्या काही आयडियाज्‌

डेकोरेशन -
बोर्डिंग पास पर्सनलाईज बर्थडे इन्व्हिटेशन
विविध देशांचे फ्लॅग्ज्‌च्या पताका
लिनिंग टॉवर ऑफ पीसा आणि अजून एक मॉन्युमेंटचा थ्री डी स्टँडी - ज्याच्या बाजूला उभं राहून लोकं फोटो काढू शकतील
फोटो बूथ विथ पार्टी सोव्हिनिअर्स

गेम्स -
गेस द कंट्री/ फूड/ अॲनिमल्स
अजून २-३ विचार करतोय

केक -
याबाबतीत आयडियाज्‌ अगदी क्लिअर आहेत.

खाणं -
पास्ता- इटली
डोसा- इंडिया
ज्यूस- जमाईका
अजून वेगळ्या कॉन्टिनेंट मधलं काय खाणं ठेवावं?
थाळी किंवा ठरलेला मेनू नको पण पोटभर हवा. मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असं

रिटर्न गिफ्ट -
अज्जिबात सूचत नाहीए

नोंद-
१) वाढदिवस एखादा ए.सी हॉल घेऊन संध्याकाळी करणार आहोत.
२) साधारण १५० लोकांना बोलावणार आहोत
३) १२ वर्षा खालील मुलांना रिटर्न गिफ्ट देणार आहोत. मुलांची संख्या ५० पर्यंत जातेय.
४) मा.बो.कर कोणी ह्या इव्हेंटची जबाबदारी घेऊ इच्छिणार असाल तर आपलं स्वागत आहे.

प्लीज कोणाला काही सुचत असेल तर इथे नक्की कळवा. काही अंग्लसने आम्ही कदाचित विचार केला नसेल किंवा एखादी गोष्ट कुठे चांगली आणि रिजनेबल रेटमध्ये मिळते त्याबाबत सांगितल्यास बरं होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान कल्पना!
return गिफ्ट्स : globe/ world map, विविध देशामधले soveniers pratyekee ek आणि स्विस चॉकलेट्स, toy aeroplane
खान्यामध्ये barbeque पण add करू शकता.

Vividh deshaanchee maheetee denaara ek स्लाइड शो ही ठेवू शकता.
पण जग म्हणजे यूरोप/US/Canada/Australia NZ/ Singapore, Bangkok China असे मर्यादित न ठेवता लहान देश/मागास देश यांचाही समावेश करा.

छान आणि वेगळी थीम आहे. पण तरीही मुलं ही थीम कितपत एंजॉय करू शकतील हे माहित नाही. ५ वर्षाच्या मुलांना धुडगूस घालायला मिळालं की झालं. त्यांना थीमबिमनी काही फरक पडत नाही आणि थीम असलीच तर त्यांच्या आवडीची असलेली आवडते. ही थीम त्यांना खरं तर कळणारच नाही असं वाटतंय.

शिवाय, देशांचे फ्लॅग पताका म्हणून वापरणे कितपत योग्य आहे?

सॉरी हां मी निगेटिव्ह लिहितेय पण वाचल्यावर पहिल्यांदा हेच मुद्दे लक्षात आले.

त्यातूनही तुम्हाला हीच थीम ठेवायची असेल तर http://www.aliexpress.com/ वर शोधून पहा. तुमच्या थीमला योग्य असे काही प्रॉडक्ट्स मिळू शकतील. नेटवरून सर्व पॉसिबल इव्हेंट ऑर्गनायझरना फोन करा. कोणी ना कोणी तयार होतीलच.

रिटर्न गिफ्ट चं बजेट काय आहे माहित नाही पण ही अशी http://www.amazon.in/s/?ie=UTF8&keywords=3d+puzzles&tag=googinhydr1-21&i... पझल्स देऊ शकता.

पार्टीला येणार्‍या लोकांसाठी ड्रेस कोड ठेवता येईल. कोणत्याही देशाचा पारंपारिक पोशाख करून येण्यास सांगता येईल. बर्थडे बॉयचा पोशाख काय असेल ?

वेगवेगळ्या देशाचे खाद्य पदार्थ निवडताना त्यांच्या चवी क्लॅश होणार नाहित हे बघा. दोन स्टेशन्स ठेवली तर हे जमेल. किंवा स्टार्टर , मेन, साईड डिश , डेझर्ट, बिवरेजेस निवडताना पारंपारिक चवी ऐवजी फ्युजन वापरता येइल.

छान कल्पना

जेवणात starter ला मन्चुरियन आणि फालाफेल (भजी सारखा आखाती आणि अफ्रिकी देशात मिळणारा पदार्थ )
शक्य असल्यास मेन मेनुमध्ये बुरिटो किंवा टॅको ( मॅकपदार्ठ)

डेकोरेशन ला जगातिल करन्सीची कलर प्रिन्ट ( त्यावर specimen चा watermark टाकुन)

निक्षिपा,

वाढदिवस व कार्यक्रम दोन्हीला उदंड शुभेच्छा!

प्रतिसादाचा ह्यापुढील भाग वाचून कृपया राग मानू नका. पण मला हे सगळं खूप प्रचंड वाटत आहे. अनावश्यक वाटत आहे.

आयडिया फारच आवडलीये पण मी मामीच्या <<देशांचे फ्लॅग पताका म्हणून वापरणे कितपत योग्य आहे?>> या पॉईंट्सशी सहमत आहे
पण मला स्वतःला पार्टी इमॅजिन करून मज्जा वाटतेय.
ऑल द बेस्ट Happy
काही सुचलं तर नक्की सांगेन

मामीचा मुद्दाही पटला! ही थीम १० वर्षाची मुलं खुप एन्जॉय करतील!
एव्हध्या आधीपासून वाढदिवसाचे प्लानिंग करणे या गोष्टीचे खुप कौतुक वाटले!
(मुलींचे वाढदिवस अगदी तोंडावर आले की थीम, मेनू ठरवणे वगैर करणारी बाहुली माता)

छान कल्पना आहे.

१२ वर्षा खालील मुलांना रिटर्न गिफ्ट देणार आहोत >> असं का १३/१४ वयाची मुलं येणार असली तर त्यांना वाईट नाही का वाटणार. देणारच असाल तर सगळ्या मुलांना द्या.

globe/ world map, विविध देशामधले soveniers pratyekee ek आणि स्विस चॉकलेट्स, toy aeroplane >> हे छान आहे. वयोमानाप्रमाणे देऊ शकता.

देशांचे फ्लॅग पताका म्हणून >> हे वापरलेले इतर ठिकाणी ( भारतात नव्हे) पाहीले आहे.

माबोकर मनापासून धन्यवाद..

वत्सला- थॅन्क्यू ..मस्त आयडिया दिलीत तुम्ही. ग्लोब डोक्यात होतं पण फायनल नव्हतं केलं.
स्लाईड शोची आयडिया भन्नाटच!

मी नताशा- प्रतिसादाबद्दल आभार. आपल्या आयडियाज्‌ची वाट पाहातेय

आत्मधून- हाहाहा.. छान आयजिया पण प्रत्यक्षात साकारणं कठीण आहे.

मामी- तुमचे मुद्दे अगदी मान्य पण माझा मुलगा आणि त्याचे शालेय मित्र सोडले तर त्याची भावंड आणि बिल्डींग मधील मुलांचा वयोगट ७ ते १२ वर्ष असा आहे. (मुलाचा बेस्ट फ्रेंड ६ वर्षाचा आहे Happy ) देशांचे फ्लॅग हे पताका म्हणून ही आयडिया गुगलबाबांची. एक मात्र आहे ते कार्यक्रमानंतर फेकून देणार नाही घरी मुलांच्या अभ्यासाकरिता ठेऊन देईन.
अरे हो, बर्थ डे बॉयचा पोशाख काय बरं असू शकेल?
साईटबद्दल मनापासून धन्यवाद!

स्वाती २- थँक्यू गं

साहिल शहा- छान आयडियज्‌

बेफिकीर- आपल्या प्रतिसादाबद्दल कौतुक, आश्चर्य आणि बरंच काही.... आपण दखल घेतलीत यातच सगळं आलं. हे सगळं प्रचंड अनावश्यक आहे यात दुमत नाही पण खरं सांगू का? त्यांच्या जन्माच्यावेळी आणि पहिल्या वाढदिवसाला त्याचे बाबा मुंबईत होते. त्यानंतरचे मुलाचे वाढदिवस म्हणजे फक्त आई आणि आई-आजोबांसोबतचे. एप्रिल म्हणजे युरोपचा सिझन म्हणूनच त्याचे बाबा जे मार्च एन्डला जातात ते मे महिन्यात काही दिवसांकरिता येतात. पुढच्यावर्षी टूरच्या तारखांची मोठी अॲडजेस्टमेंट असणार आहे. त्यांच्यासाठी हा वाढदिवस खूप खास. बाबा-मुलगा मज्जा करणार आहे. त्यानंतर मुलाचा मोठा वाढदिवस बहुदा १० व्या वर्षाचाच!

ओके. माफ करा, विरजण घातल्यासारखे झाले असले तर. काय चर्चा झाली हे समजावे म्हणून वरचा प्रतिसाद तसाच ठेवत आहे.

पण मला स्वतःला पार्टी इमॅजिन करून मज्जा वाटतेय. >>> रीया ये ग तू पण पार्टीला. Happy

सावली- नक्की विचार करतो या मुद्द्याचा

पण तरीही मुलं ही थीम कितपत एंजॉय करू शकतील हे माहित नाही. ५ वर्षाच्या मुलांना धुडगूस घालायला मिळालं की झालं. त्यांना थीमबिमनी काही फरक पडत नाही आणि थीम असलीच तर त्यांच्या आवडीची असलेली आवडते. ही थीम त्यांना खरं तर कळणारच नाही असं वाटतंय.>>> +१..

तुमच्या कंपनीचा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट कन्सल्टंट नाहिये का? जनरली, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे जे इव्हेंट्स असतात त्यांच्यापैकी कुणीतरी हे नक्कीच करू शकतो, इतकी पण काही हटके थीम नाही, खासकरून त्याच क्षेत्रात काम करणारे इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी असेल तर. जमल्यास, माझ्या एक दोन मित्रांचे ईमेल आयडी देऊन ठेवते. ते मुंबईमधलेच जानेमाने इव्हेंट मॅनेजर आहेत. पण ते बर्थडेसारखे इन्वेंट्स जास्त बजेटनुसारच करतात.

तुमचे सर्व पॉइंट्स वाचल्यावर तुम्ही "वेगवेगळे देश आणि त्यांची संस्कृती" यावर फारच फोकस करताय असं वाटतंय. मेन थीम "ट्रॅव्हल" अराऊंड द वर्ल्ड असल्याने "ट्रॅव्हल" हा मेन पार्ट जास्तीत जास्त फोकस व्हायला हवाय. त्यामुळे डेकोरेशन बस्/विमान्/शिप अशा पद्धतीचं करता येईल, पार्टी इन्व्हेटेशन बोर्डिंग पासची आयडीया उत्तम आहेच. सोबत "ट्रॅव्हलर" असाही ड्रेस कोड ठरवता येईल. येणर्‍यांचे स्वागत हवाईन स्टाईलने हार घालून आणि वेलकम ड्रिंक देऊन करता येईल. गेम्स आणि एन्टरटेनमेंटमध्ये एका देशाहून दुसर्‍या देशाला जाण्याचे गेम्स खेळवता येईल. लहान मुलांना असे धुडगूस गेमच फार आवडतात. मोठ्यांसाठी गेस द फूड, गेस द मॉन्युमेम्ट वगैरेप्रकार आहेतच. लाईव्ह एन्टरटेनमेंट बूक करणार असाल तर जगभरातील प्रसिद्ध ट्रॅव्लर्सबद्दल असलेली गाणी आणी डान्सेस करवून घेता येईल किंवा एखादे स्किट परफॉर्म करून घेता येईल. सात वेगवेगळे फूड स्टेशन्स ठेवून प्रत्येक खंडानुसार विविध डिशेस ठेवता येतील. किंवा स्टार्टर एका खंडाचे, मेन कोर्स दुसर्‍या खंडाचा असे सेव्हन कोर्स मील आरामात प्लान करता येऊ शकेल.

अजून एकः वेगवेगळ्या देशांचे ट्रॅडिशनल ड्रेस किंवा वेगवेगळ्या भौगोलिक भागतले ट्रॅवल्र्स ड्रेस (बीच, स्नो, माऊंटन्स,) असे घालून येणारे लोक फोटो काढू शकतात.

रीटर्न गिफ्टः ही केवळ छोट्यांनाच न देता प्रत्येक कुटुंबाला याप्रमाणे एक बॅकपॅक त्यामधेय चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स (प्रत्येक खंडाप्रमाणे सिलेक्ट करून) देता येतील. किंवा त्यात प्रिंटेड मग, टीशर्ट, कॅप वगैरे घालून देता येईल. समहाऊ मला केवळ लहानांना रीटर्न गिफ्ट द्यायचं आणी ज्यांना लहान मुलं नाहीत किंवा जे सिंगल आहेत त्यांना काहीच द्यायचं नाही हे पटत नाही.

मला एका टूर कंपनीने इव्हेंट्साठी छोटीसी सूटकेस दिली होती. इतकी सुंदर आणि क्युट आहे ती सूटकेस. वापरता कशालाच येत नाही, पण आठवण म्हणून छान वाटते.

विविध देशांतील भाषांच्या स्क्रिप्ट मध्ये काही सुचना लिहून त्याचे ट्रांसलेशन पण लहान अक्षरात लिहायचे!
किंवा फ्रेम करायचे.

>>मामीचा मुद्दाही पटला! ही थीम १० वर्षाची मुलं खुप एन्जॉय करतील!>>+१
१५० गेस्ट्स त्यात ५० मुले हे सगळे ५-६ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खूप जास्त होते. मुलं कंटाळतात. मग होणारे मेल्टडाऊन सगळी मजा घालवतात. ५ वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला आपले मित्रमंडळ बोलावण्याऐवजी फक्त मुलाची मित्रमंडळी बोलावली तर मॅनेज करायला सोपे जाईल.

स्वाती२, तुम्ही म्हणता तसे मलाही वाटायचे ( मी स्वतः असे काही प्लान करताना ते पाळेनही ) पण इथे म्हणजे मुंबईत आल्यावर मला असं जाणवलं की इथे जन्मलेल्या, रहाणार्‍या छोट्या मुलांना अशा मोठ्या इव्हेंटची , खुप लोकांनी यायची/ भेटायची खुप सवय असते. आणि एखाददुसरा अपवाद सोडला तर ही सगळी मुलं खुप धावपळ, मस्ती करुन एंजॉयही करतात.
नुकतेच नात्यात एक ५ वर्षाच्या मुलाचा वादि झाला. त्या मुलाने आणि त्याच्या छोट्या मित्रमैत्रिणींनी धुडगूस घातला होता. आईबाबांकडे बघायलाही तयार नव्हते. त्यामुळे आता मी 'ज्यांना आवडतं आणि ज्या मुलांना चालतं त्यांच्यासाठी प्लान करु दे' अशा विचाराप्रती आलेय. ( मात्र माझी मुलगी गर्दी फारशी एंजॉय करु शकत नाही, त्यामुळे तीच्यासाठी मी असे काहीच प्लान करणार नाही. )

मागच्या महिन्यातच पुण्याला मुलाचा १८वा वाढदिवस आणि वडलाचा वाढदिवस एकाच वेळी साजरा केला. त्यात २ वर्षापसुन ते १४ वर्षापर्यन्त ४० मुले होती. कार्यक्रम सकाळी ११ ते ४ पर्यन्त होता त्यात १२ ते १.३० पर्यन्त गेम होते. गेम मध्ये मुलात दोन गट करुन गेंम केले होते. (५ ते १० आणि १० ते १४) मुलानी खुप मजा केली. लहान मुलाचे गेम तर २ वाजेपर्यन्त चालले होते आणि त्याना तर आजुन गेम खेळायचे होते. थोडक्यात ५ -१५ वर्षाची मुले गेम एंजॉय करतात.

खरेतर १५ -२५ वर्षाच्या तरुणाना खुप कंटाळा आला होता. ह्या वयोगटातील मुला मुलीना कंप्युटर्/मोबाईल च्या पलिकडे जास्त जग माहित नसल्याने तसे झाले असेल. मोठ्या लोकासाठी पण गेम ठेवले होते पण त्यानी गप्पा मारण्याकडे जास्त interest दाखवला.

मस्त आयडीया.

धागाकर्तीने नुसते प्रश्न न विचारता आपल्या आयडिया मांडून त्यावर इतरांची मते/आयडिया मागवल्या हे खुप आवडले. नाहीतर लोक नेहमी दोन ओळींचा प्रश्न मांडतात आणि मग त्या प्रश्नाचा अर्थ लावण्यापासुन बाकीचे सगळे लोकांवर सोडतात.. Happy

मलाही आधी बेफिकिरांसारखेच वाटले पण जर परवडत असेल तर का नाही? करणा-यालाही काहीतरी वेगळे केल्याचा आनंद, आलेल्यांनाही काहीतरी वेगळे अनुभवण्याचा आनंद आणि हे सगळे करणा-या इवेंट कंपनीला धंदा. म्हटले तर नुकसान काहीही नाही.

ट्रवेल अराऊंड द वर्ल्ड म्हटलेय तर हॉलच्या एकेका कोन्यात जगातली काही आश्चर्ये किंवा वैशिष्ट्ये उभारुन मुलाना त्यात खेळण्याची किंवा ते शक्य नसल्यास नुसते पाहण्याची मजा उपलब्ध करुन देता येईल. जसे एका कोनाड्यात आर्क्टिक, इग्लु, पांढरे अस्वल व., एका कोनाड्यात माचुपिचु, माऊंट टिटलिस किंवा इतर काहीतरी असे करता येईल.

निक्षिपा मस्त थीम आहे. कितीतरी गोष्टी करता येतील.
पासपोर्ट विथ तिकिट्स आणि बोर्डींग पास. पासपोर्ट वर तुमच्या मुलाविशयी लिहिलेले किंवा ज्या मुलाला देणार आहात त्याच्याविषयी, कार्यक्रमाची रुपरेषा बोर्डींग पासवर(चेक इन टाईम,बोर्डीग टाईम इत्यादी लिहून) , तिकिट्स (खेळांसाठी) अस करता येईल.
केक एकदम जुनी ट्रंक स्टाईल बॅग आणि त्यावर ग्लोब असा केक
स्वतंत्र टेबल असतील बसायला तर मध्ये छोटी बॅग/ग्लोब/बोट आणि त्याला टाय करून बलुन्स.
बॅगेज क्लेम एरिया अस लिहून तिथे रिटर्न गिफ्ट्स
बॅक ड्रॉप ला मोठा जगाचा नकाशा.
इन्व्हाईट मॅप किंवा पासपोर्ट
सेक्शन करतान छोट्या फ्रेम मध्ये चेक इन, बोर्डिंग ,बॅगेज क्लेम अस लिहिलेल्या फ्रेम्स
मुलांना जेवण प्लेन मध्ये देतात तस ट्रे मधून Happy

जर मुलगा डॉ सुस फॅन असेल तर 'ओह दि प्लेसेस ही विल गो' अशी पण थीम करता येइल. किंवा तस बॅनर वगैरे करता येईल,

जर मदत हायर करणार असाल तर पायलट , एअर होस्टेस वगैरेचा ड्रेस अप करायला सांगा सर्व्हर आणि अटेंडट्स ना.
मज्जा करा.

निक्षिपा ,

1. Return gift packet : You can add postcards from different places around the world. People enjoy these photos.
Or Magnets souvenirs from different locations

2. You can hire 2-3 people who will dress as around the world characters which kids will enjoy e.g. Disney characters (from USA), Aladdin (from Middle east?), Shaktiman (from India) etc.

3. Please ignore any -ve comment from anyone. This is a WIN -WIN event for all. You and all your guests will have fun and get satisfaction. All food and gifts money will go to economy which will help INDIA. Kids will get some knowledge/information about world cities/locations

4. Please post few pics here so as we also can participate Happy

मस्त थीम कल्पना आयडीया आणि सारेच प्रतिसाद, बड्डेसाठी आगावू शुभेच्छा, फोटो नक्की ईथे टाका Happy

माझ्याकडे तुर्तास या थीमला अनुसरून काही आयडीया नसल्या तरी सर्वसाधारणपणे माहौल मध्ये उत्साह फुंकणारे गेम्स हेच असल्या इवेन्टची जान असतात हे विसरू नका. ते देखील असे ज्यात सारेच सर्ववेळ सहभागी झाले पाहिजेत. अगदी मुलांबरोबर त्यांचे आईबापही एकत्र खेळतील असेही काही गेम असल्यास उत्तमच. ऑर्गनायझर, अँकर असेलच पण तुम्ही देखील त्याच रोलमध्ये घुसून सर्व मुलांबरोबर एंजॉय करा. लहान मुले सदैव पार्टीच्या मूडमध्येच असतात, ही त्यांना एक दैवी देणगी असते, तिचा वापर करा. त्यांच्या पार्टीमूडचा एक मिनिट सुद्धा स्पॉईल करायचा नाही असे टारगेट ठेवलेत तर पार्टी हिटच समजा. बाकी सर्वात शेवटी डान्स मात्र झालाच पाहिजे. आधी एखाद्या गेमच्या माध्यमातून लोकांना नाचवू शकता आणि मग फ्रीस्टाईल डान्स.. फक्त त्या आधी कोणालाही भरपेट खायला चारू नका. Happy

मस्त कल्पना!
पार्टीला येणार्‍या लोकांसाठी ड्रेस कोड ठेवता येईल. कोणत्याही देशाचा पारंपारिक पोशाख करून येण्यास सांगता येईल....... हे मामींप्रमाणे मलाही वाटते.
तुमच्या थीम मधे मुख्य प्रवासी वाहने.. विमान्, ट्रेन, शिप, बस हे असणार, हॉलच्या भिंतीवर त्याचे मोठे पोस्टर लाउन तिथे त्या त्या वाहनाचा क्रु ठेवायचा. म्हणजे मुले त्यां च्याबरोबर फोटो काढु शकतील....फक्त हॉल भाड्याने घेणार तेव्हा पोस्टर भिंतीना लावायची परमीशन घ्यावी लागेल.
खाण्यामधे पास्ता बरोबर पिझा, आईस्किम, नुडल्स... हे असेलच!
पार्टी साठी तुम्हाला खुप शुभेच्छा!

तुझ्या पार्टीला येणारी बच्चे कंपनी , विविध देशां चे पोशाख करून आली तर.. तुझ्या थीम ला साजेसे दिसतील..

वेगवेगळ्या टेबलांवर सिलेक्टेड देशांचे फ्लॅग लावून , त्या त्या देशा च्या नावाचे placard ठेवायचे आणी मग त्या त्या देशातील खाद्यपदार्थ , सोविनिअर्स त्या त्या टेबलावर मांडून ठेवायचे..

केक , विमानाच्या किंवा ग्लोब च्या आकाराची..

रिटर्न गिफ्ट कॅन बी एकेका देशांचे जिगसॉ पझल.. ( मिळतात का सहज? नो आयडिया)

८ ते १२ वर्षांच्या मुलांना देशांचे कॅपिटल्स शिकवणारे गेम्स.. रिटर्न गिफ्ट म्हणून ..

ते नाही का बोर्डवर , एखाद्या देशाची राजधानी ओळखली कि रेड दिवा लागतो तो गेम.

अराउंड दि वर्ल्ड इन ८० डेज जुने क्लासिक पुस्तक / सिनेमा/ कार्टून आहे. जुने असले तरी इतके मजेदार आहे की त्यात बर्‍याच आयडियाज मिळतील. (कार्टून सिरीजचे पूर्ण भाग यू ट्यूब वर आहेत)

Pages