Submitted by चाऊ on 18 June, 2015 - 11:22
चष्म्याच्या काचांवर तुषारांची रांगोळी
ठीबकत टपटपती आनंदी पागोळी
आठवते खंडाळ्याच्या द-या डोंगरातलं धुकं
तन मन ओलं चिंब, नाही काही सुकं
सावरावा कसा तोल, वाट ही निसरडी
घसरण्यातही मौज होती, हो ना? कधी काळी!
थरथरत्या ओल्या वा-यात मन शोधते उब
नसेल जवळ कुणी, तर नुसतीच स्वप्नांची डूब
सगळं कस सावळ सुंदर दाटून आलेलं
काजळ काळ्या नेत्रासारखी बदरा काळी काळी
जिवन घेऊन येतोस आणी आणतोसही सल
निरोपाचा मेघ माझा आता कधी येईल?
आतुरलेलं मन माझं, उगाच गाणं गुणगुणतं
मन मोर नाचत म्हणतो आली बरखा आली
चष्म्याच्या काचांवर तुषारांची रांगोळी
ठीबकत टपटपती आनंदी पागोळी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा