घर्/जागा/गाव्/शहर सोडून नव्या जागी रूळताना

Submitted by वेका on 24 July, 2015 - 22:11

"शिरेयस चर्चा फक्त शुक्रवारी करून मिळतील. एरवी जादा चार्ज पडेल" अशा समेवर येऊन संपलेली नव्हे तर सुरु झालेली बेकरीवरची चर्चा इथे हलवतेय.

आपल्यापैकी काही जणांना नोकरी/शिक्षण किंवा इतर कुठल्याही (जसं बेटर किंवा स्वतः नोकरीबदलल्यामुळे वगैरे) जागा बदलांचा अनुभव असेल. त्यात तुम्ही आधीच्या जागी बरीच वर्षे राहिलात तर तुमची त्या जागेबद्दलची जवळीक जास्त असते. अशावेळी पटकन उठून दुसरीकडे स्थापन्न होणे, हे सहज शक्य होत नाही. त्यावेळी कोतबो होणं साहजिक आहे. हे तिथलं उचलून इथे चिकटवतेय. पण ज्यांना याबाबतीत जास्त अनुभव आहे त्यांनी आपले अनुभव, दुसरीकडे लवकर रूळता येण्याचे काही सोप्पे उपाय वगैरे असतील तर ते आणि ज्यायोगे जे आत्ता (किंवा हा धागा वाचताना) या अनुभवातून जाताहेत त्यांचं मनोधैर्य उंच होण्यासाठी जे उपयुक्त वाटेल ते सगळं काही इथे येऊन सांडलंत तर चालेल. Happy

वेका | 25 July, 2015 - 07:16
बरीच वर्षे एकाच ठिकाणी राहून मग मुव्ह करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपण इतके आपल्या सभोवतालच्या लोकांना सरावलो असतो की नव्या ठिकाणी पटकन एकटेपणा येतो. आता हा चुकून कुणी चांगला मित्र्/मैत्रीण मिळाल्यामुळे दूर झाला तर ठीक नाहीतर तोच एकटेपणा आपण आपल्या फायद्यात रुपांतरीत करायचा.

थोडक्यात स्वतःचा शोध घेणे हे काळात शक्य होतं आणि शिवाय पुढे-मागे हा एकटेपणा वेगळ्या कारणाने येऊ शकतो तेव्हा काय याचा विचार केला जातो. मग त्या अनुषंगाने काही वेगळे मार्ग पुढे येतात. एकला चालो रे वगैरे मिथ्या नसून सत्य आहे हे पटतं.... आता मला माझं वय झाल्यासारखं वाटायला लागलं स्मित
पण काय होतं की ही शेवटी तात्पुरती अवस्थाच असते. हेही दिवस बदलतात नव्य जागी केल्या जाणार्^या नव्या गोष्टी, भटकंती, खाऊ गल्ल्या जे काही तुमच्या आवडीचं असेल ते तुम्ही पुन्हा करू लागता. और दिल ने कब करवट बदली पता ही नहीं चलता...यही तो है जिंदगी मेरे दोस्त.

धनि तुझ्या धाग्यासाठी सेव्ह करून ठेव स्मित

संपादन

पारु | 25 July, 2015 - 07:27
<एन्ड गोल डिग्री आहे आणि ती झाली की इथुन निघायचे आहे हे दिसत होते.> +१
मी पोर्टलँडला ७-८ महिने होते इंटर्नशिप साठी तेंव्हाचा काळ खुप एन्जॉय केला मी.
पोर्टलँडल आणि सिएटल चे हवामान तसे बरेच सारखे आहे हे त्यातल्या त्यात बरे आहे.

मी अंडरग्रॅड झाल्या वर कंपनी कडून डेन्मार्कला गेले होते. माझ्या बरोबर एक तेलगु कलिग होती. आम्ही खुप रडायचो होमेसिक होउन. काही दिवसांन्नी आम्ही रेन्ट्ल अपार्ट्मेंट बदलत होतो तर त्या नवीन अपार्टमेंट चा जुना भाडेकरु जो मुळचा युके चा होता तो सामान हलवत असताना भेटला. कितीतरी वेळ आमच्याशी बोलत होता त्याच्या युकेच्या घराविषयी, कुटुंबाविषयी आणि नंतर आम्हाला म्हणे इफ यु फील होमेसिल वी कॅन मीट अ‍ॅंन्ड टॉक ! त्याला बघुन वाटलं की आम्ही एकटेच नाही आहोत जे थोडे आउट ऑफ प्लेस फील करत आहोत आणि आम्हाला जरा बरं वाटलं स्मित

rmd | 25 July, 2015 - 07:29
मूव्ह करण्याबद्दल माहिती नाही. पण एमेस करायला इथे आले हे एक मोठ्ठं मूव्ह करणंच होतं माझ्या दृष्टीने. सगळंच नवीन होतं. शेअरिंगमधे राहणं हा ही नवीन एक्स्पिरिअन्स होता. आजूबाजूला लोकं असून एकटं वाटायचं. आता एकटं असूनही त्रास वगैरे होत नाही. पुन्हा रूमीज बरोबर राहायला आता नको वाटतं. तर हा सवयीचा भाग आहे असं मला वाटतं.
इतकं बोलून आता मीटिंगडे फिदीफिदी

पियु | 25 July, 2015 - 08:03
नमस्कार, मंड्ळी. आज अगदी गंभीर चर्चा.
मूविंगचा अनुभव नाही पण एका जवळच्या मैत्रिणीला यातुन जाताना बघतेय, रादर ऐकतेय. इथे बर्याच मेहनतीने मिळविलेला मनासारखा जॉब सोडुन ईस्ट कोस्टला मूव्ह झाली. तिथे घडी बस्तेय तोवर पुन्हा वर्षभरात वेस्ट कोस्टला दुसर्या शहरात. आता मैत्रिणी नाहीत, जॉब नाही म्हणुन जाम डीप्रेस होते कधी कधी. पण मुळात स्वभाव उद्योगी आणि मनमिळाऊ त्यामुळे जिथे जाइल तिथे गोतावळा जमवेलच.
मला वाटत, एका ठराविक वयानंतर सेट रूटीन मधे बदल नको वाटतात.

rar | 25 July, 2015 - 08:33
माय हायपोथेसिस - जितकी सिस्टीम जास्त रिजीड कराल/असते - तितकी कोलॅप्स लवकर होते/त्रास जास्त होतो.
प्लेक्झीबीलीटी असणं (मग ते खाण्याच्या वेळा असोत किंवा राहण्याच्या जागा असोत..लोल) अवश्यक आहे.
मुळात लाईफ इतकं अनसर्टन आहे, तरी आपण फार दूरचे प्लॅन करतो आणि त्यात फार रूतत जातो आणि रिजीड होत जातो.

- रारमहाराज मोड ऑफ हाहा

सीमंतिनी | 25 July, 2015 - 08:43
एक निरिक्षण स्वतः व मित्रपरिवाराला बघून - मूव्हिंगचे कारण मनापासून पटले नसेल तर मूव्हिंगचा त्रास होतो. एखादे ध्येय डोळ्यासमोर असेल तर मूव्हिंगचा फारसा बाऊ वाटत नाही, उलट एक्साईटमेंट असते. जुन्या गावाकडे बघताना 'गुड टाईम्स!' एवढीच ओळ मनाशी येते.

पारू अशे ब्रिट ड्यूड्स असतील तर रोज होम्सिक व्हायला होईल न काय डोळा मारा स्मित

फारएण्ड | 25 July, 2015 - 09:05
अरे छान लिहीत आहात लोकहो (रारमहाराज यांचे निरूपण सुद्धा फिदीफिदी). पण हे वाहून जाईल. कोणीतरी बाफ काढा एक.

साहिल शहा | 25 July, 2015 - 09:07
ह्या धाग्यावर गंभीर चर्चा!

वेका, rar , सीमंतिनी तिघाचे मुद्दे पटले.

आम्ही १५ वर्ष सिंगापुरला राहुन मुलाच्या शिक्षणासाठी ३ वर्ष अमेरिकेत बदली करुन घेतली. सुरवातिला ध्येय समोर असल्याने काही वाटले नाही पण मुलाला चांगली university मिळाली की ध्येय पुर्ण झाल्यावर एकटेपणा जणवायला लागला आहे. . आता शेवटचे वर्ष काढायचे आहे तर दिवस मोजतोय. असे वाटते की कधी एकदा आपल्या गावी परत जातोय.

खाली सोन्याबापू यांनी दिलेली अतिशय सुंदर कविता इथे देतेय.

I must go down to the seas again, to the lonely sea and the sky,
And all I ask is a tall ship and a star to steer her by;
And the wheel’s kick and the wind’s song and the white sail’s shaking,
And a grey mist on the sea’s face, and a grey dawn breaking.

I must go down to the seas again, for the call of the running tide
Is a wild call and a clear call that may not be denied;
And all I ask is a windy day with the white clouds flying,
And the flung spray and the blown spume, and the sea-gulls crying.

I must go down to the seas again, to the vagrant gypsy life,
To the gull’s way and the whale’s way where the wind’s like a whetted knife;
And all I ask is a merry yarn from a laughing fellow-rover,
And quiet sleep and a sweet dream when the long trick’s over.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका डार्लिंग.. हे पुस्तक नक्की नक्की वाचं(च)
हू मूव्ड माय चीज

तुला पडलेले सगळे प्रश्न चुटकीसरशी दूर होतील.. मोस्ट इन्स्पायरिंग बुक!!! ( स्वानुभावाने !)

कंफर्ट झोन मधून बाहेर प्रयत्नपूर्वक पडलंच पाहिजे नाहीतर फुकट ताप होतो, बी प्रॅक्टीकल ( स्वानुभावाने !!!!)

मूव्ह होणार म्हणले की कुणी ना कुणी वपुंच्या गोष्टीतील एकबोटे प्रमाणे वागले आहे. माझी सोय कशी ना कशी लागत गेली. हा धागा निघाल्यावर प्रत्येक मूव्ह्चा बारकाईने विचार केला. Happy फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स हे अत्यंत पॉवरफुल नाते आहे!

मूव्हिंगच्या बाबतीत ' दि मोर यू स्वेट इन पीस, दि लेस यू ब्लीड इन वॉर' ह्याचा फार फार प्रत्यय आला आहे. नियमितपणे काही संस्थाशी संलग्न होते उदा: कॉलेजची अ‍ॅल्मनाय असोसिएशन. नवीन गावात गेले की नवे अ‍ॅलम्नाय हाय काय नि नाय काय!!

इथे लिहिण्यासारखे बरेच काही आहे. साधं लग्न झाल्यावर अंबरनाथहून पुण्याला आले तरी खुप काही गमावलं.
देश इ. सोडून जाणारे लोक खरंच ग्रेट आहेत.

पण मला अजुनही दोन्हीकडे आपण उपरेच असं फिलींग येतं. मुंबईतही आणि पुण्यातही. Sad

पियु | 25 July, 2015 - 08:03

>> अ ओ, आता काय करायचं हे कोण आहे?<<< किमान दहा वर्षं जुना आयडी आहे.

बाकी लिहिण्यासरखे बरंच काही आहे. गेल्या कित्येक वर्षांत महाराष्ट्र, मंगलोर, गोवा, चेन्नई असं फिरल्यानंतर आता मात्र मूव होणे नकोसे वाटत आहे. अर्थात कारणं वेगळी आहेत, पण प्रत्येक ठिकाणी गेल्यावर सर्व सुरूवात पहिल्यापासून करावी लागते याचा मात्र कंटाळा आलाय. त्यात आमचं स्थलांतर मुंबई-रत्नागिरीगोअवा- मंगलोर- अतीपतीपुद्दूनगर (चेन्नईपासून ५० किमी) असं झाल्यानं प्रत्येक वेळी नवीन समस्या आणि नवीन फायदे तोट जाणवले आहेत.... आता मात्र इथून परतायचं तर रत्नागिरी किंवा मुंबईलाच असं ठरवलं आहे.

किमान दहा वर्षं जुना आयडी आहे.

>> अगं हो. पण मध्ये निद्रिस्त होता बहुतेक. मी मेल पण केली होती संपर्कातुन १-२ वर्षांपुर्वी. पण नो रिप्लाय.
म्हणून तर मी हा आयडी घेतला. तो जुना आयडी आता परतणार नाही असं समजुन. Sad

माझी नोकरी ऑल इंडिया ट्रान्सफर ची, आता रिलोकेशन चे काहीच वाटत नाही , वाटून उपयोग नाही, कधीही होम सिक किंवा जुन्या पोस्टिंग ची आठवण आली की मी खालील कविता वाचतो, जॉन मासेफील्ड नामक इंग्लिश कवी ची सी फीवर नामे ही कविता आहे, रिलोकेट व्हायची इच्छा नसते पण नव्या ठिकाणी पाहण्या शिकण्या लायक खुप काही असते म्हणूनच.....
I must go down to the seas again, to the lonely sea and the sky,
And all I ask is a tall ship and a star to steer her by;
And the wheel’s kick and the wind’s song and the white sail’s shaking,
And a grey mist on the sea’s face, and a grey dawn breaking.

I must go down to the seas again, for the call of the running tide
Is a wild call and a clear call that may not be denied;
And all I ask is a windy day with the white clouds flying,
And the flung spray and the blown spume, and the sea-gulls crying.

I must go down to the seas again, to the vagrant gypsy life,
To the gull’s way and the whale’s way where the wind’s like a whetted knife;
And all I ask is a merry yarn from a laughing fellow-rover,
And quiet sleep and a sweet dream when the long trick’s over.

कुठल्या ना कुठल्या कारणाने गेल्या १६ वर्षात खूप हलवाहलवी झाली. आता हिशेबही नाही ठेवावासा वाटत. (नकारात्मक असं नाही, पण किती नि काय बोलू म्हणून)
टीनेजर असताना शेअर रूममधे रहायचा, मग पुन्हा घरी, म्ग थेट कॉलेजचं गजबजलेलं होस्टेल, पुन्हा आई-बाबा, पुन्हा पीजी (हे मात्र नोकरीला लागल्यावर), मग सासर, मग परदेश, मग पुन्हा पुण्यात, आता पुण्यातच पण वेगळ्या जागेत रहायचा अनुभव..आणि या सगळ्या फेजेसमधून जाताना प्रत्येक फेजची एक डिमांड, त्यानुसार येणारी जबाबदारी.. प्रत्येक डिमांड आधीच्यापेक्षा प्रचंड वेगळी. त्यात होणारी माझी दमछाक! पण हेच आयुष्य आहे हे एकदा समजलं की त्रास कमी होतो. रार म्हणते तसं फ्लेक्सि असलं तर मजाही येतेच. मी कधी त्रासले, कधी आनंदले. पण गेले तिथे माणसं जोडू शकले ही खूप मोठी जमेची बाजू आहे माझ्यासाठी. Happy

मला खूप त्रास झाला मानसिकदृष्ट्या. मुंबईच्या आसपास राहायलाच आवडतं मला. त्यातल्यात्यात डोंबिवली.

बालपण, शिक्षण सर्व डोंबिवलीत. लग्न होईपर्यंत तिथेच. मग नालासोपारा येथे १० वर्ष काढली. पण मनाने कायम डोंबिवलीकर राहिले पण निदान नालासोपारा, डोंबिवलीला जवळ तरी.

नंतर नवऱ्याची बदली नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला झाली. ती पावणेचार वर्ष मात्र मला खूप जड गेली. मी बरेचदा डोंबिवलीला आईकडे यायचे. मग माझ्या लक्षात आले आपण नाही adjust होऊ शकत कुठेही आणि आता डोंबिवलीलाच settle झाले. मे बी माझ्यातला हा दोष असेल.

माझा नवरा मात्र कुठेही adjust होतो पटकन.

रिलोकेशन, मूविंग माझ्या मते फार सोपं असतं तो काळ बहुतेक मुलं होण्याच्या आधी किंवा मुलं अगदीच लहान असतील तेव्हा. एकदा मुलं नऊ, दहा वर्षांची झाली की हा प्रकार अतिशय कठीण होऊन बसतो.
आम्ही स्वत: आधी ४ ते पाच वेळा घर/ शहर आणि क्वचित देशही बदलले. दर वेळेच नवीन बदली काहीतरी नवीन चॅलेंज, मजा म्हणून खूप एन्जॉय केली. जिथे गेलो तिथे आमच्या नशिबाने चांगले मित्र मिळाले.

मुलं झाल्यावर मात्र जरा एके ठिकाणी सेट्ल झालो होतो. त्यामुळे त्यांना जन्मल्यापासून एकच घर, तेच गाव, शाळा, मित्र त्यांचं जग तेच. आता मात्र दोन वर्षांपूर्वी आम्ही पुन्हा मूव केलं. शहर काय, देशही बदलला. हे रिलोकेशन मात्र आम्हाला अतिशय जड जातय. आम्हा दोघांना या बदलांची सवय असल्यामुळे आम्ही चटकन इथे सेट्ल झालोय. पण मुली मात्र व्हेन आर वी गोइंग होम हेच सारखं विचारताहेत अजूनही.

अर्थात हा फक्त माझा अनुभव आहे. काही मुले पटकन अड्जस्ट होऊनही जातात. तरीही मला वाटतं मुलं जरा मोठी होऊ लागली की मूविंग ची फ्रीक्वेन्सी कमी केलेली बरी, पण तेही काही आपल्या फार हातात नसतच. जेव्हा आणि जिथे दाना-पाणी असेल तेव्हा तिथे जावच लागतं.

सर्वसाध्ररणपणे आपल्याला रुटीन लाईफ पाहिजे असतं. आपण एखादा पिक्चर कसा दोन/ तीन वेळा पाहू शकत नाही तर एखाद्या ठिकाणी राहून/ नोकरी करुन कसं रुटीन जगू शकतो?

मला नवीव जागा, नवीन प्रॉब्लेम आणि नवीन लोक्स खूप आवडतं.एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊन अनुभव
घेणं आणि त्या ठिकाणी उदारनिर्वाहसाठी राहून अनुभव घेणं यात जमीन अस्मानचा फरक आहे.

जेव्हा मुलं ६ वर्षाची होतात मग त्यांचा शाळेमुळे/ शिक्षणामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो.पण मुलं अ‍ॅडजस्ट होणारी असेल तर रिलोकेट व्हायला अजून मज्जा! माझ्या बायकोला तर मुलं सेट्ल झाल्यावर/ ५०शी नंतर पुन्हा रिलोकेट व्हायह्च आहे.

दुसरीकडे लवकर रूळता येण्याचे काही सोप्पे उपाय 》》》》》

गेल्या १० वर्षामधे ७ वेळा स्थलांतर केले. प्रत्येकवेळेस चा यशस्वी फॉर्म्युला

१. जवळपासचे मित्र, कलीग यांना घरी जेवायला बोलाविणे, सोबत चित्रपट पहायला जाणे. हे करताना भाषा, धर्म, जात, देश याचा आजिबात अडसर येउ न देणे. आंध्रामधे गावामधे तेलगु चित्रपट थिएटर मधे बघणे हा सुद्धा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

२. एखादा मैदानी खेळ खेळतो. मन आणि शरीर दोन्ही ताजे तवाने होते. ओळखी नसतील तर होतात.

३ . आपला एखादा छंद असल्यास तो वाढविणे. आपल्या लोकल ओळखीमधे एखादा कोणी समान आवडी निवडी असलेला मेंबर असल्यास शेअर करणे.

४. हे काहीच नसल्यास तासा तासा ला माबो वर येउन प्रत्येक बीबी वर प्रतिसाद देणे.

Happy

I must go down to the seas again, for the call of the running tide
Is a wild call and a clear call that may not be denied;
And all I ask is a windy day with the white clouds flying,
And the flung spray and the blown spume, and the sea-gulls crying. >> वाह! किती सुरेख!

वरील अनेक मुद्यांना अनुमोदन. Happy

गेल्या पंधरा वर्षात काही वेळा स्थलांतर, घरबदल, आणि तिनदा देशांतर (आणि तदनुषंगाने थोडेसे वेषांतर... ) केले/ कामानिमीत्ताने करावे लागले. तरीही नवीन जागी (अगदी आपल्याच देशात पुन्हा परतताना ) थोडेसे 'बाकबुक' होतेच.
मुलीच्या शिक्षणासाठी बर्‍याच समस्या येतात. शाळाप्रवेश फार कटकटीचा होता. पण मला एकुणात आवडत असे नवीन अनुभव घ्यायला.
प्रत्येकवेळेस नवीन डाव, नवीन परिसर, नवीन लागेबांधे.... करुन घ्यायचा म्हटला तर त्रास होणार, पण जर खुल्या दिलाने सामोरे गेलो तर मज्जा येते.
कागदोपत्री मात्र जाम वैतागवाणे काम होऊन बसते. दीडेकशे नवीन फॉर्म, अमुकढमुक लाल फीत सोडवता सोडवता नाकी नऊ येतात. तसेच प्रत्येक नव्या ठिकाणी हापिसात एकीकडे काम करुन, कामाच्या पद्धती/ रीतीरिवाज शिकुन एकीकडे घरी पोराबाळांना सेटल करणे, पर्सनल अ‍ॅडमिन कामे हे बर्‍यापैकी अवघड होते. शक्य झाले तर, एकाला तरी थोडासा काही महिन्यांचा ट्रान्झिशन टाईम मिळाला तर जरा मदत होईल. असो. ते काही आपल्या हातात नसते.
आता बराचसा अनुभव गाठीशी जमा झाल्यावर कुठेही माणसांबाबतीत 'उडदामाजी काळे गोरे' हाच अनुभव वैश्विक आहे. हेच ते अंतिम सत्य. Wink
आणि एकीकडे जग हे global village वगैरे म्हणताना 'स्थानिक संस्कृती' ही किती वेगळी/ बहुआयामी असते याचा दरवेळेस नव्याने प्रत्यय येतो.
एकप्रकारचा मजेदार दृष्टीकोन तयार होतो. काहीसा निर्लेप. घरातली चीजवस्तु फारशी वाढवून चालत नाही. बरेचदा स्थलांतरीत झाल्यावरही काही महिने, कधीकधी दोन-दोन वर्ष इकडलीतिकडली कामं करण्यात जातात.
पैशाने मात्र जरासा फटका बसतो. दर चार वर्षांने देशांतर असे आमचे होत गेल्याने सगळीकडे काहीसे आर्थिक नुकसानच झाले आहे, पण अनुभवाची श्रीमंती मात्र अमाप आहे खरोखर.
अलिकडेच पुन्हा एकदा एका नवीन देशाची संधी आली तेव्हा मात्र नकार दिला. मुलीला पुन्हा नवीन शिक्षणपद्धतीशी जुळवून घेण्यात जड जाईल असे वाटले.
गंमत म्हणजे आताशा मला एकाच ठिकाणी जन्मभर रहायचे म्हणजे कसे काय जमायचे अशी किंचित भिती वाटते कधीकधी.

वरचे सगळे प्रतिसाद शांतपणे वाचले. बरेच रिलेट झालेत. हा धागा मी कुठे जातेय म्हणून काढला नव्हता पण तरी पुढे-मागे उपयोग होऊ शकतो.

हु मुव्ह्ड माय चीज हे पुस्तक जितकं नोकरी बदलण्यासाठी मला पटतं तितकं रिलोकेट होताना पटेल असं वाटत नाही. निदान मी ज्या क्षेत्रात काम करते त्यासाठी मला लगेच राज्यं बदलली पाहिजेत असं काही नाही. नुसतं लोकली जॉब चेंज केला तरी काम होईल.

मला आतापर्यंत तीन राज्यं बदलली तरी आत्ता जिथे आलो तिथे रूळताना सगळ्यात जास्त त्रास झाला. पण त्यातून माझी थोडी वेगळी मानसिक जडणघडण झाली असं मला वाटतं. सगळीकडे प्रत्यक्ष जाता-येता येतं असेच मित्र-मैत्रीणी ढिगार्‍^याने हवेत असं काही नको ही माझी आताची मानसिकता आहे. आधी बराच पसारा होता. तो होता ते काही वाईट नव्हतं. पण त्यावाचून आता अगदी सुनं वाटत नाही. वयाचाही एक भाग असावा. पुन्हा मुविंगची वेळ आली तर थोडं सोपं होईल.

इथे ज्यांनी रूमाल ठेवलेत त्यांनी देखील सवड काढून त्यांचे अनुभव लिहा.

वेके, आम्हीही बिझिनेस ऑपर्चुनिटींकरताच तर देशांतरं केलीयेत.. रिलोकेट होण्यामागचे कारण, चीज चं मूविंगच

कारणीभूत झालं.. ९०ज मधे थायलँड , बिझिनेस वाईज थंडावलं,गेलो इंडोनेशियाला... आणी तसंच .. त्याच कारणाकरता पुढे चायनाला..

त्यातून फक्त प्लस पॉईंट्स ला घट्टं चिकटून राहिलो.. नवीन देश, नवीन भाषा, नवीन समाज.. नेवर एंडिंग लर्निंग

नाहीतर उगाच कोण कशाला इकडे तिकडे मूव्ह होतेय.. नै??

थोडा फार रैना सारखाच अनुभव.
अनुभवाची श्रीमंती मात्र अमाप आहे खरोखर.>>.

एकाच ठिकाणी जन्मभर रहायचे म्हणजे कसे काय जमायचे अशी किंचित भिती वाटते कधीकधी.>>सेम हिअर.

तुझं बरोबर आहे मिस बिझनेसवुमन. आमचं पण तसं पाहायला गेलं तर चीज मुव झाल्यानंतरच जागा बदलली गेली. फक्त यावेळी माझं चीज होतं तिथेच आणि मी दुसर्^या कोस्टात त्यामुळे म्हटलं आणि तेव्हाही ठरवलं असतं तर दुसरं लोकल चीज पण पाहता आलं असतं.

असो. तुझ्या लर्निंग बद्द्ल किंवा तू तिथे जुळवून घेण्याबद्द्ल लिही की. मला मुलांसाठी पुन्हा नवे मित्र-मैत्रीणी वगैरे शोधायचा कंटाळा येईल. Happy

चांगला धागा आहे, मी सुद्धा अजून कुठे गेलो नाही, ना एवढ्यात जातोय, पण येथील अनुभव आणि सल्ले कामाला नक्की येतील Happy

मी सध्या मुव्हिंग आणि त्याचे आफ्टर शॉक्स Happy मधून जाते आहे. नव्या जागी रुळायला या ठिकाणाला आपलं घर मानायला अजून वेळ लागेल पण कालच्या पेक्षा आजचा दिवस अधिक आनंदी कसा जाईल यावर फोकस केले आहे. महिन्याभराने अजून ही जागा नवी/परकी वाटतेय पण हळूहळू एकेक ओळखीची ठिकाणं तयार होताहेत. मित्रमंडळी अजून जमली नाहीत पण जमतील. एकदा घराची घडी बसली की सगळं मार्गी लागेल. Happy

तर लोकहो आम्ही बे एरियात अनेक वर्षे राहिल्यानंतर या आठवड्यात एपेक्स, नॉर्थ कॅरोलिना येथे आलो. अजून मूव्हिंग प्रोसेस पूर्ण व्हायची आहे.

यापूर्वी अमेरिकेतून भारतात व पुन्हा परत असे एकदा केल्याने त्यामानाने हे कमी जिकिरीचे असेल असे वाटले होते पण या मूव्ह च्या ही स्वतंत्र काही गोष्टी आहेत. जमेल तसा आमचा अनुभव लिहीन येथे.

फा खरंच लिहिणार आहेस का? मला गंमत वाटली ही कमेंट वाचून की तेव्हा तूच सांगितलं होतं त्या चर्चेसाठी धागा काढा. आता कारण कळलं Happy

बरं वेळ मिळाला आणि सेटल झालास की लिही.

हो बरोबर आहे - तेव्हा आमचे 'जावे की नको' जोरात सुरू होते, त्यामुळे ते लिहीले होते Happy

लिहीणार आहे अजून. सामान, गाड्या वगैरे आल्या. मात्र अमेरिकेत इतर अनेक प्रोसेसेस जशा एकदम वेल सेट असतात तशा या नाहीत. त्यामुळे कदाचित इतरांना उपयोग होईल म्हणून माहिती लिहीन त्याबद्दल.

मी सिव्हील ईंजिनियर आहे त्यामुळे कामाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या गावी रहाणे झाले आहे.

काही वेळा अगदी ५-६ महिन्यातच तर काही वेळा ५-६ वर्षा नी,
काही वेळा कंपनी पाठवेल तिथे म्हणजे विदाऊट चॉईस तर काही वेळा स्वतःच्या मर्जीने कंपनीच बदलली म्हणून,
लग्नापुर्वी अर्थातच एकटाच तर लग्न झाल्यावर बरेचदा कुटुंबासोबत तर काही वेळा तरीही एकटा,
अशा विविधतर्‍हेने घर /जागा /गाव /शहर /देश सोडून झाले आहे.

मला अगदी सुरुवातीला घर /जागा /गाव /शहर बदलताना त्रासच झाला होता / व्हायचा. अगदी सुरुवातीला कंपनीतर्फे शेअरिंग बेसिस वर रहायचो त्यावेळी घरातल्या घरात रूम बदलण्याचा आणि गावातल्या गावात घर बदलण्याचा पण त्रास करून घेतलेला आहे.

'करून घेतलेला आहे' हा शब्दप्रयोग आज आता करतोय पण त्या त्या वेळी त्याचा खरोखरचा सात्विक त्रास झाला होता. Proud

त्यातून आम्ही (बांधकामवाले) बहुतकरून अशा ठिकाणी जाणार की जिथे आम्ही जाईपर्यंत फारशी सुधारणा झालेली नसायची आम्ही कारखाना / ईमारत वगैरे बांधून झाल्यावर इतर सुधारणा देखिल व्हायच्या आणि मग आमची ती जागा सोडून जायची वेळ यायची आणि मग नवीन ठिकाणी पुन्हा नव्याने सुरुवात

परिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच असे नाही पण हाती घेतलेले काम तडीस नेले नाही तर हार मानल्यासारखे मानले जाण्याचा काळ होता त्यामुळे परिस्थितीशी जुळवून नाहीतर झुंजून झगडून एक आव्हान म्हणून त्याकडे पाहणे झाले. ह्या सगळ्याचा मला झालेला मोठा फायदा म्हणजे माझ्या स्वभावात झालेला अंतर्मुखी पासून बहिर्मुखी असा झालेला बदल.

मला असं बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेताना माझ्या कामाच्या स्वरुपामुळे स्वतःपेक्षा आर्थिक / राहणीमानाच्या दृष्टीने निम्नस्तरावर असलेली / परिस्थितीत राहणारी पण तरीही आनंदी / समाधानी माणसं आसपास असल्याचा खूप फायदा झाला. याउलट नंतर पुढे गोव्यासारख्या सुशेगात प्रदेशातून मुंबईत गेल्यावर लोकलचा प्रवास करत असताना अधिक श्रीमंत आणि हुद्देदार पण आपल्यापेक्षा लांब रहाणारी माणसं पाहूनही असंच काहीसं वाटायचं.

ह्याकरता सरसकट सोप्पे उपाय असे काही नसावं पण त्यातल्या त्यात रुळायला महत्वाची ठरते ती सकारात्मक विचारशक्ती कारण प्रत्येक जागे गावा शहरा देशाचे काही अवगूण हे असतातच. जे मागे सोडले त्याचे अवगुण आणि जे पुढ्यात आहे त्याचे गुण बघत राहीलो की सोपे जाते.

मला माझ्या अनुभवांची व्याप्ती वाढवून (आधीच्यापेक्षा) मोठं करण्यामधे ह्या घर /जागा /गाव /शहर /देश बद बदलाचा खूपच मोठा वाटा आहे.

रिलोकेशन, मूविंग माझ्या मते फार सोपं असतं तो काळ बहुतेक मुलं होण्याच्या आधी किंवा मुलं अगदीच लहान असतील तेव्हा. एकदा मुलं नऊ, दहा वर्षांची झाली की हा प्रकार अतिशय कठीण होऊन बसतो.
>>> हे अगदी खरंय

मला एकाच ठिकाणी जन्मभर रहायचे म्हणजे कसे काय जमायचे अशी किंचित भिती वाटते कधीकधी. >>>> ह्यालाही मम

Pages