राडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2015 - 03:23

विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण.

आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्‍या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते.

बर्‍याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात.

मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते.

नारळाच्या झाडावर चढलेले हे उत्सवमुर्ती. ह्याच फोटोत डाव्या बाजूला साळुंखी पक्षी वार करण्यासाठी आलेली दिसते.
१)

नंतर धामण झाडाच्या झावळ्यांच्या खोपच्यात लपली तेंव्हा तिला शोधण्याची एकेकाची धडपड आणि चेहर्‍यावरचे हावभाव पहा.

२) साळुंखी

२) हा दयाळ त्या नारळाच्या झाडाखालच्या तारेवर.

३) खाली तर नाही ना सटकला?

४) कावळा

५) खारू ताईंचे हावभाव पहा.

६) मी खाली पहाते तू वर पहा

७) जाशील कुठे आता तू.

हा राड्याच्या प्लान संध्याकाळी चालू होता. बराच वेळ ती धामण बाहेर येण्याची मी टेरेस वरून वाट पहात होते. पण ती काही येत नव्हती. मग मला एका कामानिमित्ताने बाहेर जावे लागले त्यामुळे हे नाट्य कधी संपुष्टात आले ते कळले नाही. पुढच्यावेळी पूर्ण टिपण्याचा प्रयत्न करेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा सही आहे हे. Happy असा राडा मध्यंतरी आमच्या घरामागे एक शिक्रा आला तेव्हा झाला होता. दोन खंड्यापक्षी आलटुन पालटुन वार करत होते.

काय मस्त टिपले आहेस ! जागू कॅमेरात व्हीडीओ मोड असेल तर सरळ क्लीपच काढ. यू ट्यूबवर अपलोड करणे सोपे आहे.

मस्त आहे गं राडा. पक्षी पण किती जागरुक असतात ना.. वेळप्रसंगी एकमेका साह्य करु ह्या मोडात अगदी चटकन जातात.

धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव चमकून जाऊन परत परत २-३ वेळा वाचलं Proud
कसलं मस्तय हे
आणि स्पेशली सगळे पक्षी एकमेकांना मदत करायला सरसावलेत. त्यात माझी फेवरेट खारूतै!
इकडे बघायला धम्माल येतेय पण अशी धामण वगैरे रोज घरापाशी फिरणं म्हणजे Uhoh Proud

रिया Lol

सर्पमित्राने एकदा धामण पकडली होती पण तो परत सोडू का विचारत होता. तो म्हणत होता ही उलट तुमच्या फायद्याची आहे. काही करत नाही आणि उंदीर खाते आजूबाजूचे.

विजय धन्यवाद.

चनस, शशांक, धन्यवाद.

निसर्ग चक्र माझे फोटो काढायला कॅमेरा धामण च्या हातात द्यायला लागला असता Lol

खारूताई भा री Proud

धामणी फिरल्या घराच्या आसपास तर काही एवढे डेंजर नाही, नसावे, (सर्पमित्र बोल्ला ना)
पण खारूताई एवढ्या सहज ऊंदडताना बघायला मिळणे सही आहे.. Happy

विडिओ क्लिप नक्की काढा .. खार आणि धामण डेडली कॉम्बिनेशन.. विडिओ हिट होईल

Pages