कुठे पोचायचे असते ...

Submitted by वैवकु रीटर्न्स on 13 May, 2015 - 11:09

कुठे पोचायचे असते असा मुद्दा असत नाही
जरा थांबून घे जोवर तुला हे आकळत नाही

उमाळे यायचे पूर्वी , उधाणत जायचा वारा
असे का दाटते हल्ली, हवासुद्धा हलत नाही

किती दयनीय आहे हे तुझे विस्तीर्ण गार्‍हाणे
तुझी ही गायकी जन्मा अताशा ऐकवत नाही

दिवसभर काम नसते.. आणि रात्री झोपही नसते
तुझ्या दु:खात असलो की मला काही सुचत नाही

किनार्‍यावर उभे असतात.. त्यांना गर्व का होतो
प्रवाहातून बघणारा कधी का मी म्हणत नाही

मनाच्या आतला विठ्ठल मनाबाहेरचा विठ्ठल
मला हाही जमत नाही मला तोही जमत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाच्या आतला विठ्ठल मनाबाहेरचा विठ्ठल
मला हाही जमत नाही मला तोही जमत नाही

>>>>> कुणाशी तरी जुळवून घ्यावे लागेल. मक्ता आवडला