आय वॉज देअर!!!!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

I-Was-There.jpg

अमेरीकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी समारंभ आणि मिरवणुक क्षणचित्रे.

President-Approaching.jpg

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.

President-Barack-Obama.jpg

उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन.
Joe-Biden.jpgParade-03.jpgParade-04.jpg
आणि शेवटी Proud

Arrest-Bush.jpg

काल सगळ्यांना सांगीतले होते की मी लिहीन म्हणुन या कार्यक्रमाबद्दलचे माझे २ शब्द. Happy
वॉशिंग्टन डी. सी. ला रहातोय त्यामुळे काहीच प्रवास न करता हा कार्यक्रम बघायला मिळणार या आनंदात बराक ओबामांच्या कार्यक्रमाला जायचे असे आधीच ठरवले होते पण काहीच प्लॅन केले नव्हते. शेवटी १९ तारखेला रात्री बसुन नवर्‍याने कुठली मेट्रो, कुठले रस्ते चालु-बंद असतील, हवमान कसे असेल, हा समारंभ जिथे होणार त्या नॅशनल मॉलचा नकाशा अशी सगळी माहिती गोळा केली. घरातुन सकाळी ६ वाजताच बाहेर पडायचे असे ठरवुन पहाटे चारचा गजर लावुन झोपलो. जरा उशीराच म्हणजे साडे पाचला जाग आली. आधी CNN लावुन काय चाललय ते बघीतले, नॅशनल मॉलचा परिसर जवळ जवळ संपूर्ण भरत आला होता. बरेचसे लोक तिथे रात्री १-२ वाजताच गेले होते असे टीव्हीवर कळले. म्हणजे फार फार तर सकाळी ७ वा. मॉलजवळ पोचलेल्या लोकांना तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता होती. तरीही जाऊन बघुयात असे आम्ही ठरवले. घरातुन निघुन मेट्रो स्टेशनला पोचल्यावर गर्दीची जाणीव झाली. तिथे स्टेशनच्या आत जायलाच मोठी रांग होती. ती पार करुन एकदाचे रेल्वेत घुसलो. क्षणभर आपण मुंबईच्या ट्रेनमध्ये आहोत की काय असे वाटले. मॉलच्या जवळ असलेली मेट्रो स्टेशनं सुरक्षिततेसाठी आधीच बंद केली होती पण त्याच्या पुढच्या स्टेशनवरपण प्रमाणाबाहेर गर्दी झाली म्हणुन आमची गाडी अजुन पुढे नेवुन त्याच्या पुढच्या स्टेशनला थांबवली.
तिथुन मॉल चालत बरेच दूर होता. बघावे तिकडे लोकच लोक दिसत होते. पारा -७ डीग्री से. दाखवत होता. हळुहळु थंडीची चांगलीच जाणीव व्हायला लागली. आम्ही मॉलला जात असतांनाच तिथल्या पोलीसांनी मॉलकडे जाऊ नका तिथे आत जाता येणार नाही असे सांगीतले. आणि गेलो असतो तरीही तो समारंभ इतक्या लांबुन फक्त ऐकताच येणार होता.
मग आम्ही परेड रुट वर जायचे ठरवले. अमेरीकेच्या Capitol समोर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्या नंतर राष्ट्राध्यक्ष आपल्या नवीन घरी म्हणजे White House ला समारंभपुर्वक रहायला जातात. ती परेड (मिरवणुक) ज्या रस्त्यावरुन जाते त्याला परेड रुट म्हणतात, त्या रस्त्यावर जायचे आम्ही ठरवले. तिथे जायला चार ठिकाणी सुरक्षा चेकपोस्ट ठेवले होते बाकी कुठुनच त्या रस्त्यावर जाता येत नव्हते. तिथे चेक केल्यावरच आत सोडले जाणार होते. हे कळल्यावर आम्ही तिथल्या सेक्युरीटी चेकच्या रांगेत उभे राहीलो. तिथेच आम्हाला काही जणांनी Arrest Bush लिहीलेली placards वाटली. Happy
आमच्या पुढे नक्कीच हजार-दोन हजार लोक होते. सगळे एकदम उत्साहात होते. अमेरीकेचे झेंडे हलवत जोरजोरात 'ओबामा' 'ओबामा' अश्या घोषणा देत होते. शपथविधीची वेळ झाली तरी रांग फार पुढे सरकली नव्हती पण आमच्या मागे रांगेत मात्र अजुन २-३ हजार लोक नक्कीच वाढले होते. जवळपास कुठेही मोठे स्क्रीन डिस्प्ले दिसत नव्हते. पण सेक्युरिटी पॉईंट वर आणि रांगेतल्या खूप जणांकडे रेडीओ होता. त्यामुळे तिथे उभे राहुन सगळ्या समारंभाची रनिंग कॉमेंट्री ऐकता येत होती. आम्ही उभे असलेल्या ठिकाणापासुन अगदी काही अंतरावर हा इतिहास घडत होता आणि याला आपण साक्षी आहोत ही जाणीवच खूप आनंद देणारी होती. शेवटी तो क्षण आला, सगळे जण कान देवुन अगदी शांतपणे शपथविधी ऐकत होते. ओबामांनी शपथ घेतल्याबरोबर सगळ्यांनी ओबामा ओबामा असा गजर करत आसमंत दणाणुन सोडला. रांगेतल्या खूप लोकांना आपले आनंदाश्रु आवरता आले नाहीत. सगळे अक्षरशः भारावुन गेल्यासारखे झाले होते. आम्ही उद्घाटनाचे भाषण पण तिथे रेडीओवरच ऐकले.
एवढे सगळे होईपर्यंत आम्हाला रांगेत उभे राहुन साडेचार तास उलटुन गेले होते. रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. तिकडे परेड लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा रेडीओवर झाली तरी आम्ही बाहेरच होतो. परेड रुटवर पण खूप गर्दी वाढल्यामुळे कुठल्याही क्षणी सेक्युरीटीचे दरवाजे बंद करण्यात येतील असे आम्हाला सांगीतले होते. एवढ्या थंडीत साडेपाच तास रांगेत उभे राहिल्यावर शेवटी आमचा नंबर लागला आणि आम्ही एकदाचे परेड रुट कडे निघालो. चेकींग करतांना तिथल्या पोलीसांनी परेड रुट वर कपडे आणि बुट काढायला सक्त मनाई आहे असे सांगीतले :फिदी:.
तिथे पोचल्यावर अगदी अर्ध्याच तासानी घोषणा झाली "Please welcome the President of United States of America Mr. Barack Obama". परत एकदा सगळीकडे टाळ्या, 'Yes We Can', 'Obama' घोषणा सुरु झाल्या. त्यानंतर काहीच क्षणात अमेरीकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबमा चालत येतांना दिसले. Y...e..sss. त्यांना बघुन लोक आनंदाने अक्षरशः वेडे झाले. काही फुटांच्या अंतरावर अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष चालत होते आणि आम्ही त्यांना पाहु शकलो. त्यावेळी त्यांना बघुन काय वाटले हे शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. Happy Yes, I was there.
त्यानंतर थोड्यावेळाने उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जील बायडन हे आले. शेवटी २ तास परेड बघुन एका ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार झालो या आनंदात रात्री ८ वाजता घरी आलो.

तळटीप:
१. व्हाइट हाउस, कॅपीटॉल, लिंकन मेमोरील, वॉशिंग्टन मॉन्युमेंट, स्मिथसोनिअन म्युझीयम हे सगळे असलेल्या भागाला नॅशनल मॉल असे म्हणतात त्या नावाचा कुठल्याही शॉपींग मॉलशी काही संबंध नाही.
२. शुद्धलेखनाच्या खूप चुका झाल्या आहेत, कोणी चुका सांगीतल्या तर मी नक्कीच दुरुस्त करेन. Happy

वॉव मस्त च ग रुनि!!

१. व्हाइट हाउस, कॅपीटॉल, लिंकन मेमोरील, वॉशिंग्टन मॉन्युमेंट, स्मिथसोनिअन म्युझीयम हे सगळे असलेल्या भागाला नॅशनल मॉल असे म्हणतात त्या नावाचा कुठल्याही शॉपींग मॉलशी काही संबंध नाही.>>>>>>

अरेरे!! तळटिपा लिहून प्रयत्न केलास खरा पण ...... Proud Biggrin

छान ! (तटी १ तर खासच :))

  ***
  भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी

  वर्णन खूप छान केल आहे. टीव्ही वर पाहणे आणि प्रत्यक्ष यात खूप (भावनांची आंदोलने) फरक असतो.
  धन्यवाद.

  सही! Happy

  रूनी.... पुन्हा एकदा अभिनंदन ... आता खर्‍या अर्थाने तो समारंभ पाहिला असे वाटतंय

  रूनि, शेवटचा फोटो एकदम सुभान अल्लाह घेतलायंस ! Happy

  वाचलं वर्णन एकदाचं. मस्तच. वाचतानाही रोमांच आले अंगावर. प्रत्यक्ष बघताना काय वाटलं असेल?

  "भारतात अशी किती बॅनर्स बनवावी लागतील ? ....."

  कोणीतरी ही कॉमेंट लिहिली आहे वर. फारच जब्बरी आहे! मी "धाय मोकलून” हसलो:-)
  लालू, मुलायम, शिबू, ममता, ऋतंभरा...छ्या! कहर आहे बुवा!!

  मस्त वाटल एकदम वाचुन. मला शिकागो च त्यांच भाषण ऐकतानाच आपण तिथ असायला हव होत अस फार वाटलेल. असो. कधीतरी प्रत्यक्ष पहायला मिळतील. ball room मधली ओबामांची ती old school
  comment एकदम क्युट होती.:)

  The smartest thing you can do is NOT to show people your insecurities or the things that annoy you.

  सहीच Happy

  रुनी , ... वा आम्ही पण तुझ्यासोबत फिरुन आलो ... धन्यवाद अन अभिनंदन तुझे.

  रुनी
  खुप छान्.......वाचुन मस्त वाटल.

  Roops..........

  मस्तच !!!! ग्रेट अनुभव ना ?

  अभिप्रायासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.

  Pages