नाईफ पेंटिंग

Submitted by विनार्च on 24 April, 2015 - 05:11

घरात सापडलेली प्लास्टिकची बटर नाईफ निमित्त झाली, लेकीच्या अंगात पिकासो संचारायच Happy

IMG_20150423_152859-001.jpg2015-04-024_1.jpg

माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर
कॅन्व्हास पेपर

(फक्त झाड ब्रश वापरुन काढल आहे बाकी पूर्ण चित्र नाईफ वापरुन रंगवलय.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर! तुझ्य लेकीच्या या कलागुणांत उत्तरोत्तर वाढ होवो... ही अत्यंत स्वार्थी प्रार्थना!

हे चित्रं खरंच कुठल्याही मोठ्या कलाकाराच्या नावे खपेल.
रंगांची काय जाण आहे तुमच्या मुलीला.

वॉटरमार्क जरा बदलणार का?
रसभंग करतोय तो भला मोठा वॉ मा.

आता स्वतःची अशी एक सिग्नेचर तयार करायला सांगा. प्रत्येक कलाकृतीवर ती दिसली पाहिजे. पुढे ती सही, तिची ओळख होणार आहे.

म्हणजे नक्की काय? काय केले नाईफने? >>> नाईफवर रंग घेउन कागदावर फासले आहेत तिने

बी , ललिता-प्रीति, मुग्धमानसी खूप आभार Happy

हो दिनेशदा आजच तयार केलय तिने स्वताच्या सहीच टेन्सिल.... गणपतीची एक सिरीज करतेय त्यासाठी.
साती वामाबदलायचा प्रय्त्न करते ..

अतिशय सुंदर काढलेय. खुप खुप शाब्बसकी अनन्याला.

सध्या सुट्टीत अजुन काय करतेय? (चित्र काढण्याव्यतिरिक्त?? ) Happy

हा ठिक आहे का वामा ? दुसर्‍या चित्रातला

सध्या सुट्टीत अजुन काय करतेय? (चित्र काढण्याव्यतिरिक्त?? )>>> उनाडक्या सुरु आहेत... दुपारच्यावेळात डॉल हाऊसच काम सुरु असत ...रोज एक एक फर्निचर बनतय .. आता पर्यंत बेड, खूर्ची, डायनिंग टेबल तयार झालय....
कारखाना सुरु राहीला तर फायन प्रोडक्ट टाकू इकडेच Proud

Pages