ॲन्ड्रॉईड वरील रूट आणि इतर माहिती

Submitted by व्यत्यय on 30 April, 2015 - 01:54

या लेखामध्ये मी वरचेवर भर टाकत रहाणार आहे. शक्य तोवर नवीन माहिती मूळ लेखाच्या शेवटीच जोडायचा प्रयत्न करेन. पण जेव्हा ते शक्य नसेल तेव्हा नवीन मजकूर मी ठळक करेन.

अ‍ॅन्ड्रॉईड ही लिनक्स (Linux) वर आधारित मोबाईल फोन साठीची ऑपरेटिंग सिस्टम (ओ-एस) आहे. अर्थात हल्ली फोन शिवाय काही TV वगैरे उपकरणे पण अ‍ॅन्ड्रॉईड वर चालतात. लिनक्स आणि फ्री (मुक्त) सोफ्टवेअर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी त्यावर नंतर एक वेगळा धागा काढेन. सध्या लिनक्स हि मायक्रोसोफ्टच्या "विंडोज" सारखीच एक ऑपरेटिंग सिस्टम आहे एवढं समजून घेतलं तरी चालेल. तर "रूट (root)" म्हणजे लिनक्स वरचा admin. फोन रूट करणे म्हणजे आपल्या फोनवर admin चे अधिकार प्राप्त करणे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या फायलींशी काड्या करण्याची क्षमता प्राप्त करणे, अर्थातच, त्या फोनचा खर्‍या अर्थाने 'मालक' उर्फ 'सुपरयुजर' उर्फ 'ॲडमीन' बनणे, याला म्हणतात 'रूटींग' उर्फ रूट करणे. मायबोलीवरचे ॲडमीन ज्याप्रकारे उपद्रवी युजर ना हाकलून लावू शकतात तसेच ज्यांच्याकडे "रूट" चे अधिकार आहेत ते विनाकारण जागा खाणार्‍या व बहुतांशी निरुपयोगी, वा त्रासदायक सॉफ्टवेअर्स/गेम्स ना हाकलून लावू शकतात. तसंच adblock सारखी apps इन्स्टॉल करणं किंवा फोनचा CPU 1GHz ऐवजी 1.2 GHz ला चालवणं (CPU overclock) वगैरे गोष्टी साध्य करता येतात

रूट च्या अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्या पण येतात. उदाहरणार्थ फोन चालण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या फाईल्स आपण अनवधानाने डिलीट करू शकतो जे एरवी शक्य झालं नसतं . किंवा CPU प्रमाणाबाहेर overclock केला तर तो कायमचा खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण चुकीची पावले तर उचलत नाही ना याची काळजी बाळगावी लागते. याच कारणासाठी बहुतेक सगळ्या फोन साठी फोन रूट केला की त्याची वॉरंटी संपते. एक सन्माननीय अपवाद म्हणजे यु युरेका (Yu Yureka). युरेका ला रूट केलं तरी त्याची वॉरंटी शाबूत रहाते.

प्रत्येक फोनवर रूट अधिकार प्राप्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अगदी स्क्रीन वरचं एक बटन दाबण्याइतकं सोपं किंवा तुमच्या PC वर २-३ वेगवेगळी सोफ्टवेअर install करून नंतर फोन PCला जोडून ७-८ commands काळजीपूर्वक टाईप करून फोन ३-४ वेळा रीबूट करण्याइतकं कठीण. तुमच्या फोनला रूट करायची पद्धत शोधून काढण्यासाठी http://forum.xda-developers.com/ इथे जाऊन तुमचा फोन शोधून काढा आणि तिथे दिलेल्या स्टेप्स नीट पार पाडा. एखादी स्टेप जरी चुकली तरी तुमचा फोन बंद पडू शकतो. यालाच फोनची ब्रिक होणं म्हणतात. म्हणजे फोन आता फक्त विटेच्या आकाराचा तुकडा राहिला आहे आणि त्याचा दुसरा काही उपयोग नाही. पण काळजी करू नका. फोनची वीट बनवणं हल्ली कठीण होत चाललं आहे. ब्रिक झालेला फोन पण बऱ्याचदा पुन्हा चालू करता येऊ शकतो. पण या सगळ्या उपद्व्यापासाठी थोडा वेळ देणं गरजेचं असतं.

कोणालाही असा प्रश्न पडणं सहज शक्य आहे की एवढे सगळे धोके पत्करून रूट का करावे? रूट केलेल्याचे काही फायदे इथे नमूद करत आहे.

१) तुमच्या फोनसोबत default आलेली applications जी तुम्ही वापरत नाही पण uninstall पण करू शकत नाही. अशी applications तुम्ही रूट नंतर सहज काढून टाकू शकता.
२) adblock install करणे ज्यामुळे वेगवेगळ्या applications मध्ये दिसणाऱ्या जाहिराती गायब होतील.
३) Firewall install करणे ज्यामुळे फक्त आपण परवानगी दिलेली applications इंटरनेटशी संपर्क करू शकतील
४) फोनसोबत आलेली मूळ ऑपरेटिंग सिस्टम बदलून cyanogen mod सारखी Custom ROM install करणे. अशा कस्टम रॉम Privacy Guard सारखी कित्येक फीचर्स देतात जी मूळ अ‍ॅन्ड्रॉईड मध्ये नाहीत.
५) फोनचा performance वाढवणाऱ्या काही गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ फोनचा CPU overclock करणे इ.
६) Titanium Backup सारखी applications वापरून संपूर्ण फोनचं Backup घेणे.
७) फोनच्या दिसण्या/वागण्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे
8) युरेका फोनच्या स्पीकर चा default आवज 84 डेसिबल एवढा आसतो. रूट वापरून हा आवाज मी ८९ डेसिबल एवढा वाढवला आहे.

अजून एक महत्वाचा उपयोग, म्हणजे तुमच्या फोनला, रूट पार्टिशन्/ड्राईव्ह कोण? ते तुम्ही सांगू शकता. अर्थातच, माझी 'इंटर्नल मेमरी' २ जीबी नसून ३२ जीबी आहे, अशी 'येडी घालणे' पॉसिबल होते. याचाच अर्थ, कोणतेही अ‍ॅप डालो करताना, 'जागा संपली' असा मेसेज येत नाही

याचा फायदा हा, की लो एंड फोन्स उर्फ स्वस्त फोन्सची लिमिटेशन 'लो इंटर्नल मेमरी' असते. सॅम्संग वगैरेंना १६जीबी, ३२ जीबी इ. 'ईंटर्नल' मेमरी असते. मामॅ, कार्बनला ४ जीबी लै झाली. आपण आपले ८०० रुपयांचे १६ जीबी कार्ड 'इंटर्नल मेमरी' आहे असे रूटींगने सांगितले, तर आपला ७ हजाराचा फोन 'इंटर्नल मेमरी' च्या बाबतीत ३७ हजाराच्या फोनइतका पावरफुल बनतो

वरील यादी रुटिंग चे सगळे फायदे नमूद करते असा माझा दावा नाही, पण यावरून तुम्हाला रुटिंगच्या ताकदीचा अंदाज नक्कीच येऊ शकतो.

इथल्या अनुभवी लोकांकडून अजून माहिती मिळूदे, मी ती या लेखामध्ये समाविष्ट करेन. कोणाला काही अजून शंका असतील तर त्यादेखील विचारा. मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.

थोड्या दिवसांनी, इथे काही शब्दांचे अर्थ सांगायचा प्रयत्न करेन. उदाहरणार्थ कस्टम रिकव्हरी, फास्ट बूट, ADB, बूटलोडर, डेव्हलपर ऑप्शन इ.

तेव्हा सध्या क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामान्य फोन वापरणाय्रास अडचण येते ज्यावेळी फोन संथ होतो,मेमरी कमी,अपुरी हा संदेश सतत येतो.मग त्याला माहितगार असा सल्ला देतात-१)वॅाटसअपचे व्हिडिओ काढ,२)फॅार्मॅट मार,३)अमुक एक अॅप घे आणि कॅश मेमरी काढ,४)फोन रूट कर.शेवटचा उपाय सर्व दोष काढतो का?

वरील त्रासाचे कारण फोन वापरात आहे अथवा android systemमध्ये आहे अथवा हॅन्डसेट करणाय्राने काटछाट करून टाकलेल्या ओएसमध्ये आहे?रूट करायला लागणे याचा अर्थ दिलेली ओएस त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करत नाही अथवा काही न्यून आहे असा घ्यायचा का?

अ‍ॅंड्रॉईड ओपन सोर्स असणे आणि अर्धवट हौशी प्रोग्रामर्सनी अर्धेकच्चे अ‍ॅप्स लिहून मोकळे होणे. याचा काही संबंध नाही
<<
दोन गोष्टी एकत्र लिहिल्याने, चुकीचे इम्प्रेशन झाले. वॉल्ड गार्डनबद्दलचे माझेही मत तेच आहे.

@Srd

१) माझ्या Micromax ची ४ GB इंटर्नल मेमरी मुळातच पार्टिशन केली होती. त्यामुळे २ GB चं पार्टिशन sdcard0 समजलं जात होतं. आणि "Move to SDCard" या २ GB जागेत move करायचा. मी टाकलेलं १६ GB चं कार्ड sdcard1 म्हणून दाखवत होत. Micromax ने असं का केलं माहित नाही. कारण त्याच्या २ वर्ष आधीचा LG Optimus One, sdcard नीट दाखवायचा आणि "Move to SDCard" पण मस्त चालायचं. असो. तर या Micromax ला रूट करून येडी घालावीच लागली. कदाचित बजेट फोनचा काही प्रॉब्लेम असावा.

>> अॅप डेवलपर जाहिरातवाले फ्री अथवा विकत घेतलेले जाहिराती नसलेले अॅप देऊन कमाई करतो. आपला आवडता पर्याय घ्यावा.
याचा संदर्भ कळला नाही.

>> ६५ते ७०डेसबल आवाज स्पीकरला पुरेसा असतो.८४-८९वगैरे करून काय डीजे होणार नाही.
ही माझी चूक. आवाज कमी वाटतो म्हणून सेटिंग बदलताना मी तिथला मूळ आकडा ८४ वरून ८९ वर बदलला. तो आकडा डेसिबलचा आसावा हा माझा अंदाज होता. पण तुम्ही म्हणता तसं ८९ Db खूपच जास्त होतं

>>शेवटचा उपाय सर्व दोष काढतो का?

नाही. रूट करणे म्हणजे बाबा बंगाली ची अक्सीर इलाज करणारी रामबाण जडीबुटी नव्हे. पण आधी सांगितल्यानुसार रूट वापरून काही जागा मोकळी करता येऊ शकते जी एरवी करता आली नसती. रूट केल्याने तुम्हाला शक्य असणारे (सुपरयुजर किंवा admin) सगळे अधिकार मिळतात.

>> वरील त्रासाचे कारण फोन वापरात आहे अथवा android systemमध्ये आहे अथवा हॅन्डसेट करणाय्राने काटछाट करून टाकलेल्या ओएसमध्ये आहे?

हॅन्डसेट देणारे अधिकृत ओएसच देतात. आणि काटछाट करण्याऐवजी बहुतेक वेळा ते त्यात स्वतःची भर (bloatware) घालतात. या ब्लोटवेअर मुळे देखील फोन मंद होऊ शकतो कारण गरज नसताना background मध्ये काही प्रोसेसेस चालत रहातात. अशा वेळी फोन रूट करून हे ब्लोटवेअर काढून टाकणे हा चांगला उपाय असतो.

आपल्या हातात फोनसची सर्वच मॅाडेलस येणार नाहीत त्यामुळे नेटवरील परीक्षणांचा आधार घेऊन मत बनवावे लागते . काही परीक्षक फोनबद्दल काय आहे काय नाही सांगतात असे मला आवडते .१)मामॅक्स च्या मेमरी अलोकेशन विषयी gogi dot in मध्ये वाचले होते.
२)अॅपल ने सुरू केलेला कित्ता आता इतर कंपन्याही गिरवणार="आमचा फोन असा आहे घ्यायचा तर घ्या अथवा कटा."
३)येणारा काळ फोनस माध्यमातून वापरकर्त्याकडून सतत पैसा कसा येईल हे बघण्याचा आहे आणि अॅप यासाठीच आहेत.काश्री अॅपमध्ये एक जाहिरातींची छोटीशी पट्टी फिरत असते त्याचा त्रास नसतो,तर काहींत संपूर्ण पडदाभरून जाहिरात येते आणि विना जाहिरातीसाठी अॅप विकत घ्या म्हणतात.अगदी गरजेचे नसेल तरअसे अॅप उडवावे लागते..

३)येणारा काळ फोनस माध्यमातून वापरकर्त्याकडून सतत पैसा कसा येईल हे बघण्याचा आहे आणि अॅप यासाठीच आहेत.काश्री अॅपमध्ये एक जाहिरातींची छोटीशी पट्टी फिरत असते त्याचा त्रास नसतो,तर काहींत संपूर्ण पडदाभरून जाहिरात येते आणि विना जाहिरातीसाठी अॅप विकत घ्या म्हणतात.अगदी गरजेचे नसेल तरअसे अॅप उडवावे लागते..
<<
रूट केल्यावर जबरदस्तीने गळ्यात मारलेल्या जाहिराती बंद करता येतात Happy

२) ब्रँडसाठी काहीही करणारे लोक जगात असतातच, तसेच आमच्यासारखेही असतात. अ‍ॅपलचाही जेलब्रेक करता येतो, हे ठाऊक आहे का? जेलब्रेक्=रूट.

१) गोगी.इन = आज का संपूर्ण ग्यान? Wink

मान्यवर कंपन्या शास्त्रिय आधारावर कमाल डेसबल आवाज देतात आणि मोठ्या आवाजासाठी स्मार्ट बना आणि एक्स्० स्पिकर वापरा म्हणतात.
५)ब्लोटवेर टाकून हॅंडसेट मेकर पैसे मिळवतात आणि किंमत कमी ठेवू शकतात.६)android काटछाट-क्रोम ब्राउजर वापरला तर डेटा भयानक खातो आणि वेबपेज लवकर लोड होत नाहीत म्हणून "stock android browser" दिलेला असतो का?
७)ब्राउजरची "html5test dot com "वेबटेस्ट केली तर अपेक्षित उत्तर ४०० पेक्षा जास्ती येते का?
माझ्या मते बाजारातल्या उपलब्ध फोनसपैकी जरा बरा फोन घ्यावा कारण फोन जेवढा महाग तेवढा तो लवकर अ वमुल्यन होतोoutdated.

अॅपलचा जेलब्रेक म्हणजे समजा महिना अमुक एक डॅालरचे एक दोन वर्षाचे करार केल्यास हा फोन इतक्या डॅालरला असा सर्विस प्रवाइडर कडून स्वस्तात मिळवायचा नंतर जेलब्रेकचे सॅाफ्टवेर वापरून दुसरे कोणतेही कार्ड वापरता येते.
gogi dot in आणि ग्यान!!! हाहाहाहा!!!
फोनवाले किंमत कमी करण्यासाठी युक्त्या वापरतात.ड्यूल सिम सांगतात पण खरं एकच सिम वापरता येते. सेकंड सिम स्लॅाटमध्येच सिम कार्ड काढून मेमरी कार्ड बसते. अशा हार्डवेरचेही हॅ्ंडसेटला येडी कशी घालणार?

.

रच्याकने यु युफोरिया (Yu Yuphoria) जाहीर झाला आहे. फक्त सात हजार रुपये.
जर मी बाबांसाठी हल्लीच युरेका घेतला नसता तर नक्की हा युफोरिया घेतला असता.

-या फोन रिव्ह्युवाल्यांना हँडसेटस फुकटात कोण देतो?
-सामान्य वापरकर्त्यांनी केवळ वाचन करून रूटिंगचा धोका पत्करावा का अथवा आहे तसा फोन वापरावा आणि दोन वर्षांनी सरळ नवीनच फोन घ्यावा?
-AOSP असलेल्या वन प्लस वन,युप्फोरिया,युरेका,नोकिआ एक्स टू वाल्यांना गुगलचे काही प्रॅाडक्टस मिळतात का? नाही मिळाले म्हणून काही अडणार आहे का?

धन्यवाद माझे शंका निरसन केल्याबद्दल.

युफोरिया बहुधा रेडमी २ च्या 'लिमिटेड एडिशन'च्या स्पर्धेत उतरवला आहे. पण स्पेसिफिकेशन्स खुप चांगले वाटत आहेत. ५" गोरील्ला ३/सायनामॉन १२/२ जीबी/१६जीबी आणि ८/५ कॅमेरा. हे सगळं ६९९९ मधे चांगलंच वाटतंय. ५.५" पेक्षा ५" हाताळायलाही बरा. शिवाय युरेकासारखा साउंडचा प्रॉब्लेम यात नसावा.

मि फोन रुट करुन ,रुट चेकर app ने चेक केले तर खालिल मेसेज आला, याचा अर्थ माझा फोन रुट झाला ना!

Screenshot_2015-05-13-22-54-27.png

my mobile is samsung duos GT-S7562 my android version is 4.0.4 ice cream sandwich यावर बरीच युपीअय ऎप चालत नाहीत कारण ती लोअर व्हर्जनला सपोर्ट करीत नाहीत. नवीन अँड्रॉईड व्हर्जन रुट केल्यावर लोड करता येतात का? असल्यास कुठे रुट करुन मिळेल?
ता.क. जुन्या फोन ला हसू नये

पाहिले! तांत्रिकदृष्ट्या आपल्याला ते झेपेल असे वाटत नाही. मोबाईल दुकानदाराने आता तुमच्या मोबाईलची अपडेट करण्याची क्शमता संपली आहे. आम्ही रुट करीत नाही. दगड होण्याचा धोका असतो. रुट फंदात न पडता नवीन घ्या असे सांगितले. दगड होण्याचा धोका मी पत्करला तर कुणी रुट करुन देईल का? टग्या तुम्ही सांगितलेले वापरणे म्हणजे रुट करणे का?

तुमच्या फोनवर अ‍ॅंड्रॉईडचे नविन व्हर्जन टाकावे लागेल. हे बर्‍यापैकी वेळखाउ काम आहे. तुमचा फोन फॉर्म्याट करावा लागेल. तुमचा डेटा आणि कॉन्टॅक्टसचा बॅकप घ्यावा लागेल वगैरे.

खरं सांगायचं तर मोबाईल दुकानदाराचा सल्ला योग्य आहे.

>>दगड होण्याचा धोका मी पत्करला तर कुणी रुट करुन देईल का?

तुम्ही पुण्यात असाल तर मी प्रयत्न करायला तयार आहे.

रेड मि २ ला कसे रूट करावे

कारन फोन हाएड अप सपोर्त
नाहि

reverse tethering pan nahi

collage chya proxy server cha problem asel ka

हे रूट संदर्भात नाही.
ऑफिसमध्ये एकाचा मोटो इ फॅक्टरी रिसेट केला आता नव्याने सेट करताना प्रॉब्लेम येतोय. गुगल सर्विसेस हॅज स्टॉप असा सतत मेसेज येतो अकाउंट लॉग इन करताना. काही गोष्टी करून पहिल्या जसे फोन रिस्टार्ट, क्लीन ऍप कॅचे इत्यादी. पण प्रॉब्लेम आहेच. कुणी काही आयडिया देवू शकेल तर बरे होईल.

सोनी साइटवर एकदा ही रूटबद्दलची माहिती आलेली. आता शोधणे कठीण वाटते.तसेच अपग्रेडमध्येही थोडा जुना कोड तसाच राहतो,मेमरी खातो वगैरे.सोनीसारख्या कंपनीने हात झटकल्यावर पुढे काय?

मोटो इ /फॅक्ट्री रिसेटनंतर---

१) इमेल +अकाउंट्समध्ये जाऊन एकदा तुमचा जिमेल नव्याने सेटप करा. फोन बंद करून पुन्हा सेटप झाला आहे का पाहा त्यानंतर इतर काम होते का पाहा.

>>अपग्रेडमध्येही थोडा जुना कोड तसाच राहतो,मेमरी खातो वगैरे.

नविन ओएस इन्स्टॉल करयच्या दोन पद्धती आहेत. क्लीन फ्लॅश आणि डर्टी फ्लॅश.
क्लीन फ्लॅश मधे सिस्टम पार्टीशन फॉर्मॅट करुन नविन ओएस इन्स्टॉल करतात. त्यामुळे थोडा जुना कोड तसाच रहाणे शक्य नाही.

मोबाईलचा प्रॉब्लेम हार्ड रिसेट करूनही सुटेना. मग प्ले सर्विसेसची apk डालो केली नवी व्हर्जन. इंस्टाल, रिबुट अँड स्टार्ट. झाला एकदाचा.

फोन रुट केल्यावर अँड्रॉईड/फोन ची मेमरी (इंटरनल स्टोरेज) वाढवता येते का? माझा मायक्रोमॅक्स बोल्ट A47 फोन आहे व इंटरनल (फोन) मेमरी फक्त १६५MB आहे. त्यामुळे सतत त्रास होतो. व एखादे अॅप अनईंस्टॉल करावे लागते.. व नवीन फोन सद्ध्या घेता येत नाहीये..

तुम्ही तुमच्या फोनच्या इंटर्नल मेमरीच्या ऐवजी एसडी कार्ड वापरु शकता. हे करण्यासाठी फोन रुट केलेला असणे गरजेचे आहे.
xda-developers वेबसाईट वरुन खालील स्टेप्स कॉपी पेस्ट केल्या आहेत.

Discliamer:I am not responsible if you mess up with your phone, for bricked phones and dead sd cards. Try this on your own risk.

This file vold.fstab has mounting information for the device to mount the SD cards so change the code to swap the SD cards so that ext_card will be mounted as sdcard and sdcard will be mounted as ext_card.

Note: This will work on any Android phone with internal and external SD cards.

Here is the procedure with an example I have done on Xperia J's vold.fstab file.

1. First of all your phone must be ROOTED, If its not then STOP here and get the Root first.

2. Download Root Explorer or any other such explorer which can explore root directory of device.

3. Navigate to system/etc folder mount it as rw(read/write).

4. There you will find vold.fstab file, copy it to your sdcard.

5. Then in your PC open the file in an Text Editor.

6. Find the lines like these,

dev_mount sdcard /mnt/sdcard emmc@fat /devices/platform/goldfish_mmc.0 /devices/platform/mtk-sd.0/mmc_host
dev_mount sdcard2 /mnt/ext_card auto /devices/platform/goldfish_mmc.1 /devices/platform/mtk-sd.1/mmc_host

7. Replace sdcard with ext_card and ext_card with sdcard in those two lines.

8. Again navigate to system/etc change the name of the current vold.fstab file to vold.fstab.old (backup).

9. Paste the new edited vold.fstab file there and long press on it you will get a menu from there change the permissions to "rw_r_ _r_ _" this is important.

10. Reboot the system.

11. If you want to restore changes, delete the edited vold.fstab file and rename the vold.fstab.old file as vold.fstab and reboot.

All the best.

Pages