सर्वकाही ठीक आहे

Submitted by संतोष वाटपाडे on 21 April, 2015 - 08:37

"सर्व काही ठीक आहे" वावड्या उठतात हल्ली
माणसेही मेंढरागत आंधळी दिसतात हल्ली...

जीव आहे तोवरी तू मंजुरी कर्जास द्यावी
सबसिड्या तर आमच्या मयतासही मिळतात हल्ली..

तू भुकेपोटी जवळ येता मुकी मी रोज होते
त्यामुळे संवाद रात्री आपले नसतात हल्ली..

ही मराठी अस्मिता का एवढी नाजूक झाली
बदलता सत्ता तिलाही हादरे बसतात हल्ली...

फ़क्त स्त्रीने बाळगावी लाज असला नियम जरका
पुरुष सारे संस्कृतीच्या आड का लपतात हल्ली...

सौख्य तर भरपूर आहे झोपही भरपूर येते
मात्र अंगाला बिछाने रेशमी रुततात हल्ली...

द्रौपदीची लाज सावरण्या हजर असतोस तू जर
सांग दुःशासन तुझ्या राज्यात का चळतात हल्ली...

वेदना हा विषय मी गजलेत नाही घेत.. कारण
लोक माझे दुःख ऐकुन मस्करी करतात हल्ली...

कोणताही धर्म हिंसा मित्रहो शिकवीत नाही
धर्म नावावर तरी का दंगली घडतात हल्ली..
-- संतोष
https://www.youtube.com/watch?v=7SHpTSjNIlg

https://www.youtube.com/watch?v=rFkbTTmHxNE

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीव आहे तोवरी तू मंजुरी कर्जास द्यावी
सबसिड्या तर आमच्या मयतासही मिळतात हल्ली..

व्वा.