Submitted by हायझेनबर्ग on 30 April, 2015 - 12:21
आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे
ह्या गाण्याने पुन्हा एकदा वेड लावले, पुन्हा म्हणण्यापेक्षा मागच्या कैक वर्षात, तास तास भर रिपिट मोडवर ऐकायच्या माझ्या डझनभर गाण्यांच्या लिस्ट मध्ये ह्या गाण्याचा रिपिट काऊंट पुन्हा नव्याने वाढतो आहे.
ऊस्तादजींची कैक गाणी प्रचंड आवडती आहेतच, पण त्यातल्या त्यात त्यांच्या ठहराव वाल्या, डीप आवाजाची जादू खुलवणार्या 'आओगे जब तुम ओ साजना' सारख्या गाण्यांनी कानांवाटे मनाला जो थंडावा मिळतो तो अवर्णनीय आहे.
अताश्या माझ्या रिपिट मोड वाल्या लिस्टमधून कमर्शिअल सिंगर्स एग्झिट घेवून क्लासिकल सिंगिंगच्या प्रचंड कष्टाचा मार्ग चोखाळून आलेले गायक ठाण मांडून बसत आहेत.......कानांना सकस ऐकण्याची सवय होते आहे की वय झाल्याचे लक्षण म्हणावे हे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार आवडते गायक. आओगे जब
फार आवडते गायक. आओगे जब ..मुळेच माहिती झाले. मग इतर मिळवून ऐकले.
शास्त्रीय फार कळत नाही पण यांचा आवाज मोहिनी घालतो. जगजीत सिंग स्मृतीनिमित्त "याद पिया की आये" बेभान म्हणलं होतं. तोवर बडे गुलाम अली साहेबांचाच आवाज फिट्ट होता डोक्यात या गाण्यासाठी पण आता राशिद खानही आठवतात.
वा.. सुभान अल्लाह !!
वा.. सुभान अल्लाह !! सगळ्यांच्या पोस्ट्स साठी.
दाद, ते कोक स्टुडिओतलं ऐकलं नव्हतं, ऐकतो आता.
हार्डकोअर क्लासिकल ऐकणार्यांसाठी-
त्यांचा मालकंस ऐकावा.... !! ऐकावाच !!!
रार नी जे लिहिल ते फार छान
रार नी जे लिहिल ते फार छान लिहिल पण मी जेंव्हा हे गाण ऐकल तेंव्हा मला हे गाण मुळात भावपुर्ण नाही वाटल. ह्याहीपेक्षा सुंदर सुंदर आणि भावपुर्ण गाणी आहेत सिनेमात त्या तुलनेनी हे गाणे अगदी फिके फिके वाटले मला. आणि पडद्यावरील कलाकारांच्या नजरेत तो भाव नाही तो गीताच्या ओळीत सामावलेला आहे. म्हणून कदाचित हे गाणे तितके हीट झाले नाही. गाणे हिट झाले की ते आपोआप सामान्य माणसापर्यंत जाऊन पोहचते. मला आठवते जेंव्हा माधुरीचा देवदास लागायचा होता त्यावेळी इथे सिंगापुरात मी ट्रेलर म्हणून त्यातील हरा रंग डाला हे गाणे ऐकले आणि ते लगेच मला भावले.
तुम्ही म्हणता तसे परत परत एक दोन वेळा ऐकेन.
वाह! क्या बात है. एक से बढकर
वाह! क्या बात है. एक से बढकर एक पोस्ट्स आहेत :). आओगे जब तुम आणि पूरेसे अनेकदा ऐकलीयेत. कारण रार म्हणते तेच, आवाज!! :). दादमुळे कोक स्टुडिओतलं छिने रे सुद्धा ऐकलं. सुपर्ब.
अवांतर - त्याच कोक स्टुडिओतलं बिस्मिल्लाह असंख्य वेळा ऐकलंय
https://www.youtube.com/watch?v=w1sqYgnwEqI
हा लेख कसा राहिला! आओगे जब
हा लेख कसा राहिला! आओगे जब आणि पुरेसे जरासा फार आवडती गाणी आहेत! त्यांनी गायलेले राग देखील ऐकले आहेत. आता बाकीच्या लिंक्स ऐकेन!
दाद ... ते ऐकून झाल्यावर दोन
दाद ...
ते ऐकून झाल्यावर दोन दिवसांनी मुल्गा गुणगुणत होता.. छिनी रे मोरा चैन.. त्यातलं ऑर्केस्ट्रेशन हरवलं होतं... जोग उरला होता. >> अगदी, एकच आवाज लक्षात रहातो.
रशिद खान यांचा एक तराणा : राग यमन.
अफलातून आहे...
https://www.youtube.com/watch?v=32GFqABm9is
हाजझेनबर्गंचा दोष.. अख्खा
हाजझेनबर्गंचा दोष.. अख्खा वेळ राशिदभाई एके राशिदभाई ऐकतेय...
(हा धागा राशिदखानांच्या लिन्कांसाठी नाही.. त्यामुळे, हाझेनबर्ग ह्यांनी सांगितलं तर उडवेन नक्की... त्या आधी पटकन ऐकून घ्या
)
ही पारंपारिक ठुमरी - दिवाना किये शाम क्या जादू डाला - https://www.youtube.com/watch?v=v1UG4tbnCXs
लाईव्ह प्रोग्रॅम. हार्मोनियम खल्लास वाजवतोय. आनिंदो तबल्यावर आहेत. मज्जा आहे.
आनिंदो शेवटी लग्ग्या लावताना बघावच. हा माणूस हलतच नाही... गंमत आहे. म्हणजे छातीच्या वर कॅमेरा लावला तर हातांची घडी घालून बसला असेल असं वाटतं... भारी.
(आमचं म्हणजे तबला वाजवताना सगळं हलवून सोडणार.. काय काय ऐकायला मिळेल असं वाटतं .. पण तितके छान आवाज येतिल असं नाही... (म्हणजे नाहीच) असं नवरा म्हणतो)
मला राशिद खान आणि वडाळी
मला राशिद खान आणि वडाळी ब्रदर्सना अगदी समोरुन ऐकायची संधी आली होती. अगदी लिमिटेड लोकांसाठी कार्यक्रम होता. पासेस हातात होते. पण वेळ जुळली नाही आणि संधी हुकली. वडाळी ब्रदर्सच्या कार्यक्रमाचं काही माबोकरांनाही विचारलं होतं पण कुणालाच जमत नव्हतं तेव्हा.
अश्याच कार्यक्रमांमध्ये हरिहरन, येशूदास, भूपेंद्र आणि मिताली सिंग, भीमसेन जोशी, वीणा सहस्रबुद्धे वगैरेंना ऐकलं आहे.
हा धागा राशिद खान फॅन क्लब
हा धागा राशिद खान फॅन क्लब झालाच बहुतेक. दाद म्हणते तसं माझ्याकडे सुद्धा कालपासून केवळ आणि केवळ राशिद खान पारायण चालू आहे :). दाद, तुझी कालची लिंक पाहिली आणि " छीने रे मोरा" भयंकर आवडलं. नजरेतून कसं सुटलं होतं देव जाणे.
राशिद खान आणि हरिहरन यांची एका खासगी मैफिलीतली जुगलबंदी सुद्धा अफलातून आहे. हि त्याची लिंक
https://www.youtube.com/watch?v=1rf344qbbtM
अश्विनी के... भाग्यवान र्तीन
अश्विनी के... भाग्यवान
र्तीन वर्ष मागे ,राशीद भाईंबरोबर पेटीवर सुधीर नायक होता.. खूप छान मित्रं आहे... त्यामुळे भयंकर झक्कास जागेवरून ऐकायला मिळालं.
(बाजूच्या खुर्चीवर सुरेश वाडकर आणि तलत अजीज.. इकडे आड तिकडे विहीर. थोड्या वेळाने मी विसरले आणि मस्तं एंजॉय केला... त्यांचं ते जाणे.. बिचारे )
जबरी. मस्त गाणे व चर्चा.
जबरी. मस्त गाणे व चर्चा. रारचे गाणे उलगडणे अप्रतिम.
असच मला डोरमधले 'ये होंसला' व चक दे मधले 'मौला मेरे ले ले मेरी जान' ही दोन्ही गाणी भयंकर आवडतात. दोन्ही अशीच डोक्यात भन्नाट घुसतात व साठुन रहातात.
इथे सगळ्यांनी दिलेल्या लिंक्स
इथे सगळ्यांनी दिलेल्या लिंक्स हेडरमध्ये टाकशील का चमन?
युट्युबचे फार उपकार आहेत मानवजातीवर
मी त्यांना शास्त्रीय गायक
मी त्यांना शास्त्रीय गायक म्हणूनच ओळखत होतो.. सिनेमात गाणारे ते तेच, हेच माहीत नव्हतं
चान लिहिलंय सगळ्यांनी.
कांपो, मौला मेरे उस्तादांचं
कांपो, मौला मेरे उस्तादांचं गाणं नाहीये. एक कृष्णा नावाचा सिंगर आहे त्याने गायलं आहे. याच कृष्णाने 'मैं जहाँ रहूँ' मधे उस्तादांची साथ केली आहे.
युट्युबचे फार उपकार आहेत मानवजातीवर >>> +१
सिटीलाईटसमधलं 'भागी भागे'
सिटीलाईटसमधलं 'भागी भागे' (उषा उत्त्थुप बरोबर आहे) ऐकलंय का?
https://www.youtube.com/watch?v=DM5833K_5p8
रार "झीनी रे झीनी" पण
रार "झीनी रे झीनी" पण ऐक.
https://www.youtube.com/watch?v=YxIhdg2imjk
तसंच "आईयो पियाजी"
https://www.youtube.com/watch?v=Wvmd5iipZ1g
त्याच कोक स्टुडिओतलं
त्याच कोक स्टुडिओतलं बिस्मिल्लाह असंख्य वेळा ऐकलंय स्मित
>> बिस्मिल्ला कहर आहे. सलिम सुलेमान यांनी बॉलीवूड मध्येही चांगलं केलय पण ते एवढे पॉवरफुल असतील असे वाटले नव्हते. बिस्मिल्ला ऐकताना 'पिया तोसे नैना लागे 'या 'गाईड'गीताची आठवण येत राहते. दोन्हींचा राग एकच आहे का?
मस्त!! फार हुरहुर लावणारं
मस्त!! फार हुरहुर लावणारं गाणं.
आता वरची सर्व ऐकणार.
----
सिंडरेला ने दिलेले ऐकावेत आणि पहावेत देखील. पं. भिमसेन जोशी व उस्ताद खान यांची छोटीशी जुगलबंदी. फार मस्त आहे. पंडितजी वयोमानामुळे जरा थकलेत पण शेवटी सिंहच, अद्वितीय प्रतिभा कशी कमी होईल. आपल्या मराठी संगीतात ते काही खास जागा गात असत त्या जागांना उस्तादांकडुन मनापासुन वाहवा मिळालीये.
कांपो, मौला मेरे उस्तादांचं
कांपो, मौला मेरे उस्तादांचं गाणं नाहीये. >>
रमड मला माहीत आहे मी गाण्याचा संदर्भ दिला फक्त. मस्त असल्याने.
किती छान
किती छान
..कानांना सकस ऐकण्याची सवय
..कानांना सकस ऐकण्याची सवय होते आहे की वय झाल्याचे लक्षण म्हणावे हे?>>>> १
छीने रे मोरा>>>> भन्नाट!
छीने रे मोरा>>>> भन्नाट!
Pages