फेथ हीलिंग

Submitted by प्रकाश घाटपांडे on 14 July, 2015 - 04:03

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!
हा व्हिडिओ पहा
https://youtu.be/gVMMIaoVTPU

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तर "समकालीन युगात ख्रिस्ती धर्माचे लोक 'समूह उन्मादाचे' वातावरण तयार करुन आपल्या वेदना, दु:ख विसरायला मदत करत असतील तर ते चांगले का वाईट...." असा मुद्दा आहे का ?<<
हर्पेन,चांगले कि वाईट अशा कृष्ण धवल द्विमिती त मला चर्चा अपेक्शित नाही. त्याच्या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा व्हावी हे अपेक्षित आहे.कोणत्याही प्रश्नाकडे कृष्ण धवल द्विमितीत पहाणे मला पटत नाही. प्रश्नाकडे जर बहुविध रंगात व अनेक मितीत पाहिले तर आकलनास मदत होते असे मला वाटते.

घाटपांडेजी
एकंदर त्या बाबा बुवांची टिंगल करू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
दाभोलकर लागूंना काय म्हटले ते सोडा, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगा. (अन ते सांगण्यासाठी पुन्हा तुमच्या हातखंडा फलज्योतिष वाल्या वा तत्सम लिंका देऊ नका बुवा.)

उगा बुद्धीदांडगे नास्तिक वगैरे शब्द वापरू नका. तुमच्या भूमीकेला बुळबुळीत कुंपणारूढ सश्रद्ध असे म्हणू काय मी?

प्रत्येक वेळी असल्या गुळमुळीत भूमीका घेण्याऐवजी, आमच्यासारखी काळी किंवा पांढरी भूमीका घेऊन पहा की एकदा? Wink

अहो साहेब, त्या फेथ हीलरला पक्के ठाऊक असते की आपण पब्लिकला उल्लू बनवीत आहोत. त्याचे दुकान बंद केले की न रहेगा बांस और न रहेंगे 'बिच्चारे' अंधश्रद्धाळू. हा इलाज वाईट आहे का?

दीड मायबोलीकर
>>पेन is defined as subjective unpleasant sensation<< या नुसार अस्वस्थता वाटणे ही देखील एक वेदना च आहे असे समजता येईल का?
पेशंटला वेदना मुक्ती हवी असते. बरं वाटण याला तो रोगमुक्ती समजतो. प्रत्यक्षात त्याच्या शरीरात रोग असला तरीही.मग महत्व रोगमुक्तीला की वेदना मुक्तीला? असा प्रश्न उदभवतो.
अवांतर- आपण इब्लिस तर नव्हे?

अवांतर : होय.
*
महत्व रोगमुक्तीलाच.
वेदना बरे होण्याच्या मार्गात अडथळा ठरत असते, म्हणून उपचारांदरम्यान ती कमी करायची.
अनेकदा मी पोस्ट-ऑप पेशंटला थोडी(शीच) वेदना शिल्लक राहील याप्रकारे वेदनाशामके वापरतो. यामुळे दुखरा अवयव सांभाळून वापरायची जाणीव राहते. अन्यथा भरणारी जखम भरायला, तो अवयव वापरात आणला गेल्याने, अधिक वेळ लागू शकतो इ.

पेन च्या व्याखेत अस्वस्थता मोडते का? याच उत्तर दिल नाही दीड शहाणे स्वारी दीड मायबोलीकर Wink
तस असेल तर वेदनेची व्याप्ती बरीच मोठी होते.

इंटरेस्टिंग चर्चा चालू आहे. काही मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकावी असे वाटते.
१. माझ्या माहितीत एका ठिकाणी हा प्रकार होताना ऐकले आहे. हजारोंच्या संख्येने लोक तिथे येतात. कुणाला शारिरीक पीडा असते तर कुणाला मानसिक त्रास. हे सर्व स्तरांतील लोक असतात. म्हणजे ज्यांना उपचार परवडतात ते आणि नाही ते ही. उपचार चालू असतानाच लवकर बरे वाटावे म्हणून वाटेल ते करायची तयारी दाखवणारेही. ही पध्दती विनामूल्य अाहे (निदान मला माहीत आहे तिथली तरी).
२. उपचार चालू ठेवून ही गोष्ट केली तर (बहुधा) अपाय होत नाही किंवा आजार बळावत नाही.
३. दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है - अशी भावना सहभागीच्या मनात येऊ शकते. (किंवा उलटही होऊ शकते. मानसिकदृष्ट्या कमकुवत असणारा माणूस अधिकच खचून जाऊ शकतो समजा आपल्याच आजाराच्या पुढच्या स्टेजेस दिसल्या तर)
४. अकु म्हणते तशी छुपी प्रचंड आर्थिक उलाढाल होत असेल. पण ती कुठे होत नाही? हॉस्पिटल्सपासून सरकारी कार्यालये सगळीकडे ते सवयीचे झाले आहे.(यावर चर्चा भरकटवू नये)
५.ज्याप्रमाणे लहान मुलांचा सहवास, हास्यविनोद, मनोरंजन हे रूग्णाला तात्पुरते आनंद देण्याचे मार्ग आहेत तसाच जर आणखी एक पर्याय सर्वसामान्यांसाठी खुला होत असेल (अंधश्रध्दा वगैरे वगळून) तर का नको?
६. अर्थात, हे फक्त आस्तिकांसाठी उपलब्ध असणार. आस्तिक आणि अंधश्रध्द यात फरक आहे. त्यामूळेच हे दुकान आज ख्रिस्तींचं आहे, उद्या चौकाचौकात प्रत्येक धर्माने हे दुकान उघडले तर मूळ उद्देशच नाहीसा होऊन आणखी एक चिघळणारी जखम या देशाला होऊन बसेल.

घाटपांडेजी,
व्याख्या दिलेली आहे. तुमची अस्वस्थता किती तीव्र त्यावर तिला वेदना म्हणायचे की नाही हे ठरते. प्रेमिकेच्या कटाक्षाने विद्ध होऊन वेदनेने विव्हळणारी कविहृदयेही आहेतच की Wink

*

>>
पेन च्या व्याखेत अस्वस्थता मोडते का? याच उत्तर दिल नाही दीड शहाणे स्वारी दीड मायबोलीकर डोळा मारा
तस असेल तर वेदनेची व्याप्ती बरीच मोठी होते.
<<
उत्तर दिलं नाही हे इतक्या प्रेमाने म्हणताना, "एकंदर त्या बाबा बुवांची टिंगल करू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे का?" या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सोयिस्कर रित्या विसरलात ना? Happy

४. अकु म्हणते तशी छुपी प्रचंड आर्थिक उलाढाल होत असेल. पण ती कुठे होत नाही? हॉस्पिटल्सपासून सरकारी कार्यालये सगळीकडे ते सवयीचे झाले आहे.(यावर चर्चा भरकटवू नये)
<<
लवकर बरे होण्यासाठी "लाच" हा प्रकार हॉस्पिटलमधे कसा वापरात आणावा याबद्दल काही पॉईंटर्स मिळतील काय? थोडे साईड इन्कम वाढवावे म्हणतो. Wink

रच्याकने, अमुक मुद्यावर चर्चा व्हावी पण ती भरकटू नये म्हणजे नक्की कसे?

तुमचा ६ नंबरचा प्वाइंट अजाब्बात कल्ला नाय.

>>तुमची अस्वस्थता किती तीव्र त्यावर तिला वेदना म्हणायचे की नाही हे ठरते.<<
आता याला गुळमुळीत म्हनायचं का?
>> प्रेमिकेच्या कटाक्षाने विद्ध होऊन वेदनेने विव्हळणारी कविहृदयेही आहेतच की<<
आहेत ना. ते डायरेक याला दर्द म्हणतात.मुझे अस्वस्थ हो रहा है अस नाही म्हणत.

गुळमुळीत नव्हे. ''त्यांची" वेदना काय, हे 'सब्जेक्टिव्ह' फीलींग आहे.
तुम्ही म्हटलात तर वेदना. तुम्ही म्हटलात तर तीच अस्वस्थता. तुम्ही म्हटलात तर त्याला प्लेझरही म्हणता येईल. अधीक आकलनासाठी सब्जेक्टिव्ह हा शब्द कृपया डिक्श्नरीत पहावा. मी व्याख्या टंकताना तुमच्यासारख्यांच्या सोयीसाठी इंग्रजी स्पेलिंग दिलेले आहेच. Wink

>> "एकंदर त्या बाबा बुवांची टिंगल करू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे का?<<
अजिबात असे म्हणायचे नाही हे उघडपणे माझ्या प्रतिक्रियेत दिसते. रुग्णाची, त्याच्या असहायतेची टिंगल वा उपहास करु नये असे म्हणायचे आहे.

>>त्यांची" वेदना काय, हे 'सब्जेक्टिव्ह' फीलींग आहे.<<
सश्रद्ध लोक बी हेच म्हणतात कि आमच्या श्रद्धा काय आहेत हे सब्जेक्टिव फिलिंग आहे, ते तुम्हाला नाही कळायचं!

रुग्णाची टिंगल करावी असा अर्थ माझ्याकडून लिहिण्यात आलेला कुठे तरी दिसला का? उलट देव्हार्‍या/देवळांबद्दल काय लिहिलं आहे ते वाचनातून सुटले कि काय?

तसे नसेल तर बुद्धीदांडग्या हस्तिदंती मनोर्यांतील विद्वान नास्तिकांची संभावना का बरे करण्यात आली ? लेखाच्या विषयाशी तिचा काय संबंध होता बरे?

सश्रद्ध लोक बी हेच म्हणतात. आमच्या श्रद्धा काय आहेत हे सब्जेक्टिव फिलिंग आहे. ते तुम्हाला नाही कळायचं!

<<

अच्छा, म्हणजे तुम्ही फेथ हिलिंग प्रकाराला पाठिंबा देत आहात काय? की हे कु़ंपणावर बसण्याचे नवे आसन आहे?

"प्रत्येकाच्या अनिश्चिततेला तोंड देण्याच्या क्षमता वेगळ्या असतात तशा त्या वेळो वेळी बदलत देखील असतात.कधी कधी मलाही अस वाटत की जर आपण त्यांना सक्षम व व्यवहार्य पर्याय सुचवू वा देउ शकत नाही तर ते ज्या पर्यायाचा आधार घेतात त्याची तरी टिंगल करु नये. "
<<

हे तुमचेच लिहिलेले कॉपीपेस्ट आहे. स्वतःचेच वाक्य नीट न समजल्याने, किंबहुना जे म्हणायचे होते तेच चुकीचे म्हटल्याने, तुमची चिडचीड व गडबड झालेली आहे असे मला तरी वाटते, घाटपांडेजी.

"ते ज्या पर्यायाचा आधार घेतात", तो पर्याय फेथ हिलींग हा आहे. हाच सरळ अर्थ त्या वाक्यातून येतो आहे.

मी फेथ हिलिंग व फेथ हीलर्स यांचीच टिंगल करा असे म्हटले आहे. सक्षम व योग्य पर्याय सायकिअ‍ॅट्रीस्ट हा आहे. तो सोशल टॅबूज मुळे अ‍ॅक्सेप्ट न करता लोक इकडे जात असतात.

असो. पुढील कुंपणासनांस शुभेच्छा! मी कल्टी.कॉम

आशूडी,

तुमच्या पोस्टचे थोडे आश्चर्य वाटले. किंबहुना तुम्ही हे खालील मुद्दे गंभीरपणे लिहिले आहे की नाहीत असेच वाटले.

>>>२. उपचार चालू ठेवून ही गोष्ट केली तर (बहुधा) अपाय होत नाही किंवा आजार बळावत नाही.
३. दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है - अशी भावना सहभागीच्या मनात येऊ शकते. (किंवा उलटही होऊ शकते. मानसिकदृष्ट्या कमकुवत असणारा माणूस अधिकच खचून जाऊ शकतो समजा आपल्याच आजाराच्या पुढच्या स्टेजेस दिसल्या तर)
४. अकु म्हणते तशी छुपी प्रचंड आर्थिक उलाढाल होत असेल. पण ती कुठे होत नाही? हॉस्पिटल्सपासून सरकारी कार्यालये सगळीकडे ते सवयीचे झाले आहे.(यावर चर्चा भरकटवू नये)
५.ज्याप्रमाणे लहान मुलांचा सहवास, हास्यविनोद, मनोरंजन हे रूग्णाला तात्पुरते आनंद देण्याचे मार्ग आहेत तसाच जर आणखी एक पर्याय सर्वसामान्यांसाठी खुला होत असेल (अंधश्रध्दा वगैरे वगळून) तर का नको?<<<

लवकर बरे होण्यासाठी "लाच" हा प्रकार हॉस्पिटलमधे कसा वापरात आणावा याबद्दल काही पॉईंटर्स मिळतील काय? थोडे साईड इन्कम वाढवावे म्हणतो. >> पॉईंटर्स तर देऊ शकत नाही. अगदी "लाच" म्हणून नाही तरी अनेक प्रकारे दवाखान्यात पैशांचे छुपे व्यवहार होत असल्याच्या बातम्या आम्ही पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो त्या खोट्या असतील मग.

रच्याकने, अमुक मुद्यावर चर्चा व्हावी पण ती भरकटू नये म्हणजे नक्की कसे? >> हेच की. सरकार हा शब्द लिहीतानाही चार वेळा विचार करावा लागतो हल्ली इथे.

तुमचा ६ नंबरचा प्वाइंट अजाब्बात कल्ला नाय. >> मी ज्या केसबद्दल बोलते आहे तिथे तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तरच पुढे जाण्यात अर्थ आहे. कारण ते संपूर्ण प्रकरण देवावर श्रध्दा ठेवा, तो सर्वांचम कल्याण करतो वगैरेवर आधारित आहे. नास्तिक या पहिल्या वाक्याला उठून निघून जाईल. व इथे देव म्हणजे जीझस. म्हणून ते पुढचे धर्मांचे वाक्य.

>>अच्छा, म्हणजे तुम्ही फेथ हिलिंग प्रकाराला पाठिंबा देत आहात काय?<<
माझ्यामते नाही. पण पाठिंबा किंवा विरोध अशी कृष्ण धवल मिती मला अभिप्रेत नाही.

>>की हे कु़ंपणावर बसण्याचे नवे आसन आहे?<<
नव कुठल जुनच हाये कि!

>>रुग्णाची टिंगल करावी असा अर्थ माझ्याकडून लिहिण्यात आलेला कुठे तरी दिसला का?<<
नाही दिसला. टिंगल करु नये असे मला वाटते हे मत व्यक्त केले आहे.
>> उलट देव्हार्‍या/देवळांबद्दल काय लिहिलं आहे ते वाचनातून सुटले कि काय?<<
नाहि सुटले. वस्तुनिष्ठ लिहिले आहे.

>>तसे नसेल तर बुद्धीदांडग्या हस्तिदंती मनोर्यांतील विद्वान नास्तिकांची संभावना का बरे करण्यात आली ? <<
नाही बुवा अशी संभावना केली. मला वाटणारी वस्तुस्थिती मांडली आहे.

>>लेखाच्या विषयाशी तिचा काय संबंध होता बरे?<<
आहे ना शेवटी श्रद्धा अश्रद्ध अंधश्रद्धा या विषयाशी संबंधीतच आहे ना फेथ हीलिंग.

आशूडी एकदा मत तयार झाले म्हणजे ते अपरिवर्तनीय असे काही नसते. मतांमधे परिवर्तन होउ शकते. आपले मत सातत्याने तपासत रहावे. त्यात काही बदल करावासा वाटल्यास जरुर करावा. असा बदल म्हणजे तत्वच्युती नव्हे. प्रगती म्हणजे तरी काय शेवटी सकारात्मक बदलच ना. गॉड इज ट्रुथ म्हणणारे गांधीजी शेवटी शेवटी ट्रुथ इज गॉड असे म्हणु लागले. कम्युनिस्टांमधे जर विचारांतील कट्टरतेत जर काही बदल झाले तर त्याला ते बूर्झवा बूर्झवा म्हणुन कळपाबाहेर काढतात असे ऐकून आहे.

मला वाटणारी वस्तुस्थिती
<<
मजेशीर शब्दप्रयोग.
*
>>अच्छा, म्हणजे तुम्ही फेथ हिलिंग प्रकाराला पाठिंबा देत आहात काय?<<
माझ्यामते नाही. पण पाठिंबा किंवा विरोध अशी कृष्ण धवल मिती मला अभिप्रेत नाही.

मग नक्की काय अभिप्रेत आहे? वर दिल्याप्रमाणे 'त्याची टिंगल करू नका' असे म्हणताहात ते?

>>की हे कु़ंपणावर बसण्याचे नवे आसन आहे?<<
नव कुठल जुनच हाये कि!

मान्य केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद!

दीमा,

फेथ हीलिंगला पाठींबा किंवा विरोध व्यक्त करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ती म्हणजे हा अत्यंत व्यक्तीनिष्ठ प्रकार आहे. तर अशा काही घटनांची वस्तुनिष्ठ तपासणी करता येते का, हे तपासून पाहायला हवं.

यासंबंधात फ्रान्समधल्या लूर्डच्या रोगमुक्ती स्थानाचा बराच वरचा क्रमांक लागतो. साधारणत: १८८० पासून आजपावेतो सुमारे सातेक हजार लोकं चमत्काराने बरे झाले आहेत. त्यापैकी ६९ जणांचे रोगमुक्तीचे कारण आधुनिक वैद्यकीय दृष्ट्या स्पष्ट होत नाही. यांतल्या बहुसंख्य घटना व्यवस्थित रीत्या पत्रांकित केलेल्या (=डॉक्युमेंटेड) आहेत. अधिक माहितीसाठी : https://en.wikipedia.org/wiki/Our_Lady_of_Lourdes#The_Lourdes_Medical_Bu...

यावरून फेथ हीलिंग नावाचा प्रकार खरोखरंच अस्तित्वात असावा, असं दिसतंय. मात्र त्याचा यशदर अत्यल्प आहे.

आ.न.,
-गा.पै.

फेथ हीलिंगचे इतरही अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. जिथे आधुनिक वैद्यकशास्त्र हात वर करते तिथे लोक अशा प्रकारांकडे किंवा पर्यायांकडे वळतात हे पाहिले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील या त्रुटी दूर करून संबंधित आजारांवर कायमस्वरूपी उपाय शोधले गेले तर लोकांचे अशा आजारांसाठी 'फेथ हीलिंग/हीलर्स'कडे जाणे कमी होईल. उदा. धनुर्वाताची लस. किंवा कुत्रा चावल्यावर घ्यावी लागणारी इंजेक्शन्स. मोतिबिंदू दूर करणारी शस्त्रक्रिया.
हे उपचार बहुतांशी यशस्वी व बहुतांशी सर्वदूर उपलब्ध आहेत. लोकांना याविषयी माहीत आहे. ज्यांना परवडत नाही ते लोक सरकारी दवाखान्यात जाऊन हे उपचार / प्रतिबंधक उपाय / शस्त्रक्रिया करू शकतात.
कदाचित मी दिलेली उदाहरणे चुकीची असतील. माबुदो. पण या उपचारांतून रोगी पूर्णपणे, ठणठणीत बरा होईल याची (बरीचशी) हमी असते. शंभर टक्के हमी असेलच असे नाही. तरी हे उपचार गरीबांपासून श्रीमंतांना उपलब्ध असणे, परवडण्याच्या कक्षेत असणे, कायमस्वरूपी असणे, त्यांबद्दल जनजागृती असणे यांमुळे जास्तीत जास्त लोक यांचा लाभ घेऊ शकतात.

परंतु जे रोग 'दुर्धर' प्रकारातील आहेत, किंवा ज्यांसाठी खात्रीशीर इलाज नाही वा तो परवडणारा नाही, किंवा तेथील लोकांपर्यंत पोचलेला नाही तिथे लोक अशा फेथ हीलिंगमधून मार्ग शोधायला जातातच!

दुसरा वर्ग म्हणजे ठार अंधश्रध्दाळू वर्ग. हे लोक गंडेदोरेताईतमंत्रतंत्रजादूटोणा वगैरेंवर जबरी विश्वास ठेवणारे असतात. जगात आपल्या बाबतीत काहीही वाईट घडले की ती काळी जादू, नजर लागणे, कोणी आपले वाईट चिंतिणे, करणी वगैरेंमुळे होते हा त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यावर जारणमारणादी उपाय केले की मगच यांचा जीव गार होतो. मग त्यांना इतर काहीही सांगा. फारसा फरक पडत नाही. त्यातल्या त्यात काहीजण वैद्यकीय उपचार घेत घेत असे 'उपचार' घेतात ही जमेची (!) बाजू! बरं, यात अशिक्षित लोक जसे आहेत तसेच सुशिक्षितही आहेत.

आणखी एक गट आहे अकु. मानसिक त्रास असलेल्यांचा. दुर्दैवाने काहींच्या घरगुती समस्या सोडवण्यापलीकडच्या असतात किंवा त्यांना त्यातून मार्ग सापडत नसतो. मानसोपचार तद्न्य वगैरै काही माहीतच नसते किंवा ज्याने समुपदेशन वगैरे घेणे गरजेचे आहे तीच व्यक्ती ते घ्यायला तयार नसते. यामुळे जे इतर भरडले जातात ते अशी घटकेपुरती आपली दु:खं, विवंचना त्या कर्त्या करवित्यावर सोपवतात..पुन्हा घरी येऊन रोजची लढाई लढायचे बळ मिळवतात. अशी उदाहरणे पाहिली की त्यांना का टोकावं असंच वाटतं.

काही प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की काही सदस्यांना असेही म्हणायचे असावे:

१. समाजात ह्या गोष्टी चालणारच.

२. इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतही भ्रष्टाचार आहे तर ह्या गोष्टींमध्ये अश्य अकाही उलाढाली झाल्या तर विशेष काय?

३. अश्या गोष्टींच्या नादी लागणार्‍यांना घटकाभर बरे वाटत असेल तर त्यांना कशाला दोष द्यावा?

हे मुद्दे थोड्याफार फरकाने जर असेच असतील तर त्यावर असे म्हणावेसे वाटते की दोष त्यांना दिला जत आहे किंवा द्यायला हवा आहे जे जनसामान्यांची अशी दिशाभूल करू पाहतात / करतात. उद्या तो मनुष्य ह्या युगाचा जीझस वगैरेही ठरू शकेल. त्याचा ख्रिश्चन आसाराम बापू होईल. मग त्याचे सैनिक शासकीय सैनिकांवरच हल्ले करू शकतील. ह्याशिवाय समाज मनाने पांङळा होण्याच्या प्रक्रियेला जोर येऊ शकेल.

खरंच ह्या गोष्टींना प्रतिबंध करणारे कायदे नाही आहेत का? टीव्हीवरसुद्धा आशीर्वाद (म्हणजे हे वर लेखात दिलेले व्हिडिओज) आणि निर्मलबाबांची प्रवचने नियमीतपणे दाखवतात. तेही पटत नाही.

विडीओ बघितला. हा प्रकार आता भारतातही आलेला बघून नवल वाटले नाही. इथे एक चॅनेलवर टिव्ही इवान्जेलिस्ट आणि फेथ हिलिंग वगैरे सर्कस दिवसभर चालू असते. भरपूर आर्थिक उलाढाल चालते. तक्रारी, चौकश्या वगैरे होते. कायद्यातून पळवाटा काढून आपली पोतडी भरणे हे यांचे ध्येय! हे असे फेथ हिलिंग होत असते तर फ्रान्सिस्कन मिशन वगैरे मंडळींनी हॉस्पिटल्स कशाला काढली असती?

घाटपांडे साहेबांशी शंभर टक्के सहमत !

अशा भोंदू लोकांची टिंगल होऊ नये असे त्यांनी सूचित केलेले दिसत नाही. असे प्रकार बंद व्हावेत असेच सर्वांना वाटत असते. पण हे काम अलगदपणे पायातला एखादा काटा काढावा तसे होणे आवश्यक आहे. इथे श्रीराम लागू यांचा रोखठोक अ‍ॅप्रोच उपयोगी नाही. आदिवासी लोकांच्या मनात वैदू, भगत अशा लोकांबद्दल आदर असतो. त्यांच्या समोर वैदू भगत लोकांवर कठोर टीका केली तर ते अधिकच आहारी जातील की हे कोण आले बाहेरचे आम्हाला शिकवायला. त्यापेक्षा थोडासा प्रॅक्टिकल मार्ग काढणे योग्य. भगत लोकांनी आपल्याकडे अलेल्या लोकांना सरकारी दवाखान्यात पाठवावे यासाठी सरकारी प्रयत्न योग्य आहेत ते याच साठी.

अकु. मला देवी रोगाचे उदाहरण द्यावेसे वाटते. पुर्वी देवी झाल्यावर लोक देवी च्या देवळात रुग्णाला सोडून देउन देवी काय ते बरे करेल नाही केले तर त्याचे प्राक्तन अशा समजूतीत होते. सरकारने देवी निर्मूलनासाठी कसून प्रयत्न केले. देवीचा डॉक्टर खेडोपाडी नियुक्त केला. लसींची मोहीम राबवली. त्यामुळे देवी आटोक्यात आली व देवीचा रोगी कळवा हजार रुपये मिळवा अशी बक्शिस लावली. लोकांना जेव्हा कळून चुकले कि देवीच्या देवळात जाण्यापेक्षा डॉक्टरच आपल्याकडे येउन उपचार करतो व आपण बरे होतो. त्यावेळी ही देवीची अंधश्रद्धा आपोआप आटोक्यात आली. इथे रुग्णाला सक्षम व व्यवहार्य पर्याय मिळाला.
अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात हा अंधश्रद्धा निर्मूलनातील सगळ्यात मोठा अडसर आहे.

प्रकाश देशपांडे,
रुग्णाला सक्षम पर्याय हवा परंतू त्याच बरोबर हे जे फेथच्या नावाखाली अर्थकारण चालते त्यालाही चाप हवा. तुम्ही देवी रोगाचे उदाहरण दिले आहे. यात वॅक्सिन कामी आली. परंतू काही आजारपणे ही हेल्थ कंडीशन या प्रकारात मोडतात. त्या मॅनेज केल्या जातात. पूर्णपणे बरे होणे नसते. काही वेळा रेमिशन आणि पुन्हा उद्भवणे असेही असते. मात्र हे मान्य न करता लोकं या फेथ हिलिंगच्या मागे लागतात. अगदी काउंसेलिंग केले तरी हे होते. पद्धतशीरपणे मार्केंटिंग करणार्‍या मंडळींचे आयतेच फावते.

घाटपांडे, चांगल्या पोस्टी.

स्वाती२, बरोबर आहे. दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत.
एका बाजूला ह्या बाबा बुवांचे सगळे धंदे डिसमँटल केले पाहिजेत म्हणजे आणखिन लोकं त्यांच्या नादी लागणार नाही आणि दुसया बाजूला बळी पडलेल्यांविषयी संयम आणि सहानुभुती बाळगून त्यांना अशा लोकांच्या नादी लागण्यापासून वाचवलं पाहिजे.

Pages