इंश्युरंस आणि इन्व्हेस्टमेंट - अर्थात "टू बी ऑर नॉट टू बी !!" ची गोष्ट ...

Submitted by सीए केडी on 21 May, 2015 - 06:22

जनसामान्यांमध्ये इंश्युरंस आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टींबद्दल कमालीची कन्फ्युजंस , समज गैरसमज आढळून येतात . आणि आजकाल जश्या जश्या पेन्शन मिळणाऱ्या नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत त्या प्रमाणात हे गैर समज वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सामान्यत: हातात असलेला पैसा कुठेतरी गुंतवला की मनावरचे दडपण कमी होते. (असं आपल्याला वाटतं ) पण आपण काही गोष्टी साफ विसरून जातो , उदाहरणार्थ :

1) आपल्याला नक्की काय हवे होते अथवा आहे ?
2) आपल्याला जे हवे होते, ते या व्यवहारातून मिळणार आहे का ?
3) जे आऊटकम या व्यवहारातून मिळणार आहे ते आपल्याला पुरेसे अथवा उपयोगाचे आहे का ?
4) व्यवहारातून नफा मिळणार आहे का ? "Risk-cover" काय आहे ?
5) आपण जो व्यवहार केलाय तो फक्त आपल्यालाच उपयोगी आहे ? का पूर्ण कुटुंबाला त्याचा उपयोग होणार आहे ?
6) आपण जे पैसे व्यवहारात गुंतवत आहोत , त्याची विल्हेवाट समोरील कंपनी/एजन्सी/इंश्युरर कशी लावणार आहे ?

तर एकंदरीत असं पाहिलं , तर १० मधील ७ व्यक्तीना वरील प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची कल्पना असेलच असं नाही.

त्यामुळेच की काय फसव्या किंवा कमी प्रतीच्या गुंतवणूक कंपनीज किंवा इंश्युरंस कंपनीजचं फावतं . म्हणून कोणतीही गुंतवणूक करण्या आधी , जसं आपण आपल्या घरच्या लोकांशी सल्ला मसलत करतो , त्याच प्रमाणे आपले कौटुंबिक "कर-सल्लागार" किंवा "चार्टर्ड-अकौंटंट" यांच्याशी चर्चा करण्याची खुणगाठ बांधणे प्रत्येकासाठी फार गरजेचे आहे.

पण नुसतं त्या चर्चेने भागणार नाही. आपल्याला स्वत:स सुद्धा काही अतिशय बेसिक बाबींची माहिती असणे फार गरजेचे आहे. आपण येथे आता काही अश्याच बाबींवर थोडी चर्चा करू आणि काही गोष्टीमधील बेसिक फरक समजावून घ्यायचा प्रयत्न करू.

1) फीस ,कमिशन,चार्जेस इत्यादी ?? अर्थात "वाघ म्हंटल तरी खाणार वाघोबा म्हंटल तरी खाणार !!"

बरेचदा असा अनुभव येतो की लोक कमीतकमी पैश्यात जास्तीत जास्त "कमाई/फायदा" कशी/कसा होईल हे पहातात. इथेच खरी गोम आहे. आपणं पहिल्यांदा हे समजावून घेतलं पाहिजे की समोरची (इंश्युरंस/गुंतवणूक) कंपनी सुद्धा धंदा करायला बाजारात उतरलेली आहे. सबब "There are NO Free Lunches !!" हे कायम लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे , प्रत्येक कंपनी तुम्ही त्यांच्याशी करत असलेल्या प्रत्येक व्यवहारात काही प्रमाणात "नफा" कमावणारच हे पक्कं लक्षात घ्यायला हवं. पण कोणताही व्यवहार करायच्या आधी लेखी स्वरूपात वरील चार्जेस आणि आकाराची माहिती घेणे फार महत्वाचे ठरते.

2) "इंश्युरंस का गुंतवणूक ? अर्थात " आंधळीपेक्षा तिरळी बरी."

यानंतर आपल्याला आता नक्की कोणता व्यवहार करायचा आहे याचे "One-to-One Analysis" करणे फार गरजेचे आहे. कारण बऱ्याच लोकाना इंश्युरंस आणि गुंतवणूक यातला नक्की फरक काय ? या बद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. त्यामुळे या दोघांतील बेसिक फरक समजावून घेणे फार महत्वाचे आहे.

इंश्युरंस V/s गुंतवणूक
a) इंश्युरंस हा आपण आपल्या "जिवीताचे" अथवा "आरोग्याचे" रक्षणार्थ अथवा भरपाईस्तव काढतो . गुंतवणूक ही फक्त "फायदा" कमावण्यासाठी केली जाते.
b) इंश्युरंस मधून साधारणत: "रिटर्न्स" ची अपेक्षा धरणे टाळावे. पण गुंतवणुकीतून काही न काही प्रमाणात फायदा हा व्हायलाच हवा. तसेच , गुंतवणुकीतून "जिवीत/आरोग्य" रीस्क कवर चा विचार करणे संयुक्तिक नाही कारण गुंतवणूक ही इंश्युरंस नसते.
c) इंश्युरंस हा साधारणत: स्वत:चा , कुटुंबाचा , वस्तूंचा किंवा अवलंबून व्यक्तींचा काढला जातो. यावर ठरते की "जिवीत/आरोग्य" हानी झाल्यास पैसा कोणास / कधी मिळेल. पण गुंतवणूक ही मुख्यत: स्वत:च्या (Joint अथवा Co-investment अपवाद वगळता ) नावावर केली जाते.
d) इंश्युरंस ही बाब प्रत्येकास अत्यंत गरजेची आहे. गुंतवणुकीचे तसे नाही , गुंतवणूक न करता आपण आपला पैसा ठेवींच्या स्वरूपात बँकेत ठेऊ शकता.
e) या शिवायही काही फरकांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. परंतू बेसिक फरक जाणून घेण्यासाठी वरील मुद्दे पुरेसे आहेत.

3) योग्य कंपनी निवडणे !! अर्थात "निंदकाचे घर असावे शेजारी !! "

आपण एकदा मुद्दा क्र १ आणि २ समजावून घेतले की आता आपला प्रवास पुढे सरकतो . आता पुढचा प्रश्न हा , की कोणाशी व्यवहार करायचा ? या प्रश्नाचे इथ्यंभूत उत्तर कर सल्लागार देईलच पण आपणही "घराचा अभ्यास" करणे तितकेच महत्वाचे आहे.

तर एकंदरीत आपल्याला ज्या गोष्टीचा व्यवहार करायचा आहे , म्हणजे गुंतवणूक अथवा इंश्युरंस, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीज चे काही "Vital Stats " पाहणे फार गरजेचे ठरते. उदा:

तुम्हाला जर इंश्युरंस काढायचा असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर ,
a) क्लेम सेटलमेंट रेशियो किंवा "EPS" अर्थात अर्निंग पर शेयर
b) कंपनीचा मार्केट शेयर
c) सद्य परिस्थितीत कंपनीविरुद्ध चालू असलेले काही खटले ई.
d) ऑप्शनल रायडर्स , कंपलसरी रायडर्स , अटी ई. ची माहिती.
e) कंपनी ची आर्थिक स्थिती आणि "फायनंशियल हिस्ट्री"
f) आजूबाजूचे लोक ज्यांनी या कंपनी शी व्यवहार केला आहे त्यांचे अनुभव.
g) तुम्ही घेत असलेल्या "प्रोडक्ट" ची इथ्यंभूत "लेखी" माहिती.
h) कंपनीचा "असेट-बेस" , "मार्केट सिक्योरिटी आणि कॅपिटलायझेशन"
i) कंपनीच्या "Management staff and Key Persons" बद्दल माहिती .

या आणि अश्या काही बेसिक गोष्टींबद्दल तरी किमान माहिती असणे प्रत्येकास गरजेचे आहे.

4) गुंतवणूक आणि इंश्युरंस - वाटणी ? अर्थात "ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?"

बरेचदा असे आढळून येते की लोक गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक अथवा इंश्युरंस काढून ठेवतात. आता यात आणखीन त्रासाचा भाग हा आहे की गुंतवणूक एकवेळ जास्त झाली तर त्यात सुधारणा करून आपण योग्य तितकी गुंतवणूक चालू ठेवू शकतो, पण इंश्युरंस करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की इंश्युरंस हा आपल्या सरासरी उत्पन्नाच्या जास्तीत जास्त १० पटच घ्यावा. जास्त घेतल्यास आपला क्लेम "पेंडन्सी" मध्ये जाऊन कायदेशीर बाब उत्पन्न होण्याचा संभव असतो. त्याचप्रमाणे हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की गुंतवणूक हा काही इंश्युरंस ला पर्याय ठरू शकत नाही. आणि त्याच प्रमाणे इंश्युरंस हा काही गुंतवणुकी ला पर्याय ठरू शकत नाही.

त्यामुळे इंश्युरंस काढताना , समजा आपणा स्वत:स काही झाले तर आपण काढलेली कर्जे , मुलांची शिक्षणं , लग्न , इतर जवाबदाऱ्या पूर्ण करून आपल्या जोडीदारास पुढील १० वर्षे तरी तरतूद होईल इतक्या "सम-अश्योर्ड" चा इंश्युरंस काढणे हा "थंब-रूल" कायम पाळला पाहिजे. या शिवाय , आपल्या जीवितास हानी होऊन आपण कमावते राहू शकत नाही , अशी शक्यता गृहीत धरून त्या प्रकारचा इंश्युरंस असणे सुद्धा फार महत्वाची बाब आहे. त्यामुळे टर्म आणि मेडिक्लेम या इंश्युरंस प्रकारांची माहिती असणे गरजेचे आहे. (याबद्दल ब्लॉग मध्ये पुढील लेखात)

हे केल्यानंतर , जे काही "Surplus" उरते ते बिनबोभाटपणे कोणत्याही गुंतवणूक प्रकारात आपण ठेवू शकतो.
सबब , इंश्युरंस किंवा गुंतवणूक ? असा प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित होतो , तेव्हा तेव्हा वरील बाबींकडे लक्ष देऊन तसे निर्णय घेतल्यास आपला तोटा होणार नाही हे निश्चित.

सीए केदार दत्तात्रेय गोगटे

बी.कॉम ; एमसीए , एसीए , DISA (New Delhi)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दा d) गुंतवणूक न करता आपण आपला पैसा ठेवीच्या रुपात ठेवू शकता???????
बरेच मुद्दे एकाच वेळी मांडून घोळ उडाला आहे.लेखाची थोडी सुरुवात करून वाचकांचे जसे प्रश्न येतील तशी उत्तरे दिली तर बरे होईल.