ॲन्ड्रॉईड वरील रूट आणि इतर माहिती

Submitted by व्यत्यय on 30 April, 2015 - 01:54

या लेखामध्ये मी वरचेवर भर टाकत रहाणार आहे. शक्य तोवर नवीन माहिती मूळ लेखाच्या शेवटीच जोडायचा प्रयत्न करेन. पण जेव्हा ते शक्य नसेल तेव्हा नवीन मजकूर मी ठळक करेन.

अ‍ॅन्ड्रॉईड ही लिनक्स (Linux) वर आधारित मोबाईल फोन साठीची ऑपरेटिंग सिस्टम (ओ-एस) आहे. अर्थात हल्ली फोन शिवाय काही TV वगैरे उपकरणे पण अ‍ॅन्ड्रॉईड वर चालतात. लिनक्स आणि फ्री (मुक्त) सोफ्टवेअर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी त्यावर नंतर एक वेगळा धागा काढेन. सध्या लिनक्स हि मायक्रोसोफ्टच्या "विंडोज" सारखीच एक ऑपरेटिंग सिस्टम आहे एवढं समजून घेतलं तरी चालेल. तर "रूट (root)" म्हणजे लिनक्स वरचा admin. फोन रूट करणे म्हणजे आपल्या फोनवर admin चे अधिकार प्राप्त करणे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या फायलींशी काड्या करण्याची क्षमता प्राप्त करणे, अर्थातच, त्या फोनचा खर्‍या अर्थाने 'मालक' उर्फ 'सुपरयुजर' उर्फ 'ॲडमीन' बनणे, याला म्हणतात 'रूटींग' उर्फ रूट करणे. मायबोलीवरचे ॲडमीन ज्याप्रकारे उपद्रवी युजर ना हाकलून लावू शकतात तसेच ज्यांच्याकडे "रूट" चे अधिकार आहेत ते विनाकारण जागा खाणार्‍या व बहुतांशी निरुपयोगी, वा त्रासदायक सॉफ्टवेअर्स/गेम्स ना हाकलून लावू शकतात. तसंच adblock सारखी apps इन्स्टॉल करणं किंवा फोनचा CPU 1GHz ऐवजी 1.2 GHz ला चालवणं (CPU overclock) वगैरे गोष्टी साध्य करता येतात

रूट च्या अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्या पण येतात. उदाहरणार्थ फोन चालण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या फाईल्स आपण अनवधानाने डिलीट करू शकतो जे एरवी शक्य झालं नसतं . किंवा CPU प्रमाणाबाहेर overclock केला तर तो कायमचा खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण चुकीची पावले तर उचलत नाही ना याची काळजी बाळगावी लागते. याच कारणासाठी बहुतेक सगळ्या फोन साठी फोन रूट केला की त्याची वॉरंटी संपते. एक सन्माननीय अपवाद म्हणजे यु युरेका (Yu Yureka). युरेका ला रूट केलं तरी त्याची वॉरंटी शाबूत रहाते.

प्रत्येक फोनवर रूट अधिकार प्राप्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अगदी स्क्रीन वरचं एक बटन दाबण्याइतकं सोपं किंवा तुमच्या PC वर २-३ वेगवेगळी सोफ्टवेअर install करून नंतर फोन PCला जोडून ७-८ commands काळजीपूर्वक टाईप करून फोन ३-४ वेळा रीबूट करण्याइतकं कठीण. तुमच्या फोनला रूट करायची पद्धत शोधून काढण्यासाठी http://forum.xda-developers.com/ इथे जाऊन तुमचा फोन शोधून काढा आणि तिथे दिलेल्या स्टेप्स नीट पार पाडा. एखादी स्टेप जरी चुकली तरी तुमचा फोन बंद पडू शकतो. यालाच फोनची ब्रिक होणं म्हणतात. म्हणजे फोन आता फक्त विटेच्या आकाराचा तुकडा राहिला आहे आणि त्याचा दुसरा काही उपयोग नाही. पण काळजी करू नका. फोनची वीट बनवणं हल्ली कठीण होत चाललं आहे. ब्रिक झालेला फोन पण बऱ्याचदा पुन्हा चालू करता येऊ शकतो. पण या सगळ्या उपद्व्यापासाठी थोडा वेळ देणं गरजेचं असतं.

कोणालाही असा प्रश्न पडणं सहज शक्य आहे की एवढे सगळे धोके पत्करून रूट का करावे? रूट केलेल्याचे काही फायदे इथे नमूद करत आहे.

१) तुमच्या फोनसोबत default आलेली applications जी तुम्ही वापरत नाही पण uninstall पण करू शकत नाही. अशी applications तुम्ही रूट नंतर सहज काढून टाकू शकता.
२) adblock install करणे ज्यामुळे वेगवेगळ्या applications मध्ये दिसणाऱ्या जाहिराती गायब होतील.
३) Firewall install करणे ज्यामुळे फक्त आपण परवानगी दिलेली applications इंटरनेटशी संपर्क करू शकतील
४) फोनसोबत आलेली मूळ ऑपरेटिंग सिस्टम बदलून cyanogen mod सारखी Custom ROM install करणे. अशा कस्टम रॉम Privacy Guard सारखी कित्येक फीचर्स देतात जी मूळ अ‍ॅन्ड्रॉईड मध्ये नाहीत.
५) फोनचा performance वाढवणाऱ्या काही गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ फोनचा CPU overclock करणे इ.
६) Titanium Backup सारखी applications वापरून संपूर्ण फोनचं Backup घेणे.
७) फोनच्या दिसण्या/वागण्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे
8) युरेका फोनच्या स्पीकर चा default आवज 84 डेसिबल एवढा आसतो. रूट वापरून हा आवाज मी ८९ डेसिबल एवढा वाढवला आहे.

अजून एक महत्वाचा उपयोग, म्हणजे तुमच्या फोनला, रूट पार्टिशन्/ड्राईव्ह कोण? ते तुम्ही सांगू शकता. अर्थातच, माझी 'इंटर्नल मेमरी' २ जीबी नसून ३२ जीबी आहे, अशी 'येडी घालणे' पॉसिबल होते. याचाच अर्थ, कोणतेही अ‍ॅप डालो करताना, 'जागा संपली' असा मेसेज येत नाही

याचा फायदा हा, की लो एंड फोन्स उर्फ स्वस्त फोन्सची लिमिटेशन 'लो इंटर्नल मेमरी' असते. सॅम्संग वगैरेंना १६जीबी, ३२ जीबी इ. 'ईंटर्नल' मेमरी असते. मामॅ, कार्बनला ४ जीबी लै झाली. आपण आपले ८०० रुपयांचे १६ जीबी कार्ड 'इंटर्नल मेमरी' आहे असे रूटींगने सांगितले, तर आपला ७ हजाराचा फोन 'इंटर्नल मेमरी' च्या बाबतीत ३७ हजाराच्या फोनइतका पावरफुल बनतो

वरील यादी रुटिंग चे सगळे फायदे नमूद करते असा माझा दावा नाही, पण यावरून तुम्हाला रुटिंगच्या ताकदीचा अंदाज नक्कीच येऊ शकतो.

इथल्या अनुभवी लोकांकडून अजून माहिती मिळूदे, मी ती या लेखामध्ये समाविष्ट करेन. कोणाला काही अजून शंका असतील तर त्यादेखील विचारा. मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.

थोड्या दिवसांनी, इथे काही शब्दांचे अर्थ सांगायचा प्रयत्न करेन. उदाहरणार्थ कस्टम रिकव्हरी, फास्ट बूट, ADB, बूटलोडर, डेव्हलपर ऑप्शन इ.

तेव्हा सध्या क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिल्डींग करताना २ ला ५ मि कमी असताना लॉगईन करा, पेमेंटची माहीती आधीच भरुन ठेवा म्हणजे आऊट करायला १५ सेकंद लागतील. Happy

भारी आहे की.
वाट बघणार लेखमालेची.
घरी एक एचटिसी आहे पडलेला त्याला रुट करुन त्यात एक स्वस्तातल आणि चांगल नेट पॅक देणार सिम कार्ड घालुन त्याच वायफाय वापरुन नेट सुरु कराव म्हणतोय. Happy

छान. मीही हल्ल्ली हे बघतो आहे ए६००० साठी.

झकासराव - असा वापरला, तर फोन फार गरम होतो. सतत वापरता येणं शक्य होणार नाही बहुतेक.
रच्याक : अ‍ॅण्ड्रॉईड रुट करायची काय गरज आहे ह्यासाठी? उलट रेडीमेड टेथरिंग शक्य असणं ह्यामुळेच मला अ‍ॅण्ड्रॉईड ओएस आवडते.

रेडिमेड टेथरीन्ग आहे.
पण जास्त स्पीड मिळवता येइल.
आणि दुसर म्हणजे रुट करता येतो हा आत्मविश्वास येइल.

मस्त माहिती! एक स्वस्तातला फोन घेऊन हे उद्योग करून पहिले पाहिजेत! रूट केल्यावर आपली आपल्याला ओएस अपग्रेड करता येते का?

xposed module install karu shakta yacha fayda asa ki sadhyachya company rom var tumhi custom rom che features aanu shakata.

रूट करणे म्हणजे काय? (अर्थात, टोचा यांनी दिलेल्या माहितीचे नूब्स (newbie = noobs) साठीचे वेगळ्या भाषेतील पुनःप्रक्षेपण.)

रूट करणे म्हणजे "रूट अ‍ॅक्सेस" मिळवणे.

रुट म्हणजे काय? तर मूळ. झाडाचं मूळ असतं तसं. बुडख्यापर्यंत पोहोचण्याची ताकत = रूट अ‍ॅक्सेस.

आधी, फोन हा काँम्प्युटर आहे हे ध्यानात घ्या.

आपल्या काँप्युटरचा C:\ ड्राईव्ह हा बेसिकली 'रूट' ड्राइव्ह म्हणवला जातो. ("सी"च का, ते रोचक आहे, पण ते नंतर कधीतरी) या रूट ड्राईव्हवर सहसा 'ऑपरेटिंग सिस्टीम' इन्स्टॉल्ड असते. (कोणत्याही ड्राईव्हच्या शीर्ष डिरेक्टरीलाही उदा फः\ रूट डिरेक्टरी म्हणता येईल, पण इथे रूट = सिस्टीम पार्टिशन असा अर्थ.)

(पार्टिशन : कोणतीही हार्डडिस्क किंवा एस्डीकार्ड, कींवा फ्लॅशड्राईव किंवा सीडी वा डिव्हीडी वा फ्लॉपी वा.. इ. हा "फिजिकल" ड्राईव्ह होतो. किंवा ५०० जीबीची एकच हार्ड डिस्क काँप्युटरात असते, पण फाईल म्यानेजरात सी ड्राईव २०० जीबी अन डी ड्राईव ३०० जीबीचा दिसतो. याला 'पार्टिशन' म्हणतात. आपण ५०० पानाची वही कशी फिजिक्स-वन व फिजिक्स-टू साठी अर्धी अर्धी करतो? तसं. आपल्या फोनची 'कप्यासिटी' ४ जीबी आहे, पैकी २ जीबी युजर अ‍ॅक्सेसिबल असेल, तर २ जीबी 'सिस्टीम पार्टिशन उर्फ रूट आहे. उरलेले २ जीबी तुम्हाला तुमचे खेळ करायला, अन 'एक्स्पांडेबल अप्टू ३२ जीबी' हे बाहेरून घातलेल्या सीडी/डिव्हीडी सारखे.)

आपल्या काँप्युटरच्या 'फाइल मॅनेजर' वा 'माय कॉम्प्युटर'मधे जाउन त्यातले (C:) असे अक्षर नावात असलेले 'फोल्डर' उघडले, तर त्यात बहुतेकांना 'विंडोज' नावाचे सब फोल्डर सापडेल. या फोल्डरवर क्लिक केले, तर त्यात कोणत्याच फाईल्स नवख्या लोकांना दिसत नाहीत, अन विंडोज एक वॉर्निंग मेसेज देतो, की बाबाहो, इथल्या फायली जरा डेंजर आहेत. समजत उमजत नसेल तर इथे येऊ नका. त्यात काही कमीजास्त झालं, उदा फाईल डिलीट वा एडिट करणे, तर तुमची विंडोज काम करणार नाही, अर्थातच, काँप्युटर बंद पडेल.

बरोबर? आपल्यापैकी बहुतेकांनी हा असला मेसेज पाहिलेला आहे. (अन आपल्यापैकी बहुतेकांना काँप्यूटरने काही डायलॉग बॉक्स दिली की ती न वाचता 'ओके' चे बटन दाबायची घाणेरडी सवयही आहेच.) हो कीनै?

तर.

अँड्रॉईड फोनमधे, रूट उर्फ सी ड्राईव्हवर जाण्याकरता सामान्य 'युजर' लोकांना परमिशन नसते. ती प्रमिशन मिळवून, त्या रूट ड्राईव्ह व अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या फायलींशी काड्या करण्याची क्षमता प्राप्त करणे, अर्थातच, त्या फोनचा खर्‍या अर्थाने 'मालक' उर्फ 'सुपरयुजर' बनणे, याला म्हणतात 'रूटींग' उर्फ रूट करणे.

या रूट ड्राईव्हवरच सर्व प्रोग्राम्स इन्स्टॉल केलेले असतात (अती मराठीत 'स्थापित' Wink ) त्यासाठी 'प्रोग्राम फाइल्स' नामक फोल्डर असतो. तसेच फोनच्या रूट पार्टीशनवर कंपनीने स्थापित केलेल्या आज्ञाप्रणाली (कंपनी इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर्स उर्फ ब्लोटवेअर्स) असतात, पैकी अनेक विनाकारण जागा खाणार्‍या व बहुतांशी निरुपयोगी, वा त्रासदायकही असतात. उदा. स्वतःहून नवी सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करणारे कंपनीचे 'सॉफ्टवेअर अपडेटर' किंवा १५ मिनिटे चालून बंद पडून मग विकत घ्या असे सांगणारे १००-१०० एम्बीचे गेम्स.

रूटिंगचा पहिला उपयोग म्हणजे ह्या सगळ्या फालतू प्रोग्राम्सना हाकलून लावणे. नॉर्मल यूजर्सना हे करता येत नाही. त्यांना फक्त असे प्रोग्राम्स 'हाईड' करायचा ऑप्शन असतो. रूटेड फोनमालक असे प्रोग्राम्स 'विस्थापित' उर्फ अन-इन्स्टॉल करू शकतो. Wink = जास्त मोकळी इंटर्नल मेमरी = मला हवे ते अ‍ॅप्स डालो करायला जास्त जागा.

दुसरा महत्वाचा उपयोग, म्हणजे तुमच्या फोनला, रूट पार्टिशन्/ड्राईव्ह कोण? ते तुम्ही सांगू शकता. अर्थातच, माझी 'इंटर्नल मेमरी' २ जीबी नसून ३२ जीबी आहे, अशी 'येडी घालणे' पॉसिबल होते. याचाच अर्थ, कोणतेही अ‍ॅप डालो करताना, 'जागा संपली' असा मेसेज येत नाही Wink

याचा फायदा हा, की लो एंड फोन्स उर्फ स्वस्त फोन्सची लिमिटेशन 'लो इंटर्नल मेमरी' असते. सॅम्संग वगैरेंना १६जीबी, ३२ जीबी इ. 'ईंटर्नल' मेमरी असते. मामॅ, कार्बनला ४ जीबी लै झाली. आपण आपले ८०० रुपयांचे १६ जीबी कार्ड 'इंटर्नल मेमरी' आहे असे रूटींगने सांगितले, तर आपला ७ हजाराचा फोन ३७ हजाराच्या फोनइतका पावरफुल बनतो Wink

परदेशी सायटी वाचल्या तर रूटींगचा पहिला फायदा = 'टीदरिंग पॉसिबल' असा येतो. आपल्याकडे बाय डिफॉल्ट, टीदरिंग पॉसिबल आहे. आयफोनला जेलब्रेक उर्फ रूट केलं तर च हे शक्य होते इ.
पण आपण अँड्रॉईडबद्दल बोलत असल्याने, टीदरिंग उडत जाऊ द्या.

इतर अनेक फायदे आहेत. उदा. स्पीकरचा, फोनचा आवाज वाढवणे. जीपीएस फिक्स घेण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे. अ‍ॅड्स गायब करणे. कोणत्याच फ्री अ‍ॅपच्या अ‍ॅड्स दिसणार नाहीत अशी सोय करता येते Wink अन अजून बरंच काही.

अन हो, जिज्ञासा,
नुसती अपग्रेड नाही, स्वत:ची वेगळी ऑस लिहिता येते, किंवा अगदी सिस्टीम लाँचर, सिस्टीम डायलर देखिल बदलता येतात. उदा. ड्युअलसिम फोनाला सॅम्संगसारखे राईट स्वाईप नंबर = कॉल फ्राँ सिम १, लेफ्ट स्वाईप, सिम२.

असो.
भरपूर आहे लिहिण्यासारखं.
टोच्या यांना टेक्निकल ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे, मला कीर्तन थोडं जास्त छान येतं इतकंच Wink

>> अँड्रॉईड फोनमधे, रूट उर्फ सी ड्राईव्हवर जाण्याकरता सामान्य 'युजर' लोकांना परमिशन नसते.

@इब्लिस: सामान्य 'युजर' रूट ड्राईव वर जाऊ शकतात पण फक्त "Read-Only" मोड मध्ये. तिथे काही बदल करायचे असतील तर मात्र रूटचे म्हणजेच सुपर-युजर (ॲडमीन) चे अधिकार लागतात. म्हणून काटेकोर दृष्ट्या बघितलं तर "रुट म्हणजे बुडख्यापर्यंत पोहोचण्याची ताकत" या व्याख्येशी मी सहमत नाही.

रूट म्हणजे युनिक्स मधला ॲडमीन. ज्याला संपूर्ण फाईल सिस्टम मध्ये कुठेही बदल घडवण्याची क्षमता असते.

रच्याकने, तुमच्या प्रतीसादामधले काही भाग उचलून मूळ लेखात समाविष्ट करीन म्हणतो. तुमची परवानगी गृहीत धरली आहे. Happy

फोन रूट केल्यावर मॅन्युफॅक्चररकडून अपडेट्स मिळायच्या बंद होतात ना? मग नंतर मला लॉलिपॉपवर कसे अपग्रेडता येईल? कुणी सांगेल का...

विंडोज ८.१ मध्ये ८ जीबी फोन मेमरी १२८ जीबी मेमरी कार्ड टाकून १२८ +८जीबी होते,(फोनच्या मेमरीत भर पडते) त्यामुळे तीनचार जीबी ची नको असलेली अॅपस पडून राहिली तरी फारसा फरक पडत नाही. अॅंड्रॅाइडचा रूटींग झमेला थोडा भंपकपणा वाटतो.शिवाय अख्खी ओएसच विंडोज तुम्हाला अधिकृतपणे हातात देतात.तुलनात्मक विचार लिहिला माफ करा.

विंडोज फोन कधीच वापरला नाही त्यामुळे तिथे अॅप्स इंटर्नल मेमरी वर इन्स्टॉल होतात की मेमरी कार्ड वर याची काहीच कल्पना नाही.

>> शिवाय अख्खी ओएसच विंडोज तुम्हाला अधिकृतपणे हातात देतात.
याचा अर्थ कळला नाही.

>> शिवाय अख्खी ओएसच विंडोज तुम्हाला अधिकृतपणे हातात देतात.
याचा अर्थ कळला नाही.
<<
त्यांना विंडोजच नव्हे तर अँड्रॉईडचाही अर्थ कळलेला नाहिये Wink

@Srd
झमेला >> फोन कंपनीने तुमच्या मानगुटीवर बसुन फोन रुट करण्यास तुम्हाला भाग पाडले आहे का?

शिवाय अख्खी ओएसच विंडोज तुम्हाला अधिकृतपणे हातात देतात >> अ‍ॅंड्रॉईड अनधिकृत असल्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे?

८ जीबी फोन मेमरी १२८ जीबी मेमरी कार्ड टाकून १२८ होते >> मानवाच्या लाखो वार्षांच्या ईतिहासात हे फक्त विंडोज ओएसच्या फोनमधेच शक्य आहे का?

दुरुस्ती केली आहे. अॅपस त्यांच्या डेटासह फोन मेमरी ते मेमरी कार्ड सहज सरकवता येतात आणि मेमरी कमी वगैरे प्रश्नच पडत नाही.२)आता विंडोज वरची नवी अॅपस फोटो लाइब्ररी उघडू शकतात उदा* युसी ब्राउजर मधून फेसबुकवर फोटो अपलोड करता येत नाही परंतू ओपरा मिनि {बीटा} तून करता येतो. IE11 (8.1चा)वेबपेज ओफलाइन सेव करू देत नाही परंतू ओपरा मिनि करतो.एखादे अॅप काढल्यावर त्याची कॅश ,गोस्ट मेमरी पूर्ण जाते ती काढण्यासाठी आणखी एक अॅपची जरूरी नाही.विंडोज स्टोरच्या अॅपचा कोड अगोदरच तपासलेला असतो.स्कॅन वगैरे अॅप नेटिव कॅम्रा अॅपला बिघडवू शकत नाही.

अधिकृत ओएस: बरेच जण घरच्या असेंबल्ड संगणकावर पाइरेटेड ओएस वापरतात ,इथे आठ हजाराच्या मोबाइलात अधिकृत ओएस+मासॅाफ्ट ओफिस सूट +नोटस(ओफलाइन चालते)मिळते आणि तेसुद्धा काटछाट केलेले नाही असे म्हणायचे आहे मग रूटला जाण्याचा प्रश्न येतोच कुठे?सर्व कोडच अॅप डेवलपरला उपलब्ध केलेला आहे,अगदी कोर्टानासुद्धा काही अॅप वापरतात.अॅंटीवाइरस अॅपचा झमेला नाही.ओपन सोर्समध्ये फार ढवळाढवळ होते.
अॅपस चे डाउनलोड कुठेही करता येते ,नंतरही सरकवता येतात.

>> बरेच जण घरच्या असेंबल्ड संगणकावर पाइरेटेड ओएस वापरतात

याचा मोबाईलच्या ओएस शी काय संबंध?

>> इथे आठ हजाराच्या मोबाइलात अधिकृत ओएस+मासॅाफ्ट ओफिस सूट +नोटस(ओफलाइन चालते)मिळते आणि तेसुद्धा काटछाट केलेले नाही असे म्हणायचे आहे मग रूटला जाण्याचा प्रश्न येतोच कुठे?

अँड्रॉईडवर देखील चार हजारात अधिकृत ओएस + WPS ओफिस मिळते. यासाठी रूट करायची गरज नाही.

>> सर्व कोडच अॅप डेवलपरला उपलब्ध केलेला आहे,अगदी कोर्टानासुद्धा काही अॅप वापरतात.अॅंटीवाइरस अॅपचा झमेला नाही.ओपन सोर्समध्ये फार ढवळाढवळ होते.

तुमचा खूपच गोंधळ उडालेला दिसतोय. बहुतेक ओपन सोर्स म्हणजे काय यावर एक लेख लिहावाच लागणार आता.

विंडोजचे कोड डेवलपरला उपलब्ध?

आर यू किडिंग??

अहो, नॉर्मल विंडोजमधेही हिडन हूक्स आहेत, जे मायक्रोसॉफ्टच्याच डेवलपर सूटवाल्यांना अ‍ॅवेलेबल आहेत. इतरांना नाहीत. इतर कंपनीचे प्याकेज वापरून लिहिलेले सॉफ्टवेअर विंडोजवर हळू चालेल, बग्गी चालेल अशी व्यवस्था केलेली अस्ते, अशी बोंबाबोंब विंडोज ३.१ जन्माला आली तेव्हाच्या काळापासून लोक करताहेत.

अँटीव्हायरसचा झमेला म्हणजे काय? विंडोजसाठी जितके किडे जगात उपलब्ध आहेत तितके इतर कोणत्याच ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आजवर लिहिले गेलेले नाहीत.

धागा विंडोज वि अँड्रॉईडवर डिजनरेट होऊ घातलाय पण असो..

>>
दुरुस्ती केली आहे. अॅपस त्यांच्या डेटासह फोन मेमरी ते मेमरी कार्ड सहज सरकवता येतात आणि मेमरी कमी वगैरे प्रश्नच पडत नाही.२)आता विंडोज वरची नवी अॅपस फोटो लाइब्ररी उघडू शकतात उदा* युसी ब्राउजर मधून फेसबुकवर फोटो अपलोड करता येत नाही परंतू ओपरा मिनि {बीटा} तून करता येतो. IE11 (8.1चा)वेबपेज ओफलाइन सेव करू देत नाही परंतू ओपरा मिनि करतो.एखादे अॅप काढल्यावर त्याची कॅश ,गोस्ट मेमरी पूर्ण जाते ती काढण्यासाठी आणखी एक अॅपची जरूरी नाही.विंडोज स्टोरच्या अॅपचा कोड अगोदरच तपासलेला असतो.स्कॅन वगैरे अॅप नेटिव कॅम्रा अॅपला बिघडवू शकत नाही.
<<

रूट न करताही,
१. अँड्रॉईड अ‍ॅप्स एसडीकार्डावर सरकवता येतात. वेगळे अ‍ॅप लागत नाही.
२. स्वतःचा फाइल मॅनेजर, ऑफलाईन सेव्हिंग इ. सर्व फीचर्सवाला ब्राऊजर असतो. वरतून वेगळा ब्राऊजर टाकायची किटकिट करावी लागत नाही. (एस्सेसमधला फायरफॉक्स पीडीएफ करून देतो, अ‍ॅडब्लॉक लावून देतो म्हणून मला आवडतो, यासाठी इन्स्टॉल केलाय)
३. कॅशे, डेटा डिलीट करण्याची सोय फार पूर्वीपासून आहे.

अँड्रॉईडच्या अ‍ॅप्लिकेशन मॅनेजरचा स्क्रीनशॉट पहा बरं जरा?
Screenshot_2015-05-11-20-27-39.pngScreenshot_2015-05-11-20-28-11.png

>>स्कॅन वगैरे अॅप नेटिव कॅम्रा अॅपला बिघडवू शकत नाही.<<
रिव्ह्यूज न वाचताच कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल केले की असे होते. अ‍ॅंड्रॉईड ओपन सोर्स आहे, अन माझ्यासारखे अनेक अर्धवट हौशी प्रोग्रामर्स अर्धेकच्चे अ‍ॅप्स लिहून मोकळे होतात. त्यातले काय घ्यावे व काय घेऊ नये, यासाठी अ‍ॅपचा रिव्ह्यू वाचणे हा एक उत्तम इलाज आहे.

पण या ओपन सोर्सचाच परिणाम वा फायदा, म्हणजे स्यानोजेन मॉडसारखी ऑफिशिअल गूगल प्रणीत अँड्रॉईड ऑसला जणू पर्यायी अशी वेगळी अँड्रॉईड फ्लेवर तयार होऊ शकते. हे म्हणजे टग्या यांनी त्यांना विंडोजमधले काही फीचर्स बदलावेसे वाटले म्हणून विंडॉज ८.५ स्वतःच लिहिण्यासारखे आहे. Wink

>> स्कॅन वगैरे अॅप नेटिव कॅम्रा अॅपला बिघडवू शकत नाही.
अ‍ॅंड्रॉईडवर एका अॅप मुळे दुसरं अॅप बिघडलेलं माझ्या तरी पहाण्यात नाही. याबद्दल काही लिंक देऊ शकाल का?

>> अ‍ॅंड्रॉईड ओपन सोर्स आहे, अन माझ्यासारखे अनेक अर्धवट हौशी प्रोग्रामर्स अर्धेकच्चे अ‍ॅप्स लिहून मोकळे होतात.

इब्लिस, अ‍ॅंड्रॉईड ओपन सोर्स असणे आणि अर्धवट हौशी प्रोग्रामर्सनी अर्धेकच्चे अ‍ॅप्स लिहून मोकळे होणे. याचा काही संबंध नाही. गुगलच्या अ‍ॅप स्टोर मध्ये जास्त बंधनं नाहीत. त्यामुळे अर्धीकच्ची अ‍ॅप्स तिथे पब्लिश होऊ शकतात. अ‍ॅंड्रॉईड ओपन सोर्स नसती तरीही इम्म्याचुअर अ‍ॅप्स पब्लिश होऊ शकली असती. अ‍ॅपल त्यांच्या अ‍ॅप स्टोर वर खूप जास्त बंधनं घालतात. म्हणूनच iOS ला "walled garden" किंवा "सुंदर तुरुंग" म्हणतात.

>>पण या ओपन सोर्सचाच परिणाम वा फायदा, म्हणजे स्यानोजेन मॉडसारखी ऑफिशिअल गूगल प्रणीत अँड्रॉईड ऑसला जणू पर्यायी अशी वेगळी अँड्रॉईड फ्लेवर तयार होऊ शकते. हे म्हणजे टग्या यांनी त्यांना विंडोजमधले काही फीचर्स बदलावेसे वाटले म्हणून विंडॉज ८.५ स्वतःच लिहिण्यासारखे आहे.

ती लाजून पाणी पाणी झालेली स्मायली कशी टाकायची हो?

ईथल्या चर्चा वाचून आपन फारच मागास आहोत याची जाणीव होतेय.थोडिशी किडेगिरी करायला मलाही थोडे शिकायला हवे.xda वरच्या चर्चा माझ्या अकलेच्या पलीकडच्या आहेत.ईथेच सोप्या भासेत चर्चा केली तर समजेल थोडे थोडे.

माझा काहीतरी गोंधळ उडाला आहे -मान्य.
आता android विरुद्ध windows लिहून वात आणणार नाही.
तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांवर येतो.
१)
अॅपस थेट मेमरी कार्डावरच उतरवता येत असतील आणि अगदी सात आठ हजार रुपयांचे एन्ट्री लेवल फोनस १२८ जीबीची कार्ड सहज सामावून घेत असतील तर डिफॅाल्ट म्हणून आलेली नको असलेली पडीक अॅपस काढण्याच खटपट करावी लागणार नाही. त्यांचे विजेटस चित्रही स्टार्ट screenवरून दूर ठेवता आले तर कामच झाले.तसेच २ ची ३२ जीबी येडी घालावी लागणार नाहीत.
२)
अॅप डेवलपर जाहिरातवाले फ्री अथवा विकत घेतलेले जाहिराती नसलेले अॅप देऊन कमाई करतो. आपला आवडता पर्याय घ्यावा.
३)
६५ते ७०डेसबल आवाज स्पीकरला पुरेसा असतो.८४-८९वगैरे करून काय डीजे होणार नाही.फारच हौस असली तर ब्लुटुथ स्पिकर घेणे उत्तम नाही का?

Pages