मंत्रोच्चारात सामर्थ्य असते का?

Submitted by परमात्मा on 26 April, 2012 - 06:31

भारतीय दर्शने आणि तत्वज्ञान मंत्रमहात्म्याने खचाखच भरलेली आहेत .मंत्रोच्चार हा कर्मकांडांचा कणा आहे असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही. मंत्रशक्तीची भलामण करण्यासाठी खालील स्पष्टीकरणे दिली जातात.

1)मंत्रोच्चाराने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते.
2) मंत्रोच्चारातील ध्वनीस्पंदने दुर अंतरावर सुष्ट परीणाम घडवुन आणतात.
3) विशिष्ट देवतेचे विशिष्ट मंत्र असतात त्यांचा ठरावीक वेळेला जप केल्यास वैयक्तीक पातळीवर सुखशांती लाभते.
4) मंत्रशक्तीने पाऊस पाडता येतो, दुष्काळ दुर होतो ,मृत्युवर विजय मिळवता येतो.
5)गुरुने दिलेला गुरुमंत्र मोक्षप्राप्ती मिळवुन देतो.
6) विशिष्ट मंत्राची ध्वनीफीत मंद आवाजात घरात लावावी भूते पिशाच्चे पळुन जातात .
मंत्रोच्चाराचे सामर्थ्य ठसविण्यासाठी वरील स्पष्टीकरणे कमीअधिक प्रमाणात नेहमी दिली जातात.इथे एक गोष्ट लक्षात येईल कि वरील स्पष्टीकरणे बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर वा शास्त्रिय कसोट्यांवर फोल ठरतात कारण त्या स्पष्टीकरणांचा कार्यकारणभाव सांगितला जात नाही किंवा सांगता येत नसावा.यावरुन असे लक्षात येईल की शास्त्रिय दृष्टीकोनातुन मंत्रवाद खोटा ठरतो. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव देता येत नाही असा विश्वास असणारे मात्र मंत्रशक्तीवर विश्वास ठेवतातच .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव चुकले... मंत्रोच्च्चार सत्य की थोतांड असे नाव द्यायला हवे.. किमान ५०० तरी प्रतिसाद येतील.

जागोप्यारे हा घे मंत्र .
कल्याणमस्तु सुखमस्तु अभिवृद्धिरस्तु दीर्घायुरस्तु कुलगोत्रधनानि सदा सन्तु

>>> मंत्रोच्चाराची भ्रामकता... <<<
तसे वाटणे सहज शक्य आहे! जसे की अक्षरशत्रून्ना काला अक्षर म्हैंस बराबर अस्ते, तसेच अश्रद्धाला मन्त्रोच्चार वगैरे काय कळणार? पण ते जौदे.
पूर्वापार, भकारी वा अन्य शिव्या देखिल अगणित वेळेस उच्चारल्या गेल्या आहेत, तर त्यान्चेमधे देखिल अशी काही मन्त्रोच्चारान्सारखी ताकद अस्ते का हो? की ज्या उच्चारल्याबरोब्बर समोरच्याला चीड/संताप/उद्वेग/राग इत्यादी इत्यादी येईल? केलय का काही संशोधन वगैरे यावर? Wink
नसेल तर जरुर करा, कदाचित शिव्यान्मधे देखिल तुम्हाला मन्त्रसामर्थ्य जाणवू शकेल.
अन समजा नाहीच जाणवले, म्हणजे कुणी दिलेल्या शिव्या ऐकुन चीड/संताप/उद्वेग/राग वगैरे आलाच नाही, तर अधलीमधली "भ्रामक अवडम्बर कर्मकाण्डे" न करताच तुम्ही सन्त पदाला पोचला असे बाकिचे समजतील, (त्यातले काही नाठाळ तुम्हाला कोडगाही समजतील, पण सन्तपदाला पोहोचलेले तुम्ही तिकडे दुर्लक्ष करू शकालच, नै का?) Proud
तेव्हा कुठे या भ्रामक वगैरे मन्त्रान्च्या नादाला लागता? शिल्लक आहेतच कोण हल्ली मन्त्रबिन्त्र म्हणणारे? नै का?
मन्त्रान्च्या मागे कुठे लागताय? त्यापेक्षा जे सर्वकाळ सर्वजगात सर्वाधिक जनान्कडून उच्चारण चालते, त्या विविध भाषाप्रसन्गातल्या शिव्यान्च्या लाखोलीचा अभ्यास करा बघु! Proud

नक्कीच असते पण प्रचितीचे असे क्षण लाभणे खूप दुर्मिळ गोष्ट आहे. मला दीर्घ ओकांर म्हंटल्यामुळे शरिरात ज्या लहरी तयार होतात त्या फार आवडतात. त्यानी लगेच आपल्या सूक्ष्म नसा मोकळ्या होतात. छातिच्या मधोमध जेंव्हा ओंकाराचा नाद घुमतो तेंव्हा मन अगदी प्रसन्न होत जात. ती प्रसन्नता अगदी अगदी वेगळी असते. थकल्याभागल्यावर रात्री नऊला घरी येउन स्नान करुन १० वाजता जेंव्हा मी ओकांर म्हणतो तेंव्हा मला रोजच बरे वाटते. एक ताण निघून गेल्यासारखा वाटतो.

आपला जो शांतीपाठ आहे असतो मा सत् गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽमृतं गमय .. ओम शांती शांती' तोही मला फार फार प्रभावी वाटतो. खरच हा मंत्र म्हंटला की मला आपण शांत झाल्यासारखे वाटते. कित्येकदा आपल्या पदरी पराभव येतो, दु:ख येत, मानसिक धैर्य खचंत, आपली माणसे दुरावतात-- अशा वेळी शांतीपाठ मी केला आहे आणि मला त्या त्या वेळी ह्या मंत्राची ताकद कळलेली आहे.

आमच्या शेजारी जोशी काकू आहेत. माझ्यासाठी त्या दुर्गा भागवत आहेत. त्या आता ८९ वर्षाच्या झाल्या आहेत. त्यांना त्यांच्या मृत्युची जाणिव आहे. मी त्यांना भारतभेटीत वर्षातून एकदाच भेटतो. त्या जेंव्हा मंत्र पुष्पांजली समर्पयाणी म्हणतात तेंव्हा मला त्यांची ती समर्पाणाची भावाना आतून बाहेरुन स्पर्ष करते. आणि त्या मंत्रातून त्या किती शुद्ध, पवित्र, स्थिर होत आहेत असे सारखे सारखे जाणवत राहते.

मला वाटत आपण इतके सुखी असतो किंवा दुखाची इतकी सवय झालेली असते किंवा आपले दु:ख इतके छोटे असते की ह्या मंत्रांची ताकद कळायला ती ती वेळ यावीच लागते.

आहे मंत्रोच्चारात सामर्थ्य निश्चितच आहे. फरक एवढाच की विशुद्ध आणी लोकहितासाठी केलेल्या जप आणी मंत्रात शक्ती आहे, कुणाचे वाईट व्हावे या हेतूने केलेल्या कुठल्याही गोष्टीत ते आढळणार नाही.

दुसरे असे की मन त्यावेळी परमेश्वरापाशी एकाग्र करावे लागते. नाहीतर पूजा करतांनासुद्धा घरातली इतर मंडळी काय उपद्व्याप करतायत, शेजारचे कोण आले गेले, फोनवर कोण होते अशा निरर्थक गोष्टींमध्ये लक्ष घालणारे लोक आहेत. मंत्रोच्चाराने हवेतील वाईट शक्ती दूर होतात, वातावरण आणी मन प्रसन्न होते.

लिंबुभाऊ काय हे, अहो तुम्हाला नसेल माहिती तर नका सांगु, पाल्हाळ काय लावताय? निदान तुमच्यासार्ख्या धार्मिक माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती हो.

बी, छान पोस्ट Happy
>>>>मला वाटत आपण इतके सुखी असतो किंवा दुखाची इतकी सवय झालेली असते किंवा आपले दु:ख इतके छोटे असते की ह्या मंत्रांची ताकद कळायला ती ती वेळ यावीच लागते. <<< अगदी अगदी.
ते सुखदु:खात(?) गुन्तणे म्हणजेच षडरिपुच्या हुकमात वहावणे होय! (आजच कुठेतरी यावर लिहीलय)
मन्त्र अनुभवायला याचा अडथळा होतोच पण यातुन बाहेर पडायला देखिल मन्त्राचीच मदतही होते, जर पूर्ण श्रद्धेने, एकाग्रतेने शुद्ध मन्त्रोच्चारण केले! Happy
पुन्हा एकदा बी, चान्गले लिहीलेस.

>>> निदान तुमच्यासार्ख्या धार्मिक माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती हो. <<<
अगो पण अपेक्षा मूळात कुणी काय शब्दात केलिये ते बघ ना! क्रियेला प्रतिक्रिया या न्यायाने वा पाण्या तुझा रन्ग कसा.. या न्यायाने, जशी विचारणा तसेच माझे उत्तर असणार ना? Proud

मन्त्रान्च्या मागे कुठे लागताय? त्यापेक्षा जे सर्वकाळ सर्वजगात सर्वाधिक जनान्कडून उच्चारण चालते, त्या विविध भाषाप्रसन्गातल्या शिव्यान्च्या लाखोलीचा अभ्यास करा बघु!
<< +११११११

मित्रहो, प्लीज प्लीज इथे विनोद वगैरे नका करु. अन्य अनेक बीबी आहेत ना त्यासाठी तिथे पळा जा.. पण इथे नको हे सर्व. धन्यवाद.

बी | 26 April, 2012 - 17:01 नवीन
मित्रहो, प्लीज प्लीज इथे विनोद वगैरे नका करु. अन्य अनेक बीबी आहेत ना त्यासाठी तिथे पळा जा.. पण इथे नको हे सर्व. धन्यवाद.>>

बी, परमात्म्यांनी हा धागा विनोदासाठीच काढला असला तर?

माफ करा, असे धागे वादग्रस्त बनतात व शेवटी बंद पडतात असे पाहिले काही वेळा

बेफिकीर, ह्या धाग्यात वादग्रस्त असे काहीच नाही आहे. असे धागे बंद पडतात त्याला कारण तुम्ही जसे इथे विनोद करित अहात ते आहे. म्हणूनच मी विनंती केली आहे की विनोद इथे करु नका गप्पांच्या पानांवर करा.

>>>> मंत्रोच्चाराचे सामर्थ्य ठसविण्यासाठी वरील स्पष्टीकरणे कमीअधिक प्रमाणात नेहमी दिली जातात. <<< यापेक्षा अजुन इतर स्पष्टीकरणे/अनुभव तुम्हाला मिळालेले नाही असे दिसते.

>>>>> इथे एक गोष्ट लक्षात येईल कि वरील स्पष्टीकरणे बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर वा शास्त्रिय कसोट्यांवर फोल ठरतात कारण त्या स्पष्टीकरणांचा कार्यकारणभाव सांगितला जात नाही किंवा सांगता येत नसावा. <<< शास्त्रीय कसोट्यान्वर, मन्त्रजागराचा परिणाम सजिव वनस्पतिन्वर होतो असे देशापरदेशातले संशोधन खूप पूर्विच झाले आहे, त्याबद्दल आपण जाणुन घेतले नाहीत का? तुमच्या बुद्धिप्रामाण्याच्या/शास्त्रिय कसोट्या बहुधा परदेशी संशोधकान्पेक्षाही वेगळ्या श्रेष्ठ असाव्यात, काय? Proud

>>>>> यावरुन असे लक्षात येईल की शास्त्रिय दृष्टीकोनातुन मंत्रवाद खोटा ठरतो. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव देता येत नाही असा विश्वास असणारे मात्र मंत्रशक्तीवर विश्वास ठेवतातच . <<< इतक्यातच कस काय बोवा सिद्ध जाले? तुम्ही एक पोस्ट लिहीलित, तिचे शिर्षक नन्तर बदललेत, त्यात अनुक्रमान्क देत काही मुद्दे मान्डलेत, अन सान्गुन टाकलत की ती स्पष्टीकरणे फोल ठरतात! बस्स? झाल संशोधन?
नै नै, अस असेल, की तुम्ही लिहील, म्हणजे माबोवरील पामर वाचकान्नी बुप्राबाबावाक्यम प्रमाणम असे मानावेच असे तर वाटत नाही ना तुम्हाला? Wink

लिंबुभाऊ सॉरी, बहुतेक तुम्ही ज्यांना उत्तर दिलेत, त्यांनी ती पोस्ट आधीच उडवलेली दिसतीय.
त्यामुळे तुम्ही कुणाला काय म्हटलेत ते मला कळलेच नाही.
बी छान लिहीलेस.

यात एक गमतीशीर भाग हा आहे कि ज्यांच्याकडे हे सामर्थ्य असते त्याना हे कोणासमोर सिद्ध करायची गरज वाटत नाही किंवा त्यात फारसा रसही नसतो.आणि ज्यांच्याकडे यातले काहीही नाही पण त्यावर विश्वास आहे हे आमच्या सारखे सामान्य लोक त्याचे समर्थन करायला लागतात.पण सिद्ध करु शकत नाहीत. आणि उरते काय तर हत्तीला चाचपणार्‍या आंधळ्या लोकांची मनोरंजक चर्चा.

बी आणि मनास्मि: छान पोस्टी.

माझा अनुभव आपला:
आमच्या इथल्या चिन्मय मिशन मध्ये छोट्या पब्लिक कडून खणखणीत, स्पष्ट, एका सुरात उच्चारले जाणारे तालबद्ध मंत्रोच्चार वा आरती ऐकताना मनाची आणि शरीराची काय अवस्था होते ती शब्दात पकडता येत नाही. असो, चालू देत तुमच.

बी ,धन्यवाद तुम्ही उनाड मेंबर्सना समज दिलीत. नवीन मेंबरने नवीन थ्रेड सुरु केला कि तिथे टाईमपास कमेंट द्यायची सवय आहे बहुतेक ईथे. काल कंटाळुन मीपण अनेक थ्रेड्सवर टाईमपास कंमेट दिल्या नंतर त्या एडिट केल्या तो भाग वेगळा.चांगल्या थ्रेड्सवर चांगले बोलावे हे ही कळत नसावे काहीजणांना .पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे.

पूजा झाल्या वर 'यस्य स्मृत्याच नामोक्तः-------'हा साधा मंत्र नतमस्तक होवून म्ह्णा मग कळेल ,मंत्रांचे सामर्थ्य अन ती अनुभूती!!!

Pages