प्रेम शोधले दगडामध्ये

Submitted by संतोष वाटपाडे on 13 May, 2015 - 02:17

आले गेले बसले नाही
कोणीसुद्धा रडले नाही..

ठेव चितेवर मला एकदा
कधी वेगळे घडले नाही..

जरी प्यायचो प्रिये नेहमी
पाऊल तिरपे पडले नाही..

लपवत आलो जखमा सार्‍या
दुःख नेमके दडले नाही..

पहा वादळा उन्मळलो मी
पान तरीही झडले नाही..

मृत्यू दारी स्वतःच आला
माझे काम रखडले नाही..

असह्य होते दुखणे जोवर
काळीजही ओरडले नाही..

विज जराशी चमकून गेली
मेघ कसे गडगडले नाही..

प्रेम शोधले दगडामध्ये
तुझ्यात का सापडले नाही..

- संतोष वाटपाडॆ (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरी प्यायचो प्रिये नेहमी
पाऊल तिरपे पडले नाही..

लपवत आलो जखमा सार्‍या
दुःख नेमके दडले नाही..

अप्रतिम रचना...
दादा
निशब्द केलंत...