माझे वडील : रिकामपण घालवण्यासाठी काम हवे आहे.

Submitted by मधुरा मकरंद on 27 July, 2015 - 02:21

माझे वडील, श्री. केशव देव. वय ७९. तब्येत घरातल्या घरात एकट्याने हिंडा-फिरण्यापर्यंत नीट. वयोमानाप्रमाणे थोडे विसर होण्याचा किंवा एकसंध न बोलण्याचा त्रास. औषधे चालू आहेत.
नोकरीच्या सुरवातीला १७ वर्षे आर्मीत होते. चीन आणि पाक च्या युद्धात सक्रीय होते. नंतर RBI मध्ये ड्रायव्हरची नोकरी केली. बढती मिळत गेली. वरच्या पदावर निवृत्त झाले.
शिक्षण फक्त दहावी. कष्टाच्या कामाची आवड. सुतारकाम, बागकाम यात चांगले रमत असत. घराला रंगही स्वतः काढायचे. वाचनाची आवड तशी कमी. स्वभाव तसा एकलकोंडा आणि भिडस्त.

आता असे झाले कि, हातात काम नाही... रिकामा वेळ भरपूर... बाहेर फिरण्यावर मर्यादा.... कॉम्प्युटर / मोबाईल वापरायला आवडत नाही / समजत नाही. काय करावे? "आपला आता काही उपयोग नाही.. आपल्याच्याने काही होत नाही... माझ्याच्याने कुणाचे काही अडत नाही"...अशा विचाराने त्यांची चिड-चिड होते. शिस्तीचा माणूस गहीवरून येतो. प्रसंगी रडतोही.

त्यांनी कशात तरी गुंतावे असे मला वाटते. एकूण त्यांची पार्श्वभूमी पहाता त्यांना घरबसल्या काही काम देता येईल का? कामाचा हेतु फक्त त्यांनी गुंतून रहाणे असा आहे. काम सहज करता येण्यासारखे असावे. आम्ही कांदिवली, मुंबई येथे रहातो.

ईथे काही मदत मिळेल. ईतर काही उपाय सुचवले जातील म्हणून हा प्रपंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एल पी ओ (लीगल प्रोसेस ऑट सोर्सिंग) चे वर्क फ्रॉम होम काम असते. शोधून पहा.
(नवे आलेलेकॉपीराईट्/पेटंट नियमात बसते का तपासणे.)

पेपरमधे जाहीराती असतात घरून काम करण्याविषयीच्या. त्या रिफर करू शकता.

वर्तमान पत्राच्या पिशव्या बनवण्यासारखे काही घरगुती उद्योग करता येतिल.

वाचनाची आवड असेल तर लायब्ररी बघा.

बागकामाची आवड असल्याने थोडि जागा असेल तर बघा

टेली मार्केटिंग वगैरे सारखे काम शक्य असेल तर बघा.

राजकिय /सामाजिक allignment असेल तर अशा एखाद्या ग्रुप बरोबर जोडले गेल्यास त्यांच्याकडे बरिच कामे असतात घरबसल्या करता येण्यासारखी.

नेटवर डु इट योउर्सेल्फ मध्ये बरेच उद्योग असतात. त्यातले सुतारकाम, हस्तकला इ. कोणीतरी एकदा नीट समजावुन घेऊन (कारण बाबांना कंप्युटरचा कंटाळा आहे) मग त्यांना करण्यासाठी सांगितले तर त्यांचा वेळ जाईल. काँप्य्पुटर जरी आवडत नसला तरी त्याच्यावरचे विडिओज बघुन त्यांना करता येईल कदाचित. अर्थात हे करण्यासाठी समजावणा-यालाही स्वतःचा वेळ देणे भाग आहे, जे आजच्या घाईत सगळ्यांना जमेल असे नाही.

आजुबाजूला ज्येष्ठ नागरिक संघ/ लायब्र्री / मंदिर/ गार्ड्न असेल तर तिकडे किंवा सोसायटीत/ कॉलनीत राऊंडवर जायला सांगा. तिकडे त्यांना समवयस्क लोक भेटतील.एकदा असा ग्रुप भेटला/ बनला तर वेळ मजेत जातो.

आमच्या नवी मुंबईत महानगरपालिकाने प्रत्येक नोडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ बांध्ञ्न दिले आहेत. तिकडे ज्येष्ठ नागरिक भेटतात. कॅरम/ बुद्धिबळ खेळतात/ पेपर वाचतात. काही ग्रुप्स भटक्या/ कामकरी लोकांच्या मुलांची शाळापण चालवतात. काही मैदानात योगासने/ हास्यकल्ब/ प्रवचने करतात.

सर्वांना धन्यवाद.

बाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहेत. पण फारसे जात नाहीत.

पहाते काय करता येते ते.

बाबांना काही मर्यादा आहेत असे जाणवते. आर्मीच्या नोकरीच्या अंगभूत ग्रूमिंग मुळे बेशिस्त लोकांत हे लोक रमू शकत नाहीत. दीर्घ काळासाठी डिटॅचमेन्ट झालेली असते. दुसरे विस्मरणाचा त्रास दिसतो आहे. शिक्षणाच्या मर्यादेमुळे वाचनावरही मर्यादा आहेत असे दिसते फारशी आवडही डेवलप झालेली दिसत नाही. तरी बोल्ड टायपातल्या धार्मिक गोष्टी अभंग वाचू शकतील असे वाटते. या वयात धार्मिकतेकडे कल वाढतोही माणसाचा.

सॉलीटेर, फ्री सेल सारखे गेम शिकवायला हरकत नाही. कॉम्प्युटरवर अथवा प्रत्यक्ष पत्ते वापरून...
कामाचा जास्त त्रास देण्यात अर्थ नाही असे वाटते. या वयातल्या व्यक्ती छोट्या मुलात जास्त रमतात...

कॉम्प्यूटरला पर्याय नाहीच. तो शिकणे आवश्यक आहे. आर्मीतले अनुभव वगैरे लिहून काढायला सांगा. त्याने स्मरणशक्तीला चालना मिळेल. लिहिण्याचा कंटाळा असेल तर रेकॉर्डही करू शकाल.

पण शक्यतो अवजारे वापरावी लागतील अशी ( सुतारकाम ) कामे देऊ नका. पेपर बॅग्ज वगैरे ठिक आहेत.
बागकाम आवडत असेल, तर ते अवश्य करु द्या.

सॉलीटेर, फ्री सेल सारखे गेम शिकवायला हरकत नाही. कॉम्प्युटरवर अथवा प्रत्यक्ष पत्ते वापरून...
कामाचा जास्त त्रास देण्यात अर्थ नाही असे वाटते. या वयातल्या व्यक्ती छोट्या मुलात जास्त रमतात...>>>

अस असेल तर ,लहान मुलांसाठी काही वर्ग घेता येतिल,का बघा?
संस्कर वर्ग , कधी नुसत्याच गोष्टी .

माझे एक नातेवाईक रिटायर्ड आहेत. इंजिनिअर होते. वय असंच ८०च्या आतबाहेर. वयानुसार काही एल्मेन्ट्स आहेत त्यांना.
ते जुन्या ग्लॉसी मॅग्झीनच्या कव्हरांची सुंदर पाकिटं (एन्व्हलप्स), पिशव्या बनवतात. आणि लोकांना देतात. छंद म्हणून.

रंगकाम, सुतारकामाची आवड असेल तर नुसते फिनिश न केलेले लाकडाचे छोटे ट्रे , मातीची मडकी, पणत्या वगैरे रंगवून डेकोरेट करता येतील. तयार झालेल्या गोष्टी भेट देता येतील किंवा जेष्ठ नागरीक संघात फंड रेझरसाठी देता येतील. अजून एक. क्रोशे शिकतील का? साधे दोन-तीन बेसीक स्टिचेस शिकले तर लहान मुलांसाठी / वृद्धांसाठी टोप्या बनवता येतील. रिपीटेड अ‍ॅक्शन मन शांत ठेवते. जोडीला कुणाच्या तरी उपयोगी पडल्याचे समाधानही मिळते.

आजकाल बरेच ठिकाणी लहान मुलांच्या वाढदिवसाला थर्माकोल चे कार्टून चे पोस्टर बनवुन लावलेले दिसतात...त्यामध्ये पांढर्‍या थर्माकोल वर स्टेन्सिल ने ते चित्र काढायचे आणि नंतर कापुन रंगवायचे असे काम असते..तसे काम घरात बसुन करणे शक्य आहे..रंगकाम तर आवडतेच ..+ सुतारकामा इतके कष्ट नाहित आणि त्या प्रकारचेच काम असल्याने हे आवडतेय का बघा

१. शब्दकोडी सोडवायला देणे. सुडोकु आवडत असेल तर ते.
२. घरातली छोटी छोटी कामे करू शकतात का? जसे की, कपड्यांच्या घड्या घालणे, भाजी निवडणे, रद्दी नीट जुळवून रचून लावणे, प्लास्टिकच्या किंवा पेपरच्या थैल्या नीट घडी करून ठेवणे, ओली भांडी - ताटे - वाट्या पुसून जागच्या जागी ठेवणे, देवपूजा वगैरे करत असाल तर पूजेची तयारी करणे वगैरे. ज्या ज्या कामांना फार ताकद लागणार नाही, तरी स्किलचे काम आहे अशा प्रकारचे घरकाम.
३. जवळपास हिंडू फिरू शकत असतील तर रोज थोडे पैसे देऊन भाजीवाल्याकडून पावशेर भाजी आणायला सांगायची. (जास्त ओझे नको)
४. घरात रोपांच्या कुंड्या असतील तर रोपांना पाणी घालणे, कुंड्यांची साफसफाई वगैरे.
५. त्यांच्या आवडीची गाणी, अभंग, स्तोत्रे, कविता असतील तर ती ऐकून त्यांचे शब्द लिहून काढणे.
६. आर्मीतील सीमेवर किंवा दुर्गम स्थानी पोस्टिंग झालेल्या जवानांना प्रोत्साहक पत्र लिहिणे.
७. आर्मीतील जखमी जवानांना किंवा उपचार घेत असलेल्या जवानांना आर्मी इस्पितळात जाऊन भेटणे, त्यांच्याबरोबर बोलणे, गप्पा मारणे. (सोबत तुम्हाला कोणाला तरी जावे लागेल.)
८. वर्तमानपत्रांत वाचकांची पत्रे विभागात सामाजिक किंवा बातम्यांमधील हव्या त्या विषयांवर पत्रे लिहिणे.
९. अनाथाश्रमांतील मुलांसाठी पत्रे लिहिणे. त्यांच्यासाठी वस्तू बनवणे. तुकड्या तुकड्यांच्या पिशव्या - दुपटी बनवणे.
१०. जवळच्या एखाद्या ओळखीच्या, पंगू व्यक्तीच्या दुकानात बसून त्या व्यक्तीला दुकान सांभाळायला मदत करणे.
११. टांचण-वही तयार करणे. वर्तमानपत्रांतील, मासिकांतील त्यांच्या आवडीच्या विषयांवरील बातम्या / लेखांची कात्रणे कापून त्यांची एक वही तयार करणे.

सामाजिक संस्थाना स्वयंसेवकांची गरज असते. अश्या एकाद्या संस्थेसाठी काम केल्यास वेळही जाईल आणि समाधानही वाटेल...

हो, बरोबर गोगा. वडीलांची ने-आण करायची व्यवस्था होत असेल तर जवळपासच्या गरजू, सेवाभावी संस्थेत अगदी फोनवरील निरोप घेणे, त्यांचे हिशेब ठेवणे, लोकांना माहिती देणे, पत्रे लिहिणे, पत्रव्यवहार सांभाळणे यांसारखी अनेक कामे करता येऊ शकतात. गरज असतेच.

मुलांनी किंवा इतरांनी त्यांना विरंगुळा म्हणून का होईना काहीतरी काम लावून देणं ही त्यांना ढवळाढवळ नाही ना वाटणार ?

वाटू शकते . फार किरकोळ कामे सांगणे अपमानास्पदही वाटू शकते... त्या पिढीचा विचार करता बायकी कामे सांगणे देखील त्याना कदाचित आवडणार नाही...

अहो त्यांना एक काँप्युटर घेऊन द्या नि मायबोली दाखवून द्या. मी बोलीन त्यांच्याशी. (नाहीतरी तुमच्या सारख्या पोराटोरांत काहीतरी निरर्थक बोलण्यापेक्षा आपल्या वयाच्या लोकांशी बोलणे बरे.)
ब्रिज खेळतात का? ब्रिज हा एक उत्तम खेळ आहे, बुद्धि, स्मृति या दोन्ही साठी चांगला. मला आवडेल ऑन लाईन खेळायला. कुणि नसला पार्ट्नर नसेल तरी खेळता येते. ऑन लाईन असल्यावर जगात कुठेहि असतील तरी वेळा जमवता येतील.

चांगल्या सूचना आल्या आहेत. कामकाजाबाहेर फारसा मित्रपरिवार नसावा असं वाटतं आहे, आणि आता या वयात नव्याने सुरुवात करणं बहुधा नकोसं वाटत असावं (म्हणून ज्येष्ठ नागरीक संघात जायचं टाळत असावेत.)

पूर्वी त्यांच्याबरोबर काम केलेल्यांपैकी कोणाशी संपर्क साधण्यासारखा असेल तर त्यांना घरी गप्पांसाठी वगैरे बोलावता येऊ शकेल. रोजचं काम 'नेमून' देण्यापेक्षा (ते अपमानास्पद वाटू शकतं) 'जरा हे देता का करून - मला अगदी वेळच होत नाहीये बघायला' किंवा 'ते अमुक मोडलंय त्याचं काही करता येईल का' असं (आपल्यालाच मदतीची निकड आहे अस भासवत) बोलत काहीतरी काम सोपवता येतं का पाहता येईल. त्यांनी ते केल्यावर त्याबद्दल आवर्जून त्याबद्दल त्यांच्यापाशी आणि येणार्‍याजाणार्‍यापाशी चांगलं बोला म्हण्जे 'आपला कोणाला उपयोग नाही' हे फीलिंग जायला कदाचित मदत होऊ शकेल.

तुम्ही यातलं बरंच काहीआधीही ट्राय केलंच असेल. Happy
बाकी हे प्रयत्नच असतात, तुम्ही चांगल्या हेतूने काही सांगायला गेलात आणि त्यांना आवडलं नाही असं होऊ शकतं याची तयारी ठेवा. उतारवयाने कशावरही चिडचीड करतो माणूस. तुम्हालाच जरा पेशन्स वाढवावा लागेल. तुम्हाला शुभेच्छा. Happy

धागा अवांतरात का आहे?
उत्तररंग नावाचा छान ग्रूप केलाय ना आपण तयार?
*
रिकामपणापायी माणूस जगण्याची इच्छा हरपून बसतो. काहीतरी 'बिझी'नेस हवाच.
*
आजूबाजूच्या लहान मुलांना संध्याकाळी चक्क शाखेत खेळतात तसे खेळ खेळविणे, शिस्तबद्ध संचलन, पीटी, व्यायाम इ. शिकवणे, गोष्टींची पुस्तके वाचून दाखवणे इ. करू शकतात. पण तुम्ही सांगितलेल्या फिजिक कंडिशनला हे जरा झेपणार नाही असे वाटते.

वाचनालय चालवणे असा एक बसल्याजागी उद्योग करता येऊ शकतो.

आर्मीतून रिटायरमेंट लवकरच झाली असणार. त्यानंतर आजपर्यंत जे काम केले त्याचे एक्स्टेन्शन करता येईल असे काहीतरी केले तर बरे होईलसे वाटते.

सुपरवायझिंग प्रकारचे, त्यांना जास्त न थकवणारे व ठराविक वेळाचे कामही ते करू शकतात. जसे की, अभ्यासिकेतील मुलांवर लक्ष ठेवणे. सार्वजनिक वाचनालयात देखरेख. लोकांनी वाचून तशीच ठेवलेली वर्तमानपत्रे पुन्हा नीट घडी घालून व्यवस्थित ठेवणे वगैरे.

पत्रमैत्री हाही एक पर्याय आहे. आपला प्रांत, तेथील माणसं, निसर्ग, आपलं आयुष्य यांविषयी कधी न पाहिलेल्या व्यक्तीला सांगणं... इंटरनेटच्या जगातही असे अनेक लोक आहेत जे पत्रांतून मित्र शोधत असतात.

रंगकाम, सुतारकामाची आवड असेल तर नुसते फिनिश न केलेले लाकडाचे छोटे ट्रे , मातीची मडकी, पणत्या वगैरे रंगवून डेकोरेट करता येतील. >> +१

विस्मरण होत असेल तर लेखन (किंवा मोबाईल इ वर रेकॉर्ड करणे) करायला जरूर सांगा. अनेकवेळा महत्त्वाचे/ थरारक जीवन अनुभव त्या त्या व्यक्तीपुरते राहतात. पत्नीसही सगळ सांगितले असेल असे नसते. असे आत्मचरित्रात्मक अनुभव लिहून ठेवले (रेकॉर्ड केले) तर नातवंडे किंवा इतर परिवारासाठी तो एक ठेवा असतो. उदा: लहानपणी एक वयस्कर नातेवाईक फाळणीचे अनुभव सांगायच्या. सिंधी लोक कसे गावात आले, त्यांच्याशी बोलणे ही अवघड कारण हिंदी भाषा येत नसे इ इ. त्या आजींनी काहीच लिहून ठेवले नाही ह्याच वाईट वाटते आता.

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.

रंगकाम, सुतारकामाची आवड असेल तर नुसते फिनिश न केलेले लाकडाचे छोटे ट्रे , मातीची मडकी, पणत्या वगैरे रंगवून डेकोरेट करता येतील. >> +१ >>>> हे जमेल असे वाटते. बहुदा करतील.

३-४ महिन्यापूर्वी जिगसॉ सारखा खेळ आणला होता. लहान मोठ्या तुकड्यांतून थ्रीडी घर आणि थ्रीडी बोट तयार होत होती. "परत परत करा. तुम्हाला न बघता करता आले की दुसरा खेळ आणू असे सांगितले." एक दोन वेळा केले, मग कंटाळा केला.

प्रयत्न करते. प्रगती लिहिनच.

hi same issue. my father is now working in temple as service man( Savekari). He is enjoying the work. Now he is having lots of his friend.

Pages