मंत्रोच्चार आणि पाउस

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 8 June, 2015 - 09:47

मंत्रोच्चाराने पाउस पडू शकतो.
- नितिन गडकरी

================

हे राम. !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मस्त विषय, वाचतोय.
माऊसचा स्क्रोल मोडला इतका मोठा लेख वाचता वाचता.
लेख क्रमश. आहे का??

मन्त्रोच्चाराचे माहीत नाही पण मल्हार राग आळवला की पाऊस पडतो असे म्हणतात. जुन्या तानसेन सिनेमात सहगल साठी ताना-रीरी या दोघी बहिणी पाऊस पडावा म्हणून मल्हार आळवतात. सहगलने त्या तानसेन सिनेमात तानसेनचीच भूमिका केली होती.
अकबर बादशहा, तानसेनला दीप राग गायला सान्गतो. दरबारातले सर्व दिवे पेटतात पण तानसेनच्या अन्गाची लाही लाही होते, ती शमवायला तानसेन बाहेर पडतो आणी या दोघी बहिणी त्याला विहीरीवर भेटतात. सर्व काही समजल्यावर त्या हा राग आळवुन पाऊस पाडतात.

गाणे = दिया जलावो- दीप राग

बरसो रे, बरसो रे- मल्हार राग

मंत्र म्हणणार्यांना विदर्भ राजस्थानचे वाळवंट इ. ठिकाणी घेऊन जावा
असेही यंदांच्या सरकारचे कर्तृत्व नसल्याने असली थेरं सुचणारच Wink

>>> बहुधा 'अजितदादाय नम:' असा मंत्र असावा! <<<< Lol
नाही हो... या मन्त्राचे उच्चारण जरी केले तरी तिकडे सेनामनसेकॉन्गीसमाजवादीब्रिगेडीकम्युनिस्ट अशा सगळ्यासगळ्यां बीजेपीतरांच्या पोटात गोळा येतो, पत्रकारांना चेव चढतो, वागळेचा आवाज टीपेला पोहोचून त्यापलिकडे चिरकतो. हा मन्त्र नक्कीच पावसाकरताचा नाही!

लिंबु, सेनामनसेकॉन्गीसमाजवादीब्रिगेडीकम्युनिस्ट अशा सगळ्यासगळ्यां बीजेपीतरांच्या पोटात गोळा येतो, तो मंत्र वेगळा आहे, "शरदाय नमो" असा तो मंत्र आहे. १४ फेब्रुवारीला बारामतीमध्ये त्या मंत्राचा जागर झाला होता हे आपल्याला ठाउक असेलच. Wink

डॉक्टर साहेब गडकरींचे वक्तव्य वाचून असे वाटेल कि काय ह्या पदावरचा माणूस बालिश बडबड करतोय मात्र ते तसे नाही आहे . गडकरी त्यांचे काम चोख करतायत.

समाज हा जेवढा देवभोळा, अंधश्रद्धाळू राहील त्यातच ज्यांना फायदा वाटतो ते जनतेला अशीच धार्मिक गुंगी देवून स्वताचा फायदा लाटत असतात . त्यातूनच निरनिराळ्या शान्त्या, हे पठन, ते पठन ह्याचा नामस्मरण करा त्याचे नामस्मरण करा अश्या क्लुप्त्या लढवल्या जातात नि मूर्ख समाज त्याला बळी पडतो. दुनिया झुकती ही झुकानेवाला चाहिये हे खरच . ह्या समाजाला अंधश्रद्धे पासून दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे दाभोलकर, पानसरे पचत नाहीत तर स्वताच्या फायद्यासाठी आपल्याच देशबांधवांना अज्ञानाच्या खाईत लोटून स्वताचा स्वार्थ साधणारे महाभागच पचतात.

खालील लिंक मधील बातमी वाचा देशाचा एक मंत्री म्हणतोय मंत्रोच्चाराने पाऊस पडतो. तर मग महाराष्ट्र सरकार १० कोटी खर्च करून पाऊस का पाडतेय चार पुजार्यांना पकडून आणून होवून जावू द्या मंत्र ३० ते चाळीस हजारात काम होईल.

राज्यात कृत्रिम पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे यंदाचा मान्सून उशिरा येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जाऊ नयेत यासाठी जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती महसूल तथा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5461228005905242945&Sectio...

>>मंत्रोच्चाराने पाउस पडू शकतो.
- नितिन गडकरी <<

बातमी सनसनाटी आहे; पण सगळा काँटेक्स्ट दिला असता तर समजायला बरं पडलं असतं...

अजीतदादाचा मन्त्र सोडुन बाकी कुठला असल्यास तो लिहावा, म्हणून बघेन.:फिदी: निरथर्क हिन्दी गाणी म्हणली जातातच, मन्त्र म्हणून बघते.:फिदी:

हे साहेब ट्रान्सपोर्ट मध्ये होते न? एकदम मंत्र तंत्रात कुठे एकदम पोचलेत Uhoh ??

पगारे, एवढे नाहीत हो भोळे आपले लोक्स! त्यांना समजत कोण किती पाण्यात आहे. साहेब तसे फेमसच आहेत वक्तव्यांबाबत! इतक मनावर नका घेऊ.

हो. गणपतीला दूध पाजलं, त्यावेळचे मुख्यमंत्रीही चक्क ब्रिगेडीकी काय म्हणतात त्यांच्यातलेच होते ना?