तडका - चव सत्य-असत्याची

Submitted by vishal maske on 7 July, 2015 - 10:33

चव सत्य-असत्याची

सत्य झाकु पहाणारांना कधी
असत्यही वाटत असतं गोडवं
अन् सत्याची बाजु घेणारांना
कधी सत्यही वाटु लागतं कडवं

सत्य-असत्याच्या सत्यापनाला
कधी वैचारिकतेचेही पेव असते
मात्र आप-आपल्या आवडीनुसार
सत्य-असत्याची चव असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा तडका काय प्रकारे...? आत्तापर्यंत चारोळी, गझल, छंदबद्ध कविता, मुक्तछंद असं काय काय ऐकल होतं.
तडका म्हणजे काय ते? जीवाची तडतड करुन जुळवलेली कविता वाटतेय ही तरी