तडका - कुकर्माचे दणके,...

Submitted by vishal maske on 11 June, 2015 - 11:04

कुकर्माचे दणके,...

विश्वास टाकलेले माणसंच
घोटाळ्यांनी बाटले आहेत
उतले आहेत-मातले आहेत
कुणी विवेकही कातले आहेत

उतलेल्या अन् मातलेल्यांचे
वारंवार जणू फणके असतात
मात्र ज्याच्या-त्याच्या कुकर्माचे
ज्याला-त्यालाच दणके असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या घरी बायको तुम्हाला महिन्यांपासून रोज तडका दाल खायला घालते का?
की घालते म्हणून ईथे रतीब घालून सूड ऊगवला जातोये.

अजीर्ण झालं आहे मायबोलीवर, अजून तडका वाढाल तर सगळंच बाहेर येईल....आवरा आता.

@ हुप्पाहुय्या,

मस्के यांच्या यमक जुळविण्यात व्याकरणाच्या काही चूका होतात हे खरे आहे व त्याबद्दल मी त्यांना व्याकरण व शुद्धलेखन न चुकविता देखील यमक कसे जुळविता येईल याबद्दल एका कवितेवरील प्रतिसादात सल्लाही दिला होता. अर्थात असे असले तरीही त्यांनी त्यांच्या कवितेतून अथवा प्रतिसादांतून इतर सदस्यांना कधी दुखावल्याचे निदर्शनास आले नाही. तरीही तुम्ही त्यांना वैयक्तिक दुखावणारे प्रतिसाद देऊ नयेत असा माझा सल्ला आहे. हा सल्ला न मानण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच परंतु इथे http://www.maayboli.com/node/53684 मायबोलीकर परस्परांमधील विखार कमी व्हावा याकरिता प्रयत्न करीत असताना मला तुम्हाला हे सुचवावंसं वाटलं.

हूप्पा हूय्याजी

तुमची प्रसिध्दी मिळविण्यासाठी जी काही तळमळ चालु आहे ती मी समजु शकतो,त्यासाठी तुम्ही निशंक प्रयत्न करा,परंतु इतरांशी बोलताना चांगली भाषा वापरा,तुम्हाला त्याचा फायदा हेईल,
आणि माझी काळजी करू नका,कुठे कधी काय करायचं याची मला अक्कल आहे,आशा आहे तुमची आक्कलही विवेकशील करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल,
आणि हा तुम्हाला प्रेमळ सल्ला देत आहे आणि तुम्ही माझ्या विरोधात जाऊनही मी तुमच्या विरोधात बोलत नाही,याचा अर्थ असा नाही की मला विरोध करता येत नाही,
मी जर तुमच्या विरोधात जायचे ठरवले तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकेल अशा प्रकारचा विरोधही मी करू शकतो,
परंतु कोणाचेही कसल्याही प्रकारचे नुकसाण करण्यीची माझी इच्छा नाही,
तुम्हाला जर या ठिकाणी कोणाचं साहित्य आवडत नसेल तर तुम्ही ते वाचायचं टाळू शकता,परंतु कोणालाही विरोध करण्याच्या नादामध्ये स्वत:चे वाटोळे होईल असे वर्तन तुम्ही करून घेऊ नये,अशी तुम्हाला पुन:श्च सुचना आहे,...

धन्यवाद.