महिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ अंतर्गत सावली सेवा ट्रस्टला मिळालेल्या देणगीचा अहवाल

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 30 July, 2015 - 09:54

यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) फक्त एवढी देणगी सावली सेवा ट्रस्टला देवदासींच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आली.
सदर देणगीतून ट्रस्टने मुलांच्या शाळा-कॉलेजेसचे शुल्क भरणे तसेच गणवेश, चपला, बूट, दप्तरे इत्यादींची खरेदी केली. त्यांच्या पावत्या त्यांनी पाठवल्या आहेत.

तसेच देणगीदार आणि सावली सेवा ट्रस्टला मदतीचा हात पुढे करणार्‍या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्रही त्यांनी मुलांच्या प्रगतीच्या अहवालासकट पाठवले आहे.

१) आभारपत्र

2015 thanks letter by savali trust.jpg

उर्वरित भाग

savali thanksletter1.jpg२)गणवेश व इतर खरेदीच्या पावत्या :

(१)
receipt of uniforms1.jpg

(२)

receipt uniform2.jpg

(३)

receipt uniform 3.jpg

पत्रांत लिहिलेल्या मजकुरानुसार सावली सेवा ट्रस्टची मुले वेगवेगळ्या शाळांमधून, कॉलेजांतून शिक्षण घेत आपल्या पायांवर उभे राहण्याचाही प्रयत्न करत आहेत.

संस्थेद्वारा मदत केली गेलेली मुले ही देवदासींची मुले, व्यसनाधीन व गरीब पालकांची मुले, एच आय व्ही ग्रस्त गरीब पालकांची मुले, गरीब शेतकर्‍यांची मुले, एकट्या व गरीब पालकांची मुले या श्रेणींतील असून त्यांचा शिक्षणाचा व पोषणाचा खर्च संस्था करते. त्यांना वैद्यकीय मदत लागल्यास तशी मदत पुरवते. त्यांचे कपडे, क्लासेस, गणवेश, शैक्षणिक साहित्य इत्यादींचाही खर्च करते. मुलांना आधार वाटावा यासाठी संस्था दक्ष असते. त्यांना वेळोवेळी उचित मार्गदर्शन मिळावे यासाठीही प्रयत्न घेतले जातात.

संस्थेने पत्रात कळवल्यानुसार :
१) संस्थेची सुप्रिया राऊत ही विद्यार्थिनी देसाई कॉलेजमधून बी सी ए मध्ये पहिली आली व ८४% गुणांनी उत्तीर्ण झाली.
२) नमिता ही विद्यार्थिनी फर्स्ट इयर बी सी एस ला ९२% गुणांनी उत्तीर्ण झाली व कॉलेजात पहिली आली.
३) मिजाबाला एस एस सी ला ८५% मिळाले तर वैशालीला ८३% मिळाले.
४) दुर्गेश व सिद्धी यांनी एम. कॉम पूर्ण केले.
५) बारावीची सर्व मुले फर्स्ट क्लास मिळवून उत्तीर्ण झाली व त्यांनी आता टेक्निकलला प्रवेश घेतला असून जॉबची खात्री हाती घेऊन ती आता पुढे शिकत आहेत.

बाकी अपडेटस देत राहूच!

मूळ धागा :
http://www.maayboli.com/node/54743

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला आढावा अकु!
पत्रात कळवल्याप्रमाणे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खुप कौतुक वाटले. सर्वच मुले अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून पुढे येण्याची धडपड करत आहेत. त्यांना मदत करणार्‍या, मार्ग दाखवणार्‍या सावली सेवा ट्रस्ट चे अभिनंदन आणि सर्व दात्यांचे आभार.