सत्तू पराठा

Submitted by दिनेश. on 13 July, 2015 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ पराठे होतील
माहितीचा स्रोत: 
नेट !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, मस्त कृती. थेट कणकेतच सातूचे पिठ मिसळवले तर? तुम्ही लोणच्याचा खार कुठुन मिळवला. मसाला की आतला तिखट तेलकट गाळ? विकतच्या लोणच्यात मोजकाच खार असतो.

बी, घरातलेच लाल मिरचीचे लोणचे घेतले होते. कुठलेही चालू शकेल. फोडी असतील तर कुस्करुन घ्यायच्या.
बिहारमधे लाल मिरच्यांचे मसाला भरून लोणचे करतात. त्यात बडीशेप, गरम मसाला असे बरेच काहीकाही असते,

गहू आणि चन्याची डाळ भजुन केलेल्या पिठाला अपण सातुचे पीठ म्हणतो. ते दूध साखर घालुन मुलांना देतात. चव छान असते व पौष्टीक असते.

मला वाटतं याचे गोड पराठेही छान लागतील. सत्तू पीठ, पिठीसाखर, तूप, वेलची, दुधाचा हबका यांचे सारण. कदाचित बदाम / काजू वगैरे सुक्यामेव्याची पूड. आवरणात किंचित मीठ, तेल/तूप मोहन, कणीक. शुध्द तुपावरच पराठे (?) शेकायचे. सोबत एखादी आंबटगोड चटणी किंवा लोणचे. हे असंच सुचलंय. Happy त्याला काहीतरी रंगीबेरंगी नावही देता येईल.

आज हा पराठा करून पाहिला.( म्हणजे सारण मी केले आणि पराठा माझ्या अन्न्पूर्णेला करायला सांगितला)
डाळं मिक्सरमधे फोटोत दाखविल्याप्रमाणे एकदम बारीक झाले नाही.मग त्यात कांदा घालून वाटल्यावर जरा बारीक झाले.त्यात उरलेले मिरचीचे लोणचे(वाटून), ओवा आणि कोथिंबीर घातली.एकवेळचा नाश्ता झाला.
यापेक्षा अकुंनी सांगितल्याप्रमाणे ,गोड केल्यास अधिक चांगले लागतील असा अंदाज आहे.

माझ्याकडे गुलाबजामचा पाक उरला आहे. त्यात मावेल तितकं डाळ्याचं पीठ आणि कणिक समप्रमाणात मिसळून पराठे लाटून भाजता येतील का?

अकु, छान आयडीया.

मंजूडी, पाकात किती पिठ मावेल याचा अंदाज येणार नाही. त्यापेक्षा पिठ घेऊन त्यात थोडा थोडा पाक टाकून मिसळले तर चांगले. आपण बेसनाचे लाडू वळताना जितपत ( थंड झाल्यावर नाही ) घट्ट असतात ती कन्सिस्टंसी हवी.

नाही व्हायचे. हे पिठ कोरडे असल्याने सर्व ओलावा शोषून घेईल. मग मंद आचेवर ( गूळपोळी भाजतो तसे ) भाजायचे.