राष्ट्रीय पुरस्कार (नॅशनल अ‍ॅवॉर्ड) मिळालेले चित्रपट

Submitted by हर्ट on 28 May, 2015 - 05:25

माझ्यामते दरवर्षी एकूण ३० भारतिय सिनेमे निवडले जातात आणि ह्या ३० सिनेमांना नॅशनल अवार्ड दिला जातो. हे तीस सिनेमे कुठल्याही भारतिय भाषेतील असू शकतात. पुर्वी दुरदर्शन वर रविवारी मुकबधिरांसाठी बातम्या झाल्यात की त्यानंतर प्रादेशिक भाषेतील सिनेमा दाखवत. हल्ली प्रत्येक राज्याचे आपापल्या भाषेतील चॅनेल्स झालेले आहेत. असे असूनही आपल्यापर्यंत चांगले प्रादेशिक चित्रपट पोहचत नाहीत. ज्याअर्थी ३० सिनेमांना नॅशनल अवार्ड मिळतो म्हणजे निदान हे ३० सिनेमे तरी दर्जेदार असतील असे म्हणायला हरकत नाही.

हा धागा नॅशनल अवार्ड मिळालेल्या भारतिय सिनेमांबद्दल तर आहेच पण इथे तुम्ही इतर कुठल्याही भारतिय प्रादेशिक भाषेतील चांगल्या चित्रपटाबद्दल लिहू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळालेले चित्रपट असं शिर्षक जास्त योग्य वाटेल ना? कारण नॅशनल अ‍ॅवॉर्‍ड भारतीय चित्रपटांनाच मिळतो ना

माझ्यामते दरवर्षी एकूण ३० भारतिय सिनेमे निवडले जातात आणि ह्या ३० सिनेमांना नॅशनल अवार्ड दिला जातो.
<<
<<
दरवर्षी तीस चित्रपटांना, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा "राष्ट्रीय पुरस्कार" दिला जातो??

विकीपिडीया वर १९५३ पासून देण्यात आलेल्या सर्व चित्रपटांची यादी दिली आहे.

@ बी - अहो तुम्ही आधी काहीतरी लिहा ना २-३ नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळालेल्या सिनेमा बद्दल. ४ ओळींचा धागा काढायचा आणि दुसर्‍यांना लिहायला सांगता.

टोचा खरेच माहिती नाही मला नॅशनल अ‍ॅवॉर्ड सिनेमांबद्दल. पण मी चक्र, मंथन, सारांश, स्पर्श, श्वास, अर्थ हे सिनेमे पाहिले आहेत आणि माझ्यामते ह्या सिनेमांना नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळालेला आहे. चुभुदेघे.

मी अमि, आणि विजयजी - धन्यवाद.

माझ्यामते क्वीन्स ह्या कंगना रानावत हिच्या सिनेमाला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. बरोबर ना?
<<

बरोबर ना म्हणुन काय विचारताय? वर विजय आंग्रेनी विकीपिडीयाचा दुवा दिलाय ना, तो उघडुन पहा की.

वाह चांगली माहीती आहे....
पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मराठी चित्रपटाला तेपण श्यामची आई हे माहीती नव्हते...

त्यानंतर डायरेक्ट श्वास.... त्यानंतर देऊळ आणि कोर्ट....बस्स ६२ पुरस्कारांमध्ये फक्त ३ च मराठी....

त्यामानानी बंगाली १८ आणि मल्याल्यम ११ म्हणजे चांगलीच कामगिरी आहे....

कमर्शियल सिनेमा पैकी तिसरी कसम नंतर पेज ३ आणि पान सिंग तोमार....

बाकी चित्रपटांमध्ये गिरीश कासारवल्ली यांचा द्वीप फिल्म फेस्टीव्हलला लागलेला तेव्हा बघायचा प्रयत्न केला होता. कमालीचा संथ होता बापरे.

गोपी गाये बाघा बाये हा टीव्हीवर लागला होता. दूरदर्शनवर तेव्हा...मस्त होता..

नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळालेले चित्रपट असं शिर्षक जास्त योग्य वाटेल ना???

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले चित्रपट कसं वाटतं? मराठीत होईल म्हणजे.

त्या 'कोर्ट'ला पोतं भरून पुरस्कार मिळाले होते. मोठ्या अपेक्षेने थिएटरमध्ये जाऊन पाहिलं ते दळण.

'श्वास' पाहिला होता. अख्ख्या चित्रपटभर अरुण नलावडेंचा एकसारखा चेहरा पाहून कंटाळा आला. सांगणार कुणाला ? पुरस्कार मिळालाय !

चित्रपटांना मिळणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांपासून व्यक्तींना मिळणाऱ्या पद्म, भारतरत्न वगैरेपर्यंत मला तरी 'पुरस्कार' हे कुठल्याही कलाकृतीच्या किंवा व्यक्तीच्या चांगल्या/ उत्तमतेचं द्योतक वाटत नाही. ज्यांना मिळाला त्यांना अभिनंदन करावं आणि मंद स्मित करून, आपल्याला जे आवडतं तेच चांगलं मानावं, असं मी माझ्यापुरतं ठरवलं आहे.

चित्रपटांना मिळणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांपासून व्यक्तींना मिळणाऱ्या पद्म, भारतरत्न वगैरेपर्यंत मला तरी 'पुरस्कार' हे कुठल्याही कलाकृतीच्या किंवा व्यक्तीच्या चांगल्या/ उत्तमतेचं द्योतक वाटत नाही. ज्यांना मिळाला त्यांना अभिनंदन करावं आणि मंद स्मित करून, आपल्याला जे आवडतं तेच चांगलं मानावं, असं मी माझ्यापुरतं ठरवलं आहे.

संपूर्ण अनुमोदन Happy

रसप...+१
या निवड समिती चे चित्रपट निवडी मागचे नेमके निकष काय असतील हे कळत च नाही.
ही माणसे आपल्या सारखी नसतात कि काय?
काही अपवाद वगळता तिकीट बारी वर हे चित्रपट चालत नाहीत किंवा चालणारच नाहीत असेच काहिसे असते असे वाटते.

'कोर्ट' हा चित्रपट मी अनुभवलेल्या भयाण कंटाळ्यांच्या अनुभवांत बहुतेक तरी आयुष्यभर प्रथम क्रमांकावर सुवर्णपुष्प मिरवत राहील.

रसप ला माझं पण अनुमोदन. राष्ट्रिय पुरस्कार कोणत्या निकषांवर दिला जातो तेच कळत नाही. का अत्यंत संथ, अगम्य अशा कथावस्तू आणि पात्ररचनेला असे अ‍ॅवॉर्ड द्यायचे असा नियम आहे का?
क्विन ला नॅशनल अ‍ॅवॉर्ड? Uhoh किस खुशी मे? Uhoh

नॅशनल अ‍ॅवॉर्डसच्या खूप सार्‍या कॅटेगरीज आहेत.
देशातील सर्वोत्तम चित्रपट, प्रत्येक भाषेतील सर्वोत्तम चित्रपट, सर्वात लोकप्रिय चित्रपट, पर्यावरणशी संबंधित विषयावरील सर्वोत्तम चित्रपट, सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपट, लहान मुलांचा चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, डिओपी, साऊंड डिझायनर, संकलक, आर्ट डिरेक्टर, कॉश्च्युम डिझायनर, मेकप डिझायनर, प्रमुख अभिनेता, प्र अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, स अभिनेत्री, बालकलाकार, नृत्यदिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका इत्यादी. (अजूनही काही आहेत. त्या आठवत नाहीयेत)
यामधे देशातील सर्वोत्तम चित्रपट म्हणून जो निवडला जातो त्या चित्रपटाला व त्याच्या दिग्दर्शकाला सुवर्णकमळ (सोन्याच्या पदकावर कमळाचा छाप) मिळते. बाकी बहुतेक सर्व कॅटेगरीजना रजतकमळ (चांदिच्या पदकावर कमळाचा छाप)

दरवर्षी आलेल्या प्रवेशिकांच्यातील सर्व चित्रपट बघून मग बक्षिसांसाठी निवड होते. यासाठी साधारण १०-१२ लोकांची ज्यूरी कमिटी असते.

हा अ‍ॅवॉर्डसचा फॉर्म भरणे हे एक किचकट काम असायचे (अजूनही असावे).

देवराई ह्या चित्रपटाला, पर्यावरण संबधित विषयासाठी, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, असं वाचल्याचं स्मरतंय.

त्यात स्किझोफ्रेनिया हा विषय होताना. मी चित्रपट पहिला नाहीये. अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष होते त्यात.

हल्ली दोन समित्या असतात. एक प्रादेशिक समिती आणि दुसरी राष्ट्रीय. पहिल्या समित्या आलेल्या सर्व प्रवेशिकांमधून आपापल्या प्रदेशांमधले काही चित्रपट निवडतात आणि मग ते चित्रपट मुख्य समितीकडे जातात.

पुरस्कारविजेते सर्वच चित्रपट पाहिले नाही परंतू "दो आंखे बारह हात" "पानसिंग तोमर" "देउळ" "श्वास" "कांजिंवरम" सारखे अतिशय दर्जेदार चित्रपट पाहिले आहे. आणि हे चित्रपट नक्कीच आशयघन वेगळे चित्रपट होते. त्यात काम केलेल्या कलाकारांनी अप्रतिम अभिनय केलेला. कांजिवरम मधे प्रकाशराज आणि पानसिंग मधे इरफानचा अभिनय बघून अशा चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद अधिक झाला. अर्थात इतर चित्रपट देखील छान होते.
प्रत्येकाची आपापली एक बघण्याची नजर असते.

"देवराई" पर्यावरण विषयाशी संबंधित म्हणूनच गौरवला गेला. याबद्दल खुद्द अतुल कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण त्यावर सुमित्रा भावे-सुनीलसुकथनकर यांनी खुलासाही केला होता, की ज्यावेळी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी फॉर्म भरले त्यावेळी मानसशास्त्र/ वैद्यकशास्त्र किंवा स्किझोफ्रिनियाशी साधर्म्य साधू शकेल अशा विषयासाठी त्या फॉर्ममधे रकाना नव्हता.
उपलब्ध असलेल्या पर्यायांतून त्यांनी फॉर्म भरला आणि अंतिम निर्णय अर्थातच ज्यूरींचा होता.

Pages