आधुनिक राजकारणातील तीन प्रचंड लोकप्रिय (महान?) नेते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2015 - 12:57

हा धागा सचिन पगारे यांच्या धाग्यावरून सुचला किंबहुना स्फुरला हे प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो.
पण विचार मात्र स्वतंत्र आणि तितकेच प्रामाणिक आहेत.

धागा मुद्दाम ललितलेखनात टाकला आहे कारण चालू घडामोडींमधील चालू (पक्षी: चतुर :दिवा:) लोकांनीच यावर चर्चा करण्याऐवजी सर्वसाधारण लोकांचाही सहभाग अपेक्षित. Happy

शीर्षकात महान असे कंसात लिहून पुढे प्रश्नचिन्ह का टाकले आहे? .. असा प्रश्न पडला असेलच,
तर आधी तो सोडवतो.

काही नाही सोप्पे आहे,
हल्ली मला स्वतालाच प्रश्न पडतो की एखादा नेता किती महान आहे हे त्याची लोकप्रियता किती आहे यावर ठरते का?
त्याचबरोबर एखादा नेता किती लोकप्रिय आहे हे त्याच्या चाहत्यांबरोबरच त्याचे टिकाकार देखील किती आहे यावरही ठरते का?

सोशलसाईटवर फेरफटका मारता मला तीन राजकीय पक्षांचे तीन नेते आढळले ज्यांच्यावर टिका केल्याशिवाय त्यांच्या विरोधकांना, (जे ईतर दोन नेत्यांचे भक्त असू शकतात, नव्हे असतातच, त्यांना) जेवण जात नाही का असे वाटते. अगदी ओढून ताणून देशात घडलेल्या कुठल्याही घटनेत, दुर्घटनेत यांना आणावेच लागते. चांगली घटना असेल तर समर्थक आणतात आणि वाईट घटना (भ्रष्टाचार वगैरे) असेल तर विरोधक आणतात. यांनी न केलेल्या कार्याचे श्रेयही यांना देत हेच नेते देशाला प्रगतीपथावर नेणार हे सांगायची चढाओढ लागते तर यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन केलेले विनोदही दुर्दैवाने फिरताना दिसतात.

हे तीन नेते आहेत, अनुक्रमे ..

१) श्री अरविंद केजरीवाल - अगदी कालपरवापर्यंत यांचे नावही माहीत नव्हते. ना यांच्या पक्षाबद्दल काही माहीत होते. ना कुठला राजकीय गॉडफादर यांच्या पाठीशी. मात्र स्वत:च हे स्वबळावर राजकारणातील डॉन बनले. जे कित्येक दिग्गजांना राजकारणात उभे आयुष्य घालून जमले नाही ती लोकप्रियता यांनी मिळवली. नव्हे लोकाश्रयही मिळवला, कारण भाजपा-कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांना मात देत, ते देखील मोदी लाटेच्या विरोधात पोहून, यांनी दिल्लीच्या ७० पैकी ६७ जागा जिंकल्या.

तर ते एक असो, यांचे जे काही कार्य असेल नसेल ते असेल. इथे तो विषय नाही. पण जे काही असेल ते दिल्लीपुरतेच असूनही ईथे माझ्या महाराष्ट्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते यांच्या नावाने रोजच्या रोज असे काही शंख करत असतात की जणू काही विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि श्री केजरीवाल त्यांच्याच वार्डातून त्यांच्या लाडक्या उमेदवाराविरुद्ध उभे राहणार आहेत. ऊठसूठ आप’वाले सुद्धा कसे भ्रष्टाचारी आहेत, केजरीवाल यांनी कशी पलटी मारले याचेच गुणगाण चालू. अरे दिल्ली वाले बघतील ना त्यांचे ते, आपल्याला काय पडलीय हे सांगून सांगून थकलो तरी यांचे चालूच.

बरे केजरीवाल यांनी देखील आपल्याभोवतालचे वलय कसे कायम राहील याचीच सदैव काळजी घेतली. देशभरात लोकसभेच्या निवडणूका लढवून सगळीकडे सपशेल मार खाल्ला पण त्या जिवावर आज राष्ट्रीय नेता म्हणून ओळखले जाऊ लागले आणि बहुधा हेच त्यांचे ध्येय असावे असे वाटते. लोकसभेच्या सीट नाही पण प्रसिद्धी अन लोकप्रियता मिळवणे. जी पद्धतशीर मिळवली देखील.

* उत्सुकता म्हणून यांचे नाव गूगल सर्च मध्ये टाकले. रिजल्ट दाखवत आहेत - About 1,17,00,000 results
* आणि सहज तुलना म्हणून मा. श्री शरद पवार या महाराष्ट्रातील मातब्बर अन रयतेच्या नेत्याचे गूगल सर्च रिजल्ट चेक केले. - About 5,72,000 results फक्त

२) श्री नरेंद्र मोदी - हे आपले माननीय पंतप्रधान आहेत याचे भान राखूनच यांना यादीत घेतले आहे आणि माझा मुद्दा स्पष्ट करायला चार शब्द लिहिणार आहे.
राजकारणात नेत्याची मार्केटींग करून त्याला कसे लोकप्रिय करावे हा फंडा यांचाच त्यामुळे हे नाव अपरिहार्य. (अर्थात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य कमी लेखायचा हेतू नाही)
मोदीलाट ओसरली नसती, हा धागा आधी आला असता, तर यांचेच नाव पहिले लिहिले असते.

तुलना करायचा मोह नाही आवरत पण बॉलीवूडमध्ये जसे शाहरूख खानने स्वत:चे पद्धतशीर ब्रांन्डींग करत स्वत:ला सुपर्रस्टार बनवले तसेच काहीसे मोदींनी राजकारणात केले. पण त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असा ‘एक्स फॅक्टर’ या दोघांमध्येही आहे हे देखील कोणी अमान्य करू शकणार नाही. आणि म्हणूनच ते आपल्या स्टाईलसाठी, वकृत्वासाठी, ड्रेसिंग सेन्ससाठी (९ लाखाचा सूटही आला यात), आणि हो हो सेल्फींसाठीही ओळखले जातात.

देशाला त्यांच्या एक्स फॅक्टरचा काही फायदा होणार नसून तो प्रत्यक्ष कामानेच होणार आहे आणि त्यासाठी निश्चितच त्यांना वेळ दिला पाहिजे. पण तरीही धाग्याचा मुद्दा असा आहे की ते काम आणि कर्तुत्व अजून सिद्ध करणे बाकी असूनही आधीच त्यांचे कट्टर समर्थक आणि तितकेच कट्टर विरोधक तयार होऊन ते सार्वकालिक महान नेत्यांच्या पंगतीत जाऊन बसल्यासारखे वाटत आहेत.

३) श्री राहुल गांधी - वरील दोन नावांच्या तुलनेत मला यांचे कर्तुत्व फारसे माहीत नाही. आता हे माझे अज्ञानही असू शकते. वा तुर्तास त्यांचे कर्तुत्व पक्षांतर्गत असेल आणि संधी न मिळाल्याने जगासमोर आले नसेल असेही असू शकते. पण तरीही लोकप्रियतेच्या आणि टिकेला सामोरे जाण्याच्या निकषावर तिसरे नाव हेच डोळ्यासमोर येते. जवाहरलाल नेहरू, ईंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि हो सोनिया गांधी या दिग्गजांच्या मालिकेतीलच हे पुढचे एक नाव वाटते.. अन ते देखील विशेष काही सिद्ध करायच्या आधीच.

काही लोकांच्या मते यांच्या भगिनी प्रियांका गांधी या यांच्यापेक्षा जास्त कर्तुत्ववान आहेत वा सिद्ध होऊ शकतात. मात्र या दोघांचे नाव घेत गूगल सर्च केल्यास राहुल गांधी यांचे पारडे किमान दसपट जड दिसेल. आणि यातच त्यांची लोकप्रियता पर्यायाने महानता दिसून येत असावी. म्हणून कॉंग्रेस पक्षालाही यांच्याशिवाय पर्याय नाही असे वाटते.
* राहुल गांधी - About 1,54,00,000 results
* प्रियांका गांधी - About 18,40,000 results
(गंमत म्हणजे राहुल गांधी यांचे सर्च रिझल्ट सोनिया गांधींपेक्षाही जास्त दाखवत आहेत हे विशेष. आणि साहजिकच आहे म्हणा, आजकाल सगळीकडे त्यांच्याच नावाची चलती आहे. * सोनिया गांधी - About 85,00,000 results)

....

असो,
तर सांगायचा मुद्दा हा की सध्याचे राजकारण बघून मला असे वाटते की हल्ली एखाद्या राजकीय नेत्याला सतत चर्चेत ठेवून त्यांचे मूल्य वाढवायचा प्रयत्न केला जातो का?
किंबहुना आपण देखील राजकीय नेत्यांना सेलिब्रेटी म्हणून बघत त्यांचे मूल्यमापन करत आहोत का?
एकंदरीतच एक सुजाण नागरीक म्हणून आपण गंडलो आहोत का? वा एक मतदार म्हणून आपणही कुठेतरी चुकतोय का?

धाग्याची मांडणी गंडली असेल, वा दोनचार शब्द ईकडचे तिकडे झाले असतील, वा चारपाच अतार्किक अन बाळबोध विधाने आली असतील तर सांभाळून घ्या.
आपलाच,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सर्च रिझल्ट महान सन्नी ताई यांचे

About 2,33,00,000 results (0.24 seconds)

काही लोकांच्या मते सगळ्यांपेक्षा या जास्त कर्तुत्ववान आहेत वा सिद्ध होऊ शकतात.बाकीच्यांपेक्षा यांचे नाव घेत गूगल सर्च केल्यास यांचे पारडे किमान दसपट जड दिसेल. आणि यातच त्यांची लोकप्रियता पर्यायाने महानता दिसून येत असावी. म्हणून यांच्याशिवाय पर्याय नाही असे वाटते.

सर्च रिझल्ट वरुन महानता ठरत असेल तर मग सनिताई यांना राष्ट्रपति करायच का ?

यानात्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा नंतर बिल गेट्स हवे आणि टॉम क्रुझ गृहमंत्री
>>>>>
गल्लत करत आहात. भिन्न क्षेत्रातील लोकप्रिय माणसे ईथे कशाला आणत आहात?
अन्यथा अमिताभ शाहरूख सचिन तेंडुलकर यांचेही गूगल सर्च केले असते.
अवांतर - आयडीया वाईट नाही, पण तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे Happy

मनरंग,
आपणही तीच गल्लत करत आहात.
पॉर्न ईंडस्ट्रीमध्ये सनी लिओन ही मान्यवर आहेच. आणि तेच हे सर्च रिजल्ट दाखवत आहेत.

आणि हो, मूळ मुद्दाच माझा असा आहे की या सर्च रिझल्ट किंवा लोकप्रियतेवर तर महानता आजकाल ठरत नाहीये ना, जे नेत्यांच्या बाबतीत चुकीचे आहे असेच मी म्हणतोय. Happy

महान नेता तो असतो ज्याच्या बद्दल देशातील सर्व धर्मिय जनतेला विश्वास वाटतो.
>>>>>
पगारेजी सहमत, तसेच आपल्या वाक्याचा रोखही समजला.
मी सर्वधर्मीय सोबत सर्वसामान्य जनतेला असेही म्हणू इच्छितो.

कोण म्हणत सर्च रिझल्ट वर महानता ठरते ?
About 1,09,000 results (0.30 seconds) हा सर्च रिझल्ट dr.A P J abdul kalaam यांचा

About 1,54,00,000 results हा सर्च रिझल्ट Rahul Gandhi यांचा

मग काय राहुल गांधी कलामांपेक्षा महान झाला का ?

त्यामुळे या सर्च रिझल्ट किंवा लोकप्रियतेवर तर महानता आजकाल ठरते असा निष्कर्ष जर तुम्ही काढला असेल तर तो साफ़ चुकीचा आहे

अवांतर ...............
वीकेंड ला गर्ल फ्रेंडला घेऊन मस्त फिरायला जायच सोडून धागे कसले विणत बसतोस

ऋन्मेष धाग्याच्या शिर्षकात जो महान शब्द आहे तो लेखातील तिनही नेत्यांना लागु होत नाही.लोकप्रिय राजकारणी हा शब्द योग्य राहिल

सर्चचा मिटर एक बकवास आहे.
आपल्याकडे नेटसजगता फारच कमी आहे.बरेच विद्यार्थी सामान्यज्ञान परीक्षेकरताही सर्च मारतात.त्यावरून ते महान अथवा लोकप्रिय ठरत नाहीत.काहीवेळा भंपक विधाने करणारे( आमच्यासारखे )अचिनक सर्चलाइटमध्ये येतात.मला क्रिकेटमध्ये काही समजत नाही ते अज्ञान लोकांपर्यंत न जाता माहिती करून घेण्यासाठी सर्च केले आहे ( उदा रबर,अॅशेस,सिली मिडॅान वगैरे।).महाराष्ट्रातले बरेच नेते तिसय्रा गल्लीत अथवा रात्रीच्या दाढीवाल्याच्या कार्यक्रमापलिकडे माहित नसतात.

मनरंग उर्फ मनु ताईंची एकंदर वाक्यरचना, व नंतर सनी ताईंबद्दल सर्च करायची उर्मी पाहून मनात जरा शंकेची पाल चुकचुकली.

ज्यांच्यावर खूप टीका होतेय आणि ज्यांचे सर्च रिझल्ट्स सध्या खूप आहेत असं एक नाव सध्या चर्चेत आहे.

गजेंद्र चौहान.

मनरंग उर्फ मनु ताईंची एकंदर वाक्यरचना, व नंतर सनी ताईंबद्दल सर्च करायची उर्मी पाहून मनात जरा शंकेची पाल चुकचुकली.

नाही हो
कसलीही शंका मनात आणु नका
मी ताईच आहे दादा नाही
फ़क्त सर्च रिझल्ट वरुन महानता ठरत नाही ह्या उदाहरणासाठी सनी लिओन चा संदर्भ

आणि वाक्यरचना ऋन्मेऽऽषची आहे ,मी फ़क्त त्यातली नाव बदलली

Pages