नॅनो कार घेण्याचा विचार चालू आहे

Submitted by bvijaykumar on 25 April, 2015 - 11:31

नॅनो कार घेण्याचा विचार चालू आहे ते ही जुनी ... काय करावं ? का नवीच घ्यावी ? ... का दुसरी गाडी घ्यावी ... जमेल तसे मा र्ग द र्श न क रा वे ?

.....................................................................................................................................................

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑटोमॅटिक/ ऑटोगिअर = एएम्टी
शब्दशः एएमटी = ऑटो मॅन्युअल ट्रान्स्मिशन. उदा. सेलेरिओ.

अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशनः- यात क्लच पेडल नसते. वाहन चालविणे सुलभ. वाहनाला फक्त पी (पार्किंग) एन (न्युट्रल) डी (फॉरवर्ड ड्राईव) आर (रिवर्स ड्राईव) ग्रेडियंट १ व २ (चढाकरिता) हे मोड्स असतात. यातील

पी (पार्किंग) मध्ये वाहन हॅन्डब्रेक लावल्याप्रमाणे थांबते, मागेपुढे हलत नाही.
एन (न्युट्रल) मध्ये वाहन अ‍ॅक्सिलिरेटर पेडल दाबले तरी चाकांना गती देत नाही परंतु ढकलून मागे पुढे होऊ शकते.
डी (फॉरवर्ड ड्राईव) मध्ये वाहन अ‍ॅक्सिलिरेटर पेडल दाबले तर चाकाला गती येऊन पुढच्या दिशेने धावते.
आर (रिवर्स ड्राईव) मध्ये वाहन अ‍ॅक्सिलिरेटर पेडल दाबले तर चाकाला गती येऊन उलट दिशेने धावते.
ग्रेडियंट १ व २ (चढाकरिता) मध्ये जास्त टॉर्क निर्माण होऊन वाहन चढावर पुढच्या दिशेने धावते.

नेहमीच्या वाहनात आपण चढ चढत असता अचानक थांबावे लागल्यास वाहन न्यूट्रल मध्ये घेऊन ब्रेक दाबतो. मग पुन्हा पुढे जाण्याकरिता ब्रेकवर पाय तसाच ठेवून क्लच दाबतो आणि १ला गिअर टाकतो. त्यानंतर क्लच ब्रेक सोडून अ‍ॅक्सिलिरेटर दाबण्याआधीच वाहन मागे घसरू लागते कारण आपला पाय क्लचवर असतो. क्लच घाईने सोडल्यास वाहन बंद पडते. अर्थात सराईत वाहनचालकांना ही समस्या जाणवत नाही. तसेच अनेक वाहनचालक हॅन्डब्रेकचा खुबीने उपयोग करीत या अडचणीवर मात करतात. परंतु तरीही अनेक नवशिक्या वाहनचालकांना, स्त्रियांना आणि अपंग वाहनचालकांना (डावा पाय अधू असलेले) अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशनचा (एएमटी) फार उपयोग होतो.

What is the difference AT (Automatic Transmission) & AMT (Automated manual transmission). I drove AT but never tried AMT.

ए. एम. टी. म्हंजेच ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन
हे एटी व एमटी यांच्या मधले असते.

एएमटीची संरचना एटी एव्हढी गुंतागुंतीची नसते.
किनमत ही एटी पेक्षा कमी असते.
दोन ही प्रकार वापरले नसल्याने ड्रायविंग फीलींग बाबत माहित नाही.

चेतन सुभाष गुगळे, छान माहिती.

माझ्या माहितीप्रमाणे एटी अन एटीएम या दोघांचाही ड्रायव्हर इंटरफेस सारखाच असतो.

नॅनो ए एम टी (जेन एक्स) आलीय
मी घेणार आहे. (फक्त मला ते हिंजवडी मध्ये पीक बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये चालवायचे धाडस कुठूनतरी आणावे लागणार आहे Happy )

चेतनजी छान माहीती दिलीत.
नॅनोबद्दल आणखी माहीती असल्यास सांगा कृपया.

आयला हे एएमटी, बिएमडब्लुच्या स्टेपट्राॅनीक्स सारखा प्रकार आहे का? म्हणजे गाडी आॅटो किंवा स्टिकशिफ्ट दोन्ही प्रकारे चालवता येते?

मला एका ए एम टी गाडीच्या विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे, गाडी ऑटो शिफ्ट असते आणि ज्यांना गियरची सवय आहे त्यांच्यासाठी शो म्हणून स्तिक मॅप. (अर्थात खरेखोटे एक्स्पर्टस जाणोत)

@ पाषाणभेद ,

<< नॅनोबद्दल आणखी माहीती असल्यास सांगा कृपया. >>

माझ्याकडे मे २०१४ चे एल एक्स मॉडेल आहे. काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:-

  1. इंजिनाचा आवाज बाहेरच्यांना जाणवतो, आतल्यांना नाही.
  2. इंजिन मागे असल्याने चाकांवर त्याचे वजन जाणवते. कधी जर वाहन रस्त्याच्या खाली उतरले आणि पुन्हा रस्त्यावर चढवायचे असेल (साधारण ६ इंचाचा फरक) तर समस्या निर्माण होते कारण मागल्या चाकांनाच गती आणि नेमके त्या चाकांवरच इंजिनाचा भार येतो.
  3. इंधन टाकी फक्त १५ लिटरची आहे.
  4. वाहन चालवायला सोपे आहे. पॉवर स्टीअरिंग नसले तरीही फिरवायला त्रास होत नाही कारण पुढच्या चाकांवर इंजिन नसल्याने भार येत नाही.
  5. ए/सी ची क्षमता चांगली आहे. मस्त थंडावा निर्माण होतो.
  6. पुढच्या दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांना असलेल्या ए चॅनेल्समुळे शहरातील गर्दीच्या वाहतूकीत थोडी समस्या निर्माण होते कारण बाजूचे दुचाकीचालक किंवा खांबासारखे इतर अडथळे पटकन दिसत नाही. सराईत वाहनचालकांना हे जाणवणार नाही परंतु नवशिक्यांकरिता हे काहीसे त्रासदायक आहे. ओम्नीची सवय असल्याने नॅनोत मला हा त्रास जास्त जाणवतो, कारण ओम्नीच्या खिडकी काचांना असले चॅनेल्स नाहीत. इंडिका सारख्या वाहनांना असे चॅनेल्स असतात परंतु नॅनोचे चॅनेल्स जरा जास्तच मोठे आहेत.

याशिवाय अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे चाकांना फक्त तीनच बोल्ट्स लावलेले आहेत. सहसा कार प्रकारातली वाहनांची चाके चार बोल्ट्सनी जोडलेली असतात. टेम्पो ट्रॅक्स टाऊन अ‍ॅन्ड कन्ट्री सारख्या मोठ्या वाहनांत आणि माझ्या एलएमएल सिलेक्ट टू दुचाकीची चाके तर प्रत्येकी पाच बोल्ट्सनी जोडलेली आहेत. जास्त बोल्ट्सनी सुरक्षितता वाढते. टाटा मोटर्सने नॅनोची किंमत कमी करण्याकरिता तर ही काटकसर केली नाही ना? जर या दृश्य वैशिष्ट्यामध्ये अशी काटकसर केली आहे तर आतील न दिसणार्‍या भागांमध्ये काय केले असेल अशी शंका मनात डोकावते.

चेतन सुभाष गुगळे, नवशिक्या ड्राइवर्स साठी ( पक्षी माझ्यासाठी )चांगली आहे का नॅनो ते सांगा . मला सिटी टू सिटी साठी हवि आहे म्हणजे ऑफिस टू घर साठी. स्वतंत्रपणे गाडी पहिल्यांदा चालवानार आहे

जाई.
वाहन अतिशय दाट गर्दीच्या रस्त्यावरून चालविणार असाल तर काहीशी कठीण आहे. दाट गर्दी म्हणजे कशी तर पुणे शहर व परिसरात असते तशी.

कल्पना करा -

तुम्ही पुणे विद्यापीठाकडून पुणे रेल्वे स्थानकावर जात आहात. तुमच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना वाहनांची रांग आहे. शिवाजीनगर चौकात तुम्ही सिग्नलच्या आधी उजव्या मार्गिकेत उभ्या आहात. सिग्नल चालु झाल्यावर तुम्ही पुढे निघालात आता ज्यांना जंगली महाराज रस्त्यावरून येऊन मुंबई पुणे रस्त्यावर वळायचे आहे अशी बरीच वाहने तुमच्या उजवीकडून येऊन डावीकडे जातील. तसेच सिग्नलला थांबलेल्या तुमच्या डाव्या बाजुला असलेल्या वाहनांपैकी ज्यांना जंगली महाराज रस्त्यावर वळायचे आहे अशी बरीच वाहने तुमच्या डावीकडून उजवीकडे होतील. तुम्हाला मात्र वाहन सरळ मधल्या मार्गिकेत ठेवायचे आहे आणि भुयारातुन पुढे रेल्वेस्थानकाकडे न्यायचे आहे. हे वाटते तितके सोपे नाही. अर्थात पुण्यात इतर अनेक चौकांत तर याहूनही भीषण परिस्थिती आहे. अशा वेळी डाव्या व उजव्या बाजूची तुमच्या निकटची वाहने जी मार्गिका बदलत आहेत (विशेषतः दुचाकी) ती तुम्हाला स्पष्टपणे दिसणे गरजेचे आहे. या दिसण्यात वाहनांच्या दरवाजाच्या खिडकीवर असलेल्या ए चॅनेल्सचा अडथळा जाणवतो. हे चॅनेल्स मारुती ओम्नी व जुनी मारूती ८०० वगळता इनोव्हा, इंडिका व्हिस्टासारख्या इतर अनेक वाहनांमध्ये आहेतच. टाटा नॅनोत हे चॅनेल्स जरा जास्तच बटबटीत आहेत. जर तुम्ही चांगला सराव केलात व वाहनाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बाहेरच्या आरशांवर (जे नॅनोकरिता अतिशय उत्तम आहेत) घारीसारखी सावध नजर ठेवलीत आणि वेग वाढविण्यात जराही उतावळेपणा दाखविला नाहीत तर ह्या समस्येवर दोन महिन्यांत (रोज अंदाजे २० किमीचा सराव = एकूण १००० किमी) मात करू शकाल. अर्थात प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण प्रचलित असली तरी बर्‍याचदा वाहन चालविण्याच्या बाबतीत प्रॅक्टीस मेक्स वुमन निग्लिजिअंट असा प्रत्यय आलेला आहे. तेव्हा पुढे कितीही चांगला सराव झाला तरीही नॅनो किंवा इतर कुठलेही वाहन शहरी गर्दीत चालवित असताना ठळक केलेल्या सूचनेबाबत अजिबात बेसावध राहू नका अन्यथा दुर्घटनेची शक्यता जास्त.

सराव होण्याकरिता सुरुवातीचे दोन महिने जुनी मारूती ८०० चालविल्यास क्लच - ब्रेक - अ‍ॅक्सिलिरेटरचे उत्तम जजमेंट येईल पण नंतर पुन्हा साईड चॅनेल्समधून बघण्याची सवय होण्याकरिता नॅनोवर ५०० किमीचा सराव गरजेचा राहील.

वरच्या समस्येवर मात केल्यावर मग फारसे सामान नसेल (कारण डिकी नाही), लांबचा प्रवास नसेल (कारण इंधन टाकी लहान आहे) आणि वाहनाची मागील चाके कधी रस्त्याच्या खाली उतरणार नाही याची काळजी घेतलीत (चाकावर इंजिनाचा भार आहे) तर टाटा नॅनो वाहन चांगले आहे.

हाच सर्व अभ्यास करून निरीक्षणे नोंदविण्याकरिता मी मागील वर्षी हे वाहन विकत घेतले. सुमारे चार हजार किमी चालवून माझी सर्व निरीक्षणे नोंदविली आहेत. आता मला हे वाहन विकायचे आहे. तुम्हाला विकत घ्यावयाचे असल्यास संपर्क साधावा.

जाई, मी गेल्या वर्षी आधी गाडी घेतली आणि "मग" शिकले. चेसुगु ह्यांचे मुद्दे बरोबर आहेत पण तरीही ते सगळे वाचून घाबरून जाशील. त्यामुळे आत्ता एवढा विचार करू नकोस. हळूहळू शिकत शिकत चालवत रहा. सगळे जमेल. Happy मीही खूप घाबरट आहे तरी आता सराईतपणे चालवते आहे. गर्दीतही शांतपणे चालवली तर कोणतीच गाडी अवघड नाही व वाईट चालवली तर कितीही चांगली गाडी वाईटच हे लक्षात ठेव.

गुगळे, सुमेधा थॅंक्स।

<<<<गर्दीतही शांतपणे चालवली तर कोणतीच गाडी अवघड नाही व वाईट चालवली तर कितीही चांगली गाडी वाईटच >>>>>> exctly ! वेग वगैरे आकर्षण नाही मला. सुरक्षितपणे गाडी चालवुन स्वताचा व इतरांचा जीव धोक्यात न घालणे याला प्रथम प्राधन्य . तू म्हंटतेस तस सरावाने सराईतपणा येईल .

गुगळे, माझ प्राधान्य नव्या कोर्या गाड़ीला आहे

जाई,
जिथे सर्व नियम धाब्यावर बसवून कोणत्याही लेन मध्ये वळणारी आणि चुकीच्या बाजूने भरधाव गाडी हाकत जाणारी माणसे असतात तिथे कितीही बेस्ट कॉलम व्हिजीबलिटी वाली गाडी पण धोक्यात, पण आपली बाजू सांभाळून डोके शांत ठेवून चालवली की अवघड नाही. (मला व्हिजीबलिटी चा प्रश्न फक्त शेजारच्या सीट वर कोणीतरी बसून पुढे वाकलं असेल तरच येतो, एरवी नाही.) आणि नव्या उमेदवारांसाठी विशेष म्हणजे जन विरोधाला न बधणे. सुरुवातीला विशेषतः कॅब ड्रायव्हर आणि पांढरा ब्रासो शर्ट आणि सोन्याच्या दणदणीत चेन मंडळी भरपूर हॅरॅस करतात वेग कमी असल्याने, त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देणे. भरधाव वेगाने रागाने बघत सतत हॉर्न वाजवत बाजूने पुढे जाणे इ.इ. (मी घाबरवत नाहीये, मीही सध्या नवशिकी च.)

सुरुवातीला विशेषतः कॅब ड्रायव्हर आणि पांढरा ब्रासो शर्ट आणि सोन्याच्या दणदणीत चेन मंडळी भरपूर हॅरॅस करतात >>>>याना गुन्ठामन्त्री म्हणतात.

जाई, नवीनच गाडी घ्या. आमच्या जवळच्या नातेवाईकाच्या वेडेपणामुळे आमच सेकन्डहॅन्ड गाडीत लाखाचे नुकसान झालेय.:अरेरे:

अनु, मुंबईत तशी बऱ्यापैकी ट्रैफिकला शिस्त आहे. पोलिसमामा असल्याने पाळली जाते . घाबरले वगैरे नाही .

हो रश्मी, मी नवीनच गाड़ी घेणार आहे. सेकंडहैण्ड गाड़ी कॉन्सेप्ट पचनी पडली नाहीये

ते गुंठामंत्री प्रकरण ऐकून आहे. मुंबईमध्ये पाहिली नाहीत . पुण्यातल्या मित्रमण्डळीकडून किस्से ऐकले आहेत.
बाकी हा बाफ वाहता का झालाय

अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशन गिअरच्या नॅनोची किंमत किती आहे? (पुणे ऑन रोड) चेतनजी वाहनमास्टर आहेत.

नॅनोमध्ये AT, AMT प्रकार आहेत काय? शहरात AT, AMT यांची गरज जास्त आहे काय?

धन्यवाद.

@ पाषाणभेद,
<< चेतनजी वाहनमास्टर आहेत. >>
धन्यवाद, चारचाकीवाहन चालविण्याचा माझा अनुभव जरी १२ वर्षे असला तरी मी आजवर विविध प्रकारची चारचाकी वाहने चालविलेले एकत्रित अंतर केवळ ५०,००० किमीच भरेल. तसेच दुचाकी वाहनांवर जवळपास १ लाख किमी अंतर ताडले आहे. माझ्या माहितीतले कित्येक जण इतक्या कालावधीत ५ ते ७ लाख किमी अंतर कापून मोकळे झाले आहेत. तेव्हा वाहनमास्टर ह्या उपाधीपासून मी दूरच आहे. निरीक्षण व अभ्यासाची आवड आहे व वेळ मिळेल तसे ते करीत असतो.

<< नॅनोमध्ये AT, AMT प्रकार आहेत काय? >>

मी विकत घेतले तेव्हा नव्हते. आता आहेत.

<< शहरात AT, AMT यांची गरज जास्त आहे काय? >>

गरज वाहनचालकांवर अवलंबून असते. कुशल वाहनचालकाला नेहमीचे मॅन्युअल गिअर्सवालेच वाहन जास्त चांगले. इतरांकरिता ही गरज का? ते माझ्या पहिल्या प्रतिसादात नमूद केले आहे. वाहून जायच्या आत वाचून घ्यावे.

<< अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशन गिअरच्या नॅनोची किंमत किती आहे? >>

मी गेल्या वर्षी मॅन्युअल ट्रान्समिशनचे वाहन विकत घेतले ते ऑनरोड सव्वादोनलाख रुपयांत (चिंचवड पासिंग) पडले. नव्या अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशन गिअरच्या नॅनोची किंमत तुम्हाला ९५६१११२८१२ या क्रमांकावर कळू शकेल.