हा धागा सचिन पगारे यांच्या धाग्यावरून सुचला किंबहुना स्फुरला हे प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो.
पण विचार मात्र स्वतंत्र आणि तितकेच प्रामाणिक आहेत.
धागा मुद्दाम ललितलेखनात टाकला आहे कारण चालू घडामोडींमधील चालू (पक्षी: चतुर :दिवा:) लोकांनीच यावर चर्चा करण्याऐवजी सर्वसाधारण लोकांचाही सहभाग अपेक्षित. 
शीर्षकात महान असे कंसात लिहून पुढे प्रश्नचिन्ह का टाकले आहे? .. असा प्रश्न पडला असेलच,
तर आधी तो सोडवतो.
काही नाही सोप्पे आहे,
हल्ली मला स्वतालाच प्रश्न पडतो की एखादा नेता किती महान आहे हे त्याची लोकप्रियता किती आहे यावर ठरते का?
त्याचबरोबर एखादा नेता किती लोकप्रिय आहे हे त्याच्या चाहत्यांबरोबरच त्याचे टिकाकार देखील किती आहे यावरही ठरते का?
सोशलसाईटवर फेरफटका मारता मला तीन राजकीय पक्षांचे तीन नेते आढळले ज्यांच्यावर टिका केल्याशिवाय त्यांच्या विरोधकांना, (जे ईतर दोन नेत्यांचे भक्त असू शकतात, नव्हे असतातच, त्यांना) जेवण जात नाही का असे वाटते. अगदी ओढून ताणून देशात घडलेल्या कुठल्याही घटनेत, दुर्घटनेत यांना आणावेच लागते. चांगली घटना असेल तर समर्थक आणतात आणि वाईट घटना (भ्रष्टाचार वगैरे) असेल तर विरोधक आणतात. यांनी न केलेल्या कार्याचे श्रेयही यांना देत हेच नेते देशाला प्रगतीपथावर नेणार हे सांगायची चढाओढ लागते तर यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन केलेले विनोदही दुर्दैवाने फिरताना दिसतात.
हे तीन नेते आहेत, अनुक्रमे ..
१) श्री अरविंद केजरीवाल - अगदी कालपरवापर्यंत यांचे नावही माहीत नव्हते. ना यांच्या पक्षाबद्दल काही माहीत होते. ना कुठला राजकीय गॉडफादर यांच्या पाठीशी. मात्र स्वत:च हे स्वबळावर राजकारणातील डॉन बनले. जे कित्येक दिग्गजांना राजकारणात उभे आयुष्य घालून जमले नाही ती लोकप्रियता यांनी मिळवली. नव्हे लोकाश्रयही मिळवला, कारण भाजपा-कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांना मात देत, ते देखील मोदी लाटेच्या विरोधात पोहून, यांनी दिल्लीच्या ७० पैकी ६७ जागा जिंकल्या.
तर ते एक असो, यांचे जे काही कार्य असेल नसेल ते असेल. इथे तो विषय नाही. पण जे काही असेल ते दिल्लीपुरतेच असूनही ईथे माझ्या महाराष्ट्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते यांच्या नावाने रोजच्या रोज असे काही शंख करत असतात की जणू काही विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि श्री केजरीवाल त्यांच्याच वार्डातून त्यांच्या लाडक्या उमेदवाराविरुद्ध उभे राहणार आहेत. ऊठसूठ आप’वाले सुद्धा कसे भ्रष्टाचारी आहेत, केजरीवाल यांनी कशी पलटी मारले याचेच गुणगाण चालू. अरे दिल्ली वाले बघतील ना त्यांचे ते, आपल्याला काय पडलीय हे सांगून सांगून थकलो तरी यांचे चालूच.
बरे केजरीवाल यांनी देखील आपल्याभोवतालचे वलय कसे कायम राहील याचीच सदैव काळजी घेतली. देशभरात लोकसभेच्या निवडणूका लढवून सगळीकडे सपशेल मार खाल्ला पण त्या जिवावर आज राष्ट्रीय नेता म्हणून ओळखले जाऊ लागले आणि बहुधा हेच त्यांचे ध्येय असावे असे वाटते. लोकसभेच्या सीट नाही पण प्रसिद्धी अन लोकप्रियता मिळवणे. जी पद्धतशीर मिळवली देखील.
* उत्सुकता म्हणून यांचे नाव गूगल सर्च मध्ये टाकले. रिजल्ट दाखवत आहेत - About 1,17,00,000 results
* आणि सहज तुलना म्हणून मा. श्री शरद पवार या महाराष्ट्रातील मातब्बर अन रयतेच्या नेत्याचे गूगल सर्च रिजल्ट चेक केले. - About 5,72,000 results फक्त
२) श्री नरेंद्र मोदी - हे आपले माननीय पंतप्रधान आहेत याचे भान राखूनच यांना यादीत घेतले आहे आणि माझा मुद्दा स्पष्ट करायला चार शब्द लिहिणार आहे.
राजकारणात नेत्याची मार्केटींग करून त्याला कसे लोकप्रिय करावे हा फंडा यांचाच त्यामुळे हे नाव अपरिहार्य. (अर्थात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य कमी लेखायचा हेतू नाही)
मोदीलाट ओसरली नसती, हा धागा आधी आला असता, तर यांचेच नाव पहिले लिहिले असते.
तुलना करायचा मोह नाही आवरत पण बॉलीवूडमध्ये जसे शाहरूख खानने स्वत:चे पद्धतशीर ब्रांन्डींग करत स्वत:ला सुपर्रस्टार बनवले तसेच काहीसे मोदींनी राजकारणात केले. पण त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असा ‘एक्स फॅक्टर’ या दोघांमध्येही आहे हे देखील कोणी अमान्य करू शकणार नाही. आणि म्हणूनच ते आपल्या स्टाईलसाठी, वकृत्वासाठी, ड्रेसिंग सेन्ससाठी (९ लाखाचा सूटही आला यात), आणि हो हो सेल्फींसाठीही ओळखले जातात.
देशाला त्यांच्या एक्स फॅक्टरचा काही फायदा होणार नसून तो प्रत्यक्ष कामानेच होणार आहे आणि त्यासाठी निश्चितच त्यांना वेळ दिला पाहिजे. पण तरीही धाग्याचा मुद्दा असा आहे की ते काम आणि कर्तुत्व अजून सिद्ध करणे बाकी असूनही आधीच त्यांचे कट्टर समर्थक आणि तितकेच कट्टर विरोधक तयार होऊन ते सार्वकालिक महान नेत्यांच्या पंगतीत जाऊन बसल्यासारखे वाटत आहेत.
३) श्री राहुल गांधी - वरील दोन नावांच्या तुलनेत मला यांचे कर्तुत्व फारसे माहीत नाही. आता हे माझे अज्ञानही असू शकते. वा तुर्तास त्यांचे कर्तुत्व पक्षांतर्गत असेल आणि संधी न मिळाल्याने जगासमोर आले नसेल असेही असू शकते. पण तरीही लोकप्रियतेच्या आणि टिकेला सामोरे जाण्याच्या निकषावर तिसरे नाव हेच डोळ्यासमोर येते. जवाहरलाल नेहरू, ईंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि हो सोनिया गांधी या दिग्गजांच्या मालिकेतीलच हे पुढचे एक नाव वाटते.. अन ते देखील विशेष काही सिद्ध करायच्या आधीच.
काही लोकांच्या मते यांच्या भगिनी प्रियांका गांधी या यांच्यापेक्षा जास्त कर्तुत्ववान आहेत वा सिद्ध होऊ शकतात. मात्र या दोघांचे नाव घेत गूगल सर्च केल्यास राहुल गांधी यांचे पारडे किमान दसपट जड दिसेल. आणि यातच त्यांची लोकप्रियता पर्यायाने महानता दिसून येत असावी. म्हणून कॉंग्रेस पक्षालाही यांच्याशिवाय पर्याय नाही असे वाटते.
* राहुल गांधी - About 1,54,00,000 results
* प्रियांका गांधी - About 18,40,000 results
(गंमत म्हणजे राहुल गांधी यांचे सर्च रिझल्ट सोनिया गांधींपेक्षाही जास्त दाखवत आहेत हे विशेष. आणि साहजिकच आहे म्हणा, आजकाल सगळीकडे त्यांच्याच नावाची चलती आहे. * सोनिया गांधी - About 85,00,000 results)
....
असो,
तर सांगायचा मुद्दा हा की सध्याचे राजकारण बघून मला असे वाटते की हल्ली एखाद्या राजकीय नेत्याला सतत चर्चेत ठेवून त्यांचे मूल्य वाढवायचा प्रयत्न केला जातो का?
किंबहुना आपण देखील राजकीय नेत्यांना सेलिब्रेटी म्हणून बघत त्यांचे मूल्यमापन करत आहोत का?
एकंदरीतच एक सुजाण नागरीक म्हणून आपण गंडलो आहोत का? वा एक मतदार म्हणून आपणही कुठेतरी चुकतोय का?
धाग्याची मांडणी गंडली असेल, वा दोनचार शब्द ईकडचे तिकडे झाले असतील, वा चारपाच अतार्किक अन बाळबोध विधाने आली असतील तर सांभाळून घ्या.
आपलाच,
ऋन्मेऽऽष
>>>राजकारणात नेत्याची
>>>राजकारणात नेत्याची मार्केटींग करून त्याला कसे लोकप्रिय करावे हा फंडा यांचाच त्यामुळे हे नाव अपरिहार्य.<<<
हा फंडा मोदींचा नाही. मोदींनी तो फंडा फक्त अधिक चतुरपणे अंमलात आणला.
हा फंडा गांधी-नेहरू घराण्याचा आहे. किंबहुना, त्यांची दोन तीन सरकारे निव्वळ ह्या एकाच फंड्यावर निर्माण होऊ शकली होती. त्यावेळी खरे तर त्यांच्याकडे दुसरा काहीच फंडा नव्हता. फक्त एक चेहरा होता ज्याचे मार्केटिंग केले जात होते. (हेच राहुल गांधींच्याबाबतीतही करून पाहिले गेले आणि सपशेल अपयशी ठरले हा ताजा इतिहास).
आजवर काँग्रेसचे सरकार जाऊन दुसरे सरकार येणे हे फक्त जनतेला काँग्रेसचा अती उबग आल्यामुळे होत असे. पण मोदींच्या वेळी मात्र काँग्रेसच्या उबगाबरोबरच मोदींवर विश्वास दाखवावासा वाटणे हाही घटक कारणीभूत ठरला. हा मोदींनी त्या फंड्याचा चतुरपणे केलेला वापर होता.
केजरीवालांवर एखादे वाक्य खर्च करण्याची तूर्त इच्छा नाही.
-'बेफिकीर'!
बाळासाहेब ठाकरेंवर टीका होत
बाळासाहेब ठाकरेंवर टीका होत नव्हती (शामत नव्हती कुणाची )
मग ते महान नेते नाहीत ?
ज्याच्यावर टीका होते तो महान हा तोरसेकरी क्रायटेरीया आहे.
एखाद्याला रोज एक गुंड मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल, असं वर्षानुवर्षे चालल्यानंतर पब्लीकचा संयम सुटला तर तो गुंड पण महान का ?
६७ out of ७०. Please correct.
६७ out of ७०. Please correct.
राहुल गांधी एकंदर कुवत काय
राहुल गांधी
एकंदर कुवत काय फक्त गुगल सर्च रिझल्टच्या तगड्या आकड्यांवरून ठरवलीये का???
गुगल सर्च रिझल्ट्सवरून लोकप्रियता कशी ठरवलीस बाबा????
रुन्मेशजी तुमचे लिखाण वरवर
रुन्मेशजी
तुमचे लिखाण वरवर चाळले. तुम्ही मायबोलीवरचे सर्वाधिक लोकप्रिय आणि हिट्स असलेले महान लेखक आहात असं वाटलं. मला इतर काही तुल्यबळ (असल्यास) लेखकांची नावे सुचवाल का ?
स्वप्नील जोशी !
स्वप्नील जोशी !
गुरूंचे
गुरूंचे गुरू
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn%3AANd9GcSaEBY8UBpMVx456A...
पण गुरूपौर्णिमेला सर्वांनाच कसा काय विसर पडला यांचा ?
आधुनिक राजकारणात शारुक नाही
आधुनिक राजकारणात शारुक नाही
तिव्र निषेध.
भावी खासदार आहेत ते.
६७ out of ७०. Please
६७ out of ७०. Please correct.
>>>
ओके सुधारून घेतो. धन्यवाद
गुगल सर्च रिझल्ट्सवरून लोकप्रियता कशी ठरवलीस बाबा????
>>>
नाही, ते गूगल सर्च प्रकरण मला लेख टाईपताना सुचले.
लोकप्रियता मी सोशलसाईटवर जी नावे उधळली जातात त्यावरून ठरवली.
कोण आहे रे हा ?अथवा हे काय
कोण आहे रे हा ?अथवा हे काय आहे अशी उत्सुकता लागून त्या गोष्टीचा सर्च घेतला जातो.तो नेता वगैरे आहे अथवा एखाद्या निरुपद्रवी /उपयुक्त वगैरे वनस्पतीचे नाव आहे हे नंतर कळते.
Srd सर्च किती वेळा घेतला जातो
Srd
सर्च किती वेळा घेतला जातो हे नाही तर किती ठिकाणी ते नाव सापडते हे समजते ना ..
गूगल सर्च मधे जोक्स पण येत
गूगल सर्च मधे जोक्स पण येत असतील ना? म्हणून असेल तेवढा मोठा आकडा.
Who is pappu in india असा
Who is pappu in india असा सर्च करुन बघा एकदा!
र्म्द >>
र्म्द >>
ऋन्म्या,
ऋन्म्या,
गुगल सर्च मध्ये जोक पण येत
गुगल सर्च मध्ये जोक पण येत असतील ना >> हे बरोबर आहे पण बहुतेक त्याला लोकप्रिय म्हणजे किती प्रसिद्ध / कुप्रसिद्ध आहे या पेक्षा त्यांची ओळख किती लोकांना आहे हे अपेक्षित असावे.
एक तुलनात्मक अभ्यासासाठी ती उपयुक्त सांखिकी (स्टॅटिस्टीक) आहे. राजकारणात तुमची व्हिजिबिलिटी किती आहे ते महत्त्वाचे असते. पुर्वीच्या काळी जशी गावागावांत इंदिरा गांधींना ओळखत असत आणि त्यामुळे काही असले तरी मी इंदिरा गांधींच्या पक्ष्याचा आहे मला मत द्या इतके पूरे होते. आता मतदारांना वेगळी ओळख पाहिजे आणि हे तिन चेहेरे सतत त्यांच्या समोर आहेत.
त्यांच्या चांगल्या - वाईटा मध्ये फरक पडण्याकरता एक साधा विषय ही पुरेसा आहे. फक्त त्याची जाहिरात (पब्लिसिटी ) बरोबर करता यायला पाहिजे. ज्यावेळेस भाजप नी इंडिया शायनिंग केले होते ती चुकीची जाहीरात होती तशी चुक मोदींनी केली नाही याउलट राहूल गांधींना अजुन ही आपली प्रतिमा एक खंबीर नेता अशी तयार करता आलेली नाही. जर त्यांनी ती केली तर ते खुप लवकर प्रगती करू शकतात कारण लोक त्यांना ओळखतात.
केजरीवाल ही वेगळी केस आहे कारण त्यांच्यामागे तितकी मोठी संघटना नाही जितकी गांधी किंवा मोदींच्या मागे आहे. त्यामुळे त्यांना थोडा अधिक वेळ द्यावा लागेल संघटना निर्मीती करता.
हा एक विस्कळीत प्रतिसाद झाला आहे पण नीट सविस्तर लिहायला आवडेल याबद्दल आणि एकूणच प्रतिमा निर्मीती बद्दल.
निवडणुका होऊन , नवे सरकार
निवडणुका होऊन , नवे सरकार येऊन १४ महिने होऊन गेले. राहूल गांधींचा पक्ष चाळिशीत आला. नंतरच्या निवडणुकांत ही त्यांची कामगिरी घसरतीच राहिली. ते स्वतः दोनेक महिने गायब होते. पुढच्या लोकसभा निवडणुका (झाल्याच तर अजून साधारण चार वर्षे दूर आहेत)
तरीही कोणी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान म्हणून कामाबद्दल अवक्षरही काढलं तरी त्यांचे भक्तगण राहुल गांधी राहुल गांधी म्हणून नाचू लागतात. हे अनेक ठिकाणी पाहिलं आहे.
यावरून राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांच्याकडून मोदीविरोधकांना जितक्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा त्यांची मोदीसमर्थकांना अधिक भीती वाटते असे म्हटले तर वावगे काय?
गुगल मधे अनेक रिझल्ट्स येत
गुगल मधे अनेक रिझल्ट्स येत असतात. पीएमओ कार्यालकडून नाराजीही व्यक्त झाली आहे त्याबद्दल. तरी पुन्हा मोस्ट स्टूपीड असं काहीसं प्रकरण झाल्याचं अंधुकसं आठवतं.
खूप खूप मज्जा करतात मयेकर!
खूप खूप मज्जा करतात मयेकर! तीही सकाळी सकाळीच! भाजपचे अनुयायी हे भक्त आणि काँग्रेसला खांदे देणारे तत्वज्ञ! मोदींचे काम पाहायचे आणि राहुल गांधींची लोकप्रियता पाहायची. वर डोळा मारून 'हेतू गंमतीचा होता' असे दाखवून माबोटाईम संपवून मोकळे! व्वा!
राहुल गांधी
राहुल गांधी काँग्रेससमर्थकांपेक्षा मोदीभक्तांमध्येच अधिक लोकप्रिय आहेत. काँग्रेससमर्थक राहुलनाम जितके वेळा घेतात त्याच्या काही पट मोदीभक्त ते घेतात.

कदाचित मोदीनामापेक्षाही अधिक वेळा
मोदींच्या सेल्फी पाहायचे आणि
मोदींच्या सेल्फी पाहायचे आणि राहुल गांधींची लोकप्रियता पाहायची.
राहूल चे जींस-टी शर्ट चे फोटो पाहुन मनात विचार आला.अश्या पोषाखात मोदी भौ कित्ती छान दिसतिल.
२६ जानेवारीनंतर मोदींकाका जरा
२६ जानेवारीनंतर मोदींकाका जरा साधेच पोशाख घालताहेत हो.
तरीही त्यांनी फॅशनचा ट्रेण्ड सेट केलाय हे नक्की.
संघवाल्यांना जींस-टी शर्ट
संघवाल्यांना जींस-टी शर्ट चालत नाही का?
अहो ही सगळी Search Engine
अहो ही सगळी Search Engine Optimization Teams ची कमाल आहे.
अहो ही सगळी Search Engine
अहो ही सगळी Search Engine Optimization Teams ची कमाल आहे.
>>>>>>
म्हणजे? कश्या संदर्भात बोलत आहात हे?
ते एक असो, पण मुळात गूगल सर्च मध्ये काय रिझल्ट येताहेत हे फक्त एक साधे सोपे आकड्यात समजणारे पॅरामीटर म्हणून दिले आहे, किंबहुना लेखात मोदींचे सर्च रिजल्ट किती दाखवताहेत तो आकडाही दिला नाही, कारण तशी गरज भासली नाही.
आताच संपादन करून लेखातील एक लाईन बोल्ड केली आहे आणि तोच लेखाचा मुद्दा आहे.
हल्ली एखाद्या राजकीय नेत्याला सतत चर्चेत ठेवून त्यांचे मूल्य वाढवायचा प्रयत्न केला जातो का?
हा फंडा मोदींचा नाही. मोदींनी
हा फंडा मोदींचा नाही. मोदींनी तो फंडा फक्त अधिक चतुरपणे अंमलात आणला.
हा फंडा गांधी-नेहरू घराण्याचा आहे.
>>>>>>>>
बेफिकीर ओके.
म्हणजे हा मूळ फंडा मोदींचा नसला तरी तो त्यांनी वापरला हे तरी निश्चितपणे आपण मान्य करत आहात.
बाकी गांधी नेहरू घराण्यांनी पूर्वी नेमके काय केले हे मी तेव्हा नसल्याने ऐकीव माहितीवर काही बोलू इच्छित नाही.
टॉम क्रुज About 14,30,00,000
टॉम क्रुज
About 14,30,00,000 results (0.28 seconds)
लिअनार्डो डिकॅप्रिओ
About 4,11,00,000 results (0.27 seconds)
बराक ओबामा
About 19,70,00,000 results (0.33 seconds)
बिल गेट्स
About 32,00,00,000 results (0.44 seconds)
यानात्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा नंतर बिल गेट्स हवे आणि टॉम क्रुझ गृहमंत्री
सीधी बात नो बकवास, सध्या
सीधी बात नो बकवास,
सध्या वॉट्सअॅप असणार्या, बुधवार पेठेच्या गुरुमैय्यांच्या नावाने सर्च केले तर वरचे तीनही महानुभाव २,३,४ नं. वर ढकलले जातील.
जवाहरलाल नेहरू, ईंदिरा गांधी,
जवाहरलाल नेहरू, ईंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि हो सोनिया गांधी या दिग्गजांच्या मालिकेतीलच हे पुढचे एक नाव वाटते.. अन ते देखील विशेष काही सिद्ध करायच्या आधीच.
:हाहा::D

ऋन्मेष लेखाची कल्पना छान
ऋन्मेष लेखाची कल्पना छान आहे.मात्र महान नेता तो असतो ज्याच्या बद्दल देशातील सर्व धर्मिय जनतेला विश्वास वाटतो.
Pages