मी माझ्याकडे आठवड्यातून एकदा तरी कुठल्या ना कुठल्या भाजीचा पराठा करतो. कधीकधी उरलेल्या भाज्यापासून पराठा करतो. कदाचित तेल कमी वापरत असेल म्हणून पण माझ्या पराठ्याला साध्या मिठा तिखटाचीही चव येत नाही. प्लीज इथे मला व्यवस्थित टिप्स मिळतील का पराठ्याचा उंडा तयार करण्यासाठी? धन्यवाद.
मी पराठ्यात साधारण हे .. हे टाकतो :
१) आले लसूण जिरे ह्याचा पेस्ट
२) लाल तिखट भरड - अर्धा चमचा. नाहीतरी अर्धी हिरवी मिरची ठेचून.
३) कोथींबीर अर्धा वाटी
४) दोन चमचे दही
५) दोन चिमुटभर मीठ.
६) थोडासा गुळ चिरुन
७) तेलाचे मोहन हिंग घालून
८) हे सर्व पिठात एकत्रीत करुन पिठ मळून घेतो आणि ओल्या कापडात १५ मिनिटे ठेवतो.
९) मी तेल ऑलिव्हचेच वापरतो.
इथे एका ताइने पराठा बनवला. असा रंग पोत कधीच येत नाही माझ्या पराठ्यांना: http://the-cooker.blogspot.sg/2007/06/parathas-for-breakfast.html
आणि हो, प्लीज इथे अवांतर विनोद टाळा.
सामी छान माहिती. तुझी पण
सामी छान माहिती. तुझी पण पद्धत वा टिपा लिही इथे.
हेडरमध्ये दिलेलं मसाल्यांचं
हेडरमध्ये दिलेलं मसाल्यांचं प्रमाण किती वाट्या पिठासाठी किंवा किती पराठ्यांसाठीच्या कणकेसाठी आहे?
मी हे असे करते. कुठल्या
मी हे असे करते.
कुठल्या भाजीचा ( मूळा, कोबी, पालक वगैरे) वा पदार्थाचा (पनीर, बटाटा, चणा डाळ,मूग डाळ) पराठा आहे यावरून मी बदल करते.
किंवा
तसेच प्रवासाला न्यायचा असेल तर पाणी अजिबात घालत नाही.
किंवा
तसेच उंडा करून की सगळं एकत्रित करून ह्यावरून पद्धत बदलते.
१) अधमूरं दह्याचं ताक आणि मिरची कोथींबीर.
२) लिंबूरस- कुठल्याही पीठात लिंबूरस घातला की खुसखुशीत पणा वाढतो. कारण पीठाचं विघटन होतं, ग्लुटन मोकळण होवून पदार्थ हलका होतो. आणि तेल, तूप वगैरे कमी लागते. जिथे खुसखुशीत बनवायचा असेल प्दार्थ तिथे एक चमचा तेल , एक चमचा लिंबू रसाबरोबर फेटून घालायचे.
३) दही फेटून. एकत्रित मिश्रणाचा पराठा असेल तर.
४) ताजी मिरची आणि लसूण ठेचा.
५) अर्धे पिकलेलं केळ, ओवा,जीरं, गूळ , हळद,लिंबूरस आणि दही फेटून खास मेथी थेपले(कणिक आणि बेसन घेवून) प्रवासात नेण्यासाठी.
गॅसी पदारर्थ/भाजी घालून करताना ओवा, बडीशेप, लिंबूरस वगैरे सारणात सुद्धा घालते.
६) बटाटा पराठा : सारण- भरड काळंमीरी, शहाजीरं, ओवा, जीरं, लिंबूरस, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर,पुदीना, अनार दाणा ठेचून सारण ; तर पारी कणिक व बेसन २:१ घेवून ताकात घट्ट भिजवते मीठ घालून.
७) उरलेली साय
८) तूपाची बेरी आणि दलिया डाळ वाटून घालून
९) उकडलेल्या डाळीच पाणी (हिंग वगैरे घालून)
१०) डाळ कालवून, मिरची वगैरे
११) साअर क्रीम फेटून
१२) चक्का घालून
१२) ताजं लोणी घालून पराठा
१३) नारळाच दूध घालून गोड पराठा(अप्रतिम लागतो). किंचितच गूळ, नारळाचं दूध, मीठ फक्त. तिखटामध्ये जे आवडेल ते. हि एकदम माझ्या आईची खासियत आहे. खास तिची रेसीपी.
वगैरे वगैरे.....
वगैरे वगैरे. आमच्या घरात खाणारे कमी आणि चवीचे नखरे ज्यास्त अशी माणसं असल्याने आणि प्रत्येक जण आपली आवड सांगणारे व खायला करून घालाणारे असल्याने अगणित रिती आहेत.
हा मी केलेला पेशावरी प्राठा
बापरे देविका तुझ्या रिती
बापरे देविका तुझ्या रिती वाचून मला पराठा इतका कठिण प्रकार असतो हे माहिती नव्हते. पण केल्याने होत आहे रे..तेंव्हा आता हे सर्व अमलात आणणार आहे. कालच ओवा विकत आणला.
लिंबुची टिप माहिती नव्हती. मला वाटल फक्त आंबट चवीसाठे लिंबू पिळतात कणकेत.
अधमुर दहयाच ताक= अजुन एका
अधमुर दहयाच ताक= अजुन एका धाग्याच potential.
पराठा केल्यास बरेचदा मी सोबत तिखमिखल करते. दह्यात मीठ आणि बारीक चिरलेली ही मी टाकायची. छान एकत्र करून घ्यायच. वरुन मोहरी आणि हिंगाची खमंग फोडणीद्यायची!
बी, तुनळी वर १७६० विडीओ आहेतच
बी, तुनळी वर १७६० विडीओ आहेतच की, स्काईपचा क्लास कशाला हो? (ह. घ्या.).
मुंबईतल्या लोकांकडूनच मी ज्यास्त करून, कपडे वाळत टाक, जेवण बनवून टाक,खावून टाक, पुसून टाक, पुस्तकं घेवून टाक . सगळं टाकाटाकी..
माझ्याकडे चपात्या करणार्या
माझ्याकडे चपात्या करणार्या ताई ही ' दिदी आधी पीठ मळून टाकते' असे म्हणायच्या. त्यांना मी नेहेमी सांगायचे 'अहो मळून ठेवा, टाकता कशाला?' >>
आणि मी तिथे असलो असतो तर लगेच तुला अग चपात्या काय म्हणतेस पोळी / पोळ्या म्हण असे म्हणालो असतो.
थोडक्यात काय तर टाकने हा शब्द किंवा चपात्या हा शब्द रोजच्या वापरात आपण कुठल्या वातावरणात मोठे झालो त्यावरून येतो. विदर्भ - मराठवाड्यात टाकने ही क्रियाच. उदा उभा राहा हे बरोबर असले तर नीट उभा टाक हे पण तिकडे बरोबरच आहे.
( ह्या वरून आठवले. - कुठेतरी किती समुद्र पण बरोबर आहे म्हणे. तेंव्हा मलाही आश्चर्य वाटले होते. मला समुद्राचे नाव एकच वाटायचे आणि त्या त्या गावचा किनारा असा शब्दप्रयोग बरोबर वाटायचा. पण रत्नाग्रीत किती समुद्र? ह्यावर अनेक लोकांनी ते वाक्य बरोबर आहे असे लिहिले. जे खरे तर चूक आहे. पण तेथील बोलीभाषेत बरोबर आहे म्हणे. मग ते खटकने थांबले )
नीट उभा टाक << ठाक.
नीट उभा टाक
<<
ठाक.
दीमा, बरोबर. कोल्हापूरात
दीमा, बरोबर.
कोल्हापूरात सुद्धा ' उभा ठाकला' म्हणतात आठवतय... (तिथेच का , दुसरीकडे.. पण बहुतेक कोल्हापूरात).
ते टाक नाही आहे.
माझ्याकडेही बोलतात असं. मीठ
माझ्याकडेही बोलतात असं. मीठ जरा कमी टाक, थोडं अजुन तेल टाकायला हवं होतं वै.
जन्मापासुन हेच कानावर पडलंय नी हेच बोलतो आम्ही.
मी पराठ्यात आले कधीच घालत
मी पराठ्यात आले कधीच घालत नाही. आणि तेला तुपाशिवाय पराठा कोरडाच लागणार.... पीठ मळताना थोडेसे आणि भाजताना थोडेसे तेल ... तुप हवेच....
मी पराठ्यात आले कधीच घालत
मी पराठ्यात आले कधीच घालत नाही. आणि तेला तुपाशिवाय पराठा कोरडाच लागणार.... पीठ मळताना थोडेसे आणि भाजताना थोडेसे तेल ... तुप हवेच....
मी मागे उमर खय्याम पराठा
मी मागे उमर खय्याम पराठा लिहिला होता. त्यात भाज्या तेलात छान परतून त्यातच कणीकही ( मला मैदाच वापरावा लागतो ) परतून घ्यायची, असे लिहिले होते. असे पराठे छान खुसखुशीत होतात. तसे करून बघ एकदा बी. नक्की आवडेल.
बापरे, एवढी चर्चा
बापरे, एवढी चर्चा पराठ्यांवर!

आम्ही पराठे करताना कसलाच विचार करत नाही.जे मनात येईल ते टाकतो पण रात्रीच्या उरलेल्या भाजीपासून ते अगदी नुसतेच मीठ -कोथिंबीर घालून केलेले पराठेही मस्तं होतात.
जिच्या तिच्या हातची चव!
आमच्याकडे कोबीचे पराठे असतात.
आमच्याकडे कोबीचे पराठे असतात. चवीला चांगले असतात. भोपळा बारीक चिरून टाकतो.
मसाला आणि तेल जिभेसाठी नसून पोटाचा विचार करून टाकलं की सात्विक पराठा तयार.
मूगाचे डोसे पण असतात.
कोल्हापूरात सुद्धा ' उभा
कोल्हापूरात सुद्धा ' उभा ठाकला' म्हणतात आठवतय...
>> काही लोक, "मी कधीची इथे उभारलीये" असं म्हणतात (उभी राहिली आहे या अर्थाने).
मला उभारली ऐकलं कि गुढीच आठवते फक्त. माणुस कसा उभारतात ?
टाकणे
>> माझी आई लहानपणी "जेवुन झालं कि भांडी घासायला टाक" असं म्हणायची तेव्हा मी लांबुन भांडी सिंक मध्ये फेकायचे ते आठवले.
Pages