मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा.
___________________________________________________________________
:- दारू पिऊन मेले त्यांना सरकार काय म्हणून नुकसान भरपाई देते? कोण त्यांना प्यायला सांगते? मेले आपल्या कर्माने. नाहीतरी दारू कुठे जगवते. उद्या मरणार होते ते आज मेले.
:- त्यांना नाही त्यांच्या अनाथ झालेल्या बायकापोरांना ते पैसे मिळतात. घरच्यांचा आधार जातो, यात त्यांची काय चूक?
:- काही आधार बिधार नाही जात. उलट दारूड्या नवर्याच्या छळातून सुटतात. वर पैसेही मिळतात. त्यांना एकप्रकारची लॉटरीच लागते. कोणता बेवडा आपल्या बायकोला पोसत असतो, उलट तिच्याच पैश्यांवर थेरं करत असतो. पगार झाल्यावर अर्धा पैसा पहिल्याच दिवशी गुत्त्यात उडवतात, नाहीतर कुठेतरी रस्त्यावर पडतात. त्यांच्या खिशातून कोणी अख्खा पगार काढून नेला तरी त्यांना त्याचे भान नसते.
:- पण दिली नुकसान भरपाई तर तुमचे काय जातेय? जरा माणुसकीनेही विचार करा रे.
:- काय जातेय म्हणजे? आणि कसली माणुसकी घेऊन बसला आहेस. सरकारचा पैसा म्हणजे आपलाच पैसा. आपल्याच टॅक्समधून जमा झालेला पैसा. कोणी अपघातात वा अतिरेकी हल्ल्यात गेले, भूकंप वा पुरात दगावले, त्या अभागी लोकांना करा ना मदत. कोणी हरकत घेतली आहे का? पण जे लोक दारू पिऊन मरतात त्यांच्याबद्दल मला जराही सहानुभूती नाही.
:- तुला कोणाबद्दल सहानुभूती वाटते का नाही हा मुद्दाच नाही. तो तुझा वैयक्तिक प्रश्न झाला. कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळणे योग्यच आहे. ते दारू नाही तर "विषारी दारू" पिऊन मेले आहेत आणि दारू पिणे हे बेकायदेशीर नाही.
विषारी दारूला रोखता न येणे हे सरकारी यंत्रणेचे अपयश आहे, म्हणून त्यांना नुकसान भरपाई मिळणे योग्यच आहे.
:- विषारी असो वा नसो, तो पुढचा मुद्दा झाला. मुळात दारू पिऊन मेल्यावरही मायबाप सरकार पैसे देते ही जाणीव आणखी कित्येक पावले दारूच्या गुत्त्यावर वळवतील हा विचार का नाही कोण करत,? की हे पैसे केवळ मेलेल्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश दाबायला वाटले जातात..
सरतेशेवटी न राहवल्याने मी ऋन्मेष देखील चर्चेत उतरलो,
:- पण सरकार दारूबंदीच का नाही करत? मॅगीवर बंदी आणणार्या सरकारला दारूवर बंदी आणायला जमू नये हेच सरकारचे सर्वात मोठे अपयश नाही का? लोकांना स्वस्तात रेशनचे गहू-तांदूळ पुरवण्याऐवजी स्वस्तातली हातभट्टीची वा सरकारमान्य देशी दारू पुरवायचा हट्ट का? .... वगैरे वगैरे..
----
आणि तत्क्षणीच ठरवून केल्यासारखे सारे डब्बा धुवायला उठले. अश्या अविर्भावात जणू काही मी विषय एका डेड एंडला आणून सोडला. ‘विषारी दारू प्रकरणात मृतांना नुकसान भरपाई मिळायला हवी का नको’ यावर तावातावाने चर्चा करणार्यांना संपूर्ण दारूबंदी हा विषय मात्र अतर्क्य, अशक्य आणि अनाकलनीय कसा काय वाटू शकतो याचे नवल करत मी देखील उठलो.
----
काय चीझ आहे ही दारू ..
सरकार याच्या खरेदी विक्रीवर आक्षेप घेत नाही. दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही.
जर कोणी दारूच्या नशेत कोणाचा बळी घेतला तर तो दारू पिणारा गुन्हेगार ठरतो. विकणारा मोकाट सुटतो. बळी जाणारा मात्र नाहकच मरतो.
जर दारूने पिणार्याचाच बळी घेतला तर त्याला मदत आणि सहानुभूती मिळते. विकणार्याला शिक्षा होते. कारण पिणार्याने ते अमृत(!) समजून घेतले असते, पण देणार्याने फसवून विष दिले असते.
रोज थोडे थोडे आतडे जाळत मरणाच्या दारी फरफटत नेणारी दारू विकणे हा गुन्हा नाही.
पण एकाच फटक्यात यमसदनी पोहोचवणारी दारू बनवली तर तो मात्र गुन्हा आहे.
कमाल आहे !
They may not be educated, but
They may not be educated, but they are adults who in most cases are 'knowingly' doing something illegal. How is that compared with children or parents who are consuming what they think is safe for eating?
यांचे डायलिसीस करण्यासाठी
यांचे डायलिसीस करण्यासाठी मशीन्स उपलब्ध व्हावेत म्हणून आमच्या रेग्युलर पेशंटसच्या अपॉईंटमेंट दोन तीन दिवस रिशेड्यूल/ पोस्टपोन कराव्या लागतात.
पण रेग्युलर पेशंट आणि मरणाच्या दारातील पेशंट यांची तुलना करता ते योग्य नाही का ? आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा आपणही प्रथम ट्रीटमेंट करणारच ना, कि त्याचीच चूक आहे म्हणून बसवून ठेवणार. मी दारु पिणा-याबद्दल सहानभूती म्हणून नाही तर वेळेत ट्रीटमेंटमुळे जर काही जीव वाचवता येत असतील तर वाचवायलाच हवे या मताचा आहे. अर्थात आपणही असालच.
माझ्या व्यवसायामध्ये माझा मजूर वर्गाशी प्रत्यक्ष संबंध येतो, बरेच मजूर शनिवारी , रविवारी अथवा सुटीच्या दिवशी त्यांच्या पगारातील काही रक्कम घेवून देशी दारुचे किंवा हातभट्टीचे सेवन करतात, असे असले तरी प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला त्याचा उरलेला पगार ते त्यांच्या घरी पाठवितात ,थोडक्यात तेही कुटूंब चालवितात या मजूरांचे मासिक उत्पन्न पाहिले तर ५ ते १० हजारापर्यंत असते तेही दररोज काम उपलब्ध झाले तर ,आता अशा व्यक्तीच्या बाबतीत मालवणसारखी दुर्घटना झाली तर समाजाकडून सहानभूती मिळायलाच हवी. सरकारची भूमिका केवळ मदतीची नाही तर कारवाईचीही आहे हे दिसून आलेच आहे.
आम्ही बॉदर करतोय कारण हे लोक मरतात तेव्हा नुकसान भरपाई म्हणून आम्ही टॅक्स पे केलेला पैसा जातो
जे लोक मरण पावले तेही अप्रत्यक्ष रित्या कर भरतच होते की.. सरकारचे भरमसाठ प्रकारचे कर वस्तूवर लादल्यामुळेच वस्तूची किंमत वाढते ना मग त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या वस्तू खरेदी केल्या त्यामागे सरकारला पैसे मिळालेच कि .. आम्ही टॅक्स भरतो या वाक्याला काही अर्थ नाही , तो तर सर्वच भरतात म्हणून सरकारने सर्वानाच मदत करणे अपेक्षित आहे.
किरणकुमार ती पोस्ट आम्ही
किरणकुमार ती पोस्ट आम्ही टेक्स भरतो ते भरत नाहीत अश्या अर्थाची नाही.
आपले म्हणणे अगदी योग्यच आहे.
वर काही जण आपण मध्यमवर्गीय , सुशिक्षित आणि गावठी दारी न पिणारे असल्याने या घटनेविषयी चर्चा करण्याची आणि बॉदर करण्याची आपल्याला गरजच नाही असे म्हणणार्या माबोकरांसाठी आहे.
हा केवळ 'त्या दारु पिणार्यांच्याशीच ' निगडित प्रश्न नसून आपलाहीकाही संबंध त्या घटनेशी आहे.
परत तेच टॅक्सचे. टॅक्स सगळेच
परत तेच टॅक्सचे. टॅक्स सगळेच भरतात. मध्यम- उच्च वर्ग जो प्रत्यक्ष कर भरतो केवळ त्यावरच देशातली सगळी व्यवस्था चालते हे अज्ञान आहे. अप्रत्यक्ष कर सगळ्याकडून (गरीब श्रीमंत सगळेच) भरला जातो. गोरगरीब लोक आपल्या हक्काबद्दल जागृत नसतात बर्याचदा त्यांच्या ताटातल काढून मध्यम वर्ग आणि उच्च वर्गाला दिले जाते. तेव्हा आपण गप्प बसतो. इथे एका कुटुंबाला लाखभर रुपये मिळाले कि आपला जीव वरखाली होतो. बाकी हे पण आश्वासन असते पदरात पडायला महिने उलटतात.
किरण, पोस्टशी सहमत. बर्याचदा
किरण, पोस्टशी सहमत.
बर्याचदा वाटत की ही मजूर मंडळी असली दारू का पितात, त्यांना काय अशी दारू पिउन त्रास होतो, किंवा हानिकारक आहे हे माहिती नसेल का? मग असाही विचार येतो, की ह्या मंडळींचे पोट हातावर! रोज कंबर मोडेस्तो रात्रीपर्यंत काम करणार, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर हजर होणार. त्यात पुरेशा सोयीसुविधाऐवजी झोपडपट्टीत राहणार.
जर उद्या कमवायला उभ राहायचं तर आजचा थकवा घालवायला हवाच, काहीही करून. मग शेवटी दारू सोबतीला येते.
आणि मग त्याच व्यसनात रुपांतर सहज होत! बरेचसे
शेवटी प्रश्न पडतो की दारू वाईट की गरिबी?
थोडेसे अवांतर.. टॅक्सेशन मधे
थोडेसे अवांतर.. टॅक्सेशन मधे कॅनन ऑफ इक्वालिटी आणि कॅनन ऑफ अबिलिटी अशी दोन तत्वे असतात. कर आकारताना तो सर्व नागरिकांवर समान बोजा पडेल असाच आकारतात शिवाय त्याचवेळी करदात्यांच्या क्षमतेचाही विचार केलेला असतो.
जो सामान्य नागरीक अगदी काडेपेटी खरेदी करतो, त्यातही त्याने ( उत्पादन ) कर भरलेलाच असतो. आयकर मात्र तूमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात आकारलेला असतो. त्यामुळे केवळ पगारदार लोकांनी आमचा पैसा त्यांना दिला असे म्हणण्यात अर्थ नाही.
दिनेश.दा, किकु, साकल्य -
दिनेश.दा, किकु, साकल्य - चांगल्या पोस्ट्स!
जो सामान्य नागरीक अगदी
जो सामान्य नागरीक अगदी काडेपेटी खरेदी करतो, त्यातही त्याने ( उत्पादन ) कर भरलेलाच असतो. आयकर मात्र तूमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात आकारलेला असतो. त्यामुळे केवळ पगारदार लोकांनी आमचा पैसा त्यांना दिला असे म्हणण्यात अर्थ नाही.>>>>>>
हे जरी थियरी मधे खरे असले तरी, गरीब माणसे पैसे ज्या गोष्टींवर खर्च करतात त्यातल्या बर्यासच्या गोष्टींवर कर नसतो ( अन्नधान्य, कापड, काड्याची पेटी, ऱोकेल ). पण मध्यमवर्गीय ह्या सोडुन बाकी बरेच खर्च करतो ज्यावर टॅक्स असतो ( मल्टीप्लेक्स, ब्रॅडेड कपडे, वस्तु, प्रवास तिकीटे, हॉटेल, टोल, पेट्रोल इत्यादी )
मलापण गणित कळले नाही. वस्तु
मलापण गणित कळले नाही. वस्तु विकत घेताना कर सर्वच भरतात पण मधमवर्ग त्याशिवाय सणसणीत २५-३० टक्के आयकर भरतो ना? (आणि काडीपेटी विकत घेताना पण भरतोच, काडीपे. हे फक्त उदाहरण म्हणुन वापरले आहे) मग तो नुसतेच काडीपेटी वगैरेतुन आलेल्या करांपेक्षा प्रचंड जास्त असेल ना? सारखा कसा? त्यामुळे एखाद्या करदात्याला सातीने लिहिले तसे वाटले तर चूक का?
यात या घटनेत माणूसकी दाखवावी की दाखवु नये, 'मृत्यु पावलेल्या' लोकांना वाचवावे की नाही यावर बोलत नाहिये, झाले ते दुर्दैवीच आहे, फक्त कराचे गणित पाहिले असता ही बाब लिहाविशी वाटली.
हे गणित चूक असेल तर नक्की दुरुस्त करा.
स्पॉक, तुम्ही दिवे दिले आहेत पण हसू नाही आले.
कोणाला हसू येण्यासाठी
कोणाला हसू येण्यासाठी नव्हते.
कोणि पर्सनली घेऊ नये आणि रागावु नये म्हणुन होते.
ओके.
ओके.
जे लोक कर भरत नाहीत त्यांना
जे लोक कर भरत नाहीत त्यांना शासनाकडून कोणतेही घेऊ नयेत ही फिलॉसॉफी भारी आहे.आता ते लोक कर भरण्याएवढा पैसा कमवत नाहीत हा दोषही त्याचाच...... राज्यात अपायकारक दारू विक्री होऊ न देण्याचे शासनाचे कर्तव्य बिर्तव्य नसते. ते दारुडे सज्ञान नागरिकच स्वत:च्या परिस्थितीला पूर्णतः जबाबदार आहेत.मरू दे त्याना
दारु पिउन मेलेल्यांना नुकसान
दारु पिउन मेलेल्यांना नुकसान भरपाइ आणी वारसांना नोकरी देणे यासारखी गोष्ट फक्त याच अजब सरकारात घडु शकते. अपघातात मेलेल्यांना का नाहि मग नुकसान भरपाइ आणी वारसांना नोकरी ?
असो. कराच्या बाबतीत सांगायचे तर इन्कम टैक्स हा १५ % आहे भारताच्या संपुर्ण महसुलाच्या प्रमाणात (महसुल १०० % पकडून). corporation tax २५% आहे. इतर टैक्स (excise, custome, service) हे ३५% आहेत. उरलेले capital receipts , nontax revenues आहेत. ह्या अंदाजे फिगर आहेत.
यावर्षी सरकारने service tax १२ चा १४ % केला आणी corporation tax ३० चा २५ % केला त्यामुळे महसुलातील प्रमाण थोडे बदलेल.
थोडक्यात सांगायचे तर सर्व सामान्य लोक टैक्स भरतात कमी वा जास्त प्रमाणात (त्यात जास्त वा कमी मोजणे हे नगण्य आहे एकुण महसुलाच्या प्रमाणात). जे भरत नाहित (अंबानी, अडानी) त्यांना सरकार अब्जावधींच्या सबसिडि देते. त्यामुळे काड्यापेटीचा टैक्स कोण भरते ह्यात वाद घालण्यात काहि अर्थ नाहि.
बाकी टैक्स कोणीहि भरत असेल तरीहि दारु पिउन मेलेल्यांना नुकसान भरपाइ आणी वारसांना नोकरी देणे हे चुकच आहे आणी ह्यासारखा प्रकार करणार्या सरकारचे डोके नक्किच ठिकाणावर नाहि
धन्यवाद माणुस. आम्हाला जरा
धन्यवाद माणुस. आम्हाला जरा टॅक्सबद्दल वरवरच समजते त्यामुळे लोक 'आम्ही टॅक्स भरतो मग आमच्या पैशानी का?' हा प्रश्न जर विचारतील तर ते चुक का असे मनात आले.
मयेकर, त्यांना काही द्या वा देऊ नका असे मी तरी म्हटले नाही बरं का. वर बरेचजण 'सारे लोक सारखाच कर भरतात' अशा प्रकारचे बोलत होते म्हणुन विचारले.
ही आश्वासने म्हणजे थुकपत्ती
ही आश्वासने म्हणजे थुकपत्ती असते खास करून नोकरीचे. बाकी नोकर्या गुणवत्तेवरच द्याव्यात. सरकारने नोकरभरती बंद (अपवाद वगळता) हि घोषणा गेल्याच महिन्यात कली आहे. कितीतरी प्रकल्पग्रस्त, धारण ग्रस्त नोकरीची आश्वासने घेवून वर्षानुवर्षे खेटे मारत असतात एवढेच काय स्पर्धा परीक्षा आणि सोपस्कार पास झाले पण वर्ष लोटून पण पोस्टिंग नाही असे पण घडते (काल परवा मी मराठीवर बातमी होती). प्रकरण निवळाव म्हणून हि आश्वासने मात्र आर्थिक मदत करायला काही हरकत नसावी. मात्र गोरगरीब लोकांना चार पैश्याची मदत जाहीर झाली तरी उपरोधिक टोमणे चालू व्हावेत याला कारण पोटदुखीच आहे .
टॅक्स कोण किती भरतेय यावर का
टॅक्स कोण किती भरतेय यावर का चर्चा वळते आहे. राष्ट्रीय संपत्तीवर सर्वांचाच समान हक्क आहे. पैकी कोणी जास्त कमावणारा टॅक्स जास्त भरत असतो यामागे आणखी एक कारण बघितल्यास तो जास्त कमावतोय म्हणजे त्यासाठी तो नॅशनल रिसोर्सेस जास्त वापरतोय. (हे लॉजिक गंडलेलेही असू शकते)
पण ईथे जर कोणी या पैसेवाटपावर आक्षेप घेत असेल तर त्याला संवेदनाशून्य ठरवायची घाई का?
एखादा बॉम्बब्लास्टमध्ये नाहक बळी गेलेला, वा दुष्काळाचा बळी ठरलेला यांची तुलना विषारी दारू पिऊन गेलेल्यांशी का करू नये? नगाला नग तसे माणसाला माणूस का म्हणून मोजायचे? वर उल्लेखलेल्या सर्व प्रकारच्या बळींना एकाच पारड्यात तोलून समान सहानुभुती का दाखवायची? एवढा साधा सरळ प्रश्न होता..
किंबहुना माझा स्वताचाही या पैसेवाटपावर आक्षेप आहे असे नाही, कारण ते त्यांच्या कुटुंबीयांना मिळतात.
जर ती गेलेली व्यक्ती कुटुंबाचा आधार असेल तर ते योग्यच आहे.
आणि आधार नसेल, उलट आजवर बायकोच्या कमाईवर जगणारी आणि पोराच्या तोंडचा घास खेचून पिणारी असेल, तर त्याच्या कुटुंबियांनी आजवर जे भोगले त्याची काहीतरी भरपाई तरी झाली असे वाटते.
दारु (विषारी) पिउन मेलेल्या
दारु (विषारी) पिउन मेलेल्या लोकांना मदत जाहिर केली याचे समर्थन कसे होउ शकते हे समजण्यापलिकडचे आहे. . हे लोजिक पटतहि नाहि आणी समजतहि नाहि. यात पोटदुखीचा काय संबंध आहे हे हि नाहि समजले.
पैकी कोणी जास्त कमावणारा
पैकी कोणी जास्त कमावणारा टॅक्स जास्त भरत असतो यामागे आणखी एक कारण बघितल्यास तो जास्त कमावतोय म्हणजे त्यासाठी तो नॅशनल रिसोर्सेस जास्त वापरतोय. (हे लॉजिक गंडलेलेही असू शकते).
त्याला संधी मिळाली हे पण असू शकते. सर्वांना समान संधी (बेसिक गोष्टी , शिक्षण , आरोग्य , किमान निवारा , रोजगराची संधी ) मिळवून देण्यासारखे वातावरण बनवणे हे सरकारचे काम आहे. मरण पावलेले १०० लोक ज्या स्तरातून येतात त्यांना यातल काहीच मिळालेलं नसत.
साकल्य, मला वाटते वर आक्षेप
साकल्य,
मला वाटते वर आक्षेप घ्यायचा कोणाला अधिकार आहे का नाही यावरच्या चर्चेत तो टॅक्सचा मुद्दा आला आहे.
त्या मरण पावलेल्या लोकांना संधी मिळाली नाही यात सरकारचा दोष आहे तर जे असेच संधी न मिळालेले दारू न पिता जगत आहेत त्यांनाही मदतीची गरज आहेच. आपल्याकडे आरक्षण याच मुद्द्यावर सुरू झाले आहे. इथे दारू पिऊन मरण्या न मरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
Sakalya+1 When 'A' is earning
Sakalya+1
When 'A' is earning income enough to be taxable and 'B' does not it means 'A' has reaped more benefits than B from the state infrastructure.
<दारु (विषारी) पिउन मेलेल्या लोकांना मदत जाहिर केली> those who consumed the liquour are dead. It is their family which is being supported. There isd no prohibition on liquor. The state failed in its duty towards these people when such spurious liquor was bweing sold under its watch.
गोर गरिब लोकांचा तलतलाट घेवु
गोर गरिब लोकांचा तलतलाट घेवु नका,त्यान्ना लाखभर रुपये मिलतील तुम्ही जलू नका. ऊच्च शिक्षित तुम्ही लोक, गरिबाचे ताटातिल घास मोजू नका. मेले ते लोक ह्याच मातीतील होते,"मन्गोलिया"तील नव्हते.मागच्य्या माहिन्यात "मन्गोलिया"तील गरिबानसाठी 1000 कोटी मोदी साहेब देवुन आले. तुमच्या टैक्स पेइंग च्य्या गोषटी जरा त्याना सांगाना.
those who consumed the
those who consumed the liquour are dead. It is their family which is being supported. There isd no prohibition on liquor. The state failed in its duty towards these people when such spurious liquor was bweing sold under its watch. >>>>>
मयेकर तुम्हाला मुद्दाच समजला नसावा.
सरकार शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात अपयशी आहे, स्वछ हवा देण्यात अपयशी आहे, अपघात होउ अयेत असे रस्ते देण्यात अपयशी आहे, शेतकर्यांना शेतीचा योग्य भाव देण्यात अपयशी आहे, रस्त्यावर भिकारी आहेत त्यांना दोन वेळची भाकरी देण्यात अपयशी आहे, उन्हाळ्यात उष्माघाताने लोक मरतात, थंडित गारव्याने- त्यांना निवारा देण्यात अपयशी आहे. सुरक्षा देण्यात अपयशी आहे. सरकारच्या अपयशामुळे यात रोज हजारो लोक मरत आहेत . भुकंप, पुर, यात हजारो लोक मरतात. ७२% नवजात बालके कुपोषित आहेत. रोज ३००० बालके कुपोषणाने मरतात. १६ मुले दररोज अपघातात मरतात. यांच्या वारसांना कधी हो मिळणार एक लाख रुपये आणी नोकरी ?
पाटीलबाबा, मंगोलियात पैसे देणारे सरकार आणी इथे पैसे देणारे सरकार एकच आहे. त्यांना जरा शेतकर्यांना फक्त जनावरांसाठी चारा द्यायला सांगा, सामान्य माणसासाठी service tax वाढवु नका म्हणुन सांगा. आरोग्य आणी शिक्षणाचे बजेट कमी करु नका म्हणुनही सागा , दारुड्यांना आणी मंगोलियाला पैसे वाटत फिरण्यापेक्षा!
ऋन्मेष, चर्चा 'कोण किती कर
ऋन्मेष,
चर्चा 'कोण किती कर भरतो' ह्यावर होऊ नये ह्या तुमच्या मताशी सहमत असलो तरीही तुमच्याच मूळ लेखात खालील वाक्य असल्यामुळे तसे होत आहे हे कृपया ध्यानात घ्यावेतः
>>>सरकारचा पैसा म्हणजे आपलाच पैसा. आपल्याच टॅक्समधून जमा झालेला पैसा.<<<
ऋन्मेष,
मला असे वाटते की झालेल्या घटनेबाबत तुमच्या मनात नानाविध मते तयार झाली व ती तुम्ही 'मित्रांच्या गप्पा' ह्या स्वरुपात सादर केलीत. हे असे नसल्यास क्षमा करा.
झालेल्या घटनेबद्दल प्रत्येकाने आपापले प्रामाणिक मत बनवलेले उत्तम!
भारतात माणसाचे जीवन सर्वात स्वस्त आहे आणि माणसाला कोणत्याही पक्षाच्या सरकारतर्फे देऊ केली गेलेली जीवनशैली सुमार आहे. ह्याशिवाय भारतियांना कोणत्याही मूल्यांचा आदर करण्याची सवय वैयक्तीक जीवनात नाही आणि देश, पक्ष, सरकार, यंत्रणा, माणसे ह्याबद्दल काहीही आदरभाव त्यांच्या मनात नाही.
येथे असेच होत राहणार. मदत मात्र त्यांना घसघशीत मिळणार ज्यांच्याबाजूने मिडिया खंबीरपणे उभी आहे.
मी माणुस१ ह्यांच्या लेटेस्ट प्रतिसादाशी सहमत आहे.
विषारी दारू पिऊन माणसे मेली ह्या दुर्घटनेची जबाबदारी लोकसंख्येवर नियंत्रण न आणणार्या, सत्तेसाठी काहीही करणार्या आणि फालतू सरकार चालवणार्या माणसांची आहे. हे विधान कोणत्याही पक्षाच्या सरकारबाबत आहे.
ती माणसे दारू रोजच पीत असतील. त्यांच्या कुटुंबियांना केलेली मदत 'मुद्दा कितना उछाला' वाल्या मिडियाशी निगडीत असावी असे ठामपणे वाटते. मदत मिळू नये असे नाही पण मदत केली म्हणजे सरकार खडबडून जागे वगैरे झाले आहे असे मानणे भ्रम ठरेल. हीच घटना उद्या पुन्हा घडू शकेल. किंबहुना, रोज विविध ठिकाणी एखाददोन माणसे अश्याच प्रकारे मरत असली तर समजतही नसेल.
(कोणत्याही पक्षाच्या) बेजबाबदार सरकारचा म्या पामराकडून तीव्र निषेध!
-'बेफिकीर'!
मिडीयाने हा मुद्दा नंतर
मिडीयाने हा मुद्दा नंतर उचलला. माणसे मरत होती त्यापेक्षा मीडियाला जास्त महत्व मुंबईतल्या साचलेल्या पाण्याचे आणि नोकरदारवर्गाच्या उडणार्या त्रेधेचे होते. दुसर्या दिवशी मृतांचा आकडा पन्नाशी ओलांडून ३ अंकात जावू लागला तेव्हा मिडीयाने हा मुद्दा उचलला. सरकारी अनास्था तर पाचवीला पुजलेली आहेच.
नेमके हेच म्हणायचे होते
नेमके हेच म्हणायचे होते
मिडिया जो मुद्दा उचलून धरेल तो महत्त्वाचा ठरत आहे. हे दुर्दैवी आहे.
साकल्य - ह्या प्रतिसादातील (मला समजलेल्या) भावनेशी सहमत!
(कोणत्याही पक्षाच्या)
(कोणत्याही पक्षाच्या) बेजबाबदार सरकारचा म्या पामराकडून तीव्र निषेध! +१
बेफिकीर, लेखातील उलटसुलट
बेफिकीर,
लेखातील उलटसुलट विभिन्न मते चर्चेतीलच आहेत.
सरतेशेवटी न राहवल्याने मी ऋन्मेष देखील चर्चेत उतरलो >>> या वाक्याची पुढची आणि प्रतिसादांमध्ये जे काही लिहिले असेल ती माझी मते आहेत.
अर्थात चर्चेचा हा विषय निघायच्या आधी ती मदत देणे योग्य आहे की नाही असा विचारही माझा डोक्यात शिवला नव्हता.
माझे म्हणाल तर कोणीतरी दारू पिऊन वा कुठल्यातरी व्यसनाने मेला हे ऐकूनच मी अस्वस्थ होतो. पुढे त्यांना मदत करा न करा वगैरे हे माझ्यासाठी गौण ठरते.
बरेच लोक पुन्हा पुन्हा असा मुद्दा उपस्थित करत आहेत की ते दारूने नाही तर विषारी दारूने मेले.
अरे पण कोणी विषारी दारू पिऊनच का मरते? विषारी डाळभात वा विषारी भाजी-चपाती खाऊन का नाही मरत? बळी त्यांचा दारूनेच घेतला आहे. विषारी दारूने मरणे हा दारू पिऊन मरणाच्या कैक प्रकारातील एक प्रकार आहे बस्स!
सरकारने पैसे द्यावे की नाही
सरकारने पैसे द्यावे की नाही याबद्दल मला मत नाही कारण मी कर देत नाही.
पण एकाच फटक्यात यमसदनी पोहोचवणारी दारू बनवली तर तो मात्र गुन्हा आहे.
पण या कायद्याचे पालन न करणार्या सगळ्यांना पकडून शिक्षा करण्यासाठी लागणारे, सतत नजर ठेवणारे मनुष्यबळ आहे का सरकारकडे? कसे असेल?
निदान आहे ते मनुष्यबळ तरी व्यवस्थित कां करतात का? लाच तर घेत नाहीत ना? हे तरी बघणारे कुणि आहेत का? नि या सर्व मनुष्यबळापेक्षा विषारी दारू बनवणारे लोकच जर संख्येने जास्त असतील, तर काय करणार? निदान लोक मेल्यावर तरी चौकशी करून विषारी दारू करून विकणार्याला पकडून मनुष्यहत्त्येच्या गुन्ह्याला असते तेव्हढी जास्तीत जास्त शिक्षा दिली तरी जे मेले त्यांच्यासाठी शोक करणार्यांना दिलासा मिळेल. मग थोड्या पैशासाठी असले धंदे करताना इतर जण विचार करतील.
अशी फक्त आशा बाळगायची. सव्वाशे कोटी लोक, काय कराल ते अयशस्वीच होणार.
नुसते कायदे करून लोकांना अक्कल कशी येईल? नि तीच नसेल तर लोकशाही ची काय गत?
ही विषारी दारु गुजरातमधुन
ही विषारी दारु गुजरातमधुन मुंबईत आणण्यासाठी लिटरमागे १० रु. लाच दिली जात होती म्हणे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/mumbai-hooch-m...
Pages