कॉम्पुटर मधील विशिष्ट (Specific) शब्द शोधणे

Submitted by राज1 on 24 June, 2015 - 03:00

कॉम्पुटर मधील एखादा विशिष्ट (Specific) शब्द शोधण्या साठी काही software आहे का ?

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफिस मध्ये Window 7 वापरतो. Power Point Presentation, Word, Excel च्या file मध्ये एखादा विशिष्ट (Specific) शब्द वापरला असेल तर तो कसा शोधायचा.

राजेंद्र,
वेगळ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही. Windows Explorer उघडा. हव्या त्या फोल्डरमध्ये जा. उजव्या वरच्या कोपर्‍यात सर्च बॉक्स असतो त्यात तो शब्द लिहा. तो शब्द असलेल्या सर्व फाईल्स दिसतील.

राजेंद्र,
हा प्रश्न विचारलात याबद्दल धन्यवाद. मला देखिल ही अडचण होती.

समीर,
तुमचे तर शतशः आभार. तुमची टिप आत्ताच तपासून पाहिली. फारच कामाची गोष्ट आहे.

पूर्वी "search programmes and files" मध्ये अशी सुविधा होती. पण सध्या तशी सोय नाही. त्यामुळे कधी कधी अडचण येत असे.

समीर यान्नी वर उत्तर दिलेले आहेच.

एक सावधानता बाळगायला हवी. spell अगदी अचुक असायला हवे. एक शब्द जरी चुकला तर सर्च कमान्ड तुमची फाईल असुनही नाही आहे असे उत्तर येणार. मोठे नाव असेल किव्वा नावाबाबतही साशन्कता असेल तर तर मी स्टार * चा वापर करतो,
marks*.pdf
marks*.doc

pdf (किव्वा doc) माहित असेल तर जरुर द्यायचे म्हणजे तेव्हढीच शोधलेल्या फाईलीन्चा ठिगारा कमी.

एखाद्या फाईलमधे विशिष्ट शब्द शोधायचा असेल तर कन्ट्रोल F चा वापर करा.

www.voidtools.com येथुन Everything उतरवुन घ्या व संगणकावर स्थापित करा. संगणकातील सर्व माहितीचे सूचीकरण (indexing) झाल्यावर system tray मधिल everything iconला उघडा व तिथे हवा तो शब्द टाका. Windows Search हे खुपच पेक्षा वेगवान आहे.

सर्वांचे प्रतिसादा बद्दल धन्यवाद
योकु,
मी Power Point Presentation करतो त्यावेळी एका Presentation मध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अब्दुल कलम यांची माहिती दिली होती, file save करताना वेगळ्या नावाने file save केली होती.
हे Presentation मी २ वर्ष्या पूर्वी केले होते, आत्ता त्या Presentation ची गरज लागली म्हणून ती file शोधावी लागली.
विशिष्ट (Specific) शब्द शोधण्या काही software आहे का म्हणून हा धागा काढला

ऋन्मेऽऽष

मला साधारण १५ दिवसांनी एकदा तरी Power Point Presentation करावेच लागते. माझ्या Power Point Presentation च्या २०० तरी file असतील. मी वरती लिहल्या प्रमाणे एका file मध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अब्दुल कलम यांची माहिती लिहिली होती पण file save करताना file ला नाव वेगळे दिले होते. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अब्दुल कलम यांची माहिती असलेली file ची गरज आत्ता दोन वर्षा नंतर लागली. ज्या file मध्ये हि नाव होती ती file मला शोधायची होती, त्या file चे नाव मला आठवत नव्हते

राजेंद्र, ओके

मला साधारण १५ दिवसांनी एकदा तरी Power Point Presentation करावेच लागते...
आणि
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अब्दुल कलम यांची माहिती लिहिली होती ...

ईंटरेस्टींग जॉब प्रोफाईल Happy

भ्रमर एव्हरिथिंग हा प्रोग्रॅम चांगला आहे.पण तो फाईलच्या नावात असलेल्या शब्दातलाच सर्च देतो पण राजेन्द्रला (आणि मलाही ) फाईलमधल्या टेक्स्ट मध्ये असलेल्या शदानुसार सर्च हवा असेल तर?

भ्रमर,

एव्हरीथिंगाच्या दुव्याबद्दल धन्यवाद ! Happy

मी बऱ्याच धारिका (=फायली) उडवल्या होत्या. नंतर पुनर्वापर डब्बाही (=रीसायकल बिन) साफ केला होता. तरीपण तुमच्या पठ्ठ्याने त्या कुठूनतरी शोधून काढल्याच. त्या धडपणे पुनर्स्थापित (=रीस्टोअर) होत नव्हत्या. त्यांची बापथैली (=पेरेंट फोल्डर) तुमच्या पठ्ठ्यामार्फत हुडकली. ती मात्र पुनर्स्थापित झाली. मग उरलेल्या धारिका पुनर्स्थापित होऊ शकल्या. आणि शेवट गोड झाला. या नाट्याचा रंगमंच विंडोज ८.१ आहे.

परत एकदा धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

http://www.nirsoft.net/utils/search_my_files.html या लिंकवरुन SearchMyFiles हा पोर्टबल प्रोग्राम उतरवुन घ्या आणि चालवुन बघा. यात फाईलमधिल एखादा शब्द दिला असता फाईल शोधु शकतो. मी अगदी प्राथमिक स्वरुपाचा सर्च घेऊन पाहिल असता योग्य चालत आहे असे वाटते.

विकु, माझं बालपण आमच्या स्वत:च्या सदनिकेत गेलंय. तुम्ही म्हणता त्या डब्याचा आमच्याकडेही पुनर्वापरच होत असे! Lol
आ.न.,
-गा.पै.