भडका - उदंड जाहल्या कवीता

Submitted by स_सा on 24 July, 2015 - 05:32

कुणीतरी लिहुन जातो
बाकीचे मग वाचत बसतात
आगळ्या- वेगळ्या विषयांवर
धागे हे काढत बसतात

कोणि खायचे तर
कोणि आकलेचे कांदे तोडत असतात
गुलमोहरात कवी बनण्या
कवी मात्र धडपडत असतात

तडतडी (डोक्यातली शीर!) नेहमी तडकत रहाते
कवीतेचा खात्मा झाला तरी
कवी ला त्याची फिकीर नसते

Light 1 :दिवा::दिवा:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मत्सर, हेवा, द्वेष हे सर्व तमोगुण म्हणूनच नकारात्मक आहेत. आपण ध्यान, विपश्यना या मार्गाने यावर विजय मिळवू शकता. नव्या पिढीला निर्मळ मनाने प्रोत्साहन दिल्याने सकारात्मक उर्जेचा एक तेजस्वी स्त्रोत आपल्या रंध्रारंध्रातून खेळू लागतो आणि आपल्या मनातील सर्व विषारी द्रव्यांना फुग्याच्या छिद्रातून बाहेर पडणा-या हवेप्रमाणे बाहेर फेकू लागतो. आपण सूज्ञ आहातच. मी पामराने अधिक काय सांगावे ?

कुणीतरी लिहुन जातो
बाकीचे मग वाचत बसतात>>>> हे बाकीचे मग टवाळक्या करतात टाईप वाटतेय.:फिदी:
पण काय उपयोग नाय होणार, कविन्च्या कविता चान्गल्यात, पण जाम रतिब घातलाय त्यानी.