मंद दिव्याची ज्योत..

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

jyot.jpg

परि स्मरते आणिक व्याकूळ करते केह्वा ती माजघरातील मंद दिव्याची ज्योत...

विषय: 

मस्तच गं आयटे Happy डोळ्यांना शांत वाटले बघुन.

छान!!

सिंडे, रुनी धन्यवाद Happy

आयटे, हाही फोटो छान. पिकासा वापरतेयस का? का फोटोशॉप?

आयटे,
फोटू मस्तंच गो... मनाक शांती लाभली बघून. Happy

छान आहे, पण बॅकग्राउंड प्रोसेस केलेली आहे का? एखाद्या भिंतीवर या ज्योतीचा नैसर्गिक प्रकाश जास्त चांगला दिसेल ना? मूळ फोटोत तसे नाही का?

व्वा सुंदर फोटो.. कुठ्ला कॅमेरा आहे ?

छान सोज्वळ फोटो! कवितेची ओळ देखील प्रकाशचित्राला अगदी साजेशी आहे. प्रकाशचित्राचा आकृतीबंध आवडला! भिंतीपासून पणती जरा लांब अंतरावर असावी असे दिसतेय. खरे का? त्यामुळे बॅक्ग्राऊंड ब्लर छान जमलाय.

आयटे, मस्त! त्या ज्योतीखालची धग पण दिसते आहे.
*
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर - "माझं एक स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुलं अशा राष्ट्रांत राहतील की जिथे कातडीच्या रंगावरुन नाही तर शीलसंपदेवरुन त्यांची पारख केली जाईल."

मस्तच आलाय फोटो हा..
मोगर्‍या पेक्षा जास्त आवडला... Happy

भाग्या, धन्यवाद. कधीकधी पिकासा अन् कधी फोटोशॉप. Happy
दक्षिणा, धन्यवाद. देवघरातल्या देवापुढे उजळलेल्या ज्योतीचा फोटो आहे गं हा.
अज्जुके Happy
अमोल, नाही, प्रोसेस केलेली बॅकग्राउंड नाही. Happy
डॅफो, धन्यवाद. NIkon D60 आहे.
अभिजित, भिंतीपासून दिवा जरा अंतरावरच होता, आणि ज्योतीपासून कॅमेराही Happy ज्योतीच्या धगीपासून कॅमेराच्या लेन्सला इजा वगैरे होईल अशी भीती वाटली. पहिलाच चांगला कॅमेरा आत्ताआत्ताच घेतल्याने भीतीचे प्रमाणही जास्तच आहे! Happy
आश्विनी, अडम, फोटो आवडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मस्त आलाय शैलजा फोटो, अजून येउ देत आणि त्याचे डिटेल्स पण टाकत जा जरा. ते फोटोग्राफर गुर्जी कुट गायब झालेत त्यांच्याकडून नाही आला फोटो बर्याच दिवसात.

योगेश, वर्षा, श्यामली धन्यवाद.
हो गं श्यामली, खरय तू म्हणतेस ते. खूप दिवस झाले गुर्जींचे फोटो पाहून...

सुरेख छायाचित्र, शैलजा....
डोळ्यांना आणि मनाला एकदम शांत वाटतंय Happy

आयटे, सुरेख फोटो! (ह्यावर्षीच्या दिवाळी शुभेच्छा कार्डाची तयारी आत्त्तापासून?) Happy

गणेश, संदीप, प्रीती खूप खूप आभार!
मृण्मयी, धन्यवाद गं! तू सुचवलेली कल्पना मस्तच आहे! Happy

आयटी, छान आहे फोटो. पण वातीमागेही निखारे दिसत आहेत ते कशाचे आहे कळले नाही. फुलवात होती का.. कारण फुलवात पुर्ण जळून जाते आणि तरीही तेवते.

आयटे, खूपच सुरेख फोटो..!! Happy
तुझ्याकडे फोटोग्राफरची नजर आहे.. मस्तच..
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

केदार, धन्यवाद.
बी, निखारे नाही आहेत ते, ज्योतच आहे ती.
माणसा, घ्यायचेय लेन्स. आधी ह्याच कॅमेरावर हात बसूदे नीट, मग नक्कीच घेणार Happy
किरुभाव, थ्यांक्यू, थ्यांक्यू! Happy कसली भारी कमेंट! मस्तच वाटलं एकदम! Happy

अगदी पवित्र, सुंदर फोटो. ज्योतीचा अप्रतीम क्लोज अप.

Mrinmayee म्हणते त्या प्रमाणे एखादे ग्रिटिंग कार्ड शोभेल...

छानच

मस्त आहे फोटो. डोळ्यांना शांत शांत वाटतेय.

Pages