|| श्री हरी ||

Submitted by इंद्रधनुष्य on 27 July, 2015 - 00:48

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवभाव॥१॥

येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ॥२॥

बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥

तुका ह्मणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

सुंदर