चित्रपटांत/ मालिकांमध्ये पुन्हा पुन्हा वापरली गेलेली लोकेशन्स/ नेपथ्य

Submitted by पियू on 8 June, 2015 - 07:17

हा धागा काढण्याचे कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'संदूक' (सुमित राघवन - भार्गवी चिरमुले) हा सिनेमा.
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असल्याने मला हा सिनेमा पाहातांना नुकत्याच पाहिलेल्या 'विटी-दांडू' (अजय देवगण प्रॉडक्शन) या सिनेमाची आठवण येत होती. आणि लक्षात आलं कि या सिनेमात इंग्रजांची चौकी/ जेल/ स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यासाठी जो तुरुंग 'विटी-दांडू' या सिनेमात दाखवलेला आहे तेच लोकेशन नी तोच तुरुंग 'संदूक' मध्येही वापरला आहे.

थोडा अजुन विचार केल्यावर असे एक लोकेशन/ सेट आठवला तो म्हणजे खुप गाजलेल्या 'हम-पाच' या मालिकेतील घर. हे घर कित्येक मराठी सिनेमांमध्ये जसेच्या तसे वापरल्याचे आठवते. 'अश्विनी ये ना' हे सुप्रसिद्ध गाणे असलेला 'गंमत-जंमत' या मराठी चित्रपट याच लोकेशनवर शूट झाला आहे. (यातच वर्षा उसगावपण आहे ना?). याखेरीज 'सुहास जोशी' यांनी ज्या चित्रपटात दारू प्यायलेल्या बाईचा उत्तम अभिनय केला आहे त्या 'तू तिथं मी' या चित्रपटातही हाच बंगला वापरला आहे.

फार पुर्वी जेव्हा 'झी मराठी' हि 'अल्फा मराठी' होती तेव्हा त्यावर 'प्रपंच' नावाची एक मालिका लागायची. बहुतेक त्याच मालिकेतले घर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मध्ये वापरले गेले होते. सीआयडी या मालिकेतही हे घर एक-दोन वेळा वापरले होते.

तुम्हालाही असेच मराठी/हिंदी सिनेमात/ सिरियलमध्ये पुन्हा पुन्हा वापरले गेलेले सेट्स किंवा लोकेशन्स आठवत असतील तर इथे जरूर लिहा.

*असा धागा आधीपासून कोणी काढलेला असेल तर हा धागा डिलीट करण्यात यावा हि विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदूक बघताना मला ही विटी दांडू चीच आठवण आली. >>>> ज्यांनी विटीदांडु बघितलाय त्या सगळ्यांना संदुक बघताना आठवण आली.. प्रपंच, टिपरे मालिकेतल समुद्राकाठच घर तर बर्‍याच मालिकांमध्ये दिसत.. अस्स घर पायजे राव

ऊटीतले सगळेच्या सगळे लोकेशन्स - फिल्मी चक्कर, वेळंचं बन, दिल दिवाना लेक इत्यादी आता तोंडपाठ झाले आहेत.

शोले सिनेमा मधे ये दोस्ती या गाण्यात ते एका वडाच्या झाडाखालून जाताना अमिताभ ज्या वडाच्या पारंबीला लटकतो ते महाप्रचंड झाड अनेक सिनेमात दाखवलेलं आहे. खलनायक मधे फाईट सीन आहे त्याखाली.

चंबळ चं लोकेशन

पाचगणीची लोकेशन्स

भोरचा राजवाडा
शिमल्याजवळंची लोकेशन्स (जय जय शिवशंकर गाण्यातलं)

मनाली च्या अलिकडे सुभाष घईंनी प्रसिद्ध करून टाकलेला नदीचा स्पॉट.याशिवाय त्या एका राक्षसिणीचं मंदीर आहे ना (भीमाची बायको) तिथली लोकेशन्स.

लद्दाख ची लोकेशन्स पूर्वी नव्हती. पण आता डिस्कीटच्या पुढे परवानगी मिळाल्यापासून सॅनडून आणि पॅनामिक पर्यंतची लोकेशन्स दिसतात. लेह पण लोकप्रिय आहे.

आहट आणि सीआयडी मालिकेत रस्त्यावरचं एक घर आहे, ज्याला मधोमध दरवाजा आहे आणि त्रिकोणी छत आहे. ते असंख्य एपिसोड्स मधून दाखवलं आहे.

बिरीवली फिल्म सिटीजवळचा छोटासा रस्ता. अनेकदा या रत्स्याने पोलिसांची व्हॅन जात असताना आतला कैदी पळून जातो असं दाखवण्यात येतं ..

हॉरर सिरीयल्स मधे दोन्ही बाजूंनी झाडं असलेला चकचकीत रस्ता हे बहुतेक फिल्मसिटीतल लोकेशन आहे.

एन चंद्राच्या सिनेमात नाशिकचे स्पॉट दिसतात.

कुलू चा राजवाडा. रोजा मधला तुरूंग (वसिम खान ला ठेवलं असतं तो) म्हणून वापरला आहे. अजून १-२ सिनेमात पाहिल्याचं स्मरतं.

लोणावळ्याचा टाटा डॅम.
कयामत से कयामत तम मधे सीतानगर (कश्मीर) म्हणून दाखवला आहे तर जो जिताब्वही सिकंदर मधे आमीर पूजा बेदीला महागडा नेकलेस देतो आणि किस करतो ते ठिकाण (सिनेमात डेहराडून).

वानवडी चा पद्मव्हिला पॅलेस असंख्य सिनेमात आहे. (राम लखन मधली हवेली).

सेंट्रल रेल्वे वर ट्रेन ने प्रवास करताना कांजुरमार्ग च्या अलीकडे एका मैदानात दर वेळी वेगवेगळे सेट उभारलेले दिसतात. एकदा एका चाळीचा, एकदा एका बंगल्याचा सेट पाहिला होता.

पुण्याहून एकहोतो,)स हायवे सुरू होतो तिथून देहू रोड पोलिस स्टेशन कडे एक रस्ता जातो. (तोच पुढे एन एच - ४ ला कनेक्ट होतो,) त्या रस्त्यावर उजवी कडे ही एकदा असा सेट पाहिला होता. एकदा जुन्या किल्ल्याचा सेट होता. एकदा मशीदी चा सेट होता.

वास्तव सिनेमात चाळ दाखवलीय. तो ही सेट च आहे न. सरकारनामा सिनेमातही तीच चाळ होती की काय!

इस्माईल युसूफ कॉलेज - न्यायालय, कॉलेज किंवा रेल्वे स्टेशन म्हणून अनेक सिनेमात व गाण्यात दाखवण्यात यायचे। न्यायालय म्हणून एका मराठी सिनेमात सुद्धा दाखवले होते। व आँखे सिनेमाच्या एका सिन साठी।

कुलू चा राजवाडा - ये इश्क हाये गाण्यात पण आहे.
मुरुडचा राजवाडा माया मेमसाब मध्ये आहे.
सिमल्याचे फेमस चर्च माया मेमसाब व इतर अनेक पिक्चरमध्ये आहे.
नहीं सामने ये अलग बात है चे चित्रीकरण पवईला हिरानंदानीमध्ये झालेय, कहो ना प्यार है चे काही सीनही तिथलेच.
जय जय शिवशंकर गाण्यातलं देऊळ पहलगामचे आहे
काश्मीरचे मार्तंड मंदिर तेरे बिना जिंदगी से गाण्यात आणि हैदर मध्ये आहे.

Pages