बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

Submitted by गणेश पावले on 5 June, 2015 - 02:11

कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच…
तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या कि अबद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुडत बसतो.
मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जगतो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी.
तुझ्यासोबत जगलेले ते क्षण किती गोड होते. किती मदमस्त जीवन होत. तुझे बोलणे, तुझे चालणे, तुझे हसणे, तुझे रुसणे, तुझ्या अदा, तुझे नखरे सार काही अजूनही माझ्यासाठी जिवंत. भास आभासात मी तुलाच जगत असतो, तुलाच अनुभवत असतो, शोधत असतो… सैरावैरा पळत असतो फक्त तु एकदा दिसण्यासाठी.
न बोलताच सारं काही सांगून जाणारे तुझे डोळे आणि त्यांची भाषा आजकाल मी विसरत चाललो. रात्रीच्या अंधारात मागून येणाऱ्या तुझ्या पैंजणाचा आवाजासाठी कान अजूनही टवकारतात, त्या चंद्राच्या शितल छायेत मी जातो, शोधत असतो तुला त्या प्रत्येक चांदणीत, आणि तू दिसतेस ही. पण दूर दूर कुठेतरी. मध्येच गायब होतेस आणि पुन्हा मी हताश होवून अधीर पाणावलेल्या डोळ्यांनी तुझ्या दर्शनास व्याकुळ होवून हरवून जातो स्वताच्याच भाव विश्वात.
वाटत कधी कधी तू पुन्हा येशील आयुष्यात. पुन्हा रंगून जायील संसार माझा. अंगणातली तुळस पुन्हा डोलेल. तिला रोज तू पाणी घालशील, तिला गोडशी पालवी फुटेल, सार घर आनंदान सजेल… पण हे सारं फक्त स्वप्नातच घडतं
प्रत्यक्षात तू मात्र बेफिकीर….
प्रत्यक्षात तू मात्र बेफिकीर…


जगेन तुझ्याशिवाय, मरेन तुझ्याशिवाय
पण काही क्षणापुरताच

अश्रू भरलेल्या डोळ्यांनी झिडकारिन तुला
पण काही क्षणापुरताच

विसरेन तुला, पुन्हा कधीच न आठवण्यासाठी
पण काही क्षणापुरताच

हा राग, हा रुसवा, हा अबोला माझा कायमचाच
पण काही क्षणापुरताच

अजूनही तुझी वाट पाहतोय…. अधाशासारखा
पण काही क्षणापुरताच

तुझाच… प्रेमवेडा
तुझा गणेश….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय ..
विसरेन तुला, पुन्हा कधीच न आठवण्यासाठी
पण काही क्षणापुरताच >>> हे आवडले ..

तुझी वात पाहतोय >> वात चे वाट करा ..