राष्ट्रीय पुरस्कार (नॅशनल अ‍ॅवॉर्ड) मिळालेले चित्रपट

Submitted by हर्ट on 28 May, 2015 - 05:25

माझ्यामते दरवर्षी एकूण ३० भारतिय सिनेमे निवडले जातात आणि ह्या ३० सिनेमांना नॅशनल अवार्ड दिला जातो. हे तीस सिनेमे कुठल्याही भारतिय भाषेतील असू शकतात. पुर्वी दुरदर्शन वर रविवारी मुकबधिरांसाठी बातम्या झाल्यात की त्यानंतर प्रादेशिक भाषेतील सिनेमा दाखवत. हल्ली प्रत्येक राज्याचे आपापल्या भाषेतील चॅनेल्स झालेले आहेत. असे असूनही आपल्यापर्यंत चांगले प्रादेशिक चित्रपट पोहचत नाहीत. ज्याअर्थी ३० सिनेमांना नॅशनल अवार्ड मिळतो म्हणजे निदान हे ३० सिनेमे तरी दर्जेदार असतील असे म्हणायला हरकत नाही.

हा धागा नॅशनल अवार्ड मिळालेल्या भारतिय सिनेमांबद्दल तर आहेच पण इथे तुम्ही इतर कुठल्याही भारतिय प्रादेशिक भाषेतील चांगल्या चित्रपटाबद्दल लिहू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<क्विन ला नॅशनल अ‍ॅवॉर्ड? अ ओ, आता काय करायचं किस खुशी मे? अ ओ, आता काय करायचं>
दक्षिणा तूपण ?

किती छान आहे क्वीन पिक्चरमधलं सगळंच ... तो, इंग्लिश विंग्लिश वगैरे काही बघून प्रसन्न वाटलं होतं..
नंतर डिटेल लिहीतो...

चित्रपटाच्या विविध कॅटेगरीज असतात आणि त्या कॅटेगरीजमधे आपली फिल्म येते की नाही हे फॉर्म भरतानाच लिहायचं असतं. ते तुम्ही लिहिले नाही तर त्या कॅटेगरीसाठी तुमच्या फिल्मचा विचारही होत नाही. म्हणजे क्ष कॅटेगरीसाठी विचार होतो तेव्हा निर्माता/दिग्दर्शकाने आमची फिल्म या कॅटेगरीत बसते हे फॉर्ममधे लिहिलेले असते.

द्विप हा चित्रपटाबद्दल कुणीतरी लिहिलय की खुप संथ होता. हो संथ होता पण मला आवडला होता. असे अनेक चित्रपट जे फारसे गाजलेले नाहीत पण पुरस्कार विजेते आहेत आणि मला आवडले आहेत. हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट मनोरंजक आणि जास्तीत जास्त लोकांना आवडणाराच पाहिजे हा अट्टाहास कशाला..

आणि चित्रपट आपल्याला झेपला नाही पण ज्युरींना आवडला तर त्यावरही आक्षेप कशाला..

मला आठवतेय इथे "फाईंडींग फन्नी" सारखा चित्रपट सुद्धा बरेच जणांना काहीतरी आशयघन चमत्कारीक अर्थपूर्ण वाटला होता, आणि याउलट मला तर पार भंजाळून निघालेले. मी तो चित्रपट दोन-अडीज तास खर्च करून पाहिला हे मला माझ्यासारख्याच आवडीच्या आणि विचारांच्या मित्रांना सांगायला लाज वाटत होती..

बरे लोकप्रियतेचा अर्थातच बॉक्स ऑफिस हिटचा निकष तरी सर्वांनाच कुठे रुचतो, "दुनियादारी" सारख्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी कित्येक भुवया उंचावतील. पुरस्कार लांबची गोष्ट एखादा "दबंग" वा "रावडी राठोड" लोक हौसेने २००-२०० रुपयांची तिकीटे काढून मोठ्या संख्येने बघतात आणि वर त्याला मसाला चित्रपट म्हणून हिणवतातही.

बरं या दोघांचा सुवर्णमध्य काढायला गेले तर शाहरूख आणि त्याच्या चित्रपटांना आजवर ४-५ राष्ट्रीय पुरस्कार कुठे गेले नसते, किंबहुना फिल्मफेअरमध्ये ते खोर्‍याने त्याने मिळवले आहेतच, मग आता तेच निकष लाऊन त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले असते तर ते देखील कित्येकांना रुचले नसतेच.

ज्युरी हे कुठूनही परग्रहावरून आलेले नसून आपल्यातीलच असतात, फक्त फरक ईतकाच इथे माणसागणिक आवडी बदलतात, दोन-चार ग्रूपमध्ये विभागली जात नाही तर तिचे शेकडो प्रकार असतात, इथेच पोल काढला या वर्षीचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळावा तर त्यातही कित्येक मतमतांतरे येतील बघा.

धागा छान आहे, विविध दर्जेदार चित्रपटांबद्दल वाचण्यास उत्सुक Happy

ज्यूरी संपूर्ण भारतातील चित्रपटसृष्टीत काम करणारे वेगवेगळ्या सिनियॉरिटीजचे आणि चित्रपटसृष्टीतीलच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतात.

अंतहीन, २००९ चा नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग चित्रपट(भाषा- बंगाली). राहुल बोस, शर्मिला टागोर, अपर्णा सेन, राधिका आपटे.

सध्या आजूबाजूला घडणाऱ्या लव्ह स्टोरीज पैकीच एक लव्ह स्टोरी, still different.

सुंदर कथा, सुंदर प्रेझेन्टेशन, सारे दमदार आर्टिस्ट, इव्हन राधिका आपटेची ही पहिली बांगला फिल्म पण तरीही ज्या सहजतेने तिने जी बंगाली पत्रकार उभी केली आहे it's just awesome. तिचे संवाद तिचेच आहेत का ते दुसऱ्या कोणाकडून डब केले आहेत ते माहित नाही, पण जर कला तिचाच आवाज असेल तर hats off to her (तिच्या बंगाली भाषेसाठी).

शंतनू मोइत्राचे संगीत, आहाहा.. especially फेरारी मोन ( या गीताला बेस्ट लिरिक्स तसेच बेस्ट प्लेबॅक सिंगर [फीमेल] चे पण अ‍ॅवॉर्ड आहे)
यात टायटल(आणि त्यावेळचे गीत) साठी एक छान प्रयोग केला आहे, nice creativity Happy

अजून एक बेस्ट गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा कॅमेरा. सुंदर objects नितांतसुंदर दाखवल्याबद्दल बेस्ट सिनेमाटोग्राफीचे अ‍ॅवॉर्ड पण याच चित्रपटाला मिळाले आहे.

सो, अगदीच ग्रेट वगैरे नाही पण डोळ्याला, मनाला आणि मेंदूला नक्कीच खाद्य मिळेल Happy

मी पाहिलाय अंतहीन पण पुर्ण नाही करता आला.

फेरारी मोन खुप सुंदर गाणं आहे..... ऐकत रहावं असं. शब्द कळत नाहीत पण श्रेया घोषालचा आवाज आणि शांतनु मोईत्राचं संगित गारुड करतं.

बरं या दोघांचा सुवर्णमध्य काढायला गेले तर शाहरूख आणि त्याच्या चित्रपटांना आजवर ४-५ राष्ट्रीय पुरस्कार कुठे गेले नसते, किंबहुना फिल्मफेअरमध्ये ते खोर्‍याने त्याने मिळवले आहेतच, मग आता तेच निकष लाऊन त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले असते तर ते देखील कित्येकांना रुचले नसतेच.>>>>>> झिन्ज्या उपटुन घेणारी बाहुली.

वाद मला पण नकोच प्रशु, पण हे साहेब नसीर्,ओम पुरी सारख्यान्चे दर्जेदार चित्रपट बघत नाहीत याची खन्त आहे.

चक दे इंडीया या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपट मधे गोल्डन लोटस अवॉर्ड मिळाला आहे.
हा नॅशनल अवॉर्ड मधे येतो का ?

Best Feature Film
Best Director
Best Popular Film Providing Wholesome Entertainment
Best Children's Film
Best First Film of a Director
Best Animated Film

इव्हन त्या गीताचे picturization पण अप्रतिम आहे.

मी तर त्या गीतातल्या घराच्या प्रेमातच पडलो होतो डोळा मारा आणि स्वप्नात सुद्धा मला तेच घर दिसायचं
>>

प्रशू कुठल गाण? कुठला सिनेमा? फरारी मोन? कसे स्पेल करायचे?

फिल्म - antaheen
गीत - ferari mon
गीत अप्रतिम आहे, नो डाउट.. पण माहित नाही तुला आवडेल का ते.

असा असेल तर माहित नाही, पण असे पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा डिव्हिडी संच निघायला हवा दरवर्षी. त्यात सबटायटल्स मात्र अवश्य असावेत. असे काही संच असतात, पण केवळ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा संच दिसला नाही कधी.

दिनेश...

"...पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा डिव्हिडी संच निघायला हवा दरवर्षी...." ~ अगदी मनातील लिहिले आहे तुम्ही. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना महत्त्व हे दिले गेलेच पाहिजे....ती परंपरा सातत्याने राहिली पाहिजे. पारितोषिके ज्याना मिळतात त्याबद्दल जरूर उलटीसुलटी मते त्या त्या वर्षी समाजात चर्चेला येतात. ज्याना मिळत नाहीत, त्यांच्यावर अन्याय कसा झाला यावरही रविवारच्या पुरवण्या भरल्या जातात....यात काही गैर आहे अशातील भाग नाही. पद्म पुरस्कारांबाबतही असे वारे सुटतेच. मात्र राष्ट्रीच चित्रपट पारितोषिकांमुळे तुम्हाला मला अशा भाषांतील चित्रपटांची माहिती या अनुषंगाने मिळते जी एरव्ही शक्यच नसते.

"पथेर पांचाली...चारुलता...सीमाबद्ध" आदी सत्यजित रे यांचे चित्रपट देशभर गाजले (आजही यावर चर्चा होत असतातच...विविध गटात, शहर पातळीवरील फिल्म क्लब्जमधून) ते त्याना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळेच हे नाकारून चालणार नाही. "चेम्मीन...संस्कार...घटश्राध्द....कथापुरुषन..." अशा मल्याळी कन्नड चित्रपटांना आपल्या नजरेला आणले याच राष्ट्रीय पुरस्कारांनी....अन्यथा ही नावेही कधी ऐकायला मिळाली नसती.

तुम्ही डीव्हीडीचा केलेला उल्लेख अगदी रास्त आहे. विशेष म्हणजे १०-१२ वर्षापूर्वी त्रिचुर येथील मित्रासोबत त्या गावच्या बाजारात फिरत असताना मला शाजी करुणच्या "पिरावी" या मल्याळी चित्रपटाची डीव्हीडी दिसली होती. हा राष्ट्रीय पारितोषिकविजेता चित्रपट हे मला माहीत होते. स्थानिक मित्राकडून ती सीडी घेत असताना दुकानातील ती व्यक्ती आणि मित्र यांच्यात त्यांच्या भाषेत संवाद चालला होता. थोड्यावेळाने मित्र म्हणाला "अशा सा-या मल्याळी चित्रपटांच्या सीडीज यांच्याकडे आहेत ज्याना नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत..." ~ ही चांगलीच बातमी. म्हणजे मल्याळी व्यवसायाने अशापद्धतीने त्यांच्या चित्रपटांच्या एकत्रित सीडीज काढल्या असतील तर ते स्वागतार्हच मानले जावे. आपल्या महाराष्ट्रात असा काही प्रकार असल्यास कुठे पाहाण्यात आलेला नाही.

असा असेल तर माहित नाही, पण असे पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा डिव्हिडी संच निघायला हवा दरवर्षी. त्यात सबटायटल्स मात्र अवश्य असावेत. असे काही संच असतात, पण केवळ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा संच दिसला नाही कधी.
>>>

अतिशय चांगली सुचना दिनेश. दरवर्षीचा एक संग्रहच जमा होईल. तसेच ऑस्करसारखे जर अंतिम निवड फेरीत ४-५ सिनेमे येत असतील तर त्यांचाही संग्रहात समावेश झाला तर अजून मजा येईल

ही कल्पना जेवढी इंटरेस्टिंग आहे तेवढीच घडायला अवघड. सरकारी पातळीवर काहीही घडण्याची शक्यता शून्य.
फिल्म नॅशनल अ‍ॅवॉर्डसच्या अंगणात पोचते तोपावेतो फिल्मने किती प्रवास केलेला आहे? रिलीज झालीये का? फेस्टिव्हल्सचा सीन काय आहे? कुठल्या कुठल्या पातळीवर विकली गेलीये? वगैरे उत्तरे प्रत्येक फिल्मसाठी वेगळी.
कुणी एकत्र करायचे म्हणले तरी इतक्या फिल्म्सची मोट बांधणे मुश्कील आहे.

Pages