पंढरीचे भूत मोठे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

यूट्युबावर मालकंस-चंद्रकंस अश्या वाटेनं भटकताना एक आगळी क्लिप सापडली - मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या रंजनी आणि गायत्री या भगिनीद्वयीने गायलेल्या 'पंढरीचे भूत मोठे' या अभंगाची. हिराबाई बडोदेकर-सरस्वतीबाई राणे या बहिणी जश्या हिंदुस्तानी संगीतात तश्या रंजनी-गायत्री कर्नाटक संगीतात नावाजल्या जातात. हिंदुस्तानी संगीतातल्या चंद्रकंसात बांधलेला हा मराठी अभंग या दोघींनी ऐकण्याजोगा गायलाय.

[video:"http://www.youtube.com/watch?v=ssRRqdXlcAo"]

मूळ अभंग :
पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||
बहू घेतलीच राना | बघ हे वेडे होय मना ||
तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी ||
तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||

तुकारामांच्या लोकप्रिय संगीतबद्ध अभंगांपैकी 'जन विजन झाले आम्हां' हा अजून एक अभंग चंद्रकंसात बांधलाय. जनाबाईंचा 'संतभार पंढरीत' हा अभंग जितेंद्र अभिषेक्यांनी चंद्रकंसातच बांधलाय. आशा भोसल्यांच्या गळ्यातून तर दोन जीवघेणे चंद्रकंस निघालेत - 'देवबाप्पा' चित्रपटातला पुलंनी संगीतबद्ध केलेला 'करू देत शृंगार' हा पहिला आणि 'पाठलाग' चित्रपटातला दत्ता डावजेकरांनी चाल दिलेला 'या डोळ्यांची दोन पाखरे' हा दुसरा!

महेश काळ्यांनी गायलेला 'संतभार पंढरीत' अभंग :
[video:"http://www.youtube.com/watch?v=NlP3OjkqVX4"]

'सा रे ग म प' स्पर्धेत एका स्पर्धिकेने गायलेलं 'या डोळ्यांची दोन पाखरे' :
[video:"http://www.youtube.com/watch?v=s6oCQx1DjGk"]

आशा भोसल्यांच्या आवाजातलं मुळातलं 'या डोळ्यांची दोन पाखरे'

प्रकार: 

अर्रे वा!
फ, तुझ्या रंगीबेरंगीवर लक्ष ठेवायला हवं यापुढे. Happy
(आणि आठवणीने हेडफोन्स आणायला हवेत उद्या ऑफिसला येताना.)

या दोन बहिणी ख्रच अफलातून गातात राव. युट्यूब वरच काही क्लिप्स पाहिल्या/ ऐकल्या आहेत त्यांच्या.

परागकण

वणक्कम!
नड्री तंबी!
अप्रतीम गायले सर्वांनी!

फ, भारीच! Happy
दुसरी ओळ 'बहु खेचरीचे रान | जाता वेडे होय मन' अशी आहे.
(या गायनात 'बघ हे वेडे होय मन' असे गायले आहे.)
चू.भू.दे.घे.

छान रे फ. कंकणा बॅनर्जी या गायिकेने गायलेला चंद्रकंस माझ्याकडे आहे. खूपच छान गायलाय तो. मला वाटते लतानेपण,
छन छनन छन, जा रे ओ पवन
दूर देस ले जा संदेस, जहा मेरे सजन
असे गाणे गायलेय. ते छान आहे, हे वेगळे लिहायला हवे का ?

पंढरीचे भूत मोठे छान आहे..
पण ती महेश काळे ची क्लिप विनोदी दिसते आहे रे कारण audio video मागे पुढे होत आहे...त्यामूळे हावभाव एक अन शब्द एक अस होतय..

पंढरीचे भूत मोठे सही गायलंय रे त्यांनी.. Happy
पुन्हा एकदा ऐकतो बघ आता.

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

फ... बहोत खूब. 'या डोळ्यांची दोन पाखरे' सारखं चंद्रकंसासाठी दुसरं चपखल उदाहरण नाही. भन्नट गायल्यात दोघी. अगदी कर्नाटकी स्टाईलमधे पंढरीचे मधे 'ढ' वर आलेला जोर... मजा आया. काही ठिकाणी उच्चारांची गंमत झालीये... पण 'तेथे जाऊ नका कोणी' ची आळवणी निव्वळ मर्‍हाटमोळी!

स्वाती म्हणतेय तसं लक्ष ठेउन असायला हवं तुझ्या रंगेबीरंगीवर... असं रागांवर ठरवून मालिका कर रे. मजा येईल.

चंद्रकंस तो ही कर्नाटकी ढंगाने म्हटलेला............व्वा.....मजा आया. अगदी दाद म्हणते तसं उच्चारातील गंमतीसकट मजा आया.
फ तुम्ही खरंच रागांवर आधारित मालिका लिहा.......येथेही दादला(नवरा नव्हे........दाद हीस..) मोदक.