डोसा भाजी (हॉटेलसारखी)

Submitted by देवीका on 18 June, 2015 - 03:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ उकडलेले बटाटे हातनेच जरासे कुस्करलेले(मध्यम आकाराचे); ज्यास्त गिच उकडवू नका,
पाव चमचा तांदूळ पीठी,
फोडणी सामानः
उदीद डाळ १ चमचा भिजवून, निथळून,
चणा डाळ १ चमचा भिजवून निथळून,
भरपूरसा कडीपत्ता,
राई पाव चमचा,
हिंग चिमटीभर,
पाव चमचा साखर,
उभा पातळ कापलेला अर्धा वाटी कांदा,
चिमटीभर ठेचलेलं आलं,
४-५ लाल सुकलेल्या मिरच्या,
३-४ हिरच्या मिरच्या,
पाव चमचा हळद,
मीठ चवीला

क्रमवार पाककृती: 

१) बटाटे हातानेच थोडेसे कुस्करावे.
चवीष्ट भाजीसाठी फोडणी ह्याच क्रमाने करावी

२) सढळ हाताने तेल पातेलात घातलं आणि तापलं की आधी ठेचलेलं आलं घालाव. नंतर दोन मिनिटाने काढावे व फेकावे. Happy
३) मग राई तडतडावी. तडतडली पाहिजे. मग हिंग घालावे.
४) आता भिजलेल्या डाळी घालाव्या. त्या भाजल्या की कांदा घालावा, मग कडीपत्ता, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या.
५) चिमटीभर मीठ शिवरून वरील मिश्रण परतावे.
६) खमंग वास आला पाहिजे.
७)आता पीठी घालावी. जरा तेलात परतली की हळद घालावी. व साखर घालावी.
८) मग आधणाचे कडकडीत पाणी ओतावे. लगेच घोटावे. झाकण एक्-दोन मिनीटे ठेवून मग पुन्हा परतावे.
९) आता तेल सुटले असेल तर बटाटे परतावे मोठ्या आचेवर. उरलेले मीठ घालून ३-४ मिनिटे सतत परतावे.
आणि शेवटची दोन-तीन मिनिटे झाकण ठेवावे.
वरून कोंथीबीर घालावी.
झाली डोसा भाजी.
हॉटेलात तांदूळाची पीठी ज्यास्त घालतात. त्यामुळे बटाटा गिच न शिजता छान रहातो पण तो एक चिकटपणा येतो.

अधिक टिपा: 

पाणी बेताचे ओता. अंदाज घेवून. एकदम पातळ नाही करायचे.
बटाट्याच्या फोडी दिसल्या पाहिजेत/ नाहीत असे कुस्करावे. Happy
अम्मा साजूक तूपात करते. चवीष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users