तडका - गुंता,...

Submitted by vishal maske on 2 July, 2015 - 06:12

गुंता,...

कुणी सहज गुंतला जातो
कुणी मात्र गुंतवला जातो
न गुंतणाराच्या मागे सुध्दा
कधी गुंता भुंकवला जातो

अनपेक्षित अशा गुंत्याचाही
कधी उपद्रव होऊ शकतो
अन् गुंता सोडता-सोडता
गुंता गुंतत जाऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा टवाळजी एकमेव,
तुम्ही स्वत:चंच उदाहरण दिलं आहे,पण अगदी मजेशीर वाटलं,आणि तुमच्या प्रतिभेला साजेसंही आहे,अजुन असे उदाहरणं असतील तर,तुमच्याकडेच ठेवा,नाहीतर तुमच्या आकलेचा दर्जा सर्वांनाच कळेल,आणि स्वत:चा अपमान करून घेण्यापेक्षा थोडीशी अक्कल चालवा,आणि स्वत:च्या होणार्या नुकसाणापासुन सुटकारा मिळवा,
best of luck,...

तुम्ही स्वत:चंच उदाहरण दिलं आहे,पण अगदी मजेशीर वाटलं,आणि तुमच्या प्रतिभेला साजेसंही आहे,
मी नेहमी स्वतःचीच उदाहरणे देतो. ईतरांची देऊन त्यांना प्रसिद्धी द्यावी असं मला अजिबात वाटत नाही. मी महान आहे, माझी प्रतिभा (आणि प्रतिमा सुद्धा) अफाट आहे याची मला जाण आहे. कोहम - हा प्रश्न मला कधीच पडला नाही. तुला मजेशीर वाटावं म्हणून मी टवाळक्या करीत नाही. तरी देखील तुला ते वाटलं हे तुझं भाग्य आहे. Proud

नाहीतर तुमच्या आकलेचा दर्जा सर्वांनाच कळेल

टवाळक्या करायला अजिबात अक्कल (तुझ्या भाषेत आकल) लागत नाही आणि जर कुणाला तीची गरज भासत असेल त्याने टवाळक्यांच्या नादाला लागू नये. पण टवाळकी समजायला मात्र खरोखरचं अक्कल लागते आणि .... Proud

-आ. नम्र टवाळ Happy