चित्रपटांत/ मालिकांमध्ये पुन्हा पुन्हा वापरली गेलेली लोकेशन्स/ नेपथ्य

Submitted by पियू on 8 June, 2015 - 07:17

हा धागा काढण्याचे कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'संदूक' (सुमित राघवन - भार्गवी चिरमुले) हा सिनेमा.
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असल्याने मला हा सिनेमा पाहातांना नुकत्याच पाहिलेल्या 'विटी-दांडू' (अजय देवगण प्रॉडक्शन) या सिनेमाची आठवण येत होती. आणि लक्षात आलं कि या सिनेमात इंग्रजांची चौकी/ जेल/ स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यासाठी जो तुरुंग 'विटी-दांडू' या सिनेमात दाखवलेला आहे तेच लोकेशन नी तोच तुरुंग 'संदूक' मध्येही वापरला आहे.

थोडा अजुन विचार केल्यावर असे एक लोकेशन/ सेट आठवला तो म्हणजे खुप गाजलेल्या 'हम-पाच' या मालिकेतील घर. हे घर कित्येक मराठी सिनेमांमध्ये जसेच्या तसे वापरल्याचे आठवते. 'अश्विनी ये ना' हे सुप्रसिद्ध गाणे असलेला 'गंमत-जंमत' या मराठी चित्रपट याच लोकेशनवर शूट झाला आहे. (यातच वर्षा उसगावपण आहे ना?). याखेरीज 'सुहास जोशी' यांनी ज्या चित्रपटात दारू प्यायलेल्या बाईचा उत्तम अभिनय केला आहे त्या 'तू तिथं मी' या चित्रपटातही हाच बंगला वापरला आहे.

फार पुर्वी जेव्हा 'झी मराठी' हि 'अल्फा मराठी' होती तेव्हा त्यावर 'प्रपंच' नावाची एक मालिका लागायची. बहुतेक त्याच मालिकेतले घर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मध्ये वापरले गेले होते. सीआयडी या मालिकेतही हे घर एक-दोन वेळा वापरले होते.

तुम्हालाही असेच मराठी/हिंदी सिनेमात/ सिरियलमध्ये पुन्हा पुन्हा वापरले गेलेले सेट्स किंवा लोकेशन्स आठवत असतील तर इथे जरूर लिहा.

*असा धागा आधीपासून कोणी काढलेला असेल तर हा धागा डिलीट करण्यात यावा हि विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसत एकताच्या शिरेलीतच नै तर शिनुमांमधुन पण हेच देउळ असायच आधी.. अमिताभ तर कित्येक वेळा गेलाय या देवळात वेगवेगळ्या देवांच्या पाया पडायला.

जोधा अकबरमधला अकबराचा दरबार आणि "राजा शिवछत्रपती" मालिका जी पूर्वी स्टार प्रवाह वर लागायची त्यात औरंगजेबाचा आग्र्यातला दरबार एकच असावा कारण दोन्हीचे आर्ट डिरेक्टर नितीन देसाई आहेत.

स्विट्झर्लंड पूर्ण सीनरी प्रेमगीतांसाठी यशराज च्या सिनेमात विशेषतः
मुकेश मिल्स मारामारीच्या सीन्स साठी. व साउथ मुंबईत असल्याने सोईस्कर.

लक्ष्मीकांत बेर्डेच्या काळातल्या मराठी पिक्चर्समध्ये बागेतल्या गाण्यांच शुटिंग जास्त करुन आरे कॉलनीत व्हायच.. आमच्या शाळेची ट्रिप गेली होती आरे कॉलनी आणि दुधाची फॅक्टरी वै बघण्यासाठी तेव्हा तिथल्या पाम ट्री लक्षात राहील्या कारण त्यावेळी त्या आयुष्यात पैल्यांदाच पाहील्या होत्या... त्यानंतर जेव्हा केव्हा तिथल शुटींग असलेल गाण लागायच तेव्हा आपण हे बघितलय हे आठवुन लै भारी वाटायच.

रामोजी फिल्म सिटीतले सेट्स ब बंगले, रस्ते डेविड धवनच्या अनेक सिनेमात आहेत. बीबी नंबर वन मधला बंगला, जुदाई सिनेमातले श्रीदेवीचे नवे घर इत्यादि घरे तसेच हैद्राबादेतील काही हॉटेले हे लोक कायम वापरत असत.

माणसं वर्षानुवर्षं तीच तीच दाखवतात. आलटुन पालटून जोड्या बदलून दाखवतात, हिरोइन चं काम केलेली थोड्या दिवसांनी आई होती त्याच हीरोची. मग लोकेशनचं काय घेऊन बसलाय? Lol

मधे अनेक चित्रपटात बहुतेक मेणवली गावातला वाडा असायचा (स्वदेस आणि गंगाजल)
अजुनहि काहि मधे असु शकेल, मला आत्ता आठवत नाहिये

अलका कुबलच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये तिच गाव/खेडं दाखवल जायच स्पेशली खूप पायर्‍या असलेला नदीवरचा घाट वगैरे.. ते माझ आजोळ गाव सातारा जिल्ह्यातील संगम माहुली.. आसावरी जोशीच्या "तांदळा" मध्ये याच गावातील शंकराच्या मंदिरातल शुटींग आहे.. "उंच माझा झोका" मध्ये छोट्या रमाच्या मैत्रिणीच लग्न याच गावातील भार्गवराम मंदिरात शुट केल..

असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये हिरो-हिरवीण जेव्हा पळून जातात तेव्हा उंचच उंच एका रांगेतील झाडांचे जंगल दाखवले जाते. आठवा- गोविंदाचा शोला और शबनम, मिथूनचे प्यार झुकता नही मधील ‘तुमसे मिलकर..’ हे गाणे. हेच जंगल अनेक भूतपटांमध्येही आहे. अनेक मालिकांमध्येही दाखवले गेले आहे. गेल्या वर्षी स्टार प्लसवर सुरू असलेल्या महाभारतामधलं जंगलही असंच होतं.

>>तो म्हणजे खुप गाजलेल्या 'हम-पाच' या मालिकेतील घर.
ते घर सगळ्यात पहील्यांदा घरकुल मालिकेत पाहिल्याचे आठवतेय..... दारातुन आल्या आल्या लाकडी चौकटी-चौकटीची जाळी होती तेच ना?

>>अलका कुबलच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये तिच गाव/खेडं दाखवल जायच स्पेशली खूप पायर्‍या असलेला नदीवरचा घाट वगैरे.. ते माझ आजोळ गाव सातारा जिल्ह्यातील संगम माहुली
हो.... शाळेत असताना मीही एकदा सातार्‍याहुन गेलो होतो शुटींग पहायला.... अलका कुबलचाच कुठला तरी पिक्चर होता

कोर्टाच्या सीन साठी म्हणजे बाहेरुन कोर्ट दाखवण्यासाठी बरेचदा जोगेश्वरीचं ईस्माईल युसुफ कॉलेज वापरलेलं आहे. 'कळत नकळत'चा क्लायमॅक्स ईथेच चित्रित झालेला आहे. ('जगात देव कुणिच नसतो.. इति विक्रम गोखलेंचा डायलॉग)

पीयू
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असल्याने मला हा सिनेमा पाहातांना नुकत्याच पाहिलेल्या 'विटी-दांडू' (अजय देवगण प्रॉडक्शन) या सिनेमाची आठवण येत होती. आणि लक्षात आलं कि या सिनेमात इंग्रजांची चौकी/ जेल/ स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यासाठी जो तुरुंग 'विटी-दांडू' या सिनेमात दाखवलेला आहे तेच लोकेशन नी तोच तुरुंग 'संदूक' मध्येही वापरला आहे."

सिंधुदुर्गात अलीकडे खुप चित्रपटांचे शूटिंग होत.... त्यांच्यासाठी एक व्यक्ति लोकेशन दाखवत... दीपिका पदुकोनाचा खेल खेल में, वीटी दंडु... आता संदूक ... लोकेशन सेम त्यामुळे...काही कलाकारहि तेच

रामसेच्या बर्‍याच सिनेमांमधे खंडहर म्हणून अतिबळेश्वरचं मंदिर दाखवलं आहे. आणि या अस्ल्या खंडरांमधे त्यांचा सो कॉल्ड शैतान राहात असतो Uhoh

असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये हिरो-हिरवीण जेव्हा पळून जातात तेव्हा उंचच उंच एका रांगेतील झाडांचे जंगल दाखवले जाते. आठवा- गोविंदाचा शोला और शबनम, मिथूनचे प्यार झुकता नही मधील ‘तुमसे मिलकर..’ हे गाणे.
>>

क्यू से क्यू तक मध्ये सुद्धा तेच होते का?
हम भी अकेले तुमभी अकेले मजा आ रहा है कसमसे.....

अवांतर - त्या जंगलाच्या शोधात मी नॅशनल पार्क ते कान्हेरी गुफांच्या रस्त्यावरील जंगलात एका मित्राला घेऊन आतवर फिरलो होतो. नंतर अचानक डोक्यावर घारी-गिधाडं फिरताना दिसली तर माझा मित्र म्हणाला, जवळच कुठेतरी वाघाने-बिबट्याने शिकार केली असणार, ते तडक आम्ही तिथून कल्टी..

सिंधुदुर्गात अलीकडे खुप चित्रपटांचे शूटिंग होत.... त्यांच्यासाठी एक व्यक्ति लोकेशन दाखवत <<<
Happy
त्या एका व्यक्तीला टाळून लोकेशन्स शोधता येतात.

असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये हिरो-हिरवीण जेव्हा पळून जातात तेव्हा उंचच उंच एका रांगेतील झाडांचे जंगल दाखवले जाते. << आम्ही तसल्या जंगलांना भाट्याचे सुरूबन म्हणतो. अ‍ॅक्च्युअल भाट्याच्या सुरूबनामध्ये इश्कविश्क मधल्या एका गाण्याचं शूटिंग झालं होतं.

टीव्ही | 12 June, 2015 - 17:06
कोर्टाच्या सीन साठी म्हणजे बाहेरुन कोर्ट दाखवण्यासाठी बरेचदा जोगेश्वरीचं ईस्माईल युसुफ कॉलेज वापरलेलं आहे. 'कळत नकळत'चा क्लायमॅक्स ईथेच चित्रित झालेला आहे. ('जगात देव कुणिच नसतो.. इति विक्रम गोखलेंचा डायलॉग)<<<<<<<<
इस्मायील्च्या जगलात पूर्वी नेहमीच शूटिंग होत असायच्या . काळात नकळत तेथेच शूट झालाय. इवन ते कोलेज हे नॉर्मली कोर्टाच्या सीन साठी वापरतात. तिथे आंखे (गोविंदाचा ) सुद्धा शूट झालाय.

हात्तिच्या, भारी आहे कि धागा! हा प्रश्न क्विझ कंपीटीशन्स मध्ये खूप विचारतात त्यामुळे काही उत्तरे माहित आहेत.

१) Monument Valley - मोस्ट यूज्ड फिल्म लोकेशन ऑफ ऑल टाईम! (जीके मध्ये टाकून ठेवा!) प्रॅक्टिकली १९३०-१९४० या दहा वर्षातल्या जवळपास सर्व वेस्टर्न मूव्हीज मध्ये या दरीतला एकतरी शॉट आहे! एका लोकेशनला अनेक दिग्दर्शकांनी वापरले आहे ना; मॉन्युमेंट व्हॅलीला अनेक दिग्दर्शकांना ५-५ वेळा तरी वापरले आहे. जॉन फोर्डने इथे तब्बल ९ सिनेमे शूट केले! (एका पॉईंटला तर आता जॉन फोर्ड पॉईंट नाव दिले आहे) काही प्रसिद्ध सिनेमे - लोन रेंजर, फॉरेस्ट गंप, मिशन इंपॉसिबल २ (ओपनिंग सीक्वेन्स)

२) क्वालिटी कॅफे, लॉस एंजेलिस - मोस्ट यूज्ड कॅफे/रेस्तरां ऑफ ऑल टाईम! इतका यूज्ड कि आता त्यांनी डिनर सर्व्ह करणे बंद केले आहे, तिथे शूटिंगच चालते. तिथे एक टेबल आहे आणि त्या टेबलवरच बरेचसे सीन शूट झाले आहेत यूजिंग सेम पेअर ऑफ कॉफी मग्ज!! फेमस टीव्ही सिरियल उचला उसगावातली कोणती पण एकदा तरी हा कॅफे असतोच! मिलियन डॉलर बेबी मधला मॉर्गन फ्रीमन आणि हिलरी स्वँकचा तो आयकॉनिक सीन इथलाच आहे!

मोस्ट यूज्ड कॅफे/रेस्तरां ऑफ ऑल टाईम!
>>>>
पण असे का करतात? म्हणजे सारेच दिग्दर्शक तेच तेच.. यामागे अंधश्रद्धा superstition असेल का?

हाहा, नाही कोणतीही अंधश्रद्धा नाही. त्या ठिकाणी परफेक्ट अँगलने शॉट मिळत असावेत, परफेक्ट लाईट असावा. एवीतेवी लोकेशन मिळणे कठीण आणि लायटिंग भयंकर कठीण प्रकरण आहे. सो वापरत असतील तेच तेच. पुन्हा लॉस एंजेलिस म्हणजे स्टुडिओपासून जवळ!

पियु,
मस्त धागा.
पोस्टी वाचल्या नाहीत अजून.

मला आठवेल ते लिहितेय.
मैने प्यार किया मधला बंगला मोहनीश बेहल चा बंगला
गोविंदा व सलमान च्या पार्टनर सिनेमा मध्ये एक समुद्राकाठचा बंगला दाखवलाय तो
सैनिक सिनेमा मध्ये अश्विनी भावे चे माहेर दाखवलेय तो बंगला

फार पुर्वी जेव्हा 'झी मराठी' हि 'अल्फा मराठी' होती तेव्हा त्यावर 'प्रपंच' नावाची एक मालिका लागायची. बहुतेक त्याच मालिकेतले घर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मध्ये वापरले गेले होते. >>
शिवाय अल्पविराम म्हणून एक हिंदी सीरीयल येत असे पल्लवी जोशी अभिनीत. तिच्या आजी आजोबांचे जे घर दाखवलेय ते ही हेच आहे बहुदा,

संदूक बघताना मला ही विटी दांडू चीच आठवण आली.

Pages