अवघड झाले

Submitted by रोहितकुलकर्णी on 11 June, 2015 - 22:28

वाट पाहणे अवघड झाले
काठ शोधणे अवघड झाले

डोळ्यांमधले सत्व हरवले
सुख भोगणे अवघड झाले

कान झाकूनी गाव झोपले
हाक पोचणे अवघड झाले

मंदिर मशीद फोडून आलो
भीक मोजणे अवघड झाले

आयुष्याने कर्ज काढले
प्राण सोडणे अवघड झाले

- रोहित कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कान झाकूनी गाव झोपले
हाक पोचणे अवघड झाले

आयुष्याने कर्ज काढले
प्राण सोडणे अवघड झाले >>> जास्त आवडले

आयुष्याने कर्ज काढले....
प्राण सोडणे अवघड झाले >>>>

क्या ब्बात! !!!!