मराठी मंडळ

Submitted by Usha Mahisekar on 3 May, 2015 - 22:50

मराठी मंडळे
मराठी माणूस –

तुझ आणि माझ जमेना
तुझ्यावाचून करमेना

मराठी माणस एकत्र येतात
महाराष्ट्र मंडळे तयार होतात

प्रत्येक प्रांताची प्रत्येक गावाची
उत्तरेची दक्षिणेची पूर्वेची पश्चिमेची

गटागटात स्पर्धा वाढते
भांडणाची ईर्षा पेटते

कधी एकमेकांची मैत्री वाढते
नविन कल्पना निर्माण होते

पुन्हा सगळे एकत्र येतात
सुखासमाधानाने नांदतात

खर म्हणजे भारताबाहेरील शरिरातला
मराठी आत्मा स्पन्दन करत असतो

उषा महिसेकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users