लेखकराव आणि ज्ञानपीठ

Submitted by वरदा on 27 April, 2015 - 00:54

तर, ज्ञानपीठ सोहळा पार पडला. श्री. भालचंद्र नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन!

एक बंडखोर नव्या दमाचा मूर्तीभंजक लेखक ते रा.रा. पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोच्च पुरस्कार आनंदाने स्वीकारून फर्ड्या इंग्रजीत भाषण करणारे देशीवादाचे कट्टर पुरस्कर्ते मा. श्री. लेखकराव असा प्रवास वाटेत जनस्थान पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार इ. थांबे घेत घेत सुफळ संपूर्ण झाला.
(साहित्याचं नोबेल मिळायची शक्यता नसल्याने प्रवास संपूर्ण असं लिहिलं आहे)

नेमाडेंच्या साहित्याला पुरस्कार मिळू नये, ते महत्वाचे लेखक नाहीत, असं अजिबातच म्हणायचं नाहीये. पण एकूणच 'नेमाडेपंथ', त्यांच्या साहित्यिकांविषयीच्या पूर्वापारच्या भूमिका, विलायती आडातून भरलेले लेखनशैली/ नॅरेटिव्ह चे, देशीवादाचे पोहरे उदाहरणार्थ वगैरे भलतंच मनोरंजक आहे ब्वा!!

वि.सू. - कॉन्ग्रेस वि. भाजपा आणि इतर राजकीय विषयांवर अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत उणीदुणी काढणार्‍या मंडळींनी त्यांची गटारगंगा कृपया या धाग्यावर वहावू नये. इथे साहित्य, साहित्यिक भूमिका, विचारसरणी, तद्विषयक मतमतांतरे, मतभेद इ. असले तरी वैयक्तिक टीका न करता सभ्यपणे चर्चा करणे अपेक्षित आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेमाडे नेमके काय म्हणाले हे न ऐकताच प्रत्येकाची आपले मत मांडायची घाई पाहून मजा आली Happy
त्यांना आपण या कार्यक्रमात इंग्रजीमधून बोलत आहोत याची जाणिव होती. आणि याकडे पुरस्कार मिळतोय म्हणून त्यानी कसलाही कानाडोळा केलेला नाही. ते याविषयी नेमके हे बोलले :

We have developed a sense of acculturation. Where we believe that good things are possible only when they are acculturated, that is the seed comes from the outside.
... .. ..
Unfortunately this has taken away all the creativity from art, especially literature.
....
It requires racial intelligence. I believe that Hindu’s have that intelligence. And I believe that in sub-continent this intelligence will move and this acculturation will stop and we will have a reverse acculturation.

As our neighbor say 'After all we're slaves'. And after all slave culture dominates even today. You know the way I'm speaking in English is a sign of being slave. But that is supposed to be a necessary condition of a slave.

Next generation has to be more intelligent than this generation. Using a foreign language, foreign technique, foreign literary forms and revert to our own literary forms. This will require reverse acculturation. How that is to be done is a matter of conjecture.
..
That is my hope.

हा दुवा : https://youtu.be/8cEsu_dhcZs?t=34m35s

माझे वैयक्तीक मत आहे की देशीवाद मांडायला, तो लोकांपर्यंत पोचायला इंग्रजी लागते आहे हे कटू सत्य आहे. [खुप लोकांना नेमाडे केवळ रश्दींवरती टिका केली म्हणून माहिती आहेत.] वाद उकरून काढणे हा त्यातलाच प्रकार मला वाटतो. आपण दिवसेँदिवस आंग्रजाळलेले होत आहोत यावर किमान चर्चा तरी होणे अपेक्षित आहे. जी या कारणांमुळे घडते आहे.

नाहीतर इंग्रजी माध्यमे [कि ज्यांना आपण फार महत्वाची मानतो] देशी संस्कृतीला/हितसंबंधांना केवळ फाट्यावरच मारतात.

रावसाहेब कसब्यांनी लिहिलेला एक लेख काल प्रसिद्ध झाला -

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-nativism-by-dr-50497...

शैलीच्या प्रेमात पडलेल्यांना अनेकदा कादंबरीकाराचा मूळ हेतू दिसत नाही. नेमाड्यांच्या शैलीबाबत हे प्रकर्षानं जाणवतं. शैलीच्या प्रेमात पडणं खूप सोपं असतं, पण शैली हा काही उत्तम साहित्यिक होण्याचा निकष नव्हे.
नेमाड्यांच्या साहित्यातून जाणवणारा प्रतिगामी विचार आणि आयत्या समृद्धीवर ताव मारण्याचा लुच्चेपणा कसब्यांनी व्यवस्थित समोर आणला आहे.

Pages