विडंबन - मेरा जूता है जापानी

Submitted by आशूडी on 21 May, 2015 - 02:34

राज कपूरच्या जागी झी मराठीवरच्या "का रे दुरावा" मधल्या आदितीला ठेवून (हा हंत हंत!) खालील गाणे मेरा जूता है जापानी च्या चालीवर म्हणावे.

माझी चप्पल तुटलेली
विरार लोकल चुकलेली
जयची मी सिक्रेट पत्नी
तरी मागे लागली रजनी...

टिं.. टिणीणी णी.. णी णी.. णिणिणी..

शोभावैनींचा स्वैपाक करूनी
गोळीसह देते आण्णांना पाणी..
कुणाला काय थाप मारलेली
असते सदैव माझ्या ध्यानी...

टि...टिणीणि ...

नवरा नशीबी भोळा सांब
बापाला आहे पैशाचा दंभ..
ओ....ओओओ
केतकरकाका उपटसुंभ
माझी नेहमी बोलती बंद!

टि..टिणीणीणि णी...

मॉन्स्टर, टाईम्स आणि नौकरी
आमची करती हकालपट्टी
आख्ख्या मुंबईत एकच चाकरी
ओ..ओ ओ ओ
एका घरात राहूनी...
खातो वेगवेगळी भाजी भाकरी..

टि.टिणीणीणी..णिणिणी..टीणीणी

काम आमचे भलतेच सोपे
प्रेझेंटेशनने क्लाएंट झोपे
डोमेन नॉलेज जरी नसले
तरी मिटींग झकास होते

टि टिणीणीणी टिणीणीणी.. णीणीणि...

आण्णा कायम दुःखात मग्न
नंदिनी-काका करतील लग्न
जुई रजनीची स्वप्नं भग्न
गट्टूचा होणार प्रेमभंग..
टि.. टिणीणी णी टिणीणि णी णि णी..

Group content visibility: 
Public - accessible to all site users