रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका - महाजन बंधूंचे अभिनंदन !

Submitted by केदार on 29 June, 2015 - 09:40

भारताच्या महाजन बंधूनी आज रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका पूर्ण केली सलग ८ दिवस १४ तास ५५ मिनिट सायकल चालवून ३००० माईल्स त्यांनी पूर्ण केले. ते ही रेस पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

Mahajan.jpg

गो इंडिया !

RAAM बद्दल थोडेसे - रॅम ही अल्ट्रा लाँग डिस्टन सायकलींग रेस आहे. ३००० माईल्स ( किमी नव्हे) हे ठरलेल्या वेळे आधी पूर्ण करावे लागतात. त्याबद्दल ह्या साईट वर जास्त माहिती मिळेल. http://www.raceacrossamerica.org/raam/raamfp.php?N_webcat_id=1

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/doctor-brot...

त्यांचे स्टॅट : http://www.raceacrossamerica.org/raam/rcrank.php?s_N_category_group=2&s_...

पुनश्च महाजन बंधूंचे अभिनंदन !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच बातमी वाचली.
महाजन बंधूंचे अभिनंदन !:)

मला आठवतय त्याप्रमाणे ह्यांनी भुतानमधल्या सायकलरेसमध्येही भाग घेतला होता पण अगदी थोडा वेळ कमी पडून ती पूर्ण झाली नव्हती.

मी दुपारी लाईव्ह पहात होतो. आणि त्यांनी शर्यत पूर्ण केल्यावर अगदी भरून आलं. अर्थात गेले कित्येक दिवस अनेक रायडर्सला फॉलो करतोय. ते पूर्ण करतील की नाही ह्याबद्दल शंका होती कारण इतर रायडर्सना असणारा सपोर्ट ( सपोर्ट टीम) तितका चांगला ह्या टीमला नव्हता, तरीही त्यांनी वेळेच्या १ दिवस आधी रेस पूर्ण केली.

हेल्मेटस ऑफ टू देम !

ही बातमी वर वरची वाटत असली तरी, तिचे परिणाम इंडियन सायकलींग सिन वर दुरगामी असणार आहेत. पेसने मेडल जिंकण्याएवढे महत्त्व आहे.

पराग भूतानमधली रेस त्यांनी पूर्ण केली होती.

केदार ह्या दोघांनी जितकी प्रॅक्टिस केली होती ना त्यामुळे कोणतीच शंका आम्हाला तरी नव्हती की ते पूर्ण करतील की नाही. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. बाकीचे सायकलस्वार अनेक वर्षे प्रॅक्टिस करतात. ह्या दोघांनी २०१४च्या सुरुवातीला ठरवलं की RAAM मध्ये भाग घ्यायचा आणि दीड वर्षात स्वप्न पूर्ण केलं.

४८०० किमी साडेआठे दिवसात म्हणजे सरासरीने ५६५ किमी दिवसाला. ज्या लोकांना ह्यांच्याबद्दल माहित नाहीये ते मला खोट्यातच काढत आहेत आणि असं वाटतं त्यातच ह्या दोघांच यश आहे.

ही रेस दोघांनी रीले फॉर्मॅट मध्ये team india:vision for tribals ह्या नावाने पूर्ण केली. ३००० मैलाची ही रेस दोन जणांच्या ह्या टीमला नऊ दिवसात पूर्ण करायची होती. ती त्यांनी आठ दिवस चौदा तास आणी ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंचे अंतर ह्यात पार करायचे होते. अनेक घाटांमधून जाणार्‍या रस्त्यावर ९००० फूट उंचीचा सर्वात मोठा पासदेखील होता. भारतातील अजून दहा सायक्लिस्ट त्यांच्या क्रूमध्ये होते.

ह्यापूर्वी महाजन भावांनी भारतात २००, ३००, ४००, ६००, १००० अशा ब्रेव्हे सायकल रेसेस पूर्ण केल्या आहेत. ह्याशिवाय भूतानच्या टूर ऑफ द ड्रॅगन नावाच्या २६८ किमी च्या रेसमध्येही भाग घेउन ती वेळेआधी पूर्ण केली आहे. ह्या रेसमध्ये हिमालयातले ४ पासेस कव्हर करावे लागतात. ह्या रेसला डेथ रेस असेही म्हणतात.

ह्या टीमने RAAM मध्ये पूर्ण केलेल्या प्रत्येक शंभर किमी मागे एक प्रत्येक १०० किमी मागे ५ कॅटॅरॅक्ट आणि १ कॉर्नियल इम्प्लांट अशा सर्जरीज करण्याचा संकल्प नाशिकच्या कल्पतरू फाऊंडेशनने सोडला आहे..

भारतात सायकलिंगला सोन्याचे माहित नाही पण चांदीचे दिवस तरी येवोत.

४८०० किमी साडेआठे दिवसात म्हणजे सरासरीने ५६५ किमी दिवसाला.
<<
>>

५६५ किमी दिवसाला. अफाट कामगिरी.
अभिनंदन महाजन बंधूचे.

रेस सुरु झाल्यापासून त्यांना फॉलो करत होतो. आज शेवटच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात तर उत्सुकतेने शीग गाठला होता. सगळे कामधाम सोडून त्यांचा प्रोग्रेस ट्रॅक करत होतो. शेवटी तर अगदी मेडल जिंकल्यासारखा आनंद झाला.

काय जिद्द, काय मेहनत आणि चिकाटी....सलाम...मनापासून सलाम....

प्रत्येक भारतीयाचा उर भरून यावा अशीच कामगिरी आहे. याबद्द्ल चॅनेलवाले काय दाखवतायत म्हणून बघत होतो तर त्यांच्या दृष़्टीने अजिंक्य रहाणे कप्तान होणार हीच जगातली सर्वात मोठी बातमी होती. मराठी चॅनलनी पण अर्ध्या मिनिटाच्या वर काही दाखवले नाही.

पण लोकांना फक्त टूर डी फ्रान्स बद्दलच माहीती होते, आता कितीतरी लोकाना अशी पण रेस असते हे कळले. हेही काही कमी नाही. पण या पलिकडे काही फार बदल होईल असे वाटत नाही.

पराग भूतानमधली रेस त्यांनी पूर्ण केली होती. >>>> वेका, नाही. तू दिलेली माहिती पूर्ण बरोबर नाही.

हे डॉ. हितेंद्र महाजनांनी त्यांच्या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखामधून, (त्यांचे बंधू महेंद्र ह्यांनी रेस पूर्ण केली.)

"शेवटची १० मिनिटे राहिली होती. व ५-६ कि.मी. चे अंतर असणार. मी शेवटचा उपाय म्हणून पाठी वरची बॅग खाली फेकून दिली. तेवढेच २ ते ३ किलो वजन कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न. जमेल तेवढे जोर जोरात पेंडल मारायला लागलो. शेवटी २-२.५ की.मी. गेलो असेन तसे घड्याळात सहा वाजले व रेस मार्शल माझ्या जवळ येऊन ‘It’s, time up, doctor’ असे उद्‍गारला हे ऐकल्या ऐकल्या मला रडू आवरेना. रस्त्यावर बसून ढसा ढसा रडलो. सकाळी २ वाजे पासून खूप प्रयत्न केले होते शेवटी १५ मिनिटांसाठी वेळेत रेस पूर्ण करता येणार नाही म्हणून खूप वाईट वाटत होते."

http://kalpatarufoundation.com/dragon/
हा लेख सगळ्यांनी जरूर वाचा. अत्यंत भारी आहे!

ज ब र द स्त !!! __/\__

ही माहिती इथे दिल्याबद्दल केदारला आणि माहितीपूर्ण पोस्टससाठी पराग आणि वेलला धन्यवाद.

हे जबरी आहे... मी फॉलो करत होते, अशक्य खल्लास वाटलं. मोठी अचिव्हमेंट आहे ही खूपच.
खूप इनस्पायरींग.... हेल्मेट्स ऑफ मोमेंट Happy

महाजन बंधूंचे अभिनंदन Happy खूप कौतुक वाटतय त्यांचे अन त्यांच्यामुळे आपलिच कॉलर ताठ झाल्याचे भासते आहे.
.>>> ही माहिती इथे दिल्याबद्दल केदारला आणि माहितीपूर्ण पोस्टससाठी पराग आणि वेलला धन्यवाद. <<< सहमत. लिन्क करताही धन्यवाद.

हेल्मेट्स ऑफ टू महाजन ब्रदर्स... रेस कम्प्लिट केल्यावरचा त्यांचा इंटरव्ह्यू पण मस्त होता...

>>>>> ही बातमी वर वरची वाटत असली तरी, तिचे परिणाम इंडियन सायकलींग सिन वर दुरगामी असणार आहेत. पेसने मेडल जिंकण्याएवढे महत्त्व आहे. <<<<
>>>> भारतात सायकलिंगला सोन्याचे माहित नाही पण चांदीचे दिवस तरी येवोत. <<<<

अगदी अगदी, काल बातमी ऐकल्यावर हाच विचार मनात आला होता आणि प्रकाश पदुकोण मुळे बॅडमिंटन, विश्वनाथ आनंद मुळे बुद्धिबळ अशा प्रकारच्या खेळांना चांगले दिवस आले ते आठवले. या खेळांच्या तुलनेत, सायकलिंग ही भारतीयांच्या रोजच्या गरजेचीही बाब आहेच शिवाय परवडणारीही आहे.
आमच्या पिढीने रोज सायकलवरुन ऑफिसला जाये करणारे बाबा/काका/मामा/शेजारी पाहिलेत, वाकडेवाडी रेल्वेक्रॉसिंग पासून खडकी, दापोडी, देहूरोड अशा ठिकाणी गटागटाने कामावर सायकलने जाणार्‍यांच्या रांगाच्या रांगा पाहिल्या आहेत. ज्यांच्याकरताच खरेतर वाकडेवाडी येथे अंडरग्राऊंड सबवे केला गेला, दापोडीच्या पुलावर तेव्हा सायकलकरता बाजुने मार्गिका होती. १९९० नंतर टूव्हीलर/बाईक्स च्या आगमनाने हे चित्र झपाट्याने बदलत गेले, व पुण्यातील प्रत्येक घरटी दोनचार सायकली असायच्या तिथे दोनचार बाईक्स/कार उभ्या राहिल्या. आर्थिक सुबत्तेने सायकलिंगच्या श्रमांवर मात केली व आता तर अशी वेळ आली आहे की आर्थिक उच्चनीच स्तरात, सायकलिंग करणे म्हणजे कमसर पणाचे लक्षण मानले जाते.
जितक्या लौकर सायकलिंगबाबत सामुहिक सामाजिक शिस्त नजरेस पडेल, सायकल वापरणे "लज्जास्पद" नाहीये हे कळेल तितके चांगले.

महाजन बंधूंच्या यशामुळे जुन्या/नव्या पिढीतिल लोक अगदी स्पर्धेकरता नसले व फक्त रोजच्या वापरण्यापुरते/व्यायामापुरते जरी सायकलिंग करु लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. प्रश्न इतकाच आहे की मिडियातुन या गोष्टीला किती प्रसिद्धी मिळते. अन्यथा वर कोणी लिहीलय तसे फक्त क्रिकेट एके क्रिकेट, व तोच तेव्हडा खेळ असे होऊ नये.

>>> रेस कम्प्लिट केल्यावरचा त्यांचा इंटरव्ह्यू पण मस्त होता... <<< टीव्हीवर दाखवला कारे? कुठे दाखवला? आमच्याइथे झीमराठी सेरियल्सपुढे बाकी काहीही लावता येत नाही Sad

त्या लिंकमधिल एका वाक्याने लक्ष वेधले... अन मला भरुन /गहिवरुन आले ! Proud
>>>> लक्षात आले की हा वेडेपणा मला व माझ्या लहान भावालाच (डॉ. महेंद्र महाजन) करावा लागणार. <<<<
म्हणजे माझ्या आजुबाजुच्या लोकांकडून मीच एकटा वेडा ठरविला जातो असे नाहीये तर.... Proud मला समदु:खी आहेत...
आहाहा.. कित्ती बरे वाटले की या महाजन बंधुंना देखिल या "वेडे ठरविले जाण्याच्या / वेडेपणाच्या" मूल्यमापना पासून सुटता आलेले नाहीये. Happy मग माझ्यासारख्याची काय कथा? असो.
त्यांचे प्रॅक्टिसचे वर्णन भन्नाट आहे... वाक्य नि वाक्य महत्वाचे आहे. नीट समजुन उमजुन घ्यायला हवे.
लेखाच्या लिंक बद्दल खरेच पुनःश्च धन्यवाद.

अरे बापरे!!!!

अशी काहि रेस असते हे ही माहिती नव्हते.

महाजन बंधुंचे अभिनंदन. Happy

केदार आभार इथे शेअर केल्याबद्दल.

क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, स्वीमिंग, अ‍ॅथलेटिक्स....यांच्या व्यतिरिक्तही "सायकलिंग" नामक शारीरिक तसेच मानसिक क्षमतेची कमालीची परीक्षा पाहाणारा एक "खेळ" आहे आणि त्यात जगभरातील स्पर्धक भाग घेत असतात...इतकी माहिती महाजन बंधूंच्या या अपूर्व म्हटल्या जाऊ शकणार्‍या पराक्रमाने मिळाली आहे तमाम भारतीयांना, जी अत्यंत आनंददायी अशीच आहे. अभिनंदन...!

लिम्बूटिंबू...तुमच्या वरील एका प्रतिसादात "...कामावर सायकलने जाणार्‍यांच्या रांगाच्या रांगा...(झुंडी?)" असे एक वाक्य आले आहे. कामावर चाललेल्या लोकांच्या त्या लाईनला "रांगा" असेच संबोधन योग्य ठरते. झुंडी म्हणजे एक प्रकारची शक्तीप्रदर्शन दाखविण्यासाठी केलेली मस्ती होऊ शकते. उदा. "जत्रेत देवळाच्या दारात भक्तांची दर्शनासाठी झुंड उडाली होती...", "नटीला बघायला चाहत्यांची झुंडच निघाली..." आदी. अशी गर्दीची कारणे तात्कालिक असतात. पण सायकलवरून (मी देखील वापरली आहे) नोकरीला जाणारे लोकांची रांग, जी रोजचीच आहे, तिला मात्र झुंड म्हणता येणार नाही. असो.

Pages